2004 लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
2004 लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, मार्च ०१, २०११

एक उनाड दिवस (Ek Unad Divas)


 विश्वास दाभोळकर अतिशय शिस्तीत राहणारा माणूस. याला फक्त एक मुलगा असतो. विश्वास दाभोळकरांना वेळेवर न येणारी माणसे, जेवताना वचावचा खाणारी माणसे, चहा बशीत ओतून फुरफुर करत पिणारी माणसे, अजिबात आवडत नाहीत. आणि दाभोळकर घराण्यात म्हणे क्रीम किंवा अगदी शुभ्र पांढरा शर्टच घातला पाहिजे असा नियम. दाभोल्कारांचा वाढदिवस असतो, त्यादिवशी, त्यांची बायको, मुलगा हे दोघे त्यांना एक खूप छान पुष्पगुच्छ देतात. आणि गिफ्ट म्हणून एक खूप छान रंगीत शर्ट देतात. पण विश्वास दाभोळकर, अगदी इस्त्री केलेल्या चेहरा ठेवून हातात फुलांचा गुच्छ घेतात. शर्टचा रंग बघून मात्र त्यांचा तोल सुटतो. ते खेकसतात कि हा काय रंग आहे. मला हा शर्ट अजिबात नको आहे.

वाढदिवसाच्या दिवशी दाभोळकरांना एक मोठी ऑर्डर मिळणार असते. त्यासाठी दिल्लीहून मोहनलाल म्हणून एक व्यक्ती दाभोळकरांना १० वाजता भेटायला येणार असते. आज वाढदिवस म्हणून बायकोला वाटत असते कि यांनी आज घरी राहावे. पण विश्वासला काही ते मान्य होते नाही. मात्र संध्याकाळी त्यांच्या व्यवसायातील सगळ्यांना एक पार्टी मात्र ठेवलेली असते. दाभोळकरांना त्यांची बायको म्हणते कि मी एक लेख वाचला त्यात असे म्हटले आहे कि तुम्ही जर वर्षातून एक दिवस जरी तुमचे रुटीन सोडून वेगळ्या विषयावर, वेगळ्या माणसांना भेतानात तर तुमचे आयुष्य ५ वर्ष्यांनी कमी होते. पण या सगळ्यावर दाभोल्काराचा अजिबात विश्वास नसतो. त्यामुळे ते हट्टाने ऑफिसला जातात.

ऑफिसला जाताना ड्रायव्हर उशिरा येतो, त्यामुळे त्याच्यावर खेकसतात. व स्वताच गाडी घेऊन जातात. मोहनलाल खूप उशिरा येतो. हे वैतागतात. पण त्यांच्या व्यवसायातील पार्टनर अग्रवाल त्यांना शांत राहून मोहनलाल बरोबर व्यवहार करायला सांगतात. मोहनलाल अपेक्षेपेक्षा जास्त पैश्याची ओर्देर घेऊन येतो. दुपारी जेवण झाल्यावर दाभोळकरांना म्हणतो कि मला तुमची गाडी आजच्या दिवस द्या, तुम्ही तक्षिने परत जा. दाभोळकर गाडी मोहनलालच्या ताब्यात देऊन टक्सी पकडायला जातात, तर नेमका त्यांचा संप सुरु असतो.

त्यामुळे विश्वास दाभोळकरांना चालत जाण्याशिवाय पर्याय राहत नाही. असेच जात असताना त्यांचा बालपणीचा मित्र भेटतो. हा मित्र आता बराच म्हातारा दिसू लागलेला असतो, त्यामुळे दाभोलकर त्याला ओळखत नाहीत. पण हा मित्र मात्र ओळखतो, आणि मग त्याच्या आयुष्यातील गोष्ट ऐकता ऐकता दाभोळकरांना खूप आश्चर्य वाटते, कि इतका कमी पगार असून देखील हा माणूस स्वप्नं कशी काय बघू शकतो. तर दाभोळकर त्यानंतर कोणा-कोणाला भेटतात त्यांचा दिवस कसा जातो हे बघा "एक उनाड दिवस" मध्ये.

सिनेमा तसा छोटा आहे. सामान्य माणसाच्या आयुष्यातील काही चांगले प्रसंग या सिनेमात घातले आहेत. जीवनाकडे एका नवीन दृष्टीने बघण्याचा आनंद मात्र हा सिनेमा निश्चित देतो. अशोक सराफची अक्टिंग मस्तच आहे. त्याचा आधीचा इस्त्री केलेला चेहरा आणि नंतरचा विनोदी अशोक सराफ दोघेही आवडले. सिनेमात बरेच कलाकार थोड्या थोड्या वेळासाठी येतात, छोट्या छोट्या गोष्टींसाठी. पण सगळ्या गोष्टींमध्ये सुतुत्रता आहे. विनोदी सिनेमा आवडत असेल तर हा सिनेमा बघायला हरकत नाही.

तुमच्या प्रतिक्रिया जरूर लिहा.

The movie begins with Birthday of Vishwas Dabholkar. Vishwas is a very disciplined person, and can not tolerate people getting late for official business, people not adhering to etiquettes. He is living a routine life with certain norms pf his own,like he will were only White or creme colored shirts only. On his birthday, his wife and only son, greet him in the morning with a beautiful bouquet. He accepts it with a ironed face. On the breakfast table, they also present him with a nice shirt which is bright colored. At this point he looses his patience and shows his anger saying the color of the shirt is totally unsuitable and he is not going to wear it at all. But his wife mentions him that this color suits him well.

It was an important day for him in the office. He is working on a big deal for his company and is expecting a client visit to discuss about the order in his office at 10, so he in his usual morning rush. His wife feels he should take off from work and relax, do something different on the day and rewind. But Vishwas belives only in routine life and hard work. As a formality he has agreed for a party in the evening for his office mates and friends. His wife tells him that she recently read an article mentioning if one lives bit differently one day in year, he will feel younger by five years. Vishwas does not believe in such things and just ignores it.

As he gets ready and comes out of the house, his driver is not on time for work. On arrival driver gets good scolding form Vishwas, and with anger Vishwas tells him to be at home and help his fife and takes the car and leaves. After reaching office, he had to wait foe the Client Mohanlal for a log time. He starts loosing patience, but his boss Agrawal helps him calm down and receive Mohanlal with a smile. Vishwas is plesently surprised by Mohanlal's order of much higher amount than expected and without any negotiations. As Mohanlal has come all the way from Delhi, Vishwas takes him for lunch in a nice restaurant. After the lunch, Mohanlal requests Vishwas for his car for the day and Vishwas could not deny, and decides to take a taxi back to office. As he reached the nearest Taxi stand, he learns there is Taxi strike on that day.

Upset Vishwas starts walking towards his office which was not really too far. But in recent years Vishwas has not really walked on busy streets like this. He bumps on one of his friends on the way. For a while Vishwas could not recognize his friend, because he was meeting him after years. This person has a very simple and low paying job. He is not even able to afford to keep his family with him in Mumbai, and staying in a small rented place. But he seems to be enjoying the life and Vishwas is surprised to see his friend dream with such a small income and meager life compared to him. After this he meets several people in his journey through the day and spends the day a bit of off track. Do watch in the movie "Eak Unad Diwas".

This a small movie with a different flavor. It touches so many incidence you and me might come across in our day to day life. But it definitely adds a different perspective to out thinking. Ashok Saraf is really good as usual. The initial serious and later jovial role is really depicted well by him. There are several actors in small roles, but the only significant role in the movie is Ashok Saraf. It is a must watch for Comedy and Ashok Saraf fans.

Please do write your comments on the movie and the review.

Cast
  • Ashok Saraf अशोक सराफ
  • Viju Khote विजू खोटे
  • Sudhir Joshi सुधीर जोशी
  • Ila Bhate इला भाटे
  • Phaiyyaj फैयाज
  • Ravindra Berde रवींद्र बेर्डे
  • Shahaji Kale शहाजी काळे जयवंत वाडकर
  • Vijay Gokhale विजय गोखले
  • Janardan Lavangare जनार्दन लवंगारे
  • Arun Hornekar अरुण होर्णेकर

Director

Link to watch online 

मंगळवार, सप्टेंबर १४, २०१०

गोड गुपित (God Gupit)

दिनकरराव जोशी, पुण्याला त्यांच्या उतार वयात एकटेच राहत असतात. यांना मुले, मुलगी. मुलगा अमेरिकेला, तर मुलगा मुलगी भारतात, पुण्याबाहेर स्थायिक झालेले. दिनकररावांचे मुलांकडे राहण्याचे तत्व. त्यामुळे पुण्याला त्यांना एकाकी आयुष्य जगावे लागत असते. पण तरी ते त्यात आनंदात असतात. कारण त्यांना त्यांच्या मित्र मंडळींची सोबत असते, त्यात त्यांना नाट्यसंगीताची आवड असते. त्यामुळे सारखी गाणी ऐकत असतात, आणि जिथे कुठे शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम असेल तिथे जातात.

त्यांच्या ७० वा वाढदिवस जवळ आलेला असतो, त्यासाठी त्यांची सगळी मुलं पुण्याला एकत्र येऊन वाढदिवस साजरा करायचा ठरवतात. या मुलांची, मुले-मुली अशी एकूण नातवंडे दिनकररावांना असतात. सगळेजण घरी आल्यावर घर अगदी भरून जाते. दिनकरराव तसेच त्यांची सगळी मुले, आणि नातवंड खूपच पसारा घालत असतात. तो आवरता आवरता घरात काम करणाऱ्या शोभाताईंना नाकी नऊ येतात. सगळ्या नातवंडांचे आजोबांवर खूप प्रेम असते. त्यात ही मुलं आजोबांची डायरी वाचतात त्यात त्यांना दिनकर रावांची बरीच गुपित कळतात. दिनकररावांना कुत्रा हा प्राणी आवडत असतो, पण पाळलेला नाही. त्यांना नाट्यसंगीत आवडत असते, घरातील एकटेपण त्यांना दुखी करत असते. पसारा करायला आवडतो, पण आवरायला नाही. हे सगळे वाचल्यावर सगळी मुलं ठरवतात की आता आजोबांसाठी आजी शोधणे गरजेचे आहे.

सगळ्या नातवंडांची आजी शोध मोहीम सुरु होते. सकाळी उठल्यावर सगळी मुले घराबाहेर पडतात, आणि चांगल्या वाटणाऱ्या म्हाताऱ्या बायकांच्या मागे जातात, विशेषता ज्या बायकांना गाण्याची आवड असते अश्या. बऱ्याच मजे-मजेशीर आज्या भेटतात. काहींची लग्न झालेली असतात, काही आधी ठीक वाटतात, मग वेड्या निघतात वगेरे वगेरे. मग अचानक त्यांना एक अनाथालय चालवणारी आजी भेटते, उषाताई केळकर. ह्यांच्या कडे ३०-४० मुलं असतात. अनाथाश्रमात वाढलेली, पण आता मोठी झालेली, मधुराणी, आदेश हे दोघे असतात. हे तिघे मिळून हे अनाथालय चालवत असतात. उषाताई उर्फ माई यांना पण नाट्यसंगीताची आवड असते, मुख्य म्हणजे दिनकरराव आणि माई यांच्या आवडी जुळतात. आता नातवंड ठरवतात की या दोघांची वारंवार भेट घडवून आणायची, जेणेकरून त्या दोघांना एकमेकांबद्दल जिव्हाळा, आपुलकी, प्रेम वाटेल. आणि हे सगळे घरातील मोठ्यांपासून लपवून करायचे. कारण घरातील मोठे कदाचित या सगळ्या गोष्टीला नकार देतील. मुलं बऱ्याच काही क्लुप्त्या काढून या दोघांना जवळ आणण्याचा प्रयत्न करतात. पण शेवटी त्यांच्या प्रयत्नांना यश येते का ?, घरातील मोठी माणसे मुलांच्या या उपक्रमाला साथ देतात का ? दिनकररावांचे एकाकी पण संपते का? हे बघा "गोड गुपित" या सिनेमामध्ये.
सिनेमा मला स्वताला काही खूप आवडला नाही. कथानक जरी जरा गमतीशीर असले, तरी मनावर एकदम पकड घेत नाही. सिनेमात बहुतेक सगळे नवीन कलाकार घेतले आहेत. त्यामुळे सगळ्यांची अक्टिंग अगदीच सुमार आहे. रीमा लागू आणि दिलीप प्रभावळकर असून देखील हवा तितका प्रभाव पाडू शकलेले नाहीत. आजी शोधण्याच्या मोहिमेत ज्या गमती जमती दाखवल्या आहेत त्यात हसू मात्र नक्की येते. सिनेमातील नाट्यसंगीत ठीक आहे. एकूण सिनेमा बोअर या पठडीतील आहे असे म्हणीन. पण लहान मुलांना कदाचित आवडू शकतो.

तुम्ही सिनेमा बघितला असल्यास, बघितल्यानंतर किंवा मी लिहिलेल्या परीक्षणावर तुमच्या प्रतिक्रिया अवश्य लिहा.
Dinkarrao Joshi, is an senior citizen staying in Pune in his own bungalow. He is retired, has two sons and a daughter. One son is settled in US and other two in Bangalore. Because all his children are away, he is leading a lonely life. Fortunately he is an active person with senior citizen's groups. He has passion for classical music and a special liking for "Natya Snageet". So he is enjoing life.

As he is turning 70, all his children and grand children decide to come together and celebrate his birthday. This would also give them opportunity to spend some time together. And also is possible they want to convince him to join them rather than staying alone. All the family consisting of 3 children, 3 spouses and 7 children, land up in Pune. All are having gala time there. Poor Shobhatai, their household maid is having tough time keeping the house in order. All the grandchildren love Dinkarrao very much.

Grandchildren realize that though he is pretending to be very happy, he tends to feel very lonely at times. They all consult among themselves, and decide that best thing to do will be find a partner for Dinkarrao, that is a grandmother. So children list his likings and also question him indirectly to find a right match for him.

Grandchildren secretly start the search mission. They meet very interesting characters in the process. FInally they meet a very loving and caring lady Ushatai. She is running an orphanage with help of Adesh and Madhu. She is taking care of 30-40 children in the place called rightly as "Savli". So children explore more find out that most of the likings are matching with Dinkarrao. Both are fans of "Natya Sangeet". Children make sure that they get to meet more often. They had a tough task in front of them since they have to do it all without letting their parents know about it.

Watch the movie "God Gupeet"to find out if they are successful, if the get support for the elders, could they find solution to Dinkarrao's loneliness.

The movie is not really a must watch but okay type. Deelip Prabhavalkar and Reema Lagoo are good, but they do not have much scope in the roles. Most of the remaining actors are not as good. Some parts are hilarious specially when the kids are desperately looking for a prospective Grandmother. Kids may like the movie, but may not impress most of the elders.

Do write your comments about the movie as well as review.

Cast
  • Dilip Prabhavalkar दिलीप प्रभावळकर
  • Reema Lagu रीमा लागू
  • Monali Pingale मोनाली पिंगळे
  • Vikram Acharya विक्रम आचार्य
  • Mayuresh Dhamankar मयुरेश धामणकर
  • Atharv Limaye अथर्व लिमये
  • Ankita Jog अंकिता जोग
  • Sarthak Mangaokar सार्थक माणगावकर
  • Sakshi Tendulkar साक्षी तेंडूलकर
  • Deepak Damale दीपक दामले
  • Ragini Churi रागिणी चुरी
  • Prasad Phanase प्रसाद फणसे
  • Shubha Prashant Godbole शुभा प्रशांत गोडबोले
  • Ashish Dhuri आशिष धुरी
  • Sunanda Dhuri सुनंदा धुरी
  • Aadesh Bandekar आदेश बांदेकर
  • Madhuri Golhale - Prabhulkar मधुराणी गोखले - प्रभुलकर

Direction
  • Pramod Prabhulkar प्रमोद प्रभुलकर

मंगळवार, नोव्हेंबर २४, २००९

चकवा (Chakwa)


तुषार खोत एका अमेरिकन कंपनी मध्ये प्रोजेक्ट मॅन॓जऱ म्हणून नोकरी करत असतो. त्यांच्या कंपनीला भारतातील एका कंपनीचे प्रोजेक्ट मिळतं. भारतात मिळालेले प्रोजेक्ट कोकणात असत. त्या कंपनी मध्ये Production खूप कमी होत असतं, तर ते इतके कमी का होतंय ह्याची पाहणी करण्यासाठी तुषार खोत भारतात परत येतो. तुषारचे वडिलोपार्जित घर पण त्याच गावात असते. त्याचे आई व बाबा पुण्याला असतात. वडील जगात नसलेल्या व्यक्तींशी बोलू शकत असतात. आणि हाच त्यांच्या अभ्यासाचा विषय असतो. तुषारचा या सगळ्या गोष्टीवर अजिबात विश्वास नसतो. त्यामुळे त्याचे वडिलांशी अजिबात पटत नाही. आई एका आश्रमात काम करत असते. या आश्रमात मनोरुग्ण, मतीमंद आणि अनाथ मुले यांचा सांभाळ केला जातो.

तुषार जेव्हा भारतात येतो तेव्हा कोकणातील स्वताच्या घरातच राहतो. आणि तिथूनच सुरु होतो, भुताचा खेळ. कोकणातील घर रघुनाथराव परचुरे ह्यांच्या देखरेखीखाली असते. रघुनाथराव म्हणजे गावातील मोठी असामी. ते जरी व्यवसायाने वकील असले तरी त्यांचे इतर बरेच उद्योग असतात. कंपनी मधला मॅन॓जर "चौधरी" हा, कंपनीच्या मालकाचा (चव्हाण) यांचा मेहुणा असतो. आणि चव्हाण साहेब अमेरिकेत स्थायिक झालेले असतात.



तुषार कंपनी मध्ये नक्की काय घोळ होतोय हे तपासण्यासाठी दिवसाची रात्र करतो. रात्री काम करत असताना त्याला अचानक कोणीतरी त्याच्या शेजारी येतंय असा त्याला भास व्हायला लागतो. असाच एका रात्री उशिरा पर्यंत काम करत असताना त्याला किंचाळंल्याचा आवाज येतो.

नक्की काय होतंय ह्याचा शोध घेता घेता त्याला काही दिवसानंतर कळते कि जान्हवी पानसे, हि घरात एकटीच आहे. आणि तीच रात्री अपरात्री किंचाळत असते. हिला सगळ्या गावाने वाळीत टाकले आहे. तुषार खोत तिच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करायला लागतो, तेव्हा रघुनाथराव त्याला त्यापासून सारखे परावृत्त करण्याचा प्रयत्न करतात.

कंपनी मध्ये होत असलेला घोळ, सारखे कोणीतरी शेजारी आहे, हा भास, यामुळे तुषार खोत भंडावून जातो. व मानसिकतज्ञ डॉ. विनायक राजगुरू यांच्याकडे सल्ला घ्यायला जातो. तुषारला कंपनी मधील घोळ सापडतो का?, त्याला होणारे भास खरे असतात का? शेवटी भूत खरच आपल्यासमोर येते का हे जाणून घेण्यासाठी बघा "चकवा"



नावाप्रमाणेच हा सिनेमा आपल्याला चकवतो. सिनेमातील सगळीच पात्र महत्वाची आहेत. आणि सगळ्यांनी उत्तम काम केले आहे. सिनेमाचा शेवट पण अनपेक्षितच होतो. सिनेमातील संगीत सलीलचे आहे आणि गाणी संदीपची आहेत. "अजून उजाडत नाही ग" खूपच छान आहे. अतुल कुलकर्णी नेहमीच त्याच्या भूमिकेला न्याय देतो, मग तो हिंदीत काम करीत असो कि मराठीत. दीपा परबने देखील चांगले काम केले आहे. "परचुरेची बायको" अमिता खोपकर हिचे देखील काम चांगले आहे. हिला अगदीच कमी वेळ सिनेमात काम आहे. पण ते देखील अगदी महत्वाचे आहे. सिनेमातील अनेक धागे हिच्यामुळेच पुढे सरकतात. "परचुरे" चा खलनायक तर उत्तमच आहे. एकूण हा सिनेमा बघण्यासारखा आहे. कंटाळा नक्कीच येणार नाही, भूत, आत्मा असा जरी विषय असला तरी त्याची गोष्टीमध्ये चांगली सांगड घातली आहे.





Tushar Khot is an management consultant working in United States. He is originally from a small village in Konkan, but his parent settled in Pune. His father's expertise is in ghosts and is able to communicate with them. His mother is working with a social organization, which runs a orphanage for mentally retarded and mentally disturbed children.

Tushar gets a consulting opportunity to work with a company based in his village, and he accepts it. The problem is unusually low production in the company, with all the machinery and supply chain doing well. The company product is canned fruits. Since Tushar has his own ancestral house in the village, he decides to stay there.



On reaching the company, he meets Chaudhari, who is manager of the company and also brother in law on the owner Chavan. Chavan is settled in United States and has contracted Tusahr for the job. Raghunath Parchure is caretaker of Tushr's house. Raghunath is Lawyer by training but had several business in the village like Soft Drinks Dealer, Transportation, runs a canteen, and board member of the company too. He is a well respected person in the village.

Tushar starts looking at the job at hand, and get involved with it. He is not finding any problem in the company after working hard and long hours. During this time, he feels that he is always being followed by someone. He also hears mysterious shoutings from his neighborhood. He locates that as a house next to his and approaches it, but a girl bluntly denies to accept his help. Later on he finds out the girl is Janhavi Panse, who is kind of socially deserted by the village. After initial resistance, Janhavi becomes friendly with Tushar and reveals her story to him.

His feeling of someone always following him and seeing a person who disappears without a trace, is building lot of stress on him. Tushar consults Dr. Vinayak Rajguru for his problems.

Is Tushar finally successful in pointing out the problem in the company? What really is behind his illusions of a person following him, or at times seen by him?

Atul Kulkarni has played really nice role of Tushar Khot. All other characters are played well too. Movie has music by Sandeep Khare and Dr. Saleel Kulkarni, which is very nice. Though I am not a fan of mystery movies, I thoroughly enjoined this movie, so I would recommend all to watch this.




Cast
  • Atul Kulkarni अतुल कुलकर्णी
  • Deepa Parab दीपा परब
  • Pradip Velankar प्रदीप वेलणकर
  • Mukta Barve मुक्ता बर्वे
  • Suhas Palashikar सुहास पळशीकर
  • Amita Khopkar अमिता खोपकर
  • Sandesh Kulkarni संदेश कुलकर्णी
  • Vidyadhar Joshi विद्याधर जोशी

Director
  • Jatin Satish Vagle जतीन सतीश वागळे

Sangeet / Geet
  • Sandeep Khare संदीप खरे
  • Salil Kulkarni सलील कुलकर्णी


Link to watch online

सोमवार, जून १५, २००९

सैल (Sail)

वादळी वारा, मुसळधार पाऊस सुरु असताना विद्याधर आडोसा शोधात असतो आणि अचानक त्याची विद्याशी गाठ पडते. विद्याला बघून विद्याधर चाट पडतो. या बाईशी आपली अशी घाठ पडेल असे त्याला स्वप्नात पण वाटले नसते. राजकारणात पडून नावाजलेली आणि अनुभवी झालेली विद्या जीव मुठीत धरून लपते आहे हे समजल्यावर त्याला खूपच आश्चर्य वाटते. पैश्याच्या मागे लागलेला विद्याधर प्रोफेसर झाला आहे हे समजल्यावर विद्या पण चमकते. पैश्याचा लोभ आणि राजकारणाचा मोह यामुळे कुटुंबाची कशी दैना झाली, हे प्रेक्षकांसमोर येते. एका गोजिरवाण्या कुटुंबाची ताटातूट होते. जरी दोघे दूर असले तरी दोघांचे एकमेकांवरचे प्रेम कमी झालेले नाही याचा साक्षात्कार दोघांना झाल्यावर दोघे नव्याने आयुष्य सुरु करायचे ठरवतात. वादळ ओसरल्यावर एकत्र घरी जाण्याचे ठरवतात, तितक्यात राजकारणातील काही उलाथापालाथीत पुन्हा विद्याचा जयजयकार सुरु होतो. आता या निर्णायक क्षणी विद्या काय करते हे बघा "सैल" मध्ये.

या सिनेमात फक्त दोनच पात्र आहेत. संपूर्ण सिनेमा रात्रीतून उलगडतो. भूतकाळ फक्त बोलण्यातून कळतो. त्यासाठी फ़्लँशबँक चा उपयोग केलेला नाहीये. मोहन जोशी आणि रीमा लागू यांच्या अभिनय सुंदर. फार वेगळा सिनेमा आहे असे मी म्हणणार नाही. मोहन जोशी आणि रीमा लागू तुम्हाला आवडत असल्यास हा सिनेमा जरून बघा. बघितल्यावर पश्चाचाताप होणार नाही याची खात्री आहे.

Cast:
  • Reema Lagoo रीमा लागू
  • Mohan Joshi मोहन जोशी

Direction :
  • Gajendra Ahire गजेंद्र अहिरे

Vidyadhar meets vidya accidentally while looking for shelter, when his car breaks down in a thunderstorm in outskirts of the city. He approaches a nearby farm house and convinces the security guard to let him in till storm subsides. This a very interesting drama unfolded within just these two characters Vidyadhar and Vidya. They are separated husband and wife meeting after several years. Both had great ambitions, Vidyadhar wants to make lot of money while Vidya is interested in politics. Vidya was hiding in the farm house due to some political problem.

Their life stories in reveled in the course of their conversations in the whole night. The difference from other movies is, not a single flashback is used and still the movie remains interesting binding the viewers to their chairs. The movie ends with the breaking of dawn with a unexpected twist. Very good acting by both Reema and Mohan Joshi. If you like drama, do not miss this movie.




शुक्रवार, मे ०८, २००९

अगो बाई अरेच्चा (Aga Bai Arecha)



"ह्या बायकांच्या मनात असते तरी काय?" असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हा चित्रपट पहाच. कथानक अगदी साधे. चित्रपटाचा नायक रंगा एक मध्यमवर्गीय चाळीत रहाणारा, घरात आई, वडिल, आजी, बहिण व बायको. वडिल कधीच बोलत नाहीत. त्यामुळे घरात कायम चार बायकाच बोलणार, ऑफिस मध्ये बॉस पण बाईच, आणि ती पण जरा खडूस. त्यामुळे एकुणात बायकांवर वैतागलेल्या रंगाच्या मनात येते कि आपल्याला बायकांच्या मनातील समजले तर किती बरे होईल.

एक दिवस देवी च्या मंदिरात असताना खरच त्याला सर्व बायकांच्या मनातील ऐकू यायला लागते. आणि मग सुरुवातीला त्याचा उडालेला गोंधळ फारच मजेशीर आहे. नंतर त्याला याचा खूपच त्रास होऊ लागतो आणि तो डॉक्टर ला भेटतो. सुरुवातीस डॉक्टर बाईंचा विश्वासच बसत नाही. पण मग जेव्हा त्यांच्या मनातील सर्व तो घडाघडा सांगतो तेह्वा त्या पण चक्रावून जातात आणि शेवटी सल्ला देतात कि माझ्याकडे काही उपचार नसल्याने तू याचा काही चांगला वापर करून घेऊ शकलास तर पहा. आणि मग रंगाचे जीवनच बदलून जाते.

प्रथम बायकोला तो हे समजावून देतो आणि तिला हे गुपित ठेवायला सांगतो. मग घरातील आई, बहिण व आजी यांच्या मनातील गोष्टी करतो किंवा त्यांना समजाऊन सांगतो. त्यामुळे त्यांची उडालेली गम्मत चांगली दाखवलेली आहे. आधी वडिलांचा राग करणारा रंगा आईच्या मनातून त्यांची बाजू समजाऊन घेतो आणि त्यांच्याशी चांगला वागू लागतो. त्याचप्रमाणे ऑफिस मधील बॉस व इतर महिलांशी वागण्याचा पण दृष्टीकोन बदलतो.

यानंतर मात्र थोडा मसाला चित्रपटात येतो, हा टाळला असता तर चांगले झाले असते. परंतु एकुणात संजय नार्वेकरचा एक छान मराठी चित्रपट म्हणावयास हरकत नाही. यातील "मन उधाण वार्याचे" गाणे खूपच छान आहे. याची मुळ कल्पना "What Women Want" वरून घेतली आहे असे म्हटले तरी चित्रपट चांगला जमला आहे   पाहण्यासारखा आहे. आपल्या प्रतिक्रिया जरून लिहा.

Ago Bai Arechha concept is said to be borrowed from Hollywood "What Women Want", but has charm of its own. Ranga is a simple person resident of Mumbai Chawl. He has Father, Mother, Sister, Grandmother and Wife in his family. His father hardly speaks, so he always has to face the remaining four ladies in the house. In the office too, majority of ladies staff and his lady boss.  He is fed up of dealing with all the ladies in his life and wonders if he could understand their minds...

One day he actually starts hearing what all the ladies in his surroundings are thinking. There starts the comedy and tragedy of his life. Initially he finds ot very difficult to deal with, even tries to consult a Doctor. But no one could help him deal with miracle. The Doctor suggests he should try and utilize this rather than worry about it, and this changes his life.

Typical Bollywood masala like item song and terrorist twist etc. is there, but in spite of that the movie is worth watching I would say. Please do leave your comments.

Cast :