Tuesday, October 12, 2010

मातीच्या चुली (Matichya chuli)

श्रीपाद दांडेकर आणि सुनंदा दांडेकर त्यांचा मुलगा विशाल दांडेकर यांचे एक त्रिकोणी कुटुंब. विशाल आता लग्नाच्या वयाचा झालेला. त्यात विशाल पूजा भोसलेच्या प्रेमात पडतो. विशालला मोठा प्रश्न पडतो की आईला कसे सांगायचे, त्याला पुजाशी लग्न करायचे आहे. त्यात त्याला साथ देतात त्याचे वडील श्रीपाद दांडेकर. पूजा भोसले म्हणजे मराठा आणि दांडेकर म्हणजे ब्राह्मण. आता जात हा एक तर अडसर असतोच. पण वडिलांची साथ असल्याने, आई मुलीच्या वडिलांना भेटायला तयार होते. भोसले मंडळींना भेटल्यावर लग्नाला दांडेकर मंडळी तयार होतात. नवीन नवीन असल्याने, सुनेचे कौतुक सुरु होते. पण जेव्हा सून लग्न करून घरी येते, तेव्हा चित्र पालटायला सुरवात होते. त्यात पूजा एक स्वतंत्र विचाराची, हुशार, धडाडीची मुलगी असते. हिला मोठ्या कंपनीत मॅनेजरची नोकरी असते. त्यामुळे सासू-सुनेचे उगाच छोट्या छोट्या कारणावरून खटके उडू लागतात. विशाल आणि श्रीपाद यांची मधल्या मध्ये पंचाईत होऊ लागते.श्रीयुत दांडेकर, सुनंदाला समजावण्याचा प्रयत्न करतात, पण तो फोल ठरतो. त्यात विशाल आणि पूजाचे एकदा भांडण होते. पूजा त्याला सोडून ऑफिसला निघून जाते, नंतर विशालला त्याची चूक कळते तो तिला गाठण्यासाठी म्हणून जोरात बाईक हाणतो, आणि अपघात होऊन हॉस्पिटल मध्ये दाखल होतो. आता विशाल बेशुध्द पडल्यावर, सासू-सुनेचे जरा पटू लागते. श्रीपाद दांडेकरांना वाटते की आता तरी घरातील संबध सुधारतील, पण नाही थोड्या दिवसातच "पहिले पाढे पंचावन्न" सारखी गत होते. घरात सारखे एक टेन्शन असते. त्यातूनच का काय, विशाल आणि पूजा जे काही ठरवतात, त्यांची खबर सुनंदा आणि श्रीपाद यांना बाहेरील लोकांकडून कळतात. शेवटी एका क्षणी ही दोन्ही जोडपी वेगवेगळे राहण्याचे ठरवतात. आता या वेगळ राहण्यात "सोय" असते की एकमेकांबद्दल असलेली "कुरबुर" त्यांना दूर करते, श्रीपाद आणि सुनंदा, वेगळे झाल्यावर कसे आयुष्य जगतात. हे बघा "मातीच्या चुली" या सिनेमामध्ये.सिनेमा उत्तमच आहे. हलकाफुलका सिनेमा आहे. जरी अगदी सामान्य विषयाभोवती हा सिनेमा गुंफला असला तरी, विषयाची मांडणी, त्यातील नात्यामधील संबध अगदी सुंदर रीतीने गोवले आहे. काही काही संवाद तर खूपच सुंदर आहेत. वंदना गुप्ते आणि सुधीर जोशी यांचा भूमिकेला तर तोडच नाही. मधुरा वेलणकर आणि अंकुश चौधरी पण त्यांच्या भूमिकेत उत्तम. हा सिनेमा सुधीर जोशींचा शेवटचा सिनेमा आहे. या सिनेमाचे शुटींग सुरु असतानाच त्यांना देवाज्ञा झाली, त्यामुळे या सिनेमात मधून मधून "श्रीपाद दांडेकर ", म्हणून आनंद अभ्यंकर येतात. आणि त्यामुळेच का काय या सिनेमात निवेदक ठेवून सिनेमातील कलाकारांची बदल सांधण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. सिनेमा बघावा असा आहे, संपूर्ण कुटुंबाला एकत्र बघण्यासारखा सिनेमा निश्चित आहे.

