Monday, February 22, 2010

एक वर्ष सरले पण......(1st Birthday)

या नावाकडे बघून हा कुठला सिनेमा असा प्रश्न नक्कीच मनात आला असेल तुमच्या. पण अहो, यावेळेस सिनेमाचे परीक्षण लिहिण्याच्या ऐवजी, मी ब्लॉगच्या जन्माविषयी लिहिते आहे.

उच्च शिक्षण घेण्याची जबरदस्त इच्छा. त्यामुळे गरीब (जगातील इतर लोकांच्या मते) देशातील पण सुखवस्तू राहणी मान सोडून इथे, अमेरिकेत , श्रीमंत(?) देशात गरीब होऊन राहिलो. सुरवातीचे काही दिवस इथल्या सगळ्या नवीन गोष्टी समजावून घेण्यात, परत अभ्यासाची गोडी लावून घेण्यात गेले. अभ्यासाची गोडी परत लावून घेणे असे म्हणणेच योग्य होईल, कारण १५ वर्षाने परीक्षा, आणि अभ्यास सुरु होणार होते. त्यातून इथल्या लोकांचे बोलणे समजून घ्यायला बरेच कष्ट घ्यावे लागले. इथली Transport System अत्यंत खराब. तुमच्याकडे गाडी असली तर तुम्ही इथे राहू शकता. इथे अन्न, वस्त्र आणि निवारा अश्या तीन गरजा मी लहानपणी शिकले होते , पण गाडी हि चौथी गरज असते हे इथे आल्यावरच कळले. गाडी नसल्याने कुठे फिरता पण येत नव्हते. गाडी शिवाय इथे काही करता येणार नाही याची कल्पना होतीच. नशिबाने इथे गावात फिरणारी एक Local Bus आहे. पण ती रविवारी बंद असेल अशी कल्पना नव्हती. त्यामुळे कुठे फिरण्यात वेळ जाण्याचा प्रश्नच नव्हता.

अगदी नवीन असल्याने, त्यातून , लग्न होऊन मुलं असलेले विद्यार्थी म्हणजे इतर विद्यार्थ्यांची इतकी पटकन मैत्री होणे पण कठीण. त्यामुळे वेळ कसा घालवावा हा एक मोठाच प्रश्न होता. त्यातून भारताची सारखी आठवण यायची, त्यासाठी सिनेमा बघण्यासारखा दुसरा चांगला उद्योग नाही. अश्या विचाराने दर आठवड्याला एक सिनेमा बघणे असा उद्योग सुरु झाला. Bollywood चे आपण त्यासाठी अगदी आभार मानायलाच हवेत.

आधी कुठला सिनेमा बघावा, तो कसा असेल, कलाकार कोण याचा शोध घेणे. मग हा बघावा कि तो याची चर्चा करणे. मग आम्ही तिघे आपापली आवड ठरवणार, मग सिनेमा बघणार. कधी कधी सिनेमाचे नाव छान वाटतंय, कलाकार छान आहेत, पण सिनेमा एकदमच तद्दन आहे, असे जाणवू लागले. आणि दर वेळेस इतका शोध घेऊन पण नीट Review किंवा थोडक्यात कथा सापडायची नाही, इतकेच नाही तर, हा सिनेमा माझ्या १० वर्षाच्या मुलीबरोबर बघावा कि नाही हे देखील समजेना. शिवाय इतके सिनेमे एकावर एक बघायला लागल्यावर आधी बघितलेल्या सिनेमाची स्टोरी पण विसरू लागलो. अर्थात ती स्टोरी विसरली तरी आयुष्यात काही फरक पडणार नव्हता, पण आपण इतका वेळ घालवतो आहोत, सिनेमा बघण्यात तर त्याची गोष्ट सारांशात लिहावी असा विचार मनात आला. थोडक्यात याचा उपयोग इतर लोकांना देखील होईल असा वाटले. माझ्या या विचारला माझ्या नवऱ्याने अगदीच पाठींबा दिला. आणि हा ब्लोग लिहिण्याची कल्पना अस्तित्वात आली.

मला "ब्लोग म्हणजे काय" इथपासून शिकणे आवश्यक होते. प्रथम अगदी १० वाक्यात सिनेमाची गोष्ट लिहू लागली. एक दोन review लिहिल्यावर असे वाटले कि आपला ब्लोग जरा झकपक करायला हवा, मग त्यात अजून चांगली Templates टाकली. काही Widgets टाकली. आपल्या ब्लोगला कोण आणि कुठून भेट देतात, ते समजावे म्हणून अजून काही Widget टाकली. काही दिवसाने, नुसते Text लिहिले तर मज्जा येत नाही असे वाटून त्या सिनेमातील काही चित्र टाकायला सुरवात केली. काही काही सिनेमाची चित्र कुठेच सापडत नसत, मग सिनेमा सुरु असताना Screen Capture करून चित्र टाकायला सुरवात केली. असा माझ्या ब्लोगचा १ वर्षाचा प्रवास आहे. सुरवातीला अगदी १-२ लोक भेट द्यायचे. मग हळूहळू संख्या वाढू लागली. सुरवातीला फक्त नातेवाईक, मित्र यांनाच ब्लोगची लिंक पाठवली. सुरवातीला त्यांनी नियमितपणे बघितले, पण नंतर त्यांच्या Visit पण कमी होऊ लागल्या. आपण हे लिहितो ते लोकांनी बघावे असे वाटू लागले आणि marathiblogs.net हि Site सापडली. माझा ब्लोग त्यांच्या नेटवर्कमध्ये गेला होता. त्यामुळे खूप लोक भेट द्यायला लागले. आता रोज निदान १० - १५ लोक भेट देतात.

दर आठवड्याला १ सिनेमा टाकायचा असे सुरवातीला ठरवले होते, त्याप्रमाणे सुरवातीला प्रयत्न केला आणि त्याप्रमाणे केले देखील. पण मग जसे जसे शिक्षणातील व्याप वाढू लागले, परीक्षा जवळ आली, तसतसे परीक्षण लिहियाला वेळ मिळायचा नाही. त्यामुळे मग कधी कधी १०-१५ दिवसाने लिहिले. ब्लोग सुरु केला तेव्हा वाटले होते कि मी फक्त मराठी व हिंदी सिनेमाबद्दलच लिहीन पण तसे झाले नाही. मी हिंदी सिनेमा बद्दल एकही परीक्षण लिहिले नाही, पण बऱ्याच इंग्लिश सिनेमाबद्दल लिहिले. पूर्वी मला इंग्लिश सिनेमा बघायला लागली कि झोप यायची, पण आता इंग्लिश सिनेमा देखील छान असतात असे वाटू लागलाय. मराठीमध्ये तर गेल्या काही वर्ष्यापासून खूपच छान सिनेमे येऊ लागले आहेत. त्यामुळे मराठीच जास्त बघणे होतात. काही काही इंग्लिश सिनेमे माझ्या मुलीला दाखवायला हवे म्हणून बघितले, तसेच काही मराठी सिनेमे देखील. आता या ब्लोग वर एकूण ३५ परीक्षणे लिहिली आहेत. त्यातील मला आवडलेले सिनेमे म्हणजे, नितळ, आम्ही असू लाडके, सावली, टिंग्या, चेकमेट, कदाचित, रात्रआरंभ, चकवा, Cast Away , The next karate kid, Its a wonderful life . अगदी वेळ वाया गेला असे म्हणजे लालबागचा राजा, मुंबईचा डबेवाला, मी नाही हो त्यातला. काही काही विनोदी सिनेमे चांगले आहेत, उदाहरणार्थ, धुडगूस, निशाणी डावा अंगठा. यात नुसतेच विनोद नाही तर विनोदातून खूप गंभीर विषय हाताळले आहेत.

आतापर्यंत लिहिलेल्या सिनेमाविषयी इथे एकत्रित लिंक दिली आहे.

आता माझ्या ब्लोगने १ वर्ष्याचे बाळसे धरले आहे. आणि त्यावर तुम्हा सारख्या सगळ्या वाचकांनी मनोमन प्रेम केले आहे. तुमचे असेच प्रेम माझ्या ब्लोगला मिळावे व मला अजून बरेच सिनेमा बघण्याची व त्यावर लिहिण्याची प्रेरणा मिळावी अशी इच्छा आहे.

5 comments:

  1. ब्लॉगच्या प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

    ReplyDelete
  2. Va chan lihile aahes. Abhinandan for completeing one year!

    ReplyDelete
  3. many many belated wishes for on blog's birthday .we expect to get nice reviews .

    ReplyDelete