शनिवार, फेब्रुवारी २१, २००९

रात्र आरंभ (Ratra Aarambh)


श्री वासूदेव बळवंत ठोम्बरे, खुप श्रीमंत पण आंधळा माणुस. त्याला २ मुले, अशोक आणि अनिल. दोन्ही मुले परदेशात शिकून भारतात परत आलेली . पण त्यांचे वागणे चांगले नसते. वडिलांच्या प्रोपर्टी वर डोळा असतो . हे श्री. ठोबंरेना कळते, आणि ते त्यांच्या विशासु अंग रक्षकाला , (रॉकी) बोलावतात. आणि मग सांगतात की त्याची मुले कसा त्याला मारण्याचा प्लान करत आहेत आणि कसा प्रोपर्टी वर डोळा ठेवून आहेत. त्यांचा मेनेजर फडके , खुप चांगला माणुस . ठोम्बरे खुपदा फडकेला विचारतात, की तू जर माझ्या जागी असता तर काय केले असतेस ? आणि अशीच कथा समोर जाताना , एक स्क्रिजोपेनिया झालेल्या रुग्णाची कथा सुरु होते, त्या रुग्णाचे नाव फडके. आता फडके आणि ठोम्बरे यांचे काय नाते आहे , हे बघण्यासाठी बघा रात्र आरंभ .



सिनेमा खुपच छान आहे . दिलीप प्रभावळकरने सिनेमा अगदी खाउन टाकला आहे. त्यांच्या acting बद्दल मी कही बोलूच शकत नही. अत्यन्त अप्रतिम acting केली आहे. दिलीप कुलकर्णी नी doctor ची भूमिका केली आहे. सिनेमा अगदी शेवट पर्यंत पकड़ ठेवून असतो. आणि शेवट एकदमच अनापेक्षित आहे. सिनेमातील काही काही प्रसंग खुपच उत्तम Schrizophrenia चा अटँक येताना, वाजणारे घड्याळ, शेजारच्या घरात होणारे मुलगा आणि वडिलांचे भांडण, खुपच सुंदर रितीने गोष्टीत गुम्फ़ले आहे.



सिनेमा बराच जुना आहे. पण मी तो आताच बघितला. १९९९ मधे आलेला सिनेमा आहे. पण अजुनही बघण्यासारखा आहे. दिलीप प्रभावळकरला सलाम आणि अजय फणसेकर यांचे अत्यन्त सुंदर दिग्दर्शन.


Star Cast :
  • Dilip Prabhawalkar दिलीप प्रभावळकर
  • Dilip Kulkarni दिलीप कुळकर्णी
  • Deepak Shirke दीपक शिर्के
  • Anand Abhyankar आनंद अभ्यंकर
  • Pradeep Patwardhan प्रदीप पटवर्धन
  • Rajan Tamhane राजन ताम्हणे
Director
  • Ajay Phanasekar अजय फणसेकर


आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा.


२ टिप्पण्या: