Sonali Kulkarni लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Sonali Kulkarni लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, डिसेंबर १७, २०१५

अगं बाई अरेच्च्या २ (Aga Bai Arechcha 2)



शुभांगी कुडाळकर हि एक वयस्क तरुणी लग्न न ठरल्यामुळे तशी जरी दुखी असते. पण लहान पणापासून हिने लग्नाची स्वप्ने बघितलेली असतात. आता लग्न न ठरल्याने जिथे लग्न असेल तिथे गेल्यावर हिला बऱ्याच टोमण्यांचा सामना करावा लागतो. याला कंटाळून शुभांगी उर्फ शुभा हि गोव्याला जाउन राहायचे ठरवते. घरातील आर्थिक परिस्थिती चांगली असते. भाऊ देवेश हा सी ए असतो. घरातील सगळेच लोक शुभावर प्रेम करत असतात. शुभाला एका जन्मजात शाप असतो, कि हिचे ज्या पुरुषावर प्रेम असेल, व त्या पुरुषाचे देखील शुभावर प्रेम असेल तर, शुभाने त्या पुरुषाला हात लावला तर त्यावर काहीतरी संकट येइल किंवा त्याला काही अपघात तरी होतिल. तर हिच्या जीवनावर एक पुस्तक लिहायचे म्हणून विक्रम देसाई नावाचा लेखक तिच्याकडे येतो. सुरवातीला तर हि त्याला उडवून लावते. पण मग जशी ओळख होते, तशी हि तिच्या जीवनातील एक एक पुरुष आणि त्यांच्या बरोबर घडलेले किस्से सांगू लागते.

ही जेव्हा अगदी ७-८ वर्षाची असते तेव्हा एक छोटा मुलगा तिला आवडतो आणि त्याला पण ही आवडते,ओळख होण्या पूर्वीच हे दोघे एकमेकांचे हात हातात घेतात आणि त्याला अपघात होतो. तेव्हा तर हिला काही समजत नाही. पण जेव्हा ११-१२ वर्षाची होते तेव्हा एक प्रल्हाद किस्मिसे नावाचा एक १३-१४ वर्षाचा मुलगा हिच्याशी मैत्री करतो आणि मग ते दोघे असेच एका देवळात जाउन लग्न करतात. हे लग्न म्हणजे एक पोरखेळ असतो आणि त्यानंतर जेव्हा हे दोघे ठरवतात कि आपण एक दिवस ट्रीपला जायचे तेव्हा अचानक  शुभाच्या वडिलांना यांचा प्लॅन कळतो आणि या प्रल्हादला शिक्षा घडवायला म्हणून ते जातात, आणि त्या झटापटीत प्रल्हाद्ची सायकल झाडावर आपटते आणि मग त्याला बरेच लागते व तो गाव सोडून निघून जातो.

हिच्या जीवनात तिसरा पुरुष येतो, तो जेव्हा शुभा कॉलेज मध्ये असते तेव्हा. राहुल सावंत हा एक क्रिकेट खेळाडू असतो व त्यावर कॉलेज मधील सगळ्याच मुली फिदा असतात. पण राहुल शुभावर फिदा होतो. आणि एका क्रिकेट मॅचमध्ये राहुल शुभाचा हात धरतो, आणि मग धुवाधार बॅटींग करतो, पण  मॅच संपल्यावर त्याचा अपघात होतो. हे सगळे झाल्यावर शुभाच्या मानत असे येते कि जेव्हा ती तिला आवडणाऱ्या पुरुषाला हात लावते तेव्हा त्याच्यावर काहीतरी गदा येते, त्यामुळे ती आता कुठल्याही पुरुषावर प्रेम करायचे नाही असे ठरवते. पण आता तिचे आई-वडील एका मुलगा लग्नासाठी शोधतात नरेंद्र चकवे. या नरेंद्राला किडे पाळण्याचा फार शौक असतो. शुभाला वाटते कि आता प्रेम करून मग लग्न करण्यापेक्षा आपण आणि लग्न ठरवून मग प्रेम केले आणि मग त्या व्यक्तीला हात लावला तर कदाचित त्या पुरुषाला काही होणार नाही. पण दैववशाने नरेंद्रला किडा चावतो आणि त्याचा कानाचा पडदा फाटतो.

या प्रसंगा नंतर नरेंद्रच्या घरातील लोक लग्नासाठी तयार होत नाहीत. पण नरेंद्रला शुभा खूप आवडली असते, त्यामुळे तो तिच्याशीच लग्न करायचे ठरवतो. त्यात पण बरेच गोंधळ होतात, ते नक्की काय गोंधळ असतात, शुभाला  आयुष्यात खरच कोणी जोडीदार म्हणून मिळतो कि नाही, तिचा शाप हा खरच असतो का कि हि तिची अंधाश्रद्धा असते हे बघा "अगं बाई अरेच्च्या २" मधे.

सिनेमा चांगला आहे. जरी सुरवातीला थोडासा विचित्र मजेशीर वाटत असला, तरी नंतर सिनेमा चांगला फुलतो. आणि आता पुढे काय होणार अशी उत्सुकता लागून राहते. सिनेमा प्रेडीक्टेबल  नाही. मध्ये मध्ये सोनाली कुलकर्णी चे मेकअप थोडेसे वेगळे वाटते. वयाच्या प्रत्येक फेजमध्ये वेगळी कलाकार शुभाचे काम करायला आणली आहे. सिनेमा फ्लॅशबॅक मध्ये थोडा थोडा आहे. एकूण सिनेमा बघावाच असे नाही पण बघितल्यास कंटाळा निश्चित येणार नाही. सिनेमाचे नाव "अगं बाई अरेच्च्या २" का दिलाय हे मात्र नाही समजू शकले. कारण पहिल्या अगं बाई अरेच्च्या सिनेमाशी त्याचा काहीच संबंध जाणवला नाही.



Shubhangi Kudalkar is a unmarried lady in her late twenties. She is sad because even though she has a childhood dream to get married and have a family, she is not married yet. Since she is still unmarried, every function she attends, she has to face some taunting. She is fed up with this and decides to move to Goa and stays alone in the family house there for some time. Her family is well to do, her brother Devesh, is a chartered accountant. Her family consists of parents, grandmother and Devesh. They all love her very much. But she has a curse, any boy who loves her, after he touches her or she touches him will meet with some event injuring him. One publisher comes to know of her story and hires a author to write a novel about her. Vikram Desai approaches her for the task. Initially she is not at all interested and just drives him out. But Vikram is very persistent and finally was able to convince Shubha to talk to him. Shubha slowly starts opening up ans starts sharing stories of her life events.
Her first memory was when she was about 7-8 years. One of her neighboring kid get friendly with her, and they just hold hands. Within minutes, he was hit by a ball and gets injured. She does not take this seriously. At the age of about 12, she gets friendly with a boy of 13. His name is Pralhad Kismise. They are too young to understand what is marriage, but they go to a temple and get married. They decide to go for one day honeymoon trip to near by town, but are caught by Shubha's dad. While her dad was trying to beat him up. Pralhad runs away with his bicycle but meets with a small accident and get injured. Finally Pralhad leaves the village.

