Monday, March 23, 2009

लालबागचा राजा (Lalbaugcha Raja)

"लालबागचा राजा", एका गणेश मुर्तिकराची गोष्ट. तिघे मित्र असतात, शिक्षणात अजिबात लक्ष नसते तिघांचेही. त्यातील एकाचे वडिल खुपच श्रीमंत असतात, त्यांचा मूर्ति बनवण्याचा व्यवसाय असतो. पण मुलाचे अजिबात लक्ष नसते धंद्यात ( हा आपला खलनायक "सुभोध भावे"). आणि दुर्दैवाने दुसऱ्या मुलाचे वडिल लहानपणीच जातात. त्याला शिल्पकलेची अतिशय आवड असते. तो वडिलांच्या मित्राकडे जाऊन मूर्ती बनवायला शिकतो ( हा आपला हीरो "सुनील बर्वे".) हातात जादू असते याच्या. मातीतून अगदी सुंदर मूर्ति बनवतो. या त्रिकुटातील तीसरी व्यक्ति म्हणजे आपली नायिका. मग कसा तो मूर्ति बनवतो, त्याला काय काय अडचणी येतात याचा शोध घेण्याचा प्रयत्न म्हणजे "लालबागचा राजा".

ह्या सिनेमामधे काय नक्की दाखवायचे आहे ते मला अजूनही कळलेले नाहीए. सिनेमा अजिबात बघण्यासारखा नाहीए. बघितल्यावर अत्यन्त चिडचिड होते वेळ वाया गेल्याची. कलाकार चांगले आहेत पण ते देखिल इतका वाईट अभिनय करतात की अगदीच त्रास होतो. हा सिनेमा सुबोध आणि सुनीलच्या करिअरच्या सुरवातीचा आहे का काय, अशी शंका मनाला चाटून जाते, पण हा सिनेमा २००६ मधील आहे. सुबोधचा अभिनय इतका वाईट आहे की अरे हा सुबोध आहे हे सांगायला देखिल लाज वाटते. सिनेमा अत्यंत कन्टाळवाणा आहे, इतका की मला हा "review" लिहताना देखील कंटाळा आला आहे.

सिनेमा अजिबात बघू नका. माझे अत्यन्त महत्वाचे ३ तास वाया गेले असा मला वाटले. आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा.


Director
Cast
No comments:

Post a Comment