Irfan khan लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Irfan khan लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, फेब्रुवारी ११, २०१६

७ खून माफ (7 khoon maaf)



सुझाना ॲन मारी एका अतिशय श्रीमंत बापाची मुलगी. हिचा मृतदेह पोलिसांना सापडतो आणि ते तिची चौकशी करतात तेव्हा कळते की हिचे पूर्वी ६ पुरुषांबरोबर लग्न झालेले आहे आणि सगळ्यांचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. आता पोलिसांकडे केस आल्याने, ते तिच्या पूर्वीच्या आयुष्यात नक्की काय झाले ते न समजल्यामुळे, तरीही ६ नवर्यांचा काहीतरी घातपात मृतू झाला आहे असे वाटून तिचा या वेळी नक्की मृत्यू झाला आहे कि नाही याचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्याचे ठरवतात. तिच्या मृत्यूचे सगळे पुरावे एका अरुण कुमार नावाच्या फ्लोरेन्सिक एक्सपर्ट कडे जातात. योगायोगाने हा अरुण कुमार सुझानाला लहानपणापासून ओळखत असतो. आता जरी त्याचे लग्न झालेले असले, तरी कोणे एकेकाळी, एका अनभिज्ञ वयात अरुण कुमारला सुझाना बद्दल आकर्षण असते. आता सुझाना मेली यामुळे अर्थात्तच अरुण कुमारला खूप वाईट वाटते. सगळे पुरावे शोधता शोधता त्याला पूर्वीच्या आठवणी येतात आणि खरी गोष्ट सुरु होते.

तर सुझानाचे वडील खूप श्रीमंत असतात. सुझाना लहान असतानाच हिची आई मरण पावते, त्यामुळे वडिलांशिवाय तिला दुसरे जग नसते. ती थोडी मोठी होते तोच तिचे वडील देखील मरण पावतात. आता जो पुरुष दिसेल त्याच्यात ही प्रेम शोधू लागते. हिच्या वडिलांकडे ३ विश्वासू नोकर असतात., गालिब, मॅगी, आणि गुंगाचाचा. गालिब, वडिलांचा पी ए असतो, तर मॅगी घरात सैपाक व इतर कामे बघत असते आणि गुंगा चाचा हा वडिलांच्या तबेल्याची काळजी घेत असतो. गुंगा चाचाने अरुण कुमारला मुलासारखे वाढवले असते. गुंगा चाचा नावाप्रमाणेच मुका असतो.

वडील गेल्यावर, वडिलांच्या ओळखीचा असलेला एक आर्मी ऑफिसर, मेजर एडविन रॉड्रीक्स याच्या बरोबर हिचे लग्न होते. याला अशोकचक्र मिळालेले असते, पण एका युद्धात याचा एक पाय तुटलेला असतो. आणि याने खोटा पाय लावलेला असतो. हा सुझाना बाबत खूप पझेसिव असतो. आणि याला मुल हवे असते, पण सुझानामध्ये काहीच शारीरिक कमी नसते, पण रॉड्रीक्सला हे पटत नाही. आणि त्याच्या स्वतत असलेला कमीपणा त्याला सारखा सतावत असतो. तो हिला मारहाण करतो आणि अचानक रॉड्रीक्सचा मृत्यू होतो. त्याच्या अंतिम संस्कारच्या वेळेस हिचे लक्ष जमशेद सिंग राठोड कडे जाते, हा गीटार वादक असतो, तो हिच्याशी लग्न करतो व म्हणतो कि आता माझे नाव जिमी आहे. सुझानाचे जिमी वर खूप प्रेम असते, पण ह्याला ड्रग्जचे व्यसन असते. सुझाना त्याचे व्यसन सोडवण्याचा खूप प्रयत्न करते पण तो असफल होतो, आणि अचानक त्याचा मृत्यू होतो.


दुखातून बाहेर पडायला म्हणून ही काश्मीरला जाते तिथे तिची ओळख मोहमद नावाच्या एका शायराशी होते. त्याची हळुवार शायरी, हिला भुरळ घालते, ही मोहमदशी लग्न करण्यासाठी धर्मांतरण देखील करते. जरी मोहमदच्या कविता हळुवार असतात, पण त्याचे प्रेम हे खूप हिंसक असते. तो हिला बऱ्यापैकी मारहाण करतो आणि अचानक ह्याचा मृत्यू होतो. सुझानाचे नवरे इतके कसे पटापट मृत्यू पडतात, याच्या मागे काहीतरी नक्कीच काळेबेरे असे किमतलाल नावाच्या इंस्पेक्टरला वाटत असते. पण सुझाना तिच्या सौंदर्याच्या जोरावर किमतलालला नेहमीच मार्गी लावते. आता घोड्यांच्या शर्यतीत हिचा घोडा पहिला येतो आणि मग ही बक्षीस घ्यायला जाते आणि तिथे निकोलाई व्रोन्स्कीच्या प्रेमात पडते.

गुंगाचाचा कडे राहत असलेला अरुण कुमार ह्याच्या शिक्षणाची सगळी जबाबदारी सुझानाने घेतलेली असते. निकोलाई हा रशियन असतो, त्याच्याकडे अरुण कुमारला रशियाच्या एका युनिवर्सिटी मध्ये अडमिशन मिळवून देण्याची गोष्ट करते. सुझानाच्या प्रेमाखातर तो अरुण कुमारला रशियात घेऊन जातो. अचानक अरुण कुमार कळते कि निकोलाईचे लग्न झालेले आहे आणि त्याची रशियात एक बायको देखील आहे. सुझानाला जेव्हा कळते तेव्हा अचानक निकोलाईचा मृत्यू होतो. निकोलाई हा रशियन असल्याने त्याच्या मृत्यूची चौकशी जास्त डिटेल मध्ये होऊ लागते. त्या चौकशी साठी किमतलालचे घरी वारंवार घरी येणे सुरु होते. या चौकशीत सुझाना अडकणार, हे सुझानाला कळते, त्यातून वाचण्यासाठी सुझाना एकदा त्याच्याबरोबर एक रात्र घालवते. किमतलाल मग सारखा सारखा हिच्याकडे येऊ लागतो आणि शेवटी कंटाळून सुझाना त्याच्याशी लग्न करते आणि थोड्याच दिवसात त्याचा मृत्यू होतो.

या सगळ्या प्रकाराला कंटाळून सुझाना शेवटी आत्महत्या करण्याचे ठरवते. ती आत्महत्या करायला एका गाडीच्या समोर जाऊन उभी राहते आणि तिला अपघात होतो. त्या अपघातातून तिला मोधू वाचवतो. याला औषधी वनस्पतीबद्दल खूप माहिती असते. तो खूप चांगला असतो, सुझानाला वाटते की तिला हवा असणारा पुरुष आता तिला मिळाला आहे, आणि ती मोधूशी लग्न करते.. पण थोड्याच दिवसात मोधूचा मृत्यू होतो. आता मात्र तिचा या जगावरील विश्वास उडतो आणि ती स्वत:ला गोळ्या घालून आत्महत्या करते. आता तिच्या मृतदेह आणि त्या बरोबर असलेले पुरावे पोलिसांकडे आलेले असतात, आणि त्याची चौकशी अरुण कुमार करत असतो.

अरुण कुमारला चौकशीत नक्की काय आढळून येते? सुझाना तिच्या नवऱ्याचे खून कश्या प्रकारे करते, हे बघा "७ खून माफ" मध्ये. सिनेमा ठीक आहे. लहान मुलांना घेऊन बघण्यासारखा निश्चित नाही. ३ तास सिनेमा प्रेक्षकांना कंटाळा येऊ देत नाही. पण सिनेमा बघितलाच पाहिजे असा काही नाही. सगळे नवरे, आणि त्यांच्या खुनाचे प्लॉट चांगले रंगवले आहेत. सिनेमाचा शेवट खूपच वेगळा आहे.

तुम्ही हा सिनेमा बघितला असल्यास प्रतिक्रिया लिहा.



Suzana is a daughter of a very rich person. Her dead body is found and the police are trying to investigate the matter. They find out that she was married to six different men at different points in time and all men have died untimely. This makes the case very complicated, they need to find if her death is natural or there is something fishy in this incidence too. So they want to check the reality behind the whole episode. Arun Kumar is the officer in charge of the forensic analysis of this case. A sheer coincidence is this Arun Kumar knows Suzana from his childhood. Now he is happily married, but at young age, he had a crush on her. With the news of Suzana's death Arun Kumar is very sad and while investigating this case he is remembering his olden days spend around and with Suzana.

Suzana's dad was a very rich person. His mother died when Suzana was very young. For her the whole world now is her dad. But she lost her dad before she was twenty. Now she is looking for love in any man she comes in contact with. Her dad had three employees in his home. Galib who is a personal assistant and accountant, Magi is cook and care taker of the home and Gunga Uncle is in charge of the Horse Stable. Gunga has adapted Arun Kumar in very young age. Susana married her fathers friend who was an army officer Major Edwin Rodrigs, conferred with bravery medals. But in the war, he has lost one of his legs and has an artificial one. Rodrigs is very possessive about Suzana. He also has a major inferiority complex of his handicap. He drinks a lot and beats Suzana at times. One day all of a sudden Rodrigs dies. During his last rites Suzana meets Jamshed Sing Rathod a guitarist. They got along well and soon decide to get married. He becomes Jimmy and they are in deep love for some time. But Jimmy has one problem, he is drug addict. Suzana tries to treat him for his addiction, but she fails. And Jimmy too dies soon.
Suzana is in shock after Jimmy's death and decides to travel to Kashmir to change the atmosphere around her. She meets Mohamad in Kashmir who is a poet. His soft poetry really touches Suzana and again she falls for him. She marries him by accepting Islam. Though Mohamad's poetry was very soft and loving, his love making was very violent and aggressive. He likes beating and hitting her. He too dies and now police department starts feeling foul play in all this. Kimmatlal was the officer put on this investigation. He probes the case for several weeks, visits Suzana's home several times for that. Suzana just uses her looks and manages to keep Kimatlal away from real investigations. One of her horse wins a major race in the region and during the felicitation she meets Nickolai.

Nickolai is a Russian and he starts spending lot of time with Suzana. Arun Kumar was young man by this time and Suzana requests him to get Arun admitted in some good Russian university. After Nickolai's marriage with Suzana, he takes Arun Kumar to Russia for his admission. During this time Arun Kumar learns that Nickolai is already maried in Russia with children. He conveys this to Suzana and on Nickolai's return from Russia he too dies. Now him being a foreign citizen, there is a larger trouble for Suzana. Kimatlal is again back for investigations. Kimatlal is now making progress and seems like Suzana would be in big trouble. To manage this situation she sleeps with Kimatlal. Now Kimatlal starts frequenting her place at odd hours, and finally she decides to marry him, to keep herself out of trouble. He too dies of heart attack one night.

Now Suzana is fed up with life and attempts suicide. She jumps in front of a fast car and the car hits her and runs away. But Modhu saves her life by treating her. He is a herbal physician. He is a very loving and caring person and Suzana feels better very soon. During this course she starts feeling that Modhu was the kind of person she was looking for, all her life. She marries Modhu now, but unfortunately he dies in few weeks. Now she shoots herself and her body with all the evidences are in front of Arun Kumar. He is the forensic expert the police department is relying on now to know the truth behind her life.

What did Arun Kumar find in his investigations? Does she really kill her husbands and if yes how does she manages all this? Watch "Saat Khun Maf" for that. Do not watch this with kids. This is not really a must watch type movie, but enjoyable with interesting story line, plot and script. The movie ends with a bit of surprise. 

If you have watched this, we would appreciate your comments on this movie.

Director
  • Vishal Bhardwaj विशाल भारद्वाज 

Cast
  • Priyanka Chopra प्रियांका चोप्रा 
  • Neil Nitin Mukesh नील नितीन मुकेश 
  • John Abraham जॉन अब्राहम 
  • Irfan Khan इरफान खान 
  • Aleksandr Dyachenko अलेक्झांडर द्याचेन्को 
  • Annu Kapoor अनु कपूर 
  • Naseeruddin Shah नसिरुद्दीन शाह 
  • Vivaan Shah विवान शाह 
  • Konkana Sen Sharma कोंकना सेन शर्मा 
  • Usha Uthup उषा उथुप 
  • Harish Khanna हरीश खन्ना 

मंगळवार, जानेवारी २४, २०१२

द नेमसेक (The Namesake)



अशोक गांगुलीला कलकत्त्याला लहानाचा मोठा झालेला आणि आता अमेरिकेत एका युनिवर्सिटी मध्ये पीएचडी करत असतो. तो लग्न करायला म्हणून भारतात येतो. जुन्या रीतिरिवाजाप्रमाणे मुलगी बघून लग्न ठरवले जाते. मुलगी असते असीमा. असीमाला खरतर शास्त्रीय संगीताची खूप आवड असते. ती शिकत देखील असते. पण आई-वडील लग्न ठरवतात आणि त्या दोघांना पण काही प्रोब्लेम नसतो. त्यामुळे ती दोघे लग्न करून अमेरिकेत येतात. अशोक गांगुली खूपच चांगला असतो. आशिमाची चांगली काळजी घेतो. त्यांना लवकरच एक मुलगा होतो. मुलाचे नाव काय ठेवायचे असा प्रश्न असतो, पण भारतात सांगितल्यावर ते पत्रिका बघणार, मग जन्माक्षर येणार आणि मग नाव ठरणार याला खूप दिवस लागत असल्याने, व अमेरिकेत नाव ठेवल्याशिवाय घरी जाता येणे शक्य नसल्याने मुलाचे नाव गोगोल ठेवण्यात येते. गोगोलचे नाव निखील असेही ठेवण्यात येते, पण गोगोल हेच नाव प्रचलित होते. थोडे दिवसाने दुसरी मुलगी होते, तिचे नाव सोनिया ठेवण्यात येते.

शाळेत नाव घालायला जेव्हा आई-वडील जातात, तेव्हा गोगोलचे नाव निखील असे सांगण्यात येते, पण गोगोल म्हणतो की त्याला निखील आवडत नाही व शाळेत गोगोल हेच नाव ठेवायचे. सुरवातीला त्याला त्याच्या नावा बद्दल काहीच प्रोब्लेम नसतो. जेव्हा तो ६-७ जातो तेव्हा शाळेतील मुले त्याला त्याच्या नावावरून चिडवतात. ते बघून त्याला खूप वाईट वाटते व तो आई-वडिलांना म्हणतो की तुम्हाला दुसरे कुठले नाव सुचले नाही का? इतके वाईट नाव का ठेवले? पण आई-वडील काही सांगत नाही. थोडक्यात गोगोलला त्याच्या नावाचा तिटकारा असतो. तो जेव्हा हायस्कूल मध्ये जातो तेव्हा त्याला कळते की निकोलाई गोगोल नावाचा एक कोणीतरी रशियन लेखक होता. त्याच्या वडिलांना तो लेखक खूप आवडत असल्याने त्याचे नाव गोगोल ठेवण्यात आले आहे. गोगोल हा लेखक जरी खूप हुशार असतो, तरी तो थोडा विचित्र असतो. आणि सगळी मुले गोगोल उर्फ निखीलला, लेखकाच्या या विचित्र कॅरेक्टर मुळे चिडवत असतात. आता शाळा संपवून दुसऱ्या गावात युनिवर्सिटी मध्ये जाणार असतो. तो तिथे त्याचे नाव निक असे सांगतो, तिथे आता नवीन आयुष्य सुरु होते. त्याला तिथे एक मॅक्सीन नावाची एक गर्लफ्रेंड मिळते. तिचे आई-वडील खूप श्रीमंत असतात. निक आता घरी आई-वडिलांना टाळू लागतो. आईचा कधीही फोन आला तरी हा घरीच नसतो. तो घरी कधीही आपणहून फोन करत नाही. आशिमाला याचे खूप दुख होते. पण ती ते फार दाखवत नाही.

आता अशोक ओहायो युनिवर्सिटी मध्ये ६ महिने शिकवायला जाणार असतो. सोनिया पण आता कॉलेज मध्ये असते, त्यामुळे आशिमा एकटीच घरी राहत असते. आशिमाला वाटते की गोगोलने अशोक जाण्यापूर्वी एकदातरी त्यांना भेटायला यावे. हो- नाही करता करता तो येतो आणि त्याचा गर्लफ्रेंडला घेऊन येतो. आशिमाला सगळेच आवडत नाही पण तरी ते सगळे निमुटपणे सहन करते. गोगोल एक दिवस राहून जातो, अशोकला विमानतळावर पोचवायला आशिमा जाते, आणि तीच काय अशोकची शेवटची भेट ठरते. पोटात दुखतंय असा अशोकचा फोन येतो, तो सांगतो की काळजीचे काही कारण मी हॉस्पिटलमधूनच बोलत आहे. डॉक्टर माझ्यावर आता उपचार करतीलच. पण हा फोन शेवटचा ठरतो. अशोकचे तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने निधन होते. वडील गेल्यावर मात्र गोगोलला खूप दुख होते आणि तो त्यांना काहीच सुख देऊ शकला नाही याबद्दल तीव्र पश्चाताप करतो. त्याचा गर्लफ्रेंडला सोडून देतो.

थोड्या दिवसाने त्याला मौसमी नावाची एक बंगाली मुलगी भेटते. तिच्याबरोबर तो लग्न करतो. सोनियाने पण एका अमेरिकन मुलाबरोबर लग्न करायचे ठरवले असते. अशीमाला काही प्रोब्लेम नसतो. ती म्हणते की जर मुलं खुश आहेत तर मला काही प्रोब्लेम नाही. पुढे गोगोल-मौसामिचे आयुष्य कसे जाते, गोगोलला त्याच्या नावाचे रहस्य कळते का हे बघा "नेमसेक" मध्ये.

सिनेमा ठीक आहे. एक अमेरिकेत आलेल्या भारतीय कुटुंबियांचे जगणे दाखवले आहेत. भारतीय मूल्य सोडता येत नाही, आणि अमेरिकी मूल्य नीट धरता येत नाहीत असे थोडेसे या सिनेमातून दाखवण्याचा दुबळा प्रयत्न केला आहे. सिनेमा एकूण गोष्ट म्हणून चांगला आहे. पण नक्की कश्यासाठी हा सिनेमा काढला हे नीटसे कळले नाही. मीरा नायरने दिग्दर्शित केलेला सिनेमा असल्याने सिनेमा खूप चांगला असेल असे वाटले, पण प्रत्यक्षात सिनेमा ठीक या वर्गात मोडेल.


Ashok Ganguli is born and brought up in Kolkata. Now he is doing his PhD in an American university. He visits India and his parents suggest him to get married. Acording to Indian customs he visits a girl's house meets Asima and marries her. Asima has deep interest in Indian classical music and she is pursuing it as serious hobby. Since her parents decide her marriage she happily marries Ashok. They move back to US. Asok is very caring husband and he takes care of her very well. Very soon they have their first boy child. The hospital staff asks for a name immediately. They are not really ready for this. They were planning to make the horoscope of the boy and get the first letter of the name form it and then decide on the name. But in the hospital they will not get discharge till they decide the name, so Ashok just suggests a name Gogol. Soon they get a girl and this time they are ready with name, so she is named Sonia. Later on they name Gogol as Nikhil but that is not changed in the papers, so Gogol remains his name.

At the time of school enrollment Asima tells his name as Nikhil but young Gogol insists that it should be Gogol itself. So again in the school the same name sticks him. Initially he is happy with the name but as he grows old and enters middle school he starts feeling uncomfortable for two reasons, first it is bit unusual and another is other kids tease him on that. He asks his parents why they named him like that, but his parents do not have a real reason to him. By the time he enters high school, he starts hating his own name. His parents tell him that they tried to keep his name Nikhil at the time of school enrollment but how he insisted on Gogol that time. He learns in the high school about a renowned Russian author Nicolai Gogol and since his father liked the author that name came to his mind at the time in the hospital. Gogol was renowned author but he is also know for his whimsical character. So his classmates continue to tease him.

He finishes high school and goes a University in different city. He takes this opportunity and changes his name to Nikhil aka Nick. His life changes and he gets reed of his past and the name stuck to him for years. He gets a girlfriend called Maxim and starts to enjoy life. Slowly he starts to avoid his family. He spends more time with Maxim's parents. He is never at home with Asima calls and never calls her up. Asima is disturbed and unhappy but never shows that.

Around this time Ashok gets an opportunity to teach in Ohio university for a semester as sabbatical. Since Asima has her job as librarian she decides to stay back and only Ashok is supposed to go there. Sonali is already married to a American guy and not with her. Asima wishes that Gogol should come and spend some time with her and Ashok before he leaves for Ohio. Finally Gogol visits them along with his girl friend. She is not really happy with this kind of relationships, but she accepts it all without resentment. Gogol spend some time with them and leaves even before Ashok is supposed to leave. Asima alone has to see Ashok off at the airport. That happens to be their last time spent together. In a few days Ashok calls her form Ohio and tells her that he has some pain in the stomach and is in the hospital. He dies with heart attack within few hours. The phone conservation between Ashok and Asima was the last one they had. At this point Gogol is shocked
and really sad. He feels he could not make his dad happy at all. He leaves his girlfriend and spends some time with his mother.

He reconnects his childhood friend Mausami. She has changed a lot over years. Gogol marries Mausami and since Sonali is already married and leading a good life and Gogol is into a decent job, Asima decides to come back to India. What happens next in the lives of Gogol and Asima needs to be watched in the movie Namesake. It also opens up the secret behind the name Gogol.

The movie is good. A non resident Indian family's life in US. The emotional stress. Their attempt to balance between the Indian morals & values and the American lifestyle and culture. The storyline and the plot seems good, but does not take complete grip over audience. Not as good as most of the Meera Nair movies. Not a must watch but can watch category. This movie is based on the novel by Jhumpa Lahiri

Cast


Direction