Wednesday, January 22, 2014

पाऊलवाट (Paaulwaat)


अनंत देव एका छोटाश्या गावात करीत असलेली चांगली नोकरी सोडून मुंबईला गायक बनण्यासाठी येतो. तो एक उत्तम गायक असतो. आता मुंबईला एक मोठा गायक बनण्याचे त्याचे स्वप्न असते. अर्थात मोठा गायक बनण्यासाठी त्याला खूप प्रयत्न करावे लागतील व सुरवातीला बऱ्यापैकी अपयश येऊ शकते याची त्याला कल्पना असते

मुंबईत त्याच्या मित्राच्या मदतीने त्याला एका वयस्क बाईकडे पेयिंग गेस्ट म्हणून राहण्यास जागा मिळते. या बाईंना सगळे लोक आक्का म्हणत असतात. आक्कांना कोणीच मुलं बाळ नसतात. नवरा तरुण वयातच गेलेला असतो. त्यामुळे तसे बघितले तर सगळे आयुष्य दु:खात गेलेले असते. जरी आक्कांना पूर्वायुष्यात काहीच सुख मिळालेले नसते, तरी आक्का प्रेमळ असतात, तसेच त्यांची शिस्त कडक असते. आक्कांच्या शेजारीच नेने म्हणून एक वयस्क गृहस्थ राहत असतात. त्यांची मुलगी एका पंजाबी मुलाबरोबर पळून गेलेली असते आणि सध्या त्यांच्याकडे त्यांची भाची राहायला आलेली असतेअनंताचा रोज सकाळी उठून काम शोधायला बाहेर पडत असतो. तिथे एका संगीतकाराकडे त्याला उस्मानभाई म्हणून एक सारंगी वादक भेटतो. हा उस्मान भाई त्याच्या काळी खूप प्रसिद्ध लोकांबरोबर काम करून नावाजलेला असतो. पण त्याचा आयुष्यातील संघर्ष काही अजून संपलेला नसतो. उस्मान भाईला आजच्या काळातील संगीत ज्या दिशेला जाते आहे त्याबद्दल खूप त्रास होत असतो. पण त्यांचा नाइलाज असतो. अनंतचे गाणे ऐकून त्यांना खूप छान वाटते. शिवाय अनंतचे गुरु हे उस्मानभाईला ओळखत असतात. त्यामुळे त्यांना अनंतबद्दल थोडे जास्त प्रेम असते.

अनंतला एका संगीतकाराकडे आरत्या म्हणण्याचे काम मिळते. पण त्या आरत्यांच्या चाली व त्याचे संगीत बघून अनंत त्याला नकार देतो. तेव्हा तो संगीतकार म्हणतो कि तू स्वत: पैसे खर्च कर व स्वताचा अल्बम काढ. त्या अल्बम मध्ये खूप चांगले संगीत देईन पण सध्या जे काय संगीत चालते त्याप्रमाणे या आरत्यांच्या चालीच योग्य आहेत. अनंतकडे काही पैसे नसतात त्यामुळे तो पुन्हा कामाच्या शोधत फिरू लागतो. आता इतके दिवस काहीच काम न मिळाल्याने त्याच्याकडील पैसे देखील संपत येतात

नेन्यांची भाची रेवती हिच्याशी मात्र अनंतची चांगली मैत्री जमते. शिवाय एका सेवाभावी आश्रमाचे काम बघणाऱ्या संचालकांची देखील अनंतशी चांगली मैत्री होते. आक्कांना देखील अनंतबद्दल प्रेम वाटू लागते. शिवाय अनंतला काम मिळावे, त्याच्या आयुष्यात चांगले व्हावे अशी त्यांची इच्छा असते. अश्यातच अनंतला एका नवोदित संगीतकाराकडे काम करण्याची संधी मिळते. या निमित्त्याने तो खूप आनंदात असतो. रेवती देखील त्याला काम मिळणार म्हणून खूप आनंदित होते. पण अनंतच्या आयुष्यातील संघर्ष अजून संपलेला नसतो. त्या अल्बम काढणाऱ्या कंपनीला नवोदित गायक व नवोदित संगीतकार अश्या दोघांची जोडी असलेला अल्बम काढायचा नसतो. त्यामुळे अनंतचा पत्ता कापला जातो. अश्या अकल्पनीय अपयशानंतर त्याला अजून काय काय भोगावे लागते हे बघा "पाऊलवाट या सिनेमात.

सिनेमाची कथा जरी पठडीतील असली, तरी सिनेमा बघताना कंटाळा येत नाही. आक्कांची भूमिका खूप छान साकारली आहे. नेने आणि आक्का यांच्या मधील संवाद ऐकायला खूप मज्जा येते. सगळीकडे अपयश आल्यानंतर, अनंतला आता तरी यश लाभू दे अशी प्रेक्षकांना देखील प्रार्थना करावीशी वाटते. एकूण सिनेमा चांगला या विभागात मोडता येईल. सिनेमा बघावाच असे मी म्हणणार नाही, पण सुबोध भावे आवडत असल्यास हा सिनेमा तुम्हाला नक्की आवडेल.

Anant Dev is a singer, who is aspiring to make career in Mumbai as an artist. He quits his job in his town, takes his savings to establish himself in Mumbai. He is prepared to go through the initial struggle, to establish himself and the time required to do that. He has a friend in Mumbai who helps him find a place, as a paying guest in a nice home. The owner, who is known as Akka. Akka is alone, has no children and lost her husband in early age. She has gone through hardships in life, but she is still a loving lady. She is strict with her rules though. Her neighbor Mr. Nene is an elderly man. His daughter has married a Punjabi guy, not liked by Mr. Nene. But now his niece is staying at his place, who has a job in Mumbai.

Anant is trying hard for a singing assignment. He starts early in the morning everyday and meets different musicians and music directors for work. He meets Usmanbhai an artist who has done some really good music assignments in his younger age, but still struggling to make his ends meet in today's world. According to him, the struggle in life never ends. Usmanbhai is not really happy with the way the music industry working in recent times. But he has no control over it. Anant links to Usmanbhai very quickly for two reasons. First both are good artists and care art more than money. Second Usmanbhai know his Guru and has witnessed his Guru perform several years back.

Finally Anant gets a offer to sing. But that is to sing Aarati (devotional songs) on some modern fast beat tunes. Anant hates this type of copy music and rejects the offer. The music director likes Anant, so tries to convince him. But finally he tells Anant the reality of life. He too hates this type of music but does it to sustain himself, in a hope of getting to do some quality work once in a while. He tells Anant to raise some money and make an album of his own. He also promises to support him in that mission. Since Anant does not have sufficient money, he gets back to his everlasting search for work. And now he is running out of his savings too.

Revati, who is niece of Nene has become very good friend of Anant. He has also made friends with a director of a non profit organisation who is doing good social work for orphans. Akka has also liking Anant and she is praying for him. She is a well wisher of Anant now. During this time, Anant gets a contract with a upcoming music director. This news make both Anant and Revati very happy. But it still does not end Anant's struggle in music industry. Final moment, just before the recording, Anant get the news of his removal from the recording, the company does not want to take risk on both new music director and the singer, so they get an established singer in place of Anant. What all Anant has to struggle and will he continue in this or go back to his town and start working on job for survival, watch in "Paaul waat".

The story line of the movie is fairly run of the mill type. But the execution is fresh and does not get boring at any time. Akka is really done well and the conversations between Nene and Akka are really interesting and entertaining. Audience gets involved in the story and finally starts praying for Anant to get a good contract. Overall the movies is good, though not a must watch in general, if you are Subodh Bhave fan, it will be unavoidable for you.

Cast
 • Subodh Bhave सुबोध भावे
 • Jyoti Chandekar ज्योती चांदेकर
 • Kishor Kadam किशोर कदम
 • Madhura Welankar - Satam मधुरा वेलणकर- साटम
 • Anand Ingale आनंद इंगळे
 • Hrushikesh Joshi हृषिकेश जोशी
 • Abhiram Bhadkamkar अभिराम भडकमकर
 • Vijay Kenkare विजय केंकरे
 • Vaibhav Tatvawadi वैभव तत्ववादी
 • Seema Deo सीमा देव

>Director
 • Aditya Ingale आदित्य इंगळेLink to watch online