Sumitra Bhave लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Sumitra Bhave लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, सप्टेंबर २८, २०१०

दहावी फ (Dahavi Pha)

02 
 रावसाहेब पटवर्धन शाळेत (किंबहुना कुठल्याही शाळेत) वर्ग मुलांच्या कुवतीनुसार निर्माण केलेले असतात. त्यात मुख्यत्वेकरून "" तुकडी हुशार मुलांची तर बुद्दू मुलांची तुकडी "" असा एक अलिखित नियमच आहे. तशीच "दहावी " हि रावसाहेब पटवर्धन शाळेतील मुलांची तुकडी. या तुकडीतील मुले, हि गरीब आई-बापांची, ज्यांना पोटापाण्याची सोय लावण्यासाठी होण्याऱ्या कामाच्या रगाड्यात मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नसतो अश्या गरीब आईबापांची असतात. दहावीच्या सहामाही परीक्षेत इतर तुकडीतील सगळी मुले चांगल्या मार्कांनी पास होतात तर दहावी मधील फक्त मुले अतिशय कमी मार्कांनी सगळ्या विषयात पास होतात इतर मुले नापास झालेली असतात.


आधीच निकाल खराब लागलेला, त्यात तुकडीतील एक मुलगा, तुकडीतील मुलाला चिडवतो. त्यात सगळी तुकडीच एकमेकांशी भांडायला लागते. आता या भांडणात नक्की कोणाची चूक हे समजून घेता, चूक तुकडीतील मुलांचीच असणार असा शिक्षकांचा समज होतो आणि ते तुकडीतील सगळ्या मुलांना ५० रुपयांचा दंड ठोठावतात. या सगळ्या प्रकाराने तुकडीतील मुले खूप चिडतात रागाच्या भरात शाळेत तोडफोड करायचा निर्णय घेतात.



एके दिवशी रात्री व्यवस्थित प्लान करून मुले शाळेतील प्रयोगशाळेवर हल्ला करतात. त्यांना रस्त्यावरील एक मुलगा मदत करतो. शाळेत तोडफोड तर करतात, पण त्या तोडफोडीत सामील असलेल्या "सिद्धार्थ जाधव" नावाच्या मुलाची ओळख दुसऱ्या दिवशी शाळेतील शिपायाला पटते. आता एक मुलगा तुकडीतील आहे असे कळल्यावर सगळी मुले तुकडीतील असणार असा सगळ्यांचा विश्वास बसतो. प्राचार्य पोलिसांकडे तक्रार करण्याचे ठरवतात.



शाळेत गणित शास्त्र शिकवणारे शिक्षक गणेश देशमुख हे मात्र तुकडीतील मुलांना मिळण्याऱ्या वागणुकीवर खुश नसतात. त्यांना या मुलांबद्दल तितकेच प्रेम असते, जितके त्यांचे तुकडीतील मुलांवर असते. ते मुलांना प्रेमाने विचारतात कि अशी नासधूस का केलीत? पण सुरवातीला मुले नीट उत्तरे देत नाहीत. पण जेव्हा मुलांना खात्री पटते कि देशमुख सर चांगले आहेत तेव्हा हि मुले सगळे खरं खरं सांगतात. मग या तोडफोडीची प्रायश्चित्त म्हणून सगळी उपकरणे मुलांनी स्वताच्या मेहनितीने भरून द्यायची असे ठरवतात. मुले पण त्याला होकार देतात. काही गोष्टी तर दुरुस्त करून वापरणे शक्य असते पण काही गोष्टी विकत घ्यायला लागणार असतात. या सगळ्याचा खर्च २५००० येणार असतो, तो खर्च सगळी मुले काम करून, पैसे जमा करून भरून देण्याचे ठरवतात. आता या मुलांना या सगळ्यात यश येते का ? या मुलांना इतर शिक्षक आणि विद्यार्थी समजून घेतात का हे बघा "दहावी " मध्ये.

सिनेमा अतिशय उत्तम आहे. घरातील समस्त जनांना घेऊन बघण्यासारखा आहे. सिद्धेश जाधव ची आई देशमुख सरांबरोबर जे काही बोलते ते अगदी खरं आहे खूप विचार करण्याजोगे आहे. देशमुख सर त्यांच्या कॉलेजजीवनातील प्रसंग सांगतात तो खूप चटका लावण्यासारखं आहे. अतुल कुलकर्णीचा गणेश देशमुख खूपच छान, त्याचबरोबर ज्योती सुभाषची भूमिका पण अतिउत्तम. सिनेमातील सगळेच लोक आपापल्या परीने चांगली भूमिका करतात.

