शुक्रवार, एप्रिल २४, २००९

मुंबईचा डबेवाला (Mumbaicha Dabewala)

मुंबईचा डबेवाला हा आता जगप्रसिद्ध आहे. इंग्लॅण्ड च्या राजा पासून six-sigma experts पर्यन्त सर्वजण यांना ओळखु लागले आहेत. त्यामुळेच की काय यावर एक चित्रपट काढलेला दिसतो.

या चित्रपटाचे कथानक अगदीच साधारण पठडीतले आहे. एक सच्चा इमानदार डबेवाला कथेचा नायक. मग प्रेमाचा त्रिकोण, वरून सभ्य दिसणारा खलनायक, मोठे देशद्रोहाचे कारस्थान, त्यात नायक गोवला जाणे, ...... नावावरून या चित्रपटात कमीतकमी मुंबईच्या डबेवाल्यांचे जीवन बघायला मिळेल अशी अपेक्षा होती पण ती सुद्धा नीटशी साधली नाही.

या चित्रपटात फारसे काही पहाण्यासारखे वाटले नाही. पण भारत जाधवचे सच्चे चाहते असलात तरच या चित्रपटात वेळ खर्च करा.

सिनेमा बघून झाल्यावर / बघितला असल्यास आपल्या प्रतिक्रियांची प्रतीक्षा आहे.

Mumbai Dabewala has become a well- known community from Six Sigma to Duke of Edinburgh for their efficient handling of material without mistakes by un-educated people. So the movie industry also decided to cash on it with this movie Mumbaicha Dabewala.

This is a story of a youth in the Lunch Tiffin Delivery Business of Mumbai. The story line is a very typical bollywood "masala" movie. Simple and honest hero, love triangle, villain pretending to be a honest gentleman but trying to sell top level country secrets to foreigners etc.

The movie fails to make any point or even show the real life of Mumbai Dabawala Community. So unless you are big time fan of Bharat Jadhav, you are not recommended to invest the time to watch this movie.

Do leave your comments, if you have seen the movie.

Cast


Direction
  • Manohar Raghoba Sakhankar मनोहर राघोबा सखणकर
Link to watch online
Mumbaicha Dabewala on Marathi Tube

1 टिप्पणी: