Mugdha Godse लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Mugdha Godse लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, नोव्हेंबर १५, २०११

ऑल द बेस्ट (All the Best)

 प्रेम चोप्रा याला गाडी मध्ये काहीतरी फेरबदल करून गाडी कशी जोरात पळवता येईल असे प्रयोग करायला फार आवडत असते. याचे जान्हवीशी लग्न झालेले असते. प्रेम चोप्राच्या आजोबांचे जिम असते, जे आता त्याला मिळालेले असते. पण त्या जिम मध्ये सगळ्या मशीन्स जुन्या झालेल्या असतात त्यामुळे काही ना काही तरी तक्रारी येत असतात. प्रेम काही उद्योग न करता, नुसता गाड्यांच्या मागे असतो, त्यामुळे घर चालवायला बिचारी जान्हवी जिम सांभाळते. या दोघांचा एक मित्र असतो वीर कपूर. याचे विद्या नावाच्या मुलीवर प्रेम असते. पण याला काही नोकरी धंदा नसल्याने ह्या दोघांनी लग्न केलेले नसते. वीरचा भाऊ धरम कपूर हा एक खूप धनाढ्य माणूस असतो. (तो कश्यामुळे धनाढ्य होतो, किंवा त्याचा नक्की काय धंदा असतो ते शेवटपर्यंत कळत नाही). हा धरम कपूर वीरला दर महिन्याला पॉकेट मनी देत असतो.

तर तो पॉकेट-मनी डबल व्हावा म्हणून प्रेम, वीरला सांगतो कि धरम भाईला सांग तुझे लग्न विद्या नावाच्या मुलीशी झाले आहे. धरमवीरचा पॉकेट-मनी डबल करतो. आता वीरला १ लाख रुपये पॉकेट-मनी म्हणून मिळू लागतात. वीर त्याच्या पैश्यातील थोडे पैसे प्रेमला त्याच्या गाडीसाठी देत असतो. आता प्रेमची गाडी खूप छान तयार झालेली असते. आता या गाडीला कोणीतरी गिऱ्हाईक मिळायला पाहिजे असे त्यांना वाटू लागते एकदा असा गिऱ्हाईक मिळाला आणि गाडी विकली कि पण खूप पैसे होतील अशी गणिते हे दोघे करतात. पण आता हि गाडी चांगली आहे ते कसे पटवायचे या विवंचनेत प्रेम असतो. त्यात त्याला एक आयडिया सुचते.

गावात एक टोबू नावाचा श्रीमंत गुंड असतो. जो सगळ्या लोकांना उधारीवर पैसे पुरवत असतो. त्याला बोलता येत नसते त्यामुळे तो काचेच्या ग्लासवर चमचा फिरवून आवाज काढतो आणि त्याचे चमचे तो काय म्हणतो आहे हे समजावून सांगतात. तर या टोबूकडून प्रेमने आधीच पैसे घेतलेले असतात. त्यामुळे तो वीरला म्हणतो कि आता तुझ्या नावावर आपण तोबू कडून पैसे घेऊ. आणि पैसे घेऊन कार रेस मध्ये जाऊ. तिथे आपली कार जिंकेल आणि मग खूप पैसे मिळतील. वीरला ही कल्पना पटते, त्यानुसार तो टोबू कडून ५ लाख रुपये घेतो. ठरल्यानुसार हि दोघे रेस मध्ये भाग घेतात. पण दैववशात यांची गाडी जिंकत नाही. सुरवातीला गाडी खूप जोरात पळते सगळ्यांना वाटते कि आता हीच गाडी जिंकणार. त्यामुळे टोबू त्या गाडीवर ५ लाख रुपये लावतो. जेव्हा यांची गाडी जिंकत नाही, तेव्हा टोबू वीरला म्हणतो कि आता मला १० लाख रुपये परत पाहिजे. वीर इतके पैसे कसे काय आणायचे या चिंतेत असतो. पुन्हा प्रेमला कल्पना सुचते कि, तसेही वीरचे घर खूप मोठे आहे. ते घर भाड्याने दे, ज्याचे डीपॉझीट तुला १० लाख देईल आणि शिवाय तुला दर महिन्याला भाडेही मिळेल. वीरला हि कल्पना आवडते त्यानुसार ते दोघे घर एका RGV उर्फ रघुला भाड्याने देतात. हा रघु खरा तर खूप गरीब मनुष्य असतो, पण त्याला खूप मोठी लॉटरी लागते त्यामुळे तो मोठे घर घेण्याचा विचार करतो आणि वीरचे घर घेतो. या सगळ्या गोष्टी वीर त्याच्या भावाला सांगत नाही. यावरून वीर आणि विद्याचे भांडण होते व विद्या रागाच्या भरात तिचा फोन घरीच विसरून बाहेर निघून जाते. त्यातूनच अजून एक गोंधळ म्हणजे, वीरला त्याचा भावाचा फोन येतो. की तो गोव्याच्या विमानतळावर आलेला आहे आणि ४ तास विमान लेट आहे त्यामुळे तुम्ही दोघे, म्हणजे विद्या व वीरने भेटायला यावे.

