Deepa parab लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Deepa parab लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, नोव्हेंबर २४, २००९

चकवा (Chakwa)


तुषार खोत एका अमेरिकन कंपनी मध्ये प्रोजेक्ट मॅन॓जऱ म्हणून नोकरी करत असतो. त्यांच्या कंपनीला भारतातील एका कंपनीचे प्रोजेक्ट मिळतं. भारतात मिळालेले प्रोजेक्ट कोकणात असत. त्या कंपनी मध्ये Production खूप कमी होत असतं, तर ते इतके कमी का होतंय ह्याची पाहणी करण्यासाठी तुषार खोत भारतात परत येतो. तुषारचे वडिलोपार्जित घर पण त्याच गावात असते. त्याचे आई व बाबा पुण्याला असतात. वडील जगात नसलेल्या व्यक्तींशी बोलू शकत असतात. आणि हाच त्यांच्या अभ्यासाचा विषय असतो. तुषारचा या सगळ्या गोष्टीवर अजिबात विश्वास नसतो. त्यामुळे त्याचे वडिलांशी अजिबात पटत नाही. आई एका आश्रमात काम करत असते. या आश्रमात मनोरुग्ण, मतीमंद आणि अनाथ मुले यांचा सांभाळ केला जातो.

तुषार जेव्हा भारतात येतो तेव्हा कोकणातील स्वताच्या घरातच राहतो. आणि तिथूनच सुरु होतो, भुताचा खेळ. कोकणातील घर रघुनाथराव परचुरे ह्यांच्या देखरेखीखाली असते. रघुनाथराव म्हणजे गावातील मोठी असामी. ते जरी व्यवसायाने वकील असले तरी त्यांचे इतर बरेच उद्योग असतात. कंपनी मधला मॅन॓जर "चौधरी" हा, कंपनीच्या मालकाचा (चव्हाण) यांचा मेहुणा असतो. आणि चव्हाण साहेब अमेरिकेत स्थायिक झालेले असतात.



तुषार कंपनी मध्ये नक्की काय घोळ होतोय हे तपासण्यासाठी दिवसाची रात्र करतो. रात्री काम करत असताना त्याला अचानक कोणीतरी त्याच्या शेजारी येतंय असा त्याला भास व्हायला लागतो. असाच एका रात्री उशिरा पर्यंत काम करत असताना त्याला किंचाळंल्याचा आवाज येतो.

नक्की काय होतंय ह्याचा शोध घेता घेता त्याला काही दिवसानंतर कळते कि जान्हवी पानसे, हि घरात एकटीच आहे. आणि तीच रात्री अपरात्री किंचाळत असते. हिला सगळ्या गावाने वाळीत टाकले आहे. तुषार खोत तिच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करायला लागतो, तेव्हा रघुनाथराव त्याला त्यापासून सारखे परावृत्त करण्याचा प्रयत्न करतात.

कंपनी मध्ये होत असलेला घोळ, सारखे कोणीतरी शेजारी आहे, हा भास, यामुळे तुषार खोत भंडावून जातो. व मानसिकतज्ञ डॉ. विनायक राजगुरू यांच्याकडे सल्ला घ्यायला जातो. तुषारला कंपनी मधील घोळ सापडतो का?, त्याला होणारे भास खरे असतात का? शेवटी भूत खरच आपल्यासमोर येते का हे जाणून घेण्यासाठी बघा "चकवा"



नावाप्रमाणेच हा सिनेमा आपल्याला चकवतो. सिनेमातील सगळीच पात्र महत्वाची आहेत. आणि सगळ्यांनी उत्तम काम केले आहे. सिनेमाचा शेवट पण अनपेक्षितच होतो. सिनेमातील संगीत सलीलचे आहे आणि गाणी संदीपची आहेत. "अजून उजाडत नाही ग" खूपच छान आहे. अतुल कुलकर्णी नेहमीच त्याच्या भूमिकेला न्याय देतो, मग तो हिंदीत काम करीत असो कि मराठीत. दीपा परबने देखील चांगले काम केले आहे. "परचुरेची बायको" अमिता खोपकर हिचे देखील काम चांगले आहे. हिला अगदीच कमी वेळ सिनेमात काम आहे. पण ते देखील अगदी महत्वाचे आहे. सिनेमातील अनेक धागे हिच्यामुळेच पुढे सरकतात. "परचुरे" चा खलनायक तर उत्तमच आहे. एकूण हा सिनेमा बघण्यासारखा आहे. कंटाळा नक्कीच येणार नाही, भूत, आत्मा असा जरी विषय असला तरी त्याची गोष्टीमध्ये चांगली सांगड घातली आहे.





Tushar Khot is an management consultant working in United States. He is originally from a small village in Konkan, but his parent settled in Pune. His father's expertise is in ghosts and is able to communicate with them. His mother is working with a social organization, which runs a orphanage for mentally retarded and mentally disturbed children.

Tushar gets a consulting opportunity to work with a company based in his village, and he accepts it. The problem is unusually low production in the company, with all the machinery and supply chain doing well. The company product is canned fruits. Since Tushar has his own ancestral house in the village, he decides to stay there.



On reaching the company, he meets Chaudhari, who is manager of the company and also brother in law on the owner Chavan. Chavan is settled in United States and has contracted Tusahr for the job. Raghunath Parchure is caretaker of Tushr's house. Raghunath is Lawyer by training but had several business in the village like Soft Drinks Dealer, Transportation, runs a canteen, and board member of the company too. He is a well respected person in the village.

Tushar starts looking at the job at hand, and get involved with it. He is not finding any problem in the company after working hard and long hours. During this time, he feels that he is always being followed by someone. He also hears mysterious shoutings from his neighborhood. He locates that as a house next to his and approaches it, but a girl bluntly denies to accept his help. Later on he finds out the girl is Janhavi Panse, who is kind of socially deserted by the village. After initial resistance, Janhavi becomes friendly with Tushar and reveals her story to him.

His feeling of someone always following him and seeing a person who disappears without a trace, is building lot of stress on him. Tushar consults Dr. Vinayak Rajguru for his problems.

Is Tushar finally successful in pointing out the problem in the company? What really is behind his illusions of a person following him, or at times seen by him?

Atul Kulkarni has played really nice role of Tushar Khot. All other characters are played well too. Movie has music by Sandeep Khare and Dr. Saleel Kulkarni, which is very nice. Though I am not a fan of mystery movies, I thoroughly enjoined this movie, so I would recommend all to watch this.




Cast
  • Atul Kulkarni अतुल कुलकर्णी
  • Deepa Parab दीपा परब
  • Pradip Velankar प्रदीप वेलणकर
  • Mukta Barve मुक्ता बर्वे
  • Suhas Palashikar सुहास पळशीकर
  • Amita Khopkar अमिता खोपकर
  • Sandesh Kulkarni संदेश कुलकर्णी
  • Vidyadhar Joshi विद्याधर जोशी

Director
  • Jatin Satish Vagle जतीन सतीश वागळे

Sangeet / Geet
  • Sandeep Khare संदीप खरे
  • Salil Kulkarni सलील कुलकर्णी


Link to watch online

मंगळवार, ऑक्टोबर २०, २००९

क्षण (Kshan)



"क्षण" म्हणजे निखील, निलांबरी आणि विहंग यांच्या आयुष्यात आलेल्या अविस्मरणीय क्षणांची गोष्ट.

निलांबरी आणि विहंग एकाच कॉलेजमध्ये शिकत असतात. तिथेच त्यांची खूप मैत्री होती आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात. विहंगला कविता लिहिण्याचा आणि गाणं म्हणण्याचा छंद असतो. छंद असे म्हणता येणार नाही, तर त्यात त्याला गती असते. कविता आणि गाणी म्हणत असताना तो एका छोट्याश्या कम्पनीमध्ये नोकरी देखील करत असतो. निलांबरीचे आई वडील सधन असतात. जेव्हा निलाम्बरीच्या वडिलांना कळते कि निलांबरी आणि विहंगचे प्रेम आहे तेव्हा ते त्याला होकार तर देतात. पण विहंग थोड्या दिवसाने नोकरी सोडतो आणि निलूच्या वडिलांचे डोके संतापाने फिरते. ते निलूला विहंगबरोबर लग्न करायला नकार देतात. पण निलूचे विहंगवर खूप प्रेम असते त्यामुळे ती वडिलांशी भांडण करते आणि त्यातच वडिलांना हृदयविकाराचा झटका येतो. या प्रसंगाने घाबरून जाऊन निलू शेवटी वडिलांच्या आग्रहास बळी पडते आणि निखीलशी लग्न करते. निखील खूप मोठा बिसिनेसमन असतो. पैश्याला काहीच कमी नसते, तो निलांबरीवर खूप प्रेम देखील करत असतो. हे सगळे सुरु असतानाच निलूला खूप मोठा आजार होतो. थोडा हवापालट म्हणून निलू व निखील दुसऱ्या गावाला जातात आणि तिथेच विहंगची निलू बरोबर पुन्हा भेट होते. आता विहंग खूप मोठा कवी / गायक झालेला असतो.


आता बऱ्याच दिवसाने भेट झाल्याने खूप जुन्या गोष्टी आठवतात. विहंग अजूनही निलू सोडून गेली त्यात क्षणात अडकून पडलेला असतो. निलू, निखील आणि विहंग एकत्र येतात. निलूचा आजार खूपच वाढतो आणि ती या आजारातून बाहेर पडणार नाही असे निखीलला कळते. निलूला पण समजते कि आता आपण फार दिवसांचे सोबती नाही. परिस्थितीमुळे विहंगला सोडून गेल्याचे दुख तिला अजूनही त्रास देत असते. त्यामुळे ती निखील जवळ, विहंगबरोबर राहण्याचे थोडे "क्षण" मागते. पुढे काय होते हे तुम्हीच बघा "क्षण" मध्ये.

सिनेमा जरूर बघावा असा आहे. जरा वेगळी गोष्ट आहे. सिनेमा थोडा दुखद आहे असे म्हणायला हरकत नाही. सुबोध भावेची अक्टिंग मस्तच आहे. सगळ्यात जास्त आवडलेला प्रसंग म्हणजे जेव्हा निखीलला, निलूच्या आजाराबद्दल कल्पना येते आणि तो ते लपवण्याचा प्रयन्त करतो तेव्हा तो एका क्षणी हसतो आणि दुसऱ्याच क्षणी रडतो हा प्रसंग सुबोधने खूप चांगला रंगवला आहे. सिनेमातील गाणी म्हणावी तितकी मला आवडली नाहीत. फक्त शेवटचे गाणे खूप छान आहे. प्रसाद ओक आणि दीपा परब हे दोघांनी पण त्यांच्या भूमिकेला न्याय दिला आहे.

या सिनेमाबद्दल व माझ्या मताबद्दल तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.




Kshan which literally means moment is a story about moments in lives of Nilu, Nikhil and Vihanga.

Vihanga is an performing artist, struggling to establish as a poet and singer. He has a day job and managing to perform in stage shows. Nilambari or Nilu is a college student few years junior to Vihanga and they fall in love with each other.

Vihanga and Nilu decide to talk to parents of Nilu once Vihanga manages to get a own house and for that he is also waiting for his promotion in job. But one day Nilu's father finds out about their love and invites Vihanga for discussion. He agrees for their marriage.




Vihanga decides to quit the job on Nilu's insistence when he was denied the promotion. He decides to concentrate on his music career. But this upsets Nilu's father and they has a heated argument with Nilu. In the process he suffers a stroke. He emotionally blackmails Nilu to forget Vihanga and agree to marry a person of his choice.

On Vihanga's birthday Nilu gives this bad news and walks away from his life forever. Vihanga is shattered and stuck to those moments in his life. Nilu is married to Nikhil and is trying to be happy with him. They have very good relationship with transparency between them.

Destiny brings them together while Nilu is suffering with an unidentified health condition. And soon they realise Nilu hardly has any time in here life. In her final days when Nilu realised that Vihanga is still stuck with their moments together, convinces Nikhil to lend of her final few moments to help attempt Vihanga to recover from his failed love life.

Though a popular love triangle, the storyline has a charm in it and a must watch if you like movies with a difference. All three main characters are well justified by Deepa Parab, Subodh Bhave and Prasad Oak.



Cast:



Director: