
शालिनी बुध्धिसागर या एका मोठ्या कॉलेज मधील प्रिंसिपल असतात. त्यांचा मुलगा अभिजित हा अगदीच सामान्य बुध्धिचा असतो. म्हणजे त्याला खुप जास्त मार्क वगेरे मिळत नसतात. तर शालिनी बुध्धिसागर यांच्या मते जी मूल हुशार असतात त्यांच्यावरच मेहनत घ्यायला हवी.

आपण बुद्धीत कमी असल्याचे, सारखे डोक्यावर ओझे असल्याने एक दिवस अभिजित आत्महत्येचा प्रयत्न करतो. हे बघून शालिनी बुध्धीसागर खूप वैतागते. तिचा भाऊ रघुनंदन याला फोन करून बोलावून घेते व अभिजीतला थोडे दिवस मामाकडे पाठवण्याचा निर्णय घेतला जातो. अभिजित आत्महत्येच्या धक्क्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतो, तेव्हा अर्चना नावाची एक मुलगी रघुनंदनमामाला भेटायला येते. ती दोघांना शाळेत चित्रकला स्पर्धेचे आमंत्रण देते. अभिजितला खरतर तिथे जायचे नसते, पण दोघांच्या आग्रहाखातर तो तिथे जातो. तिथली शाळा बघून त्याच्या आश्चर्याला पारावर उरत नाही. मतीमंद मुले आनंदाने व निरागसपणे चित्र काढत असतात.

त्यांचे एकदम वेगळे जीवन बघून अभिजित विचार करू लागतो.बऱ्याच दिवसाने हातात ब्रश आणि स्केत्चींग पेपर घेऊन एक सुंदर चित्र काढतो. हे चित्र बघून अर्चना त्याला शाळेत चित्रकला शिकवण्याची विनंती करते. अभिजित देखील त्या शाळेत जाऊन शिकवण्याचा प्रयत्न करतो. सुरवातीला त्याला जमत नाही, पण हळू हळू त्याला तिथे खूप आवडू लागते. येथील जीवन बघून त्याला आयुष्यात दुख म्हणजे काय याची चांगलीच जाणीव होते. अभिजित इथे रमतो, त्याला मतीमंद मुलांसाठीच काम करावे असे वाटू लागते, पण शालिनी बुध्धीसागरच्या मनात अभिजितसाठी दुसरेच प्लान असतात. तिला अभिजीतला हॉलंडला शिक्षणासाठी पाठवायचे असते.

शेवटी अभिजित काय करतो, मतीमंद मुलांचे काय प्रश्न असतात, समाज मतीमंद मुलांकडे कसे बघतो, त्याचप्रमाणे, त्यांचे आई वडिलांचा मुलांकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा असतो हे बघा "आम्ही असू लाडके" मध्ये.
सिनेमा अत्यंत सुंदर आहे. सुबोध भावे मस्तच. मतीमंद मुलांचे प्रश्न खूप वास्तविकपणे आपल्यासमोर मांडले आहेत. प्रत्येक नात्याचे कसे विविध कंगोरे असतात याचा प्रत्यय देण्याचा खूपच चांगला प्रयत्न केला आहे. गिरीश ओकने एका मतीमंद मुलाच्या बापाचे काम केले आहे, त्याचे विक्रम गोखले, अप्रत्क्षपण॓ जे डोळे उघडतो ते बघण्यासारखे आहे. सगळेच सानावाद अगदी मनाला भिडतात. अभिजीतचे व एका आजीचे संवाद खूपच सुंदर. मतीमंद मुलांचा अभिनय पण खूप सुरेख. या मुलांना कसे काय हे काम करायला जमले, हा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही. सिनेमा बघताना, डोळे पाणावल्याशिवाय राहत नाहीत. या सिनेमाने तरी समाजाचा मतीमंद मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल असा विश्वास वाटतो. सिनेमा जरूर बघा. तुमच्या प्रतिक्रिया अवश्यलिहा.

Shalini Budhhisagar is Principal of an Engineering College. Her son Abhijit is not doing well in education. Shalini is an ambitious lady and working hard for success. But she feels that world if for bright students, and bellow average students are not worth the attention.

Abhijit is frustrated with the competition and attempts suicide, but is saved. Raghunandan, Shalini's brother offers to take Abhijit to Kolhapur to take care of him till he recovers form the setback. For few months Abhijit is inactive. Once while visiting a school for mentally retarded children, his interest in art is awakened. He starts drawing sketches again.

When Abhijit and Raghunandan visit school to present one of his sketch to the school, they come to know that the Art teacher is getting married and quitting the school. Abhijit was requested to visit the school for few days and teach art to children. Initially reluctant, he agrees.

His initial days were difficult to deal with the mentally retarded children. But slowly he started enjoying it and get involved with the school. While Shalini, his mother keep insisting that he should go for further education, he keep avoiding and ignoring it. All his mind is in the progress of the school and the problems the school is facing. What happens to Shalini's plans for Abhijit needs to be watched in the movie.
Some of the dialogues are really nice like Raghunandan tells Abhjit, "The sorrows you feel are sorrows, and small problems in your day to day life, you have yet to see the real sorrows." Overall a really nice movie and I would like to say all parents should watch it.

Cast
- Neena Kulkarni नीना कुलकर्णी
- Girish Oak गिरीश ओक
- Subhodh Bhave सुबोध भावे
- Smita Sarvade स्मिता सरवडे
- Ganesh Joshi गणेश जोशी
- Vikram Gokhale विक्रम गोखले
Director
Link to watch online