Tuesday, October 15, 2013

द लाँग रन (The Long Run)


हि गोष्ट आहे रेनबो नेशन मधील. कॉम्रेड्स मॅरॅथॉन हि जगातील एक कठीण मॅरॅथॉन समजली जाते. या सिनेमाची गोष्ट या कॉम्रेड्स मॅरॅथॉनच्या अवती-भवती फिरते. या सिनेमाचा हिरो बेरी, ह्याच्या आयुष्यात धावपटूंना कोचिंग देण्याशिवाय काहीही नसते. ह्याला रात्रंदिवस सगळी कडे धावणेचे दिसत असते.

बेरी एका विटा बनवण्याच्या फॅक्टरी मध्ये काम करत असतो. तिथे ४ काळे लोक खूप चांगले धावत असतात. त्यामुळे बेरी त्यांना ट्रेनिंग देण्याचे ठरवतो. चौघेही जण बेरीवर खूप विश्वास ठेवून असतात. बेरी आता म्हातारा झालेला असतो, त्यामुळे बेरीला नोकरीवरून काढण्यात येते. त्याच्या जागेवर गाजा नावाचा एक तरुण मनुष्य येतो. गाजा आल्यावर, या चौघांचे धावणे बंद पडते. बेरीला असे सांगण्यात येते कि जर तू या चौघांना पुन्हा धावण्याचे ट्रेनिंग दिले तर या चौघांची नोकरी जाईल. असे सांगितल्यावर बेरी त्यांना सांगतो कि तुम्ही माझा विचार करू नका, तुम्ही तुमची नोकरी करा. बेरीच्या आयुष्यात "पळणाऱ्यांना" ट्रेनिंग देणे या शिवाय दुसरा कुठलाच विचार नसतो. त्यामुळे त्याला आता काय करावे असा खूप मोठा प्रश्न पडतो. त्याच दरम्यान त्याला एक मुलगी रोज एका विशिष्ट ठिकाणी पळताना दिसते.



तो हिच्या मागावर जातो. हिचे नाव असते ख्रिस्तीन. हि नामिबियाची रहिवासी असते आणि आता तिथून पळून येऊन साउथ आफ्रिकेमध्ये आलेली असते. साउथ आफ्रिकेतील लोकांना असे पळून आलेले लोक आवडत नाही आणि त्यांना पकडून नेतात. त्यामुळे हिच्या मागे पोलीस लागतात आणि असेच ख्रिस्तीनला एकदा पकडून नेतात. आता ख्रिस्तीनला प्रश्न पडतो कि काय करावे. पण बेरी हिच्या मागावरच असतो. तो खटपट करून हिला सोडवतो. तिला स्वतच्या घरी घेऊन येतो.

ख्रिस्तीनला सांगतो कि तुझ्या मध्ये पळण्याचे खूप चांगले टॅलेंट आहे, मी जसे सांगीन त्याप्रमाणे जर का तू वागशील तर तू खूपच लवकर जग प्रसिध्ध होशील. ख्रिस्तीनला सुरवातीला याबद्दल खूप काही प्रेम वाटत नाही. थोड्या दिवसाने तिला खरतर बेरीच्या शिक्षणाचा जाच होऊ लागतो. तिच्या मते पळायला आवडेल, पण सारखे दिवस रात्र पळण्याचा विचार शक्य नाही. आयुष्यात दुसरे देखील काहीतरी हवे.



बेरी ख्रिस्तीन साठी सगळे करीत असतो. ख्रिस्तीनला राहण्यासाठी जागा नसते त्यामुळे ती बेरी कडेच राहत असते. बेरी तिच्या साठी सैपाक करतो. तिच्या धावण्याच्या व्यायामाला योग्य असाच आहार तो तिला देतो. तिच्या जेवणाच्या वेळा पाळतो. पण शेवटी शेवटी ख्रिस्तीनला सोन्याच्या पिंजऱ्यात बंद असल्या सारखे वाटू लागते. बेरीची मुलगी त्याचा गावात असते. बेरीच्या मुलीला ख्रिस्तीन तिच्या मनातील गोष्ट सांगते. पण मुलगी काही तिला मदत करू शकत नाही. कारण बेरीला कोणीतरी ती मॅरॅथॉन जिंकणे हेच महत्वाचे वाटत असते आणि त्यापुढे बेरी काही एक ऐकणार नाही याची संपूर्ण जाणीव त्याच्या मुलीला असते. त्यात गाजा बेरीला शह देण्याकरता ख्रिस्तीनच्या प्रेमात पडण्याचे नाटक करतो. त्याने तिचे धावण्यातील लक्ष उडते. बेरीचे ध्येय व ख्रिस्तीनच्या स्थलांतरित जीवनातील संघर्ष यात पुढे काय होते हे बघा "लाँग रन" मध्ये.

सिनेमा उत्तम आहे. सिनेमा बऱ्यापैकी जुना आहे. कुठे बघायला मिळाल्यास जरूर बघावा. सिनेमा इन्स्पिरेशनल आहे. मुलांना दाखवावा.


This is a story in South Africa. Comreds Marathon is one of the toughest and prestigious race in the world. The story line of this movie is woven around this competition. Comred marathon is assumed to be a difficult marathon due to its path. The path of marathon goes around mountains and this is the hardest patch in the marathon. The main character of the movie is Berry and he is a coach. He himself had tried this marathon and could never complete it. His life is just about running and coaching runners. Berry has a day job in brick factory. He has four African runners working there. Berry decides to work on them for the upcoming marathon. The runners too were liked Berry and has respect for him. But Berry looses his job, the unsaid reason being his age. New supervisor Gaja is a young man, but not interested in running at all. So these four runners are not permitted  to run. Berry is told, if he remains involved in training the four guys, they would loose jobs.

Berry is frustrated, but for the runner's good, he tells them not to keep in touch with him. Berry has a big void in his life, because he has nothing but running and training on his mind. During this time, he sees a girl running on the same road couple of times. Berry follows the girl and finds out her name is Christine and she is from Namibia. She has fled her country and came to South Africa. South African's hate the illegal emigrants like her, and police are always on lookout of such people. Christine is caught by police during this time. Fortunately Berry is on watch, and realizes the problem. He uses his contacts and manages to get her released on bail and brings her home.   

Berry tells Christine that she really has some running talent and she should use Berry's coaching to become a successful runner. Christine is not too happy with Berry but has no choice for the time being. As the training proceeds, she really gets pissed up with his coaching. She enjoyed running, but doing this day in and day out is not possible for her. She feels person needs to have some life beyond running too. Berry is doing all the things for Christine. She is staying in his house itself. Berry is cooking healthy food for her. He keeps her food timings very meticulously. But being a young lady, Christine starts finding this too rigorous and jail like.

Berry's daughter is in the same city, Christine tries telling her about the situation, but his daughter was not able to her either. Berry is totally dedicated to work on Christine to make her major contestant in the marathon. Gaja tries to lure Christine, pretending that he is in love with her, just to prove him better against Berry. Christine gets involved a bit and looses her concentration on her workout. The struggle of Berry for the marathon and Christine's life as illegal emigrant is beautifully captured in the movie Long Run.

The movie is motivating and enjoyable. Do not miss the opportunity to watch this movie. It is a good family movie.


Cast
  • Armin Mueller-Stahl अरमिन मुलर स्टल
  • Nthati Moshesh स्तति मोशेह
  • Paterson Joseph पॅटरसन जोसेफ़ 
  • Seputla Sebogodi सेपुल सेबोगोडी
  • Desmond Dube देसमन्ड दुबे 
  • Anna-Mart van der Merwe  अॅना-मार्ट वॅन दर मेरवे 
  • Chrostopher Kubheka ख्रिस्तोफर कुभेका 
  • Gift Leotlela  गिफ़्ट लिओटेला 
  • Jeremia Ramasita जेरेमिया रामासिता 
Director

  • Johann Potgieter जोहान पॉटगिटर 

Tuesday, October 08, 2013

फिलाडेल्फिया (Philadelphia)


अॅन्ड्रु बेकेट हा एक अत्यंत हुशार वकील असतो. तो एका मोठ्या कंपनीत लॉ कंपनीत नोकरी करीत असतो. केंदाल कनस्ट्र्कशन नावाच्या कंपनीची एक खूप मोठी केस तो जिंकून देतो. त्यामुळे केंदाल कंपनीकडून यांच्या फर्मला बरेच पैसे मिळतात. त्यामुळे खुश होऊन त्या कंपनीचा मुख्य मॅनेजिंग डायरेक्टर अॅन्ड्रुला त्यांच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर मध्ये घेण्याचे ठरवतो. त्याला बोर्डात घेतल्या बद्दल एक पार्टी सुरु असते. त्या पार्टीमध्ये एका डायरेक्टरला दिसते की अॅन्ड्रुच्या डोक्यावर काही जखमा आहेत व या जखमा दुसर्या-तिसर्या काही नसून एड्सच्या आहेत. तेव्हाच कंपनीतील लोकांना कळते की अॅन्ड्रु हा समलिंग आहे व त्यामुळे त्याला एड्स झालेला आहे. याच दरम्यान अॅन्ड्रुकडे एका मोठ्या कंपनीची केस असते. या केसची तारीख व अॅन्ड्रुची डॉक्टरांकडील अपॉईन्टमेंट यांची तारीख एकाच येते. त्यामुळे अॅन्ड्रु केसचे सगळे पेपर्स तयार करून त्याच्या सेक्रेटरीला ते पेपर्स एका ज्युनियर वकिलाला द्यायला सांगतो. पण अॅन्ड्रु जेव्हा डॉक्टरांकडे असतो तेव्हा त्याला कंपनीतून फोन येतो की सगळे केस पेपर्स गायब झाले आहेत आणि आता ते कोणालाच सापडत नाहीत.अॅन्ड्रुचा विश्वास असतो की, त्याला एड्स झालेला आहे व तो समलिंगी आहे हे समजल्यामुळे त्याला कंपनीतून काढून टाकण्यासाठी काहीतरी कारण हवे म्हणून हा घोळ करण्यात आलेला आहे. असाच प्रसंग पुन्हा एकदा घडतो.
 
त्यानंतर अॅन्ड्रुला त्याच्या हलगर्जी बद्दल कंपनीतून काढून टाकण्यात येते. आजवर सगळे लोक त्याच्याशी चांगले वागत असतात, अचानक असे का झाले याचे कारण अॅन्ड्रुला माहिती असते. तो कंपनीविरुद्ध केस लढवण्याचे ठरवतो. पण त्याचा वकील म्हणून कोणीच तयार होत नाही. सगळ्यांना एड्स झालेल्या व्यक्तीशी संबध ठेवायचे नसतात. केंदाल कंपनीच्या विरुद्ध केस लढताना जो वकील त्याच्या विरुद्ध उभा ठाकतो तो "जो मिलर" एक खूप चांगला वकील आहे असे अॅन्ड्रुचे मत असते. त्यामुळे अॅन्ड्रु त्याला विनंती करतो की त्याने अॅन्ड्रुची केस लढवावी. पण जोचे मत देखील इतर लोकांसारखेच असते. पण तो थोडासा वेगळा असतो. तो डॉक्टरकडे जाऊन एड्स बद्दल माहिती गोळा करतो. पण तरीही केस लढवावी असे तो ठरवत नाही.
एकदा अॅन्ड्रु लायब्ररीत जाऊन एड्स ची माहिती गोळा करत असतो, ते बघून तेथील लोक त्याच्याकडे विचित्र नजरेने बघतात व त्याच्या पासून दूर जाऊन बसतात. नेमक्या त्याच वेळी जो तिथे येतो. अॅन्ड्रुने गोळा केलेली माहिती बघतो व त्याच्या लक्षात येते की अॅन्ड्रु हा आता स्वत: केस लढणार आहे. त्या क्षणी जो ठरवतो की आपण या माणसाची मदत करायला हवी. मग तो अॅन्ड्रुची केस लढवायला तयार होतो. जो जसा जसा अॅन्ड्रुच्या सहवासात येतो तसा तसा तो अॅन्ड्रु मुळे खूप प्रभावित होतो. अॅन्ड्रुचा पार्टनर मिगेल अल्वारेज याच्याशी पण जो ची ओळख होते. अॅन्ड्रुच्या पाठीमागे मिगेलची काळजी घेता येईल अशी तजवीज करत असतो, हे देखील जो ला समजते. अॅन्ड्रुच्या घरच्यांशी त्याची ओळख होते. एकूण अॅन्ड्रु याला जरी एड्स झाला असला तरी हा माणूस म्हणून खूप उत्तम आहे याची जो ला खात्री पटते. तो एकदम मनापासून अॅन्ड्रुची केस लढतो. जो अॅन्ड्रुची केस जिंकतो का? एकूण जो ला काय अनुभव येतात ? अॅन्ड्रु कसा चैतन्यमान व्यक्ती असतो हे "फिलाडेल्फिया" बघितल्याशिवाय समजणे  शक्य नाही.

सिनेमा अतिशय सुंदर आहे. टॉम हॅन्क्स ही भूमिका अक्षरशः जागला आहे. सुरवातीचा तब्येतीने चांगला असणारा  अॅन्ड्रु  व नंतर वजन कमी झालेला  अॅन्ड्रु हा खरच टॉम हॅन्क्सने उत्तम उभारला आहे. त्यासाठी त्याने खरच त्याचे वजन कमी केले होते असे मी वाचले होते. लोक खरच झालेल्या रोगांमुळे एखाद्या चांगल्या व्यक्तीवर कसा अन्याय करतात हे या सिनेमात खूप सुंदर दाखविले आहे. त्याचबरोबर, सगळ्या प्रकारच्या माणसांना समाजाने सामावून घेतले पाहिजे असे अगदी प्रकर्षाने सांगणारा हा सिनेमा वाटला. सिनेमात तसे वाईट दृश्य खास नाहीत. पण सिनेमा तसा जड विषयाला धरून असल्याने खूप लहान मुलांना दाखवू नये असे माझे मत आहे. पण थोडी समंजस झालेल्या मुलांनी हा बघायला काही हरकत नाही.

Andrew Beckett is a very bright and skillful lawyer. He is a very hard working man. He is working for a very famous Law firm. He wins a very prestigious case for a company called Kendal Constructions. This earn a lot of money for his company and the managing director of the law firm promotes him to the board of directors. During the party to celebrate his success and induction to the board of directors, one of the directors notices some wounds on his Andrew's head. He quickly figures out that they are due to AIDS, and all in the company realize that Andrew is gay and is suffering with AIDS.
Andrew is working on another very important case during this period. Unfortunately his doctor appointment and case hearing are on the same date. Andrew carefully prepares the papers and hand over to his secretory to pass them on to another lawyer of his firm to submit in the court. and leaves for his doctor appointment. But while he was at the doctor's place he receives a phone call telling him the papers are missing and no one was bale to trace them later. Andrew is convinced that this is plot to remove him form the company since his directors have found out that he is gay and suffering with AIDS. Someone has purposely done this to get a reason against him. Similar incidence is repeated and he is removed for his company.

Everyone in the company has been really good with him earlier. So Andrew is upset with this sudden change and decides file a case against his company. No finding a lawyer who can take up his case is challenging. Lawyers are not willing to take his case because he is suffering with AIDS and also they have to fight a big law firm. Now Andrew approached Joe Miller who was the opposing lawyer in the Kendal case. Andrew knew Joe was a really nice person and a good lawyer too. Joe denies this deal, but he approached a doctor and get more information on AIDS. He is still undecided to commit to Andrew's case. 
Once Andrew is in Library trying to get more information about AIDS for the case. All the people around are keeping distance form Andrew. Joe happens to go to the library and sees this. He realizes that Andrew is planning to defend his case himself, and at that point Joe decides to help him out. 
As he start interacting with Andrew, he learn a lot about Andrew. He is impressed by his thoughts and personality. Miguel Alvarez is Andrew's partner. One of the reasons Andrew wants to win this case is to provide backup for his partner Miguel after Andrew's death. Joe also gets to meet and interact with Andrew's family. They are all very nice people and even though Andrew is suffering with AIDS, Joe learn how well meaning and good nature Andrew is. After that Joe really start putting his mind and soul in this case, 

Does Andrew win the case ? What all he learns about life in this process ? It is definitely worth watching the powerful person Andrew is. The movie is really good and Tom Hanks is too good in the role of Andrew. His initial days when is is reasonable healthy and later on really sick person. looks like Tom Hanks has actually reduced his weight for this movie. This movie also shows how people change after learning that Andrew has AIDS. People do not think much even being unreasonable to a long time friend since he is suffering now. The movie covers this very sensitive topic with a lot of elegance. Though there are no scenes really inappropriate for children, looking at the topic, very small children should avoid this but good for growing sensible children.

Cast

  • Tom Hanks  टॉम हॅन्क्स
  • Denzel Washington डॅनझेल वॉशिंग्टन
  • Roberta Maxwell रॉबर्टा मॅक्सवेल 
  • Buzz Kilman बझ कीलमन
  • Karen Finley बझ कीलमन
  • Daniel Chapman डॅनियल चॅपमन 
  • Mark Sorenson Jr. मार्क सोरेन्सन ज्यु. 
  • Jefferey Williamson जेफ्री विलीयम्सन 


Director

  • Jonathan Demme जोनाथन डेम्मे