Years pass and Shubha joins college. During her college years, she meets Rahul Savant, the captain of college cricket team. He is really good looking and a heartthrob of the college girls. In the first meeting with Shubha, Rahuls falls for her. They become close. During one of the cricket match, he holds Shubha's hand for best wishes and goes out to score a century. But he meets with a freak accident after his innings and is injured. This makes Shubha believe that if she loves any man, and holds his hands or rather touch each other, the destiny puts the man in trouble. He meets with some accident within 24 hours. Finally after finishing college, her parents start looking for a right relation for her, and Shubha thinks, if there is no love before the marriage, it will be alright. Her parents find Narendra Chakave as a suitable match. Narendra has a hobby for insects and small critters. But he touches Shubha, and within minutes a spider enters Narendra's ears and bites him, damaging his year permanently. 
This puts off Narendra's family and they wanted to cancel this marriage, but Narendra has started liking Shubha and decided to marry her only. But the sailing was not at all smooth. What troubles they have to go through, what happens next, is the curse Shubha has was for real? Is there any solution for that? Watch the Marathi movie "Aga Bai Arechha 2".

This movie is not sequel of the movie Aga Bai Arechha, so we failed to understand the name of the movie.This movies is good and we enjoyed watching it. Initially if felt little like a routine movie, but really flourished after a while. It got really interesting after interval. Sonali Kulkarni looks good and different with makeup. They have used several artist to play Shubha over years. Finally it is not really must watch type, but you may not regret if you decide to watch. Do let us know your views in the comments section. 


Direction

Cast










गुरुवार, डिसेंबर ०३, २०१५

मितवा (Mitwa)



 शिवम सारंग हा बऱ्याच हॉटेल्स आणि पब्जचा मालक असतो. त्याचा एक दोष म्हणजे त्याला सुंदर मुलगी दिसली कि  तिच्यावर फिदा होतो. शिवम सारंग ची अवनी नावाची एक बिसिनेस पार्टनर असते. अवनी न खरा तर शिवम खूप आवडत असतो, पण शिवमचे लग्न, बंधन, जबाबदारी यावर विश्वास नसतो त्यामुळे तो अवनी बरोबर खूप जवळची मैत्रीण यापेक्षा जास्त काही संबध ठेवू इच्छित नाही. आणि शिवम सारंग खूप श्रीमंत असल्याने त्याच्यावर सगळ्याच मुलींचा तो लाडका असतो.

त्याच्या नवीन हॉटेल मध्ये परदेशी लोकांबरोबर काही बिसिनेस डील होणार असते, आणि त्यानुसार नवीन व्यवसायात काही लोकांची भारती सुरु असते. त्यासाठी मुलाखत द्यायला म्हणून नंदिनी प्रभू येते. नंदिनीला बघाता क्षणीच शिवम सारंग तिच्या प्रेमात पडतो. नंदिनीला नोकरीवर घेतो, पण नंदिनीची अट असते कि ती संध्याकाळी ५ नंतर काम करणार नाही. पण कामाचे स्वरूप असे असते कि तिला संध्याकाळी यायला हवे असे अवनीचे मत असते. नंदिनी म्हणते कि तिला यायला जमणार नाही, आणि त्यामुळे मला नोकरी नकोय. पण शिवम म्हणतो कि ठीक आहे तरीही तुला मी घेइन. अवनी खूप खुश नसते, पण शिवम पुढे तिचे काही चालत नाहि. शिवम काही न काही कारण काढून नंदिनीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. आणि मग तो त्यात यशस्वी देखील होतो. अवनीला दोघांचे हे इतके जवळ येणे खूप आवडत नाही. पण अवनीचे शिवमवर खूप प्रेम असते त्यामुळे ती सगळे सहन करते.

नंदिनी आणि शिवम दोघांचे असे ठरलेले असते कि फक्त मैत्री करायची त्यापुढे काही कामित्मेंत नाही. पण शिवम  नंदिनीच्या इतक्या प्रेमात पडतो कि तो शेवटी तिला लग्नाची मागणी घालतो. पण नंदिनी धुडकाऊन लावते. याचा परिणाम म्हणून तो एक दिवस स्वताला खोलीत कोंडून घेतो. नंदिनीला खूप काळजी युक्त भीती वाटते, ती त्याला भेटायला जाते आणि शेवटी त्याला स्वताचा भूतकाळ सांगते आणि सांगते कि ती लग्न करेल पण २४ तासातील २ तास ती अश्विनला देइल. हा अश्विन कोण आणि नंदिनी अश्विन साठी दिवसातले दोन तास का देऊ इच्छिते? शिवमला या अटीचा काय त्रास होतो का?  या प्रश्नांची उत्तरे बघा "मितवा" या सिनेमात.

सिनेमा बऱ्यापैकी कंटाळवाणा आहे. सिनेमात दोन-तीन गाणी आहेत. पण फार श्रवणीय आहे असे नाही. एक-दोन वेगवेगळ्या सिनेमांचे मिश्रण करून हा सिनेमा तयार केलाय अस वाटले.



Sivam Sarang is a rich businessman who owns many hotels and pubs. He is a playboy and falls for every beautiful girl he meets. Avani is Shivam's business partner. Avani loves Shivam, but Shivam does not believe in marriage and related responsibilities. So he always looks at Avani as best friends but nothing more than that. Since Shivam is good looking and rich, he has a huge fan followers of girls. 

His hotel has got into a big deal with a international group so he is buy recruiting staff for his hotel. Nandini Prabhu is one of the candidates for interview and Shivam falls for her at the first sight. Shivam immediately hires her, even though she puts a condition that she can not work second shift any time. Nandini frankly tells, that she needs this job desperately, but still she cannot accept the job, if the condition of second shift can not be relaxed. Shivam overrules Avani's objection to this condition and agrees to hire Nandini irrespective. After Nandini was hired, Shivam tries very hard and ultimately was successful to become friends with Nandini. This pains Avani a lot, but she accepts this, due to her love for Shivam. 

Nandini accepts Shivam's friendship on the condition that they will only remain only friends and nothing more.  Shivam inititally agrees, but at some point he was not able to control himself and proposes Nandini. Nandini ruthlessly denies his proposal. Shivam locks himself in the room and Nandini gets worried about him. Finally she meet him and explains him the whole background and accepts to marry him on the condition that after marriage Shivam will permit her two hours per day to be spent with Ashwin and Shivam will never try to invade those two hours. Who is this Ashwin and why Nandini has to commit those two hours to him needs to be watched in the Marathi movie "Mitawa".

The movie is boring and the songs are not that good. The story line seems to be mixture of a few popular movies. If you really love Swapnil Joshi, watch it on you own risk and let us know your views if you have watched it.  



Direction
  • Swapna Waghmaare-joshi स्वप्ना वाघमारे-जोशी 

Cast

मंगळवार, डिसेंबर २०, २०११

गुलमोहर (Gulmohar)


  विद्या चौधरी ही एका कॉलेजात लेक्चरर असते. आई वडिलांच्या मनाविरुद्ध हिने पळून जाऊन देवेन चौधरीशी लग्न केले असते. हे खूपच सोशिक, हुशार, मनमिळावू, कष्टाळू असते. देवेनला नाटकात काम करून जम बसवायचा असतो. पण ह्याची काही तत्वे असतात. त्यात तत्वात बसणारी नाटकंच याला करायची असतात. आणि त्याच्या तत्वात बसणारी नाटकं चालत नसल्याने नवीन प्रकारची नाटकं दिग्दर्शक बसवतात. याला त्या नाटकात काम करण्याची संधी मिळते. पण हा ती धुडकावून लावतो. त्यामुळे ह्याला काही त्याला हवी तशी काम मिळत नसतात. त्यामुळे हा जवळपास रिकामटेकडा असल्यासारखा असतो. आता ह्याला नाटकं मिळत नाहीत हे बघून विद्या पुढे शिकते, तिच्या मेहनतीवर, त्याच कॉलेज मध्ये नोकरी मिळवते

पण आरक्षणामुळे हिला तिथे तासावर नोकरी करावी लागते. पण तरीही ही तिथे टिकून राहते, कधीतरी पर्मनंट होईल या आशेवर त्याच कॉलेज मध्ये राहते. प्रिन्सिपल सर तिला काही अनुवाद करण्याचे काम देखील देतात. मिळेल ते काम कष्ट करून करायचे हे हिचे तत्व असते. घर हिच्या आधारावर सुरु असते.

आई वडील गेल्यावर हिची लहान बहिण मीरा पण ह्यांच्याकडे येऊन राहते. मीराचे शिक्षण सुरु असते आणि ती UPSC ची परीक्षा देऊन पुढे करिअर करायचे असे तिने ठरवलेले असते. विद्याच्या कॉलेजमधील राजन नावाच्या लेक्चरर बरोबर मीराचे प्रेम होते, पण घरातील देवेन आणि विद्याचे संबध बघून हिचा लग्नसंस्थेवरील विश्वास उडालेला असतो.

विद्याच्या कॉलेज मध्ये आरक्षणाबद्दल एक आंदोलन सुरू असते. त्या आंदोलनाचा सूत्रधार एक राजकीय पक्ष असतो. पण त्यांनी हाताशी याच कॉलेज मधील काही युवक हाताशी धरलेले असतात. त्यातच एक भगवान म्हणून मुलगा या आंदोलनाचे नेतृत्व करत असतो. तो राजकीय पक्ष त्याला पैसे देत असतात व राहायला एक गोडाऊन. विद्याला समजत असते, कि भगवान हा खूप हुशार मुलगा आहे, पण याची दिशाभूल केली जात आहे.

तसा विद्याचा या आंदोलनाशी काहीच संबध नसतो. ती तिच्या काळज्यामध्ये व्यस्त असते. त्यात तिला बातमी कळते कि तिला पर्मनंट होणार अशी बातमी कळते. ती खूप आनंदात असते. पण देवेनला त्याचा काहीच आनंद होते नाही. विद्याला हे समजत असते कि देवेन त्याच्या अपयशाने त्रस्त झालेला आहे आणि त्यामुळे हिचे यश त्याला बघवत नाहीये. पण तरीही हि या सगळ्याचा स्वीकार करते. या सगळ्यावर अजून एक संकट म्हणून कि काय, विद्याला कळते कि ती आई होणार आहे. तिच्या मते आता त्यांनी हे मुल ठेवायला पाहिजे, पण देवेनला ते नको असते. या मुद्यावरून दोघांमध्ये खूप भांडण होते. देवेन हिला खूप मारहाण करतो.

ती दुखात घर सोडून बाहेर पडते. पण बाहेर पडून जाणार तरी कोठे? ती अशीच जखमी अवस्थेत बसलेली असताना भगवान तिला बघतो. तो तिला त्याच्या गोडाऊन वर घेऊन येतो आणि ते दोघे ती रात्र गोडाऊन मध्ये काढतात.... आता या गोष्टीचा पुढे काय परिणाम होतो, विद्याला कॉलेज मध्ये या गोष्टीला कसे तोंड द्यावे लागते ? देवेन आणि विद्याचे संबध सुधारतात का ? शेवटी विद्या, भगवान, मीरा, आणि देवेन यांच्या जीवनात त्यांना हवा असलेला गुलमोहर फुलतो का हे बघा "गुलमोहर" या सिनेमामध्ये.

मला सिनेमा आवडला. पण तो सगळ्यांना आवडेलच कि नाही हे सांगणे जरा कठीण जातंय. विद्या तिच्या नवऱ्याचे इतके हट्ट का पुरविते असा प्रश्न मात्र नक्कीच पडतो. रजत कपूरचे मराठी उच्चार नीट नाहीत. त्याने यावर अजून जास्त मेहनत घ्यायला हवी होती असे वाटते. "सगळीच स्वप्न नाही तुटत रे भगवान. फांदी तुटली म्हणून, नवा कोंब येण्याचा थांबत नाही." हे वाक्य आवडले. सोनाली कुलकर्णी आवडत असल्यास हा सिनेमा बघा. लहान मुलांबरोबर बघण्यासारखा सिनेमा नाही. कारण हा सिनेमा मुलांच्या डोक्यावरून निश्चित जाईल.

Vidya Chaudhari is a lecturer in a college. She has married Deven Chaudhari, against will of her parents. She is a bright, hard working, friendly and tolerant person. Deven is an theater actor and wants to make a career in that. But he has some principles, and he accepts the plays that fit into his framework. With changing times, he hardly finds any of those that fit this and most of the times Deven is jobless. When he gets some work, he is not happy with that. Because of all this, Vidya works hard, continues her education and gets a lecturer's job in a college.

Due to quotas and reservations, he has to work on temporary positions and gets paid only on hourly basis. She is continuing on the faith that one day she will get a regular job and ultimately a tenure position. The principal of the college is a nice man and help her with some job works like translations etc. She has been working hard to run her family.

Her parents pass away and her sister Meera too joins them. Meera is still a student and has a dream of writing UPSC examination and get into Government Administrative Services. Meera is dating a lecturer called Rajan, who teaches in the same college as Vidya. But looking at Vidya and Deven's relationship now, she is really not sure of the whole institution of marriage.

There is a movement in the college about the reserved quotas for certain sections of students. This is run by a political party in the background, and are supporting few college students. Bhagwan is one of the leaders in that. He is paid by the political party and they have also made a go-down available for him to stay. Vidya is pained looking at Bhagwan, because he is a bright and has good future, but being used by the politicians. 

Vidya is not bothered of this reservations movement, since she is very busy herself with her own problems at home and college. But she get the sweet news that she is going to get tenure position. She is really happy with the news, but Deven is not at all happy with this. Vidya understands his situation, that he is frustrated with his own failure, and so he is not able to enjoy it. During these days Vidya gets another good news that she is going to be mother. She is really happy with this news, and want the child very much. But Deven is not in a situation to accept this and want her to abort the child. They get into a argument and end up in a scuffle and Deven beating her badly.

In this shock in sadness, she quits the home and moving out aimlessly. While sitting by the roadside and injured, Bhagvan sees her, and with intention of helping her, brings her to his home in the go-down. She spends the night in the go-down with Bhagwan and this leads into consequences of different nature. What kind of problems Vidya has to face in the college ? Was Deven able to patch up with Vidya ofter all this ? What happens in the lives of Vidya, Deven, Meera, Bhagvan watch in the movie Gulmohor.


Cast
Direction

Link to watch online

मंगळवार, ऑगस्ट ०९, २०११

रिंगा रिंगा (Ringa Ringa)

 सिद्धार्थ देसाई हा रंगराव उर्फ श्रीरंग नाईक यांच्या आतल्या गोटातील एक मनुष्य असतो. सुरवातीला तो त्यांचा बॉडी गार्ड म्हणून काम करत असतो, पण एकदा रंगरावचा जीव वाचवल्यामुळे तो रंगरावच्या आतील गोटातील एक मेम्बर होतो. श्रीरंग नाईक हा एका कोळ्याचा मुलगा असतो, खूप गरीब घरात जन्माला येतो. मोठा झाल्यावर समुद्रमार्गाने स्मगलिंग करायला सुरवात करतो. आणि आता राजकारणात येऊन मुख्यमंत्री पदाकडे वाटचाल सुरु असते. रंगरावच्या पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब मराठे असतात. यांना रंगरावाबद्दल बऱ्याच गोष्टी माहिती असतात. पण त्याचे काळे धंदे माहिती नसतात.

सिद्धार्थ, बरोबरच रंगरावच्या आतल्या गोटात, एक असतो जानी ज्याचे काम म्हणजे रंगरावच्या वाटेत येणाऱ्या सगळ्या काट्यांचा खून करणे, प्रत्येक खूप करताना हा बालवाडीत शिकलेल्या इंग्लिश कविता म्हणत असतो. याला बॅन्जो भयंकर प्रिय असतो. आणि तो बॅन्जो चांगला वाजवू पण शकतो. दुसरी व्यक्ती म्हणजे विश्वास दाभोळकर, हा एकदम चॉकलेटी हिरो असतो. जिथे धमक्या व जोर जबरदस्तीने चालत नाही तिथे हा चॉकलेटी हिरो गोड बोलून गोष्टी काढून घेण्यात पटाईत असतो.


सिद्धार्थ देसाईचे लग्न झालेले असते, मानसीशी. मानसीच्या वडिलांना एक मानसिक रोग झालेला असतो, त्यामुळे ते हॉस्पिटलमध्येच असतात. मानसीच्या आईचे अपघातात निधन होते, त्यानंतर तिच्या वडिलांना तिची आई दिसत असते, आणि ते तिच्याशी प्रत्यक्ष बोलल्यासारखे बोलत असतात. अपघातानंतर सुरवातीचे २ वर्ष वडिलांच्या तब्येतीत काहीच सुधारणा होत नाही. पण ६ महिन्यापूर्वी पासून मानसी देखील आई दिसल्याचे नाटक करून त्यांच्याशी गप्पा करते आणि वडिलांच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागते. मानसीला माहिती नसते कि हे नाटक अजून किती दिवस करावे लागणार.

सिद्धार्थचे लग्नापूर्वी एका सोनाली नावाच्या मुलीबरोबर लफडे असते आणि सिद्धार्थ, माणासीला चिडवण्यासाठी, सोनालीचा फोन आलाय असा नाटक करत असतो आणि या नाटकात बरेचदा विश्वास सामील असतो.

जरी रंगरावचे स्मगलिंगचे धंदे सिद्धार्थला माहिती असतात, तरीही रंगराव त्याचा हिरोच असतो. पण एकदा त्याला कळते कि स्मगलिंग मध्ये रंगराव ने RDX आणले आहे तेव्हा मात्र सिद्धार्थला रंगराव देशद्रोही आहे असे वाटू लागते आणि अश्या देशद्रोह्याला मात्र गोव्याचे मुख्यमंत्रीपद मिळायला नको असे सिद्धार्थला मनापासून वाटते. RDX स्मगलिंगच्या केसेस इंस्पेक्टर कामत कडे जातात, कामत अंथोनीला पकडतो, ज्याच्याकडे सगळे पुरावे असतात. कामत हा खरतर इमानदार असतो. तो यांच्या धमक्यांना घाबरत नाही, पण विश्वास मध्यस्थी करून कामतला रंगरावबरोबर बोलायला तयार करतो. कामत सगळे पुरावे ५ करोड रुपयांच्या बदल्यात देण्याचे काबुल करतो. हेच सांगण्यासाठी सिद्धार्थ, अण्णासाहेब मराठे यांच्याकडे येतो. अण्णासाहेब म्हणतात, कि तू त्या सगळ्या फाईल्स माझ्याकडे आणि फक्त माझ्याकडेच आणून दे. अश्या माणसाला मुख्यमंत्री पद द्यायला नको.

जेव्हा कामत आणि रंगरावचा सौदा होणार असतो, तेव्हा सिद्धार्थ देखील तिथेच असतो. आणि संधी साधून तो सगळ्या फाईल्स घेऊन पळतो. मानसीला फोन करून सांगतो कि भेटायला ये जशी असेल तशी. रस्त्यात मानसीला जानी भेटतो, त्याला कसेबसे सोडवून ती सिद्धार्थला भेटायला जाते, रंगराव, जानी आणि विश्वास तिथेही मानसीवर पाळत ठेवून असतात. सिद्धार्थला मानसी भेटते, ते काही क्षण एकत्र असतात, पण तितक्यात जानी आणि रंगराव देखील तिथे पोचतात. झटापटीत सिद्धार्थ जानीवर गोळी झाडतो, आणि जानी सिद्धार्थवर. यामध्ये मृत्यू होतो, पण नक्की कोणाचा हे आता सांगितले तर मज्जा येणार नाही त्यामुळे ते गुपित ठेवून गोष्ट पुढे सरकते.

हे बघून मानसीला जबरदस्त धक्का बसतो आणि तिला तिच्या वडिलांसारखेच व्हायला लागते. तिला सिद्धार्थ सगळीकडे दिसतो, तसेच जानी पण सगळीकडे दिसतो. सिद्धार्थ- सोनिया च्या बरोबर सगळीकडे घरभर फिरतो असे दिसायला लागते. जॉनी सगळीकडे बेंजो वाजतात, नर्सरी राहीम्स म्हणतो आहे असा भास व्हायला लागतो. इकडे रंगरावची मुख्यमंत्री पदाकडे घोडदौड सुरु होते. मानसीच्या आजारावर काही उपाय सापडतात का? रंगरावचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्नं पूर्ण होते का? नक्की कोणाचा खून झालेला असतो, सिद्धार्थ / जॉनीचा ? ज्या कारणासाठी खून झाला असतो ती फाईल शेवटी रंगरावला सापडते का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे बघायला "रिंगा रिंगा" बघायला हवा.

सिनेमा अफलातून आहे. रहस्यमय आहे हे सांगायलाच नको. सुरवातीला सिनेमा खूपच वेग घेतो सिद्धार्थ पडद्यावरून नाहीसा झाल्यावर मात्र जरा मंदावतो आणि आपण पण चक्रावून जातो. नक्की काय होतंय हे अगदी पटकन समजत नाही. नक्की कोणाचा मृत्यू झालाय हे ओळखण्यात बरीच बुद्धी नष्ट होते, आणि त्यात सिनेमा जरा संथावलेला असल्याने, मेंदू नक्कीच विचार करण्याचा प्रयत्न करतो. हा सिनेमा चेकमेट च्या दिग्दर्शकाने केलेला आहे, त्यामुळे रहस्य सुरवातीला कळू न देता प्रेक्षकांना खिळवण्याचे काम निश्चित साधले आहे. अजिंक्य देव चा रंगराव, संतोष जुवेकारचा जॉनी, अंकुश चौधरीचा विश्वास, भारत जाधवचा सिद्धार्थ आणि सोनाली कुलकर्णीची मानसी सगळे सगळे उत्तम आहे. थोड्यावेळासाठी येणारी सोनाली म्हणजे अदिती गोवारीकर खरं तर एकही संवाद म्हणत नाही. पण तिचा आभास संपूर्ण सिनेमाभर असतो. सिनेमा सगळ्यांनी बघावा असा आहे, कुठेही अश्लील किंवा बिभित्स प्रसंग नाही.

तुम्ही हा सिनेमा बघितला असल्यास, किंवा माझ्या लिखाणावर तुमचे काही मत असल्यास जरूर द्या.

Sidharth Desai is working for Rangarao aka Shrirang Naik. He is actually his right hand man, after he saved his life in an attack on him when he was still his bodyguard. Rangarao was a son of a fisherman, get into smuggling though sea in Goa. Slowly he becomes rich and becomes a politician. Now he is eying the post of Chief minister. Annasaheb Marathe is the party chief. He is aware about Rangarao but not the levels he can get down to become a Chief Minister.

Two other men really close to Rangarao are Johney and Vishwas Dabholkar. Johney is a sharp shooter, using a long range rifle and killing people who are problematic for Rangarao. He has a passion for music, mainly Bango. He likes to play it most of the time and he plays it well too. When is is killing people using his rifle, he keeps humming and singing nursery rhymes. On the other hand Vishawas is chocolate hero. He is very talkative, and has a knack to get things done just by talking sweet.

Manasi is Sidharth's wife. Her father is getting treated for a psychological condition in a nursing home. After Manasi's mother's death in a accident, her father sees her always around and keep talking with her. They try a lot for his recovery, but there were no hopes, so finally Manasi starts to pretend as if her mother is there ans she can see her too. This helps in improving her father's health and she continues to do this for a while.

Sidharth had an affair with Sonali, long before he met Manasi. Once in a while Sidharth pretends in front of Manasi that Sonali has called up and Vishwas is helping him in these pranks.

Though Sidharth knows about Rangarao's smuggling business, he is alright with that, and he helps him in most of his business. But at one point he learns that Rangarao is smuggling in RDX. This really disturbs Sidharth, he can not take this any more now. He is worried of a traitor like this becomes Chief Minister of Goa, that will be a big problem. There is a inspector Kamat who is handling this RDX case, who has a guy called Anthony in his possession. Anthony is the guy who knows everything about the smuggling case. Inspector Kamat is a clean d honest person, and is fearless too. So he does not care about the threats posed by Rangarao. Finally Vishwas comes into play and makes sure that Kamat strikes a deal with Rangarao. Kamat agrees to sell all the evidences to Rangarao fot 5 crore. Sidhharth meets Annasaheb Marathe to tell this situation and request him to make sure Rangarao does not become the Chief Minister. Annasaheb tells him to hand oer the evidences to him and him only, so that he can make sure that Rangarao does not become Chief Minister.

At the time of the real deal execution between Inspector Kamat and Rangarao, Sidharth steals the file and runs away. On the way he calls Manasi to start as she is and come to a particular place to see him. Unfortunately Johny meets Manasi on the way and offers to take her where ever she needs to go. Somehow she manages to escape from Johny but Rangarao, Johney and Vishwas are trying to track Manasi and Sidharth. At one point in this running around, Manasi and Sidharth meet briefly, but Johny and Rangarao reach there in moments. In the scuffle, both Sidharth and Johny pull out guns and fire at each other. It is not disclosed at this point who dies.

But the whole incidence leaves Manasi a mental shock. She starts seeing Sidharth and Sonali together everywhere. She also sees Johny singing his nursery rhymes. She always sees Sidharth and Sonali moving around the home, and she is disturbed. Rangarao is improving his position for grabbing the Chief Minister-ship. Who is able to treat Manasi ? Does Rangarao become CM, Where does the file go ? Can Annasahb Marathe get the file and what intentions he has for using the file. You must watch the thriller Ringa Ringa.

This is a nice movie. The mystery is really good. The story moves fairly fast in the beginning but slows down after the incidence that took lace which changes the course of the movie. The story gets a bit too complicated at times. And even we loose track of what is real and what is imagination of Manasi. This Movie is done by the same director of movie Checkmate He has handled this one also with lot of strength. Rangarao by Ajinkya Dev, Johny by Santosh Juwekar, Vishwas by Ankush Chaudhari, Sidharth by Bharat Jadhav and Manasi by Sonali kulkarni are all really good. Sonali played by Aditi Gowarikar does not have a single line but her illusions are all over the movie. This movie is for all age groups and is fairly child safe.

Do write your comments on the movie or about the review.

Cast

  • Sonali Kulkarni सोनाली कुलकर्णी
  • Ajinkya Dev अजिंक्य देव
  • Bharat Jadhav भारत जाधव
  • Santhosh Juvekar संतोष जुवेकर
  • Ankush Choudhari अंकुश चौधरी
  • Sanjay Mone संजय मोने
  • Uday Sabnis उदय सबनीस
  • Kamlesh Sawant कमलेश सावंत
  • Jayant Savarkar जयंत सावरकर


Direction

  • Sanjay Jadhav संजय जाधव



Link to watch online


मंगळवार, जानेवारी २५, २०११

गंध (Gandh)



एकमेकांशी संबध नसलेल्या तीन गोष्टींचा सांगाडा म्हणजे "गंध". फक्त एकच गोष्ट या तिन्ही गोष्टींना  बांधून ठेवते तो म्हणजे "गंध". ज्या सिनेमात नक्की काय सांगायचय याचा गंध शेवटपर्यंत आणि त्यानंतर देखील लागत नाही तो सिनेमा म्हणजे गंध. आता सिनेमा कसा आहे हे या तीन ओळीवरून लक्षात आलेच असेल. पण आता गंध मध्ये नक्की काय होते हे थोडक्यात बघा.


गंध म्हणजे वास. चांगला किंवा वाईट वास म्हणजे पुस्तकी भाषेत गंध. तर या सिनेमात एकूण तीन गोष्टी आहेत.

पहिली गोष्ट, वीणाची. वीणा एक २४ वर्षाची लग्नाळू मुलगी. हिला बघायला खूप म्हणजे खूप मुलं येतात. पण सगळी मुलं हिला नकार देतात. अतिशय धार्मिक असलेले हिचे आईवडील खूप काळजीत पडतात. वीणाला सारखी सारखी मुलं बघून आता कंटाळा आलेला असतो. ही स्वप्न रंगवत असते कि हिला पण कोणीतरी भेटेल, ज्याच्या प्रेमात हि पडेल आणि तो देखील तिच्या प्रेमात. तर अशी ही वीणा नोकरी देखील करत असते एका कॉलेज मध्ये. एक विद्यार्थी, मंगेश नाडकर्णी, हा दुरून येताना देखील एक "गंध" आणतो. तर या गंधामुळे हि याच्या प्रेमात पडते. तो एक चांगला चित्रकार असतो. पण त्याला सांगण्याची हिची हिम्मत होते नाही. शेवटी त्या दोघांचे पुढे काय होते हे या गोष्टीत बघा. लग्नाची मुलगी या गोष्टीमध्ये.

दुसरी गोष्ट आहे "औषध घेणारा माणूस". या गोष्टीमध्ये सारंग नावाचा एक फोटोग्राफर असतो. त्याचे त्याच्या बायकोवर निरतिशय प्रेम असते. हिचे नाव रावी. पण रावी त्याला दीड वर्षापासून सोडून गेलेली असते. कारण सारंग हा HIV+ असतो. बायको सोडून गेल्यानंतर, घरात फक्त मोलकरीण येते. ती सैपाक, कपडे, झाडू, सगळे म्हणून सगळे करते. हिला माहितीच नसते, कि सारंगचे लग्न झाले आहे. एक दिवस सारंग सांगतो कि आज तू पालक पनीर, पुलाव आणि गाजर हलवा कर. आणि २ माणसांचा कर. कारण आज माझी बायको मला भेटायला येणार आहे. ठरल्याप्रमाणे रावी घरी येते. रावीला घरात आल्यापासून सारखा एक घाण "गंध" येत असतो. पण कसला वास हे कळत नाही. ती सारंगला विचारते कि तुला येतोय का वास?  पण सारंगला येत नाही. रावी आणि सारंगला त्यांनी घालावेलेले बरेचसे क्षण या भेटीत आठवतात. पुढे काय करायचे याचे प्लान पण करतात, सगळ्याच गोष्टी या गंधामुळे फिसकटतात. आणि हा सारखा येणारा गंध, रावीच्या डोक्यातून (नाकातून) जात नाही. शेवटी रावीला सापडतो का तो दुर्गंध, हे बघा गंध मधील दुसऱ्या गोष्टीत.


तिसरी गोष्ट आहे बाळाच्या गंधाला आसुसलेल्या एका स्त्रीची. कोकणातील गोष्ट. जानकीच्या नणंदेचे (ललिताचे) दिवस भरले आहेत. हे ललिताचे दुसरे बाळंतपण असते. पहिला मुलगा राघू ७-८ वर्षाचा असतो. ललिताच्या कळा सुरु होतात, त्यामुळे सुईण लक्ष्मीला बोलावणे धाडतात. लक्ष्मी येते खूप धो धो पाउस पडत असताना. त्यात जानकीला वेगळे बसायला लागते. बाळंतपणाची धांदल उडालेली त्यात हिचा विटाळ, त्यामुळे जानकीची सासू वैतागते. ललितावर जानकीचे खूप प्रेम असते, तसेच राघूला पण मामी बद्दल प्रेम असते. जानकीला मदत करता येत नाही, त्यामुळे नक्की काय होतंय, याची काळजी आणि नुसत्या एका कोपर्यातून चौकश्या करीत बसते. त्यात सासूचे टोमणे ऐकते, कारण हिला अजूनही मुल झालेले नसते. त्यामुळे बाळाच्या गंधाला आसुसलेल्या जानकीची हि गोष्ट "बाजूला बसलेली बाई" या गोष्टीत बघायला मिळते.

सिनेमातील तीनही गोष्टी स्वतंत्रपणे बघितल्या तर चांगल्या आहेत. पण सिनेमात एकत्र गुंफल्या गेल्या नाहीत. पूर्वी दूरदर्शन वर असलेल्या मराठी सीरिअल मधील काही गोष्टी एकत्रित करून सिनेमा केला आहे कि काय असा वाटते. बर तिन्ही गोष्टी एकाच कालखंडातील आहेत असे म्हणवत नाही. पहिल्या गोष्टीत पुण्यातील एक कॉलेज दाखवतात, पण तिथे टाईपरायटर वर टाईप करणारी, वीणा, तर एकदम HIV+ असलेला माणूस, आणि मग एकदम कोकणातील सुईणीच्या जमान्यातील गोष्ट.

हे कालखंड नीट जमले आहेत असा वाटले नाही. म्हणजे काहीतरी एकमेकांशी संबध ठेवायला हवा होता असे वाटले. तिसऱ्या गोष्टीत तर बाजूला बसलेली बाई याचा अर्थ कळायलाच फार वेळ लागला. कारण एकदम HIV च्या जगातून विटाळशी झाल्यामुळे वेगळे बसण्याच्या संकल्पनेत जाणे जरा कठीण वाटले. कितीतरी वेळ बाजूला बसलेली बाई म्हणजे, वाटत होते, कि बस मधून प्रवास करताना, बाजूला बसलेल्या बाईची गोष्ट सांगणार आहेत कि काय. प्रत्येक गोष्टी मध्ये चांगले कलाकार घेतले आहेत, त्यामुळे त्यांच्या अभिनय चांगलेच आहेत. पण पहिल्या गोष्टीत जरा, ओवर अक्टिंग केल्या सारखी वाटते.

सिनेमा कंटाळवाणा आहे असे म्हणता येणार नाही, पण कशाकशाचा गंध लागत नाही हे मात्र खरे. गंध मला लागला नाही, तुम्हाला याचा काही गंध लागला असेल तर कृपया तुम्हाला समजलेले गंध इथे अभिप्राय म्हणून लिहा.
हा सिनेमा बघितला असल्यास किंवा माझ्या लिखाणावर तुमच्या प्रतिक्रिया जरूर लिहा.

Three disjoint stories with a vague common link between them is attempted in the movie "Gandh" meaning smell / odour. Smell is the only loose string between the stories, but fails to convey that well till the end of the movie. The opening lines in the review would give you a flavor of what to expect in this movie. So here is a brief...

Smell could be any type, pleasant or intolerable. So there stories involving the scent in some way.

The first one is of a young girl called Veena. She is a typical middle class girl form core Pune city of 24 years age. Her parents are trying for her marriage, she has seen several boys, but none of them selects her as their mate. Both her parents are worried over her marriage. Veena is fed up of the ritual of seeing boys every now and then. She is always dreaming of a person, who will meet her by chance and both will fell for each other. Veena is working as a Clark and typist in an Arts college. There is an student called Mangesh Nadkarni, who brings very nice fragrance even from a distance. Because of this, Veena falls for him. He is a very good artist and is studying on some scholarship. Watch the first section of the movie Gandha to see if Veena conveys her feelings and Mangesh reciprocates it or not in the section "Lagnachi Mulagi" or Bride to be.

The second section is called "Aushadh Ghenara Manus" or Man on Medicine. This is a story of a photographer called Sarang. His wife is Raavi. He loves his wife very much. But Raavi has left him about a year and half, the reason appears to be HIV+ Sarang is HIV+. Since then, there is a maid working in his house, who takes care of the household chores like cleaning, cooking and even preparing his dosages of medicines. She is not even aware that Sarang is married. She is surprised to hear Sarang requesting her to make a very good menu of Palak Paneer, Pulav and Gajar Havla for two. He tells her that his wife is coming over to visit him. Raavi comes over as decided, but she is bothered by some foul smell since she enters the house. She enquirers about it, but Sarang is not getting it and is unaware about it. They spend some nice moments lost in the sweet memories of their past, but Raavi is disturbed of the foul smell every once in a while. Watch the second part to see of Raavi find about the foul smell or not.

Third story is about a loving lady craving for sweet scent of a new born baby. This is story form Konkan, a lady called Janaki. Her sister-in-law Lalita is expecting a baby any day. She already has 7-8 years old son called Raghu. Right at the time of delivery, it is raining very heavily. Lakshi the midwife comes in time to help them. But Janaki is unable to help them at all due to the custom of sitting aside due to monthly problem. Janaki's Mother-in-law is upset due to this. Janaki is not able to help for next 5 days even though she really wants to. Lalita and Raghu both love Janaki very much, but she is bound to the customs and not able to touch any work but to inquire about Lalita from a corner of the house. This is the last story called "Bajula basaleli Bai" or the woman sitting aside.

The three stories are good on their own like a TV serial episodes, but they do not come together well as a single movie. The time periods seen to be different in the sense the typewriters in one story, the HIV+ case in the next and again the Midwife and no telephones in the last one. There are renowned artists in all three sections and they have rightly justified the roles they have played, which make the movie good, only missing thing is inability to relate all three in a string to make a single movie.

In general the impression of the movie is not totally bad. So I would like to request the readers that of you have made sense to the linkage among the story, please let us know through your comments.


Cast

  • Amruta Subhash अमृता सुभाष
  • Jyoti Subhash ज्योती सुभाष
  • Sonali Kulkarni सोनाली कुलकर्णी
  • Milind Soman मिलिंद सोमण
  • Neena Kulkarni नीना कुलकर्णी
  • Yatin Karyekar यतीन कार्येकर
  • Girish Kulkarni गिरीश कुलकर्णी
  • Chandrakant Kale चंद्रकात काळे
  • Mihir Mahajani मिहीर महाजनी
  • Prem Sakhardande प्रेम साखरदांडे
  • Vidula Javalgikar विदुला जवळगिकर
  • Anila Date अनिता दाते
  • Seema Deshmukh सीमा देशमुख
  • Leena Bhagwat लीना भागवत
Director
  • Sachin Kundalkar सचिन कुंडलकर



Link to watch online

मंगळवार, ऑक्टोबर १९, २०१०

हाय काय नाय काय (Haay kaay Naay kaay)


 प्रेम प्रधान एक स्त्री लंपट मोठ्ठा पण तरुण उद्योगपती असतो. प्रिया प्रधान अत्यंत भोळी असते. हिचे प्रेम असते प्रेम वर. हिला असे वाटत असते कि प्रेम हा अत्यंत साधा भोळा आणि प्रेमळ नवरा आहे. अर्थात तो प्रेमळ असतो. अर्थात तो प्रेमळ असतो, पण कुठलीही सुंदर दिसली की हा फारच प्रेमळ होतो. यांच्याच घरात एक राणी, म्हणून सुंदर तरुणी नोकरी करत असते.



याचा एक साधा भोळा सरळमार्गी मित्र सदाशिव ढापणे प्रेमच्या घरी येतो. प्रेम आणि सदाशिव यांची खूप जुनी मैत्री असते. सदाशिव ढापणे हा एक कवी असतो. आता नवीन कवींची व्यथा, आणि कथा जशी असते तशीच याची पण स्थिती असते. बिचाऱ्याला पुरेसे पैसे मिळत नसतात. त्यामुळे घरमालक घरातून हाकलून लावतो, कारण घराच्या भाड्याची थकबाकी खूप झालेली असते. आता कुठे जावे अश्या विचारात असताना, त्याला प्रेम आठवतो आणि तो तडक प्रेमच्या घरी येतो.



आता हा अतिशय प्रेमळ प्रेम, याच वेळेस त्याच्या नवीन प्रेम-प्रकरणातील, मल्लिकाला भेटायला पुण्याला जाण्याचा बेत करत असतो. प्रियाला सांगतो की पुण्याला नवीन ब्रांच उघडली आहे त्यासाठी शनिवार-रविवार पुण्याला जावे लागणार आहे. आणि पुण्याची ब्रान्च प्रेमचा  मित्रच (श्री लोखंडे ) बघत असल्याने तसा काही प्रश्न नाहीये असे तो प्रियाला पटवून देतो.  पण प्रियाला त्याने पुण्याला जाऊ नये असे वाटत असते. त्यामुळे ती प्रेमच्या इमेल मध्ये जाऊन पुण्याच्या "मित्राला" मुंबईला बोलावते. खरं तर हा मित्र नसून "मल्लिकाच" असते. मल्लिकाला वाटते कि खरच प्रेम तिला पुण्याला बोलावतो आहे, त्यामुळे ती देखील पुण्याला यायला निघते. जोवर प्रेमला हा सगळा प्रकार कळतो तोवर मल्लिका मुंबईला येऊन पोचलेली असते. आता या मल्लिकाला कसे लपवावे याचा भयंकर मोठा प्रश्न प्रेमला पडतो. कारण प्रेमने मल्लिकाला त्याचे लग्न झाले आहे असे सांगितलेले नसते. अश्या कात्रीत सापडलेल्या परिस्थितीत असताना, अचानक कवी सदाशिव ढापणे घरी येऊन पोचतो.
 


आता मल्लिका आणि सदाशिव ढापणे "नवरा-बायको" आहे असे प्रियाला पटवून दिले तरच काहीतरी मार्ग सापडेल असे तो या दोघांना पटवतो. आणि सदाशिव ढापणे चा "परीस लोखंडे" होतो.  सदाशिव ढापणे उर्फ परीस (तोतया) हा अतिशय साधा, तर मल्लिका अतिशय नखरेल आणि हाय-फाय . म्हणजे दोघांना बघितल्यावर हा दोघांचे लग्न कसे काय बुवा झाले असा प्रश्न निश्चित पडावा. तसा प्रश्न राणीला निश्चित पडतो. तो प्रश्न ती प्रियाला पण विचारते. पण प्रिया म्हणते की त्यात काय, झाले असेल लग्न. आता या दोघांना लग्न झाल्याचे नाटक करावे लागते. इकडे घरात सैपाकाला बाई हवी असे प्रिया सारखे सांगत असते. तर प्रिया ज्या बाईंकडून मोलकरीण बोलावणार असते, त्या सांगतात की बाई नाहीये, पण आचारी आहे. याच दरम्यान एक मनुष्य प्रेमच्या घरी येतो. तर प्रेमला तो आचारी वाटतो म्हणून तो त्या मनुष्याला घरात घेतो. तो मनुष्य स्वताचे नाव सदाशिव ढापणे असे सांगतो. आणि मग सुरु होते धमाल. तोतया कोण, खरा कोण हे समजत नाही. शिवाय प्रेम आणि मल्लिकाचे प्रकरण काहीच पुढे सरकत नाही. अश्या बऱ्याच गमती जमती या सिनेमात घडतात. शेवटी प्रियाला समजते का प्रेमचे प्रेम-प्रकरण. सदाशिव ढापणे चा तोतया वर परीस लोखंडे या दोघांचे नक्की काय नाते असते हे बघा "हाय काय नाय काय" मध्ये.



सिनेमा ठीक आहे. विनोदी सिनेमा आहे. पुष्कर श्रोत्रीचे काम मस्त आहे. त्याचे विनोद देखील आवडले. सिनेमाचे कथानक खूप काही छान नसले, तरी अगदीच कंटाळा येत नाही. एकूण सगळे विनोद, आणि गाणी यामध्ये हा सिनेमा ठीक वाटतो. सहकुटुंब हा सिनेमा बघण्यालायक आहे. काही वाईट सीन नाहीत. विनोद पण चांगले आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन पुष्कर आणि प्रसाद यांनी केले. पहिलाच प्रयत्न चांगला होता असे म्हणण्यास हरकत नाही.

तुम्ही सिनेमा बघितला असल्यास, किंवा माझ्या लिखाणावर तुमच्या प्रतिक्रिया जरूर लिहा.
 

Prem Pradhan is a rich and young businessman. But he is a big womanizer. His wife Priya is very simple lady. She loves Prem very much and she is feels that Prem is also very loving and caring husband. Prem is in fact very loving, but towards all beautiful ladies. And he is always thinking of different ladies in his life. There is a young and beautiful maid servent called Rani in their house, to help Priya.

Prem has a very simple and straightforward friend Sadashiv Dhapne. Both of them are very old and thick friends. Sadashiv aka Sada is a upcoming poet. He is not doing well and always in need of money. One day Sada's landlord throws Sada out of the rented house, for not paying rent for several months. He decides to take shelter in Prem's house for some days and reaches his house.



Prem is planning to visit his latest affair Mallika in Pune. He has been doing that for some time. To facilitate his flirting, he has convinced Priya, that his business is expanding, and he has opened a new branch in Pune. He has to go to Pune on weekends for several months to establish it well. He has pretended that his friend Mr. Lokhande is taking care of Pune branch. Priya wants Prem to be in Mumbai with her for the weekend, so she sends an email using Prem's unlogged email account to Lokhande that this weekend Prem shall meet in Mumbai and passes on the home address. This Lokhande is no one else but Mallika, she thinks that it is a better plan to go to Mumbaia and spend some time with Prem, since she is unaware that Prem is already married.



By the time Prem realizes the complications, Mallika is already in Mumbai and reaching him house. His is in big trouble now, since both the ladies do not know each other and are going to meet soon. And he also has to convince Mallika that his marriage is big problem and he has to come out of this. Finally looking at Sada, he makes a quick plan. Prem convinces Mallika, that his mariage was a big blunder, due to his dad's final wish, and he is working hard on coming out of it. And he forces Sada to act as Paris Lokhande, if he wants to stay in his house for some time. And Mallika his wife for some time.


 Mallika is really mod lady and this Sada aka Paris Lokhande is very very simple man. The made up pair really looks odd. But Prem introduces them as Mr. and Mrs. Lokhande and Priya is happy to meet them. Rani doubts them as a pair looking at the mismatch and esquires with Priya, but Priya says there are some odd pairs at times, and forgets the issue. Mallika and Sada have hard time pretending as husband and wife. To add the complications, Priya has been looking for a lady cook to help her, and the agent looking for cook convinces her that she should accept a reliable male cook. The new cook is also a fraud, and he uses a fake name Sadashib Dhapne.



There are a lot of confusions due to several people in the same house with fake identities and complicated relations. Prem and Mallika are not able to meet each other and finally Priya figures out the affair between Prem and Mallika. It will not be worthwhile to explain the confusions in the review but must be watched in the movie Hai Kay ani Nai Kay.

The movies is well done and Pushkar Kshotri has acted well. Prasad Oak and Sai Tamhankar are good too. Atul Parchure has added some additional fun in the movie. The storyline is alright and nothing new in it, but overall comedy and acting is enjoyable. A good first attempt by Prasad oak and Pushkar Kshotri at directing a movie.



Cast
  • Pushkar Shrotri पुष्कर श्रोत्री
  • Sai Tamhankar सई ताम्हणकर
  • Sonali Kulkarni सोनाली कुलकर्णी
  • Prasad Oak प्रसाद ओक
  • Jitendra Joshi जितेंद्र जोशी
  • Ashwini Apate अश्विनी आपटे
  • Atul Parchure अतुल परचुरे



Direction
  • Pushkar Shrotri पुष्कर श्रोत्री
  • Prasad Oak  प्रसाद ओक



Link to watch online  

Marathi movie DVD