अगदी सामान्य वाटणाऱ्या मुलांमध्ये पण खूप काही चांगले गुण असतात, त्याची चांगली जोपासना करायला पाहिजे असा संदेश हा सिनेमा देऊन जातो. सिनेमा अगदी जरूर बघावा असाच आहे. तुमच्या प्रतिक्रिया जरूर लिहा.


Raosaheb Patwardhan School has sections of students in every class according to merit. Section A are all bright & studious student and Section F is all dull. This is the usual convention in most Indian schools. Same is the case with this 10th F of Raosaheb Patwardhan High School. Most of the students in 10th F class are from poor families, where parents have to work hard, and do not have time to pay attention to the kids.

In the mid term examination almost all the students from section A through E pass, but from section F only three pass with minimum passing scores and all others fail in one or more subjects. Because of this, school principal warns section F students, that unless they show improvement immediately, they will not be allowed to appear for the board examination. And we all know how important is Board Examination in India.



All the section F students are upset due to the poor results, and to add fuel to fire a boy from section A comments and teases section F boys. This leads to a fight in the school and the section F children were held responsible. They are all made to pay Rs. 50 fine, despite of their bad economic condition. Disturbed by this injustice, they decide to break open the school and take revenge.

Soon one of the nights, they make a plan and attack the school. They destroy several things, but main destruction was the science lab. One street boy also helps them in the process. While doing this, one of the watchman get small injury. But he recognizes one of the students in the gang. He identifies Sidhharth Jadhav of section F. Now since Sidhharth is from Section F, the authorities conclude that all the children of same section were in the gang. The principal decides to involve police in the incidence.


Ganesh Deshmukh, Science and Mathematics teacher is a balanced person, and he loves the Section F as well as section A. He takes initiative and intervenes. He convinces principal that involving police will have multiple implications and might earn bad name for the whole school. He starts talking to the section F students. Initially the students are reluctant to talk to him, but slowly they realize, he is really considerate and is caring for them. Finally the students confess and ask for his guidance.



Prof. Deshmikh strikes a deal with the children. To protect them from police complaint and other embarrassments they should earn money and rebuild all the things they broke. Also they can repair the things themselves if they can, to save some money. Total expenses are estimated to be Rs. 25,000. The students take the challenge and start working on it as a team. Can the students do it ? Do they get help from others ? Do they get help from teachers.? Do they accept this help.? To get answers to all these you should watch "Dahavi Pha. 



The movie is really good and I would recommend to all. This is an entertaining movie. Some conversations are really thought provoking. Conversation between Prof. Deshmukh ans Sidhharth's mother is one such. Prof. Deshmikh's incidence from his college is really touching. Atul Kulkarni is really good like most of his recent roles. Jyoti Subhash is good too. In general all the people have acted well, though many of the students are new actors.



This movie highlights the point, how ordinary looking kids have some good talent and skill, which just needs a bit of polishing and it glows. Do watch the movie if you have not. And do write your comments in the comments section below.


Cast

  • Atul Kulkarni  अतुल कुलकर्णी
  • Rajesh More  राजेश मोरे
  • Shreeram Ranade श्रीराम रानडे
  • Yashodhan Baal  यशोधन बाळ
  • Satish Taare सतीश तारे
  • Sunil Godase  सुनील गोडसे
  • Sampat Kambale  संपत कांबळे
  • Jyoti Subhash ज्योती सुभाष
  • Milind Gunaji मिलिंद गुणाजी
  • Renuka Daftardar रेणुका दफ्तरदार

Direction
  • Sumitra Bhave सुमित्रा भावे
  • Sunil Sukhthankar सुनील सुखटणकर



Link to watch online


Movie

शुक्रवार, मे २२, २००९

नितळ (Nital)




कथा आहे "नीरजा कौशिक" या एका अत्यंत हुशार डॉक्टरची. नीरजा जरी एक हुशार डॉक्टर असली तरीही तिचे आयुष्य इतके सरळ सोपे नसते. तिला डागाळलेल्या चेहऱ्याचा शाप असतो. तिला कोड असतं आणि ते मुखत्वेकरून चेहरा आणि हात यावर असतं. तिच्या हुशार, मनमिळावू, प्रेमळ स्वभावाच्या प्रेमात "अनन्या रानडे" पडतो. तो तिला बंगलोरहुन पुण्याच्या घरी घेऊन जातो आणि मग रानडेच्या कुटुंबात जे वादळ सुरु त्याचे यथार्थ चित्रण या सिनेमात केले आहे.

अत्यंत पुरोगामी विचाराचे रानडे खरंच किती पुरोगामी असतात याचे दर्शन होते. घरात बरीच मंडळी असतात. सगळ्या लोकांच्या नीरजाला बघून वेगवेगळ्या प्रतिक्रिया होतात. नीरजाला घरी आणेपर्यंत ठाम असलेला अनन्या , घरीतील लोकांचा प्रतिक्रिया बघून खूप confused होतो. काय करावे आणि काय करू नये अश्या संभ्रमात पडतो. पण रानडेच्या घरातील नवीन पिढी नीरजाला समजावून घेते आणि तिचा स्वीकार करायला तयार असते. सिनेमाचा शेवट मात्र खूपच आशादायक केला आहे.


सिनेमातील लोकांच्या प्रतिक्रिया अगदी बघण्यासारख्या आहेत. प्रत्येक माणसाच्या स्वभावानुसार प्रतिक्रिया असतात. रीमा लागू (अनन्याची आत्या), नीरजाला तिचे डाग लपवायला सांगते तर नीना कुलकर्णी (अनन्याची काकू), रानडेच्या घरात कसे सौंदर्याला महत्व देतात ते सांगते. काही लोक तिचा स्वीकार करायला तयार असतात, पण प्रत्यक्ष सांगत नाहीत. अगदी वेगवेगळ्या दृष्टीकोनातून लोकांच्या कोडावरील प्रतिक्रिया दाखवण्याचा सर्वांगसुंदर प्रयत्न केला आहे. दीपा श्रीराम (अनन्याची आजी) नीरजाला स्पर्शाने ओळखत असते, त्यामुळे तिच्या दृष्टीने सौंदर्य हे दृष्टीत नसून स्पर्शात असते. त्याप्रमाणे नीरजा सुंदरच असते. नंतर तिला आलेली दृष्टी नीरजाला कसे स्वीकारते ते खरंच बघण्यासारखे आहे. विचारवंत रानडेंच्या भूमिकेत (अनन्याचे आजोबा) विजय तेंडूलकर आहेत.

नीरजा तिच्या लहानपणातील काही प्रसंग जेव्हा सांगते तेव्हा खरंच हृदय द्रवते. देविका दफ्तरदार ची नीरजा मनाला खूपच भावते. तिने या भूमिकेला अगदी योग्य न्याय दिला आहे. सिनेमामध्ये खूपच मोठे कलाकार आहेत व ते आपापल्या भूमिकेत छान शोभून दिसतात. दिग्दर्शकाने कलाकारांची निवड अगदी योग्य केली आहे. सिनेमातील ३ गाणी खूपच सुंदर आहेत. ओठावर घोळत राहतात.

या सिनेमात कोडाविषयी जागरुकता निर्माण करणे व लोकांचे मन स्वच्छ करणे हा उद्देश जर असेल तर तो अगदी सफल झाला आहे असा मला वाटले. अगदी नावाप्रमाणेच सिनेमा "नितळ" आहे. सिनेमा खूपच सुंदर आहे, अजिबात चुकवू नये असा. मला अजून बरेचदा बघायला आवडेल.

सिनेमाच्या विषयावर, माझ्या परीक्षणावर आणि कोडाच्या समस्याबद्दल तुमची मते जरूर लिहा. तुमच्या प्रतिक्रियांची अपेक्षा आहे.




A very thought provoking and intriguing movie on vitiligo. This is a story of a young and intelligent doctor "Neeraja kaushik" whose life is not so easy going because of vitiligo. she has white patches on her hand and face. Doctor is very humane by nature. Ananya Ranade falls in love with Neeraja. Both are working together in Bangalore. Ananya invites Neeraja, who is ophthalmologist to his house in Pune on pretext of examining his grandmother.

Before seeing Neeraja, all family members are very supportive Ananya and Neeraja's relationship. Neeraja comes with carefully choosed presents for each family members. As everyone sees her with Vitiligo, their reactions change. Everyone is taken aback by Ananya choice. After a while, some of them provide solutions to her white patches, some of them reject idea of their relationships. But the younger generation becomes friendly and accepts Neeraja.

The dilemma among intellectual and socially forward "Ranade" family is depicted here strongly. People in the family shows different reaction as per their nature. Reema lagu, who is an actress, suggests Neeraja for makeover. While Nina Kulkarni, who is most beautiful daughter-in-law, tells Neeraja about Ranade's perspective towards their daughter-in-law. Deepa shriram, who is blind folded due to operation, knows Neeraja by touch. So she do not consider her as ugly. But when she starts seeing Neeraja, whether she accepts her or not... should be seen in the movie.

Director has chosen all the characters carefully. All the actors have given justice to their cast. A very good movie indeed. For Non-Marathi audience also, I feel it is worth watching with English subtitles. All the songs in the movie are good

Do share your thoughts on movie, my review and the social stigma of Vitiligo.




Director
Cast