Sunday, June 27, 2010

ऑक्सिजन - जीव गुदमरतोय (Oxygen - Jeev gudmaratoy)


शर्वरी एका गरीब शेतकऱ्याची हुशार आणि हिम्मतवान मुलगी. हिच्या प्रेमात शेजारील गावातील एका धनाढ्य पाटलाचा मुलगा प्रेमात पडतो. समीर त्याचे नाव. समीर हा अण्णासाहेब पतंगे पाटील यांचा दत्तक घेतलेला मुलगा. हा लहान असताना, त्याला अनाथाश्रमातून घरी आणलेले असते, आणि त्यामुळे समीरच्या दृष्टीने अण्णासाहेब म्हणजे एकदम देव माणूस आहे असा विश्वास असतो. अण्णा पाटील जरा मोकळ्या विचारांचे आहे असे समीरचे मत असते. पण प्रत्यक्षात अण्णा पाटील हा अत्यंत स्त्री लंपट पुरुष असतो. गावातील, किंवा कुठेही गेला कि त्याला आवडलेल्या स्त्रीला पैठणी द्यायची म्हणजे तिला आपल्या जाळ्यात ओढायची असे प्रयत्न तो करत असतो. बऱ्याच बायकांना फसवतो.


अण्णासाहेबांचा विरोधक म्हणजे जगदाळे, याला अण्णासाहेबांचे तसे सगळे कारभार माहिती असतात. पण पुरावे नसतात इतक्या मोठ्या माणसाविरुध्ध लढणे सोपे नसते हे त्याला पक्के ठाऊक असते. अण्णांची फुटकळ काम करण्यासाठी, वीरू नावाचा एक प्रामाणिक मनुष्य असतो. तो सगळी लबाडीची काम करत असतो, पण मनाने खूप चांगला असतो. वीरू आणि समीर या दोघांची बऱ्यापैकी मैत्री असते. आता समीर, शर्वरीच्या प्रेमात पडतो तिला सरळ तिच्या घरी जाऊन मागणी घालतो. शर्वरीचे वडील आधी नकार देतात, पण समीर च्या सांगण्यावरून लग्नाला होकार देतात. शर्वरीची आई लहानपणीच गेली असते तिचा सांभाळ तिच्या वडिलांनी केलेला असतो. तिच्या माहेरी तिचे वडील एक मावशी इतकाच परिवार असतो.

लग्न करून शर्वरी सासरी तर येते. सुरवातीपासूनच शर्वरीला सासऱ्या बद्दल शंका असते. पहिल्याच रात्री, समीरला खोटा फोन करून बाहेर पाठवण्यात येते आणि शर्वरी समीरची वाट बघत झोपली असताना, अण्णासाहेब शर्वरीच्या खोलीत येतात. पण समीर तितक्यात येतो, शर्वरीवरील ओढवणार प्रसंग पुढे ढकलला जातो. शर्वरीला हे वागणे जरा विचित्र वाटते. दुसऱ्या दिवशी तिला बाथरूम मध्ये असे दिसते, कि तिचे सासरे बाथरूम च्या खिडकीतून आत बघत आहेत. हे बघितल्यावर तर हि हादरूनच जाते. असे बरेच प्रसंग येतात, आणि हिला खूप विचित्र अनुभव येऊ लागतात.


पण शर्वरी, समीरला याबाबत काहीच सांगत नाही. त्यातच शर्वरीच्या वडिलांचे निधन होते. शर्वरी घरी जाते, तिच्या मावशीला सगळे सांगते. मावशी म्हणते कि तू सगळे समीरला सांगितले पाहिजे. समीरला सगळे सांगण्याचा प्रयत्न शर्वरी करते, पण तो प्रयत्न फोल ठरतो. एका प्रसंगात तर समीरला नक्की समजत नाही कोणाची चूक आहे, पण अण्णासाहेब म्हणजे समीरचा देव, त्यांच्या वर कसा आळ घेणार. त्यामुळे शर्वरीला घराबाहेर काढल्या जाते. मग शर्वरी बाहेर राहून अण्णासाहेबांची कधी लढते, तिला कोण कोण मदत करतात, हिला अण्णा पाटलांचे पितळ उघड पाडण्यात यश मिळते का, समीर पुन्हा तिचा होतो का, बघा "ऑक्सिजन - जीव गुदमरतोय".

सिनेमा ठीक आहे. बघावाच असा काही नाही. सिनेमातील गाणी उगीचच घातली आहे असं म्हणायला हरकत नाही. सुरवातीला सिनेमा ठीक वाटतो, पण नंतर नंतर कंटाळवाणा होऊ लागतो. एकूण या सिनेमात नक्की काय सांगायचे आहे असा प्रश्न नक्कीच पडतो. स्त्रीने तिच्यावर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडलीच पाहिजे असे सांगण्याचा दुबळा प्रयत्न या सिनेमात केला आहे असे मी म्हणीन. सिनेमातील मुख्य कलाकार बहुदा नवीन आहेत, मकरंद अनासपुरे फारच थोडा वेळ असतो, तो असतो त्यावेळेस थोडे विनोद करण्याचा प्रयत्न होतो. आपला खलनायक मात्र भारी आहे.

तुमच्या प्रतिक्रिया अवश्य लिहा.


Sharvari is a brave and bright girl. Her parents are poor farmers in a small village. Samir Patil is son of a rich farmer and local politician Annasaheb Patange Patil. Samir is adopted son of Annasaheb and Sameer respects him next to God. Annasaheb is very open minded and progressive person is Samir's belief. But Annasahb is womeniser and always uses his money and power to woo them for fulfilling his desires. His wife has died long back, so he is free to do all he wants to do.

Veeru is a good friend of Sameer. He is good natured person, but by profession he does all the odd jobs for Annasaheb. He is doing all these works purely for money. Jagdale is another local politician in opposition of Annasaheb.

Sameer meets Sharvari and falls for her. He meets her dad and convinces him for marriage. Then he also convinces Annasahb and he too agrees. Sharvari only had dad and aunt (Mavshi) in her house. Sameer has only Annashab and a very loyal servent of Annasaheb in his home.

On the wedding night, Sameer receives a phone call from a friend of his, telling another friend has met with an accident and he needs to be there as soon as possible. Reluctantly he discusses with Sharvari and decides to go to see his friend. He realised his friends have just played prank on him. But Annasaheb enters their bedroom and tried to approach Sharvari, who is asleep tired of waiting for Sameer. Fortunately Sameer enters the room and Sharvari is saved from unwanted incidence. Sharvari quickly realises the intentions of Annasaheb. She also notices him observing her with bad intentions, in the bathroom or elsewhere.


In the meantime Sharviri's father passess away. She mentions her experiences with her father-in-law to her aunt. Her aunt suggests her to talk to Sameer after taking him into confidence. Accordingly she tries it, but could not convince him. Finally at one point of time, Sharvari is thrown out of her house, though Sameer feels it not her mistake, he is not able to oppose Annasaheb. Sameer is torn between guilt towards Sharvari and respect towards Annasaheb. Veeru helps her at this juncture opposing Annasaheb and at times Veeru.

Does Sharvari suceeds in her fight ? Is she able to convince Sameer ? Who all help her ? All the answers in the movie. Movies open with a very interesting plot. But by mid point, it is dragged a bit and finally gets boaring. The theme is good, but the director has not handled them as well. Makarand Anaspure and Sayaji shinde are good. Makarand has a short role. But in general the movie is more on lines of old school marathi movies of atrocoties and revenge type.

Do post your comments.Cast

 • Sayaji Shinde सयाजी शिंदे
 • Makarand Anaspure मकरंद अनासपुरे
 • Chinmay Mandalekar चिन्मय मंडलेकर
 • Mohan Joshi मोहन जोशी
 • Kamlesh Savant कमलेश सावंत
 • Sandeep Pathak संदीप पाठक
 • Charusheela Sabale-Wachchani चारुशीला साबळे - वाच्छानी
 • Manjusha Godse मंजुषा गोडसे
 • Kalyani Mule कल्याणी मुळे
 • Teja Devjar तेजा देव्जार

Direction

 • Rajiv Patil राजीव पाटील

No comments:

Post a Comment