तुमच्या प्रतिक्रिया जरूर लिहा.Vishal Dandekar and his parents Shreepad Dandekar and Sunanda Dandekar are a small happy family. Vishal is working as executive and is planning to get married. He is in love with Pooja Bhosale also a executive in another company. Vishal is in dilemma how to convey this to his parents, specially his mother. His dad helps him in this. The reason for his dilemma was the cast, Dandekars are Brahmin and Bhosles are Maratha. But on Shreepad's request Sunanda decides to meet Bhosale family. And on meeting them Sunanda agrees for the marriage and the marriage take place making everyone happy.The newly wedded couple is enjoying the honeymoon phase of the life. Slowly things are settling to normal. Initially the new Daughter-in-law is pampered by all. Pooja is a bright, dashing and independent lady. She is already a manager in a good company. Slowly there are small issues arising between Sunanda and Pooja, The usual daughter-in-law and mother-in-law type issues. Vishal and Shripad are scape goats in between sometimes. They do now know how to deal with this situations.Shreepad tries to explain Sunanda that she needs to deal with Pooja tactfully and needs to understand the generation gap and accept certain things. But Sunanda is not that understanding lady. During this phase, Vishal and Pooja have some minor misunderstanding and fight. But Vishal realises his mistake very soon and tries to catch up Poojs who has left for the office on his bike. He meets with an accident and lands up in hospital. To take care of him, Pooja and Sunanda come together and start taking care of Vishal. Everyone hopes that the relations are improving now, but once Vishal is well and starts going to office, things roll back to normal.With lot of thinking Vishal and Pooja take some decisions and Sunanda and Shripad get to hear them from others rather than their own son. This causes lot of tension between them and finally they decide to live seperately rather than to have tense moments every day. Now this separation is really for convenience or due to in fights, how are Sunanda and Sripad leading their life after this separation, is all depicted very powerfully in the movie Matichya Chooli.The storyline of the movie is very nice. The subject of this movie is really an everyday one but handled powerfully. It has also suggested some interesting solutions to everyday problems in life. Vandana Gupte and Sudhir Joshi are too good. Madhura Velankar and Ankush Chaudhari are good too. Sanjay Mone has a short but nice role. Unfortunately Sudhi Joshi passed away while the movie was half way through. That makes this his last movie. Abhyankar has played his remaining role to complete the movie. This confused the spectators sometimes, due to change of person in Shripad Dandekar's role. The movie is really good and a recommended one with family.

Do leave your comments on the movie and the review.Cast
 • Vandana Gupte वंदना गुप्ते
 • Sudhir Joshi सुधीर जोशी
 • Madhura Velankar मधुरा वेलणकर
 • Ankush Chaudhari अंकुश चौधरी
 • Sanjay Mone संजय मोने
 • Anand Abhyankar आनंद अभ्यंकर

Direction
 • Sudesh V. Manjarekar सुदेश वा. मांजरेकर
 • Atul Kale अतुल काळेLink to watch online

3 comments:

 1. Yes subject is very common. But presentation is impressive. Some conservations between Mr and Mrs Dandekar is too good. The movie is good.

  ReplyDelete
 2. मला हा सिनेमा आपल्या प्रमाणेच आवडला.चित्रपटाच्या बांधेसूद मांडणी मध्ये त्याचे वैशिष्ट्य दडलेले आहे.सर्व कलाकार पट्टीचे असल्याने सिनेमा नक्कीच प्रेक्षणीय झाला आहे.हॉटेल मधील मुलगा-आई नि वडिलांचा प्रसंग छानच आहे.आनंद अभ्यंकर ह्यांचे विशेष कौतुक अशा साठी कि त्यांनी सुधीर जोशींची भूमिका "मधूनच" करून सुध्धा कथेच्या प्रवाहात कुठेही बाधा आलेली नाही.

  ReplyDelete