रमाबाई शिरोडकर या खुप मोठ्या गायिका असतात. त्यांची मुलगी सानिका व अजुन एक विद्यार्थिनी राधा या दोघी रमाबाईकड़े संगीताचे शिक्षण घेत असतात. सानिका खुप सुन्दर गाते कारण घरात सतत सुरु असलेला अभ्यास तिच्या कानावर पडत असतोच आणि तिचा स्वताचा आवाज गोड असतो. रमाबाईला सानिकाची खुप जास्त स्तुती केलीली आवडत नाही. त्यांच्या मते लहानपणी खूप जास्त स्तुती केली तर चांगले नसते आणि सानिकाला अजून खूप रियाझ करण्याची गरज आहे.
सानिकाचे वडील वनस्पतीशात्रातील मोठे प्राध्यापक असतात. ते रमाबाईला समजावतात कि तू सानिकाबरोबर खूप कडक शिस्तीमध्ये वागतेस त्यामुळे सानिकाला त्याचा त्रास होतो. सानिकाने गाणी म्हटली कि सगळे लोक म्हणतात, कि रमाबाईची मुलगी आहे चांगल म्हणणारच. आणि गाणं नीट जमले नाही कि म्हणतात कि रमाबाईची मुलगी असून गाणं जमत नाहीये. या सारख्या होत असलेल्या "comparison" मुळे सानिकाला एक प्रकारचा तिटकारा येतो.
त्यामुळे तिला आई बरोबर स्पर्धा करण्याची व आई पेक्षा काहीतरी वेगळं करावे असे सतत वाटू लागते. त्या भरात ती घर सोडून एक Orchestra ग्रुपला सामील होते. व त्यांच्या बरोबर गाणं म्हणू लागते. आई व वडील दोघांना पण त्याचा खूप त्रास होतो. पण दोघेही मनाची समजूत घालतात, कि आता सानिका मोठी झाली आहे व स्वताचे बरं-वाईट तिला समजत. सानिका व विकी हे दोघे एक CD काढतात, पण त्याची काही खास विक्री होत नाही. व त्यामुळे हे खचून जातात. शेवटी सानिकाला काहीतरी वेगळे करण्यात यश मिळते का, तिचा तिच्या आईबद्दलचा ग्रह बदलतो का हे बघा "सावली" मध्ये.
सिनेमा सुंदर आहे. त्यातील गाणी तर अप्रतिम आहेत. सगळे कसलेले कलाकार आहेत त्यामुळे सिनेमा उत्तमच झाला आहे. एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या पोटी जन्माला येण्याचे जसे फायदे तसेच तोटे देखील असू शकतात. सावलीत वाढण्यारा रोपाला किती मानसिक ताण सहन करावा लागत असेल हे यातून दिसते. पण सानिकाला असे सारखे का वाटत असते कि सानिकाची आणि तिच्या आईची स्पर्धा आहे हे मला नीटसे समजले नाही. कदाचित बालवयापासून सारखी आईसारखी तू आहेस असे सांगितल्यामुळे तिला त्रास होतो, असे वाटते.
सिनेमा बघण्यासारखा निश्चित आहे. सिनेमाचा शेवट देखील चांगला आणि वेगळा केला आहे. जरूर बघा. तुमच्या प्रतिक्रिया निश्चित कळवा.
Sanika is daughter of famous classical singer Ramabai Shorodkar. Sanika is undergoing music training with her mother along with another student Radha. Sanika has inherited talent for singing from he mother. Her father is a Botany professor in a college. Ramabai did not like anyone praising Sanika and feels she needs to work hard and earn her due credit.
Sanika develops hate for being compared with her mother or taken for granted as Ramabai's daughter. Whenever she does well, she gets to hear "After all she is Ramabai's daughter", and whenever it is not up to the mark, she will get to hear "she should do better, she is Ramabai's daughter". As she grows into a young lady, this hate and tension within the mother and daughter becomes unbearable to her and at a spur of a moment, she quits her home and joins an orchestra group.
Viki the group leader of the orchestra is a creative musician and is trying to establish in the industry. Sanika and Viki put in lot of efforts and bring out an music album, but unfortunately it does not fetch them good response or money. What happens next is better watched in the movie.
The movie is really good and worth watching. The songs by Swapnil Bandodkar are really good. It seems to be one of his early works. All the actors are good and in general the story is depicted really well, in Goa. The initially unsaid and then openly expressed tension between the two is picturized well. The characters are very well suited.
Cast
- Reema Lagu रीमा लागु,
- Pradip Velankar प्रदीप वेलणकर,
- Amruta Subhash अमृता सुभाष,
- Urmila Kanetkar उर्मिला कानेटकर,
- Amita Khopkar अमिता खोपकर,
- Anil Raikar अनिल रायकर,
- Raju Naik राजू नाईक,
- Swapnil Bandodkar स्वप्निल बांदोडकर
Director
- Rajendra Talak राजेंद्र तालक
गायक: आरती टिकेकर अंकलीकर, देवकी पंडीत, आरती नायक, सावनी शेंडे, जानकी अय्यर
Link to watch online
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा