शनिवार, सप्टेंबर ०५, २००९

निशाणी डावा अंगठा (Nishani dawa anghatha)

महाराष्ट्रातील प्रौढ साक्षरता मोहिमेवर काढलेला एक फार्स म्हणजे "निशाणी डावा अंगठा". भिलाठाना (बुलढाणा) जिल्ह्यात असेलेले "सावरगाव" नावाचे एक गाव. तिथल्या शाळेचे मुख्याधापक राठोड, एक खूपच चतुर शिक्षक असतात. त्यांच्या शाळेत ६ स्त्री शिक्षिका व ६ पुरुष शिक्षक असतात. जेव्हा सरकारकडून साक्षरता मोहिमेबद्दल पत्र येते तेव्हा सगळे शिक्षक त्याचा जोरदार विरोध करतात. कारण या पत्रकाप्रमाणे शिक्षकांना शाळा संपल्यानंतर, रात्री पुन्हा ८ ते १० प्रौढ लोकांना शिकवण्याची ऑर्डर दिलेली असते. हि सगळ्याच शिक्षकांना "शिक्षा" वाटते. त्यामुळे काहीना काही तरी कारण काढून सगळेच शिक्षक त्या जबाबदारीपासून पळवाट काढतात.

साक्षरता मोहिमेवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा, राज्य आणि केंद्र या स्तरांवर लोक नेमलेले असतात. जिल्हा स्तरावर काम करणाऱ्या शिक्षकांना शाळातून रजा देऊन काम कारणासाठी रात्र पाळीवर पाठवलेले असते. यात जे कार्यकर्ते असतात ते बर घरी बसल्या बसल्या पगार मिळेल आणि काम पण करायला नको या उद्देशाने यात पडतात. मग सुरु होते एक धमाल नाट्य. ज्यामध्ये लोक कसे रात्र शाळेत येत नाहीत, त्यांना कसे शिकणे महत्वाचे वाटत नाही, जेव्हा तपासणीची वेळ होते त्यावेळेस गावातील शिक्षक वेगवेगळ्या क्लुप्त्या काढून आपली कातडी कशी वाचवतात, याचे धमाल चित्रण बघायला मिळते. एकूण ३ वर्ष्यात एकही निरक्षर साक्षर होत नाही. साक्षरता मोहीम संपल्यानंतर एका वर्षभराने "सावरगाव"ला संपूर्ण साक्षरतेचे बक्षीस मिळते आणि सगळे गावकरी चकित होऊन जातात.

एकूण विनोदी चित्रपट आहे. सिनेमामध्ये सगळीच पात्र (बोकीलबाई सोडून) कामचुकार आहेत अस वाटत असत. शेवटी बोकीलबाई पण याच माळेतील एक मणी आहेत असे दिसून येते. तेव्हा मला स्वत:ला तरी खूप वाईट वाटले. निदान या सगळ्या लोकांमध्ये एकतरी सज्जन व्यक्ती असेल जिला खरच हि मोहीम फत्ते व्हावी असे वाटत असेल असे वाटत होते. पण छे तसे झालेच नाही. जेव्हा प्रौढ लोकांना तुम्ही शिका असा जेव्हा शिक्षक सांगतात, त्यावर प्रश्न म्हणून लोक म्हणतात, कि आम्ही आता ५० वर्ष्याचे झालो, शिकलो नाही म्हणून काय अडले, आता का शिकावे? हा प्रश्न खरच निरुत्तर करण्यासारखा आहे. लहानपणापासून न शिकता, आता वयाच्या ५० वर्षानंतर शिकून खरच काही उपयोग आहे का हा प्रश्न मला पण पडला आहे. तुमची या विषयावर मते अवश्य कळवा.
निर्मिती सावंत, मकरंद अनासपुरे आणि अशोक सराफ सर्वोत्तम. या तिघांचे विनोदाचे टाईमिंग अफलातून. मकरंद अनासपुरे, त्याची बोलण्याची पद्धत, त्याचे हावभाव फारच मस्त आहेत. मोहन आगाशे २ गोष्टी सांगताना एका गोष्टीतून दुसऱ्या गोष्टीतील पहिली गोष्ट कधी सांगतात ते कळत नाही, व त्यामुळे भरपूर करमणूक होते. सलील आणि संदीप चे संगीत खूपच श्राव्य. या सिनेमाबद्दल २ गोष्टी सांगायच्या आहेत. २ री गोष्ट म्हणजे हा सिनेमा आवर्जून बघावा आणि पहिली गोष्ट म्हणजे या सिनेमामध्ये आपल्या देश्यात कसे कुठलेही सरकारी काम धाब्यावर बसवले जाते आणि त्यात कसे पैसे खाल्ले जातात, हे विनोदातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

सिनेमा जरूर बघावा. सिनेमाच्या विषयावर, माझ्या परीक्षणावर तुमची मते जरूर लिहा. तुमच्या प्रतिक्रियांची अपेक्षा आहे.

This is a comedy film made on the adult literacy program by Indian government. Movie revolves around the theme of adult literacy program in a village and how teachers belonging to this task avoid the responsibility.
In a village named Savargaon in Buldhana district, a letter from government arrives and the Principal of the school is taken aback. Because this letter says that all the teachers have to do the extra duty everyday from 8 to 10 PM after the school working hours which is 10AM to 5PM. All the teachers oppose this decision. But its an order from government, so nothing can be done. So they try to falsify the teaching program. The program is hierarchy based. Many official at district, State level supervises the program. Whenever they visit the village, teachers find some ideas to save their skin. Everyone knows that program is not going well. At the end, government official from central government visit the village to find out how the program is going on. This time all the teachers with other officials’ consent impress the central government officer and prove that the literacy program was successful. After a year this village, receives an award for the excellent work in the literacy program. The entire resident in the village are surprised to hear this, because this program was in fact a total failure.
This is really a good movie. But it is really a agony to see how the government program implemented in India. Really feel sad after seeing such a truth, though this truth might be exaggerated. All the characters in this movie have performed very well. Music by Sandeep and Saleel is best as always.
A must watch movie. Do write your comments about this movie and blog.

Cast :