Wednesday, June 06, 2012

अंकगणित आनंदाचं (Ankaganit Anandacha)


आनंद प्रकाश कुलकर्णी हा मुंबईमध्ये एका बँकेत नोकरी करीत असतो. बायको रागिणी व मुलगा समीर असे त्रिकोणी कुटुंब खूप सुखात असते. समीरवर आनंदाचे निरतिशय प्रेम असते. त्याला मुंबईचे धकाधकीच्या जीवनात त्याला वाटते की त्याला खरा आनंद मिळत नाहीये. गावाकडील जीवन जास्त सुखी असेल असे त्याला वाटते व त्यामुळे तो रागिणीला म्हणतो की आपण गावीच राहून शेती करावी. आनंदला वाटते की वडिलांच्या हाताखाली शेती शिकावी व गावातच राहावे. अचानक आनंदच्या वडिलांची तब्येत बिघडते आणि ते त्याला गावी बोलावून घेतात. परंतु वडिलांचा मृत्यू अचानक ओढवतो, त्यामुळे शेती नीटशी शिकता येत नाही. वडिलांनी आनंदच्या शिक्षणासाठी शेतीवर बरेच कर्ज घेतले असते.

आता ती शेती सोडून जाण्याचे आनंदला नकोसे वाटते. पण शेती न शिकल्याने, याला शेतीत फारसा नफा देखील होत नाही. आता घर चालवण्यासाठी म्हणून बायको रागिणी एका शाळेत नोकरी करते. मुंबई मध्ये एका मोठ्या कंपनीत टीम लीडर असलेली इथे एका शाळेत १०००० रुपयासाठी नोकरी करते. त्यात देखील तिला ८००० रुपयेच मिळतात. शिवाय बरेचदा शाळेत जायला १-२ मिनिट उशीर झाल्यामुळे, लेट मार्क पण लागतो. व पैसे कापल्या जातात. रागिणी नोकरी करत असल्याने, समीरला जोशी काकूंच्या पाळणाघरात ठेवण्यात येते. रागिणीच्या आईला त्यांचे असे मुंबई सोडून जाणे अजिबात पसंत नसते. तरीपण रागिणी समीर आणि आनंदवर असलेल्या प्रेमापोटी गावी येते.

पण अप्पा गेल्यानंतर व शेती जमत नसताना उगाचच गावी राहून कर्ज बाजरी होतो त्याचे रागिणी दुख व राग असतो. त्यात शेती करताना त्याचे उसाचे उत्पादन एक अहलुवालिया नावाचा मनुष्य खूप पैसे देईन असे म्हणून लुबाडतो, त्यानंतर तर आनंद कडे अजिबातच पैसे उरत नाहीत. त्यामुळे या दोघांमध्ये सारखे वाद सुरु असतात. रागिणीची खूप चीडचीड होत असते. पण आनंदला वाटते की पैसा नसला म्हणून काय झाले आपण आनंदात आहोत. रागिणीला वाटते की आता या शेती करण्यात काही अर्थ नाही. एकतर आनंदची तशी काही फारशी मदत तिला होत नाही, शिवाय घर शाळा सांभाळले व शिवाय पुन्हा पैश्याची मारामार, त्यामुळे रागिणीला आता शहरात जावे असे वाटू लागते. रागिणीच्या शाळेत असणारा नेमाडे नावाचा क्लार्क रागिणीला त्रास देत असतो. एकदा तो लेट मार्क लागल्याबद्दल तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करतो, ती रागाच्या भरात त्याला दोन थोबाडीत देऊन ठेवते.

घरी आल्यावर आनंदला सांगते पण आनंद, रागिणीची बाजू घेण्याऐवजी, तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. हे बघितल्यावर रागिणी भयंकर चिडते व सांगते की आता तिने ती नोकरी सोडली आहे व ती मुंबईला परत तिच्या आईकडे जाते आहे. आनंद तिला समजावण्याचा पर्यंत करतो पण तो व्यर्थ असतो. रागिणी समीरला घेऊन निघते, तेव्हा आनंद, समीरला जाऊ देत नाही. रागिणी गेल्यानंतर तो त्याच्या घरी शेतीत मदत करणाऱ्या सुदामा नावाच्या नोकराला देखील काढून टाकतो कारण आता त्याला हे चैन परवडणारी नसते जेव्हा रागिणी सोडून जाते, तेव्हा आनंदचे डोळे अचानक उघडतात, तो नोकरी करण्याचे ठरवतो. आनंदच्या डोक्यावर कर्ज झालेले असते. त्यामुळे त्याची गाडी बँक जप्त करते. शिवाय लोन फेडण्याबद्दल त्याला एक-दोनदा जेल मध्ये देखील जावे लागते.

त्याच्या नशिबाने त्याला नोकरी मिळते, पण त्यात गोम अशी यासाठी कि १०० दिवस काम करायचे, पण पगार मिळणार नाही. १०० दिवसाने जर चांगले काम केले तर महिन्याला १५००० रुपये मिळतील. आनंदकडे काहीच पैसे नसतात, त्यामुळे तो विचारात पडतो की हे गणित जमवायचे कसे, त्यात हिशोब केल्यावर त्याला असे वाटते कि ३ महिन्याला लागतील इतके पैसे शिलकीत आहेत, ते वापरून नोकरी घ्यावी. पण रागिणी कडे मुंबईला न जाता गावीच राहून आनंद मिळवावा व जीवनाचे अंकगणित सोडवावे. आनंदला त्याच्या जीवनातील आनंद व अंकगणित याची सांगड घालता येते का हे बघा "आनंदाचे अंकगणित" या सिनेमा मध्ये. आनंदाचे अंकगणित असे नाव का दिले असावे असा विचार मनात येतो. कारण हे आनंद या व्यक्तीच्या जीवनातील गणित आहे की आनंद मिळवायला लागणारे जे गणित असते ते गणित या सिनेमात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे हे नीटसे समाजात नाही. माझ्या मते सिनेमा अत्यंत बेसलेस आहे. नक्की या सिनेमात काय दाखवायचे आहे हे समजत नाही. म्हणजे मुंबईला नोकरी करताना कंटाळा येतो म्हणून आनंद शेती करायला गावी येतो, पण पुन्हा नोकरी करणारे लोक कसे सुखी आहेत हे बघून नोकरी करायला लागतो. बायको सांगत असते की शेती वगेरे आपल्याला जमणाऱ्या गोष्टी नाहीत तरी तिच्याकडे दुर्लक्ष करून शेती करतो व बायको सोडून निघून गेली म्हणून व स्वत: हलाखीच्या परिस्थितीत असताना, मुलाला बायको कडे न पाठवता उगीचच काहीतरी उद्योग करत बसतो. एकूण नक्की काय करायचं या सिनेमातील हिरोला हे समजत नाही. एका भरकटलेल्या जहाजाचा प्रवास दाखवण्याचा प्रयत्न केला आहे का ? अशी शंका येते. एकूण या कथानकातील अंकगणित मला तरी फारसे समजलेले नाही. चांगल्या कलाकारांचा अगदीच चुथडा केला आहे असे वाटले. सिनेमा बघू नये. वेळ वाया जाईल.

Anand Prakash Kulkarni was a bank employee in Mumbai. His wife is Ragini and son Samir. Small and happy family. Anand loves Sameer a lot. He feels the busy Mumbai life is putting a lot of stress on him and on the whole family in general. He thinks life at his town will be less stressful and happy. He initiates discussion with Ragini, about shifting to the villages and farming. He decides to learn farming from his father and stay in his town. While he is thinking about it, his father is unwell and he had to rush. Unfortunately his father passes away and Anand did not get time to learn farming from him. At this point Anand decides to farm rather than going back to his job. But since he does not know farming well, he is not very good at that and not able to make much money. To help him financially, Ragini takes a job in a high school. She was team leader in a corporate company earlier. Here her salary is merely 10K and the fraudulent school administration takes another 2K cut and at end of month she gets only 8K in hands. Since Ragini is working, their son Sameer is in  day care facility after school which is run by Mrs Joshi. 

Ragini's mother is not happy with this change in her life. But Ragini wants to support Anand so she decides to do all this for him. But Anand's failure to generate substantial income from agriculture due to no proper training is bothering her. During these days a person named Ahulwalia cheats him for big amount of money, in sugarcane deal. Anand is under raising burden of loans. This is more and more disturbing for Ragini and they frequently fight. Anand still keeps insisting that even without money they are leading happy life. Ragini makes it clear to Anand that he should stop spending time and money on agriculture and rather do something else. Financially Anand is not getting anything out of it and Ragini is under severe stress in school, and also has to do lot of work in home to keep things moving. She start thinking they should rather go back to city and find better jobs there.

A clerk called Nemade is a troublesome guy in Ragini's school. He is always trying to catch Ragini, and one day when she was bit late for signing the attendance he crosses the limit. Ragini gives him a tight slap and decides to quit her school job at that moment itself. While discussing with Anand, he tries to convince her that she should have taken it cool and the job is important for her. Ragini looses temper that moment, decides to quit all this and stay with her mother in Mumbai. When she actually try to leave with Sameer, Anand stops Sameer and Ragini leaves alone.

After this Anand really starts thinking about his life. He has to remove his domestic assistant Sudama. And finally he decides to take up a job. Due to non payment of loan bank confiscates the vehicle and Anand is in real trouble now.

He manages to get a job, but with a very strange condition, that he will not receive salary for first 100 days and he may not get to work all days. He does lot of calculations and decides he can barely manage for those 100+ days with whatever money he has in his account and will try be happy with Sameer in his town only. So he decides to give it a try. If he is able to do that successfully or Ragini needs to intervene needs to be seen in "Ankaganit Anandache"

Looks like in the title of the movie "Anand" is used in two senses, name of lead character Anand and happiness. The movies storyline is very average and the script is not impressive. The take home message for the movie is very vague and may be interpreted in different ways. He initially quit job to to work on farm, but after a while takes a job and tries to be happy and prove his point. When Ragini tells Anand that farming is not suitable profession for him, he did not listen, but in the end lands up with a job but again in his small town instead of staying with Ragini in Mumbai. When he was in real financial trouble, he keeps his son with him and make him suffer too, when he could have taken good care of him by sending his son to his wife. The director has failed to utilize some really good talent like Sandeep Kulkarni, Aishavarya Naarkar and Sulabha Deshpande.


 Cast
Direction
  • Girish Kolapkar गिरीश कोळपकर