आता विद्या तर घर सोडून गेलेली असते तिला कसे बोलावणार हा मोठा प्रश्न असतो. शेवटी वीर विद्याला न घेता, प्रेमला घेऊन विमानतळावर जातो. यांना वाटते कि थोड्यावेळात धरमचे विमान येईल आणि तो जाईल म्हणजे विद्याला भेटवण्याची गरज नाही. पण दुर्दैवाने धरमचे विमान अनिश्चित काळासाठी लेट होते व धरम घरी येतो. मग सुरु होतो गोंधळ. कारण आता विद्या म्हणून कोणाला तरी उभे करणे गरजेचे असते. ती विद्या नक्की कोण होते, या सगळ्या गोंधळात खऱ्या गोष्टीचा पत्ता धरमला लागतो हे बघा "ऑल द बेस्ट" मध्ये.

सिनेमा विनोदी आहे. काही काही विनोद चांगले आहेत. सिनेमात तसे बघितले तर काहीच तथ्य नाही. डोके बाजूला ठेवून जर सिनेमा बघितला तर त्यातल्या विनोदाचा आस्वाद घेऊ शकाल. सिनेमातील अनिमेशन अगदीच तद्दन आहे. सुरवातीला कार रेस जी दाखवतात ती खूपच विचित्र दाखवली आहे. कार रेस मध्ये लोक हेल्मेट न घालता बसतात हा तर खूपच मोठा विनोद वाटला. नंतर कार उलट्या पालट्या होतात तेव्हाचे अनिमेशन तर अगदीच प्रपोरशनला न धरून केले आहे असे वाटते. सिनेमातील एकूण कपडे, रंग संगती खूपच भडक वाटली. सिनेमा बघावा असा अजिबात नाही. पण बघितला तरी कुटुंबाबरोबर बसून बघण्यालायक आहे, निदान सिनेमा बघताना कॉमेंट करून तरी आनंद लुटता येईल. .
 
 Prem Chopra is a automobile buff. He always keeps playing around with his car engine and improves its performance. He is married to Janavi. His grandfather owned a gym, and not he has inherited it. Since it is very old one, most of the machines have some problem or the other. Prem is always into his cars, so Janavi has to take care of the Gym and the home too. They have a very close friend called Veek Kapur. He is in ralationship with Vidya, but since Veer does not have a job, they are not married yet. Veer's elder brother is Dharam Kapoor. He is very rich man. He is in some big business. And he is giving pocket money to Veer every month.

But since they are in Goa and have a lavish lifestyle, Veer needs more money. In consultation with Prem, he makes a p;lan. He tells his Brother Dharam, that is now married to Vidya and Dharam should increase his pocket money. Dharam is very happy and doubles it. Now this extra money he invests in Prems car, and now his car is improved a lot. Now they plan to sell this car for a good bargain and make some money, but how to convince the prospective buyer that this car is really a good one. They start thinking about that and in a while they get a brilliant idea.

They plan to race in a illegal car race, where one wins huge amount on winning. But that race entry fees is high too, and they need to borrow that money. There is a underworld money lender called Tobu. He is not able to speak, so he makes some sounds using a glass and a spoon. One of his men works as interpreter to explain what that means. But Prem has already borrowed some money form him, so he tells Veer that they can borrow money on Veer's name. Invest that in the race and win lot of money. Retunr Tobu's money and have fun. Veel likes the idea and borrows money from Tobu. AS they enter the race, unfortunately they loose. Since the car was doing well in the begining, they were expected to win, but untimately they loose.

Tobu puts in his 5 lacks expecting them to win, so he is angry too. He catches hold of Veer and demands 10 lacks now. Now they are in bigger trouble. Now again he consults Prem. Now this time he has another idea. He suggests Veer to lease out his big house and demand for 10 lakhs as deposit amount. He can pay that to Tobu and save himself for the time being. Veer likes the idea.

They start looking for a tenant. They fins a prospect called Raghu. Raghu is a very poor man, but has won a big lottery and has become rich. He wants to rent a big house and enjoy. He likes Veer's house. And decides to rent it. Veer is doing all these things without informing his brother Dharam. Vidya is not happy with this and she has a argument on this with Veer. She is furious and she leaves his home a goes away. Unfortunately Dharam calls up at this moment. He tells Veer that he is on his way to Africa, but his flight has got delayed. SInce he has 3-4 hours, Veer should immiditely come to airport and see him. This will give Dharam opportunity to meet Vidya too.

Now Vidya has just left house and is not answering her cell phone, so Veer goes to airport alone telling Dharam that was not at home, and since he may not have much time, Veer came alone to see him. Unfortunate for Veer, Dharam's flight get cancelled for the day, so Dharam insist that he wants to go home with Veer to see Vidya. Now Vidya has to be at home, so Prem has to do something about it. There starts the big fracial comedy of All the Best.

This is a typical farcical comedy where we need to watch it without trying to reason most of the things. Just enjoy the fun. The movie animations and trick photography is not up to the mark. Things get ridiculous at times. In general the movie is bit gaudy and loud at many times. Not definaelt must watch type, but if you decide to enjoy it anyway, it will be good time pass with family.

Cast

  • Sanjay Dutt संजय दत्त
  • Ajey Devgan अजय देवगण
  • Fardeen Khan फरदीन खान
  • Bipasha Basu बिपाशा बासू
  • Mugdha Godse मुग्धा गोडसे
  • Ashwini Khalsekar अश्विनी खालसेकर
  • Mukesh Tiwari मुकेश तिवारी
  • Johny Lever जॉनी लिवर
  • Asarani असरानी

Direction
  • Rohit Shetti रोहित शेट्टी

मंगळवार, ऑक्टोबर ०५, २०१०

जेल (JAIL)

ही गोष्ट आहे "पराग मनोहर दीक्षित" याने जेल मध्ये घालवलेल्या वास्तव्याची. तर गोष्ट अशी आहे की, पराग मनोहर दीक्षित हा एका चांगल्या कंपनी मध्ये रिजनल डायरेक्टर म्हणून नोकरी करत असतो. हा अत्यंत हुशार आणि कष्टाळू असतो. गुन्हेगारी वृत्तीचा मागमूस देखील याच्या मनात कधीच नसतो. याचे मानसी नावाच्या एक एयर होस्टेस वर प्रेम असते. दोघेही एकमेकांवर मनापासून प्रेम करत असतात पराग एका मित्राबरोबर "केशव राठोड" बरोबर राहत असतो. केशव हा एका कार कंपनीमध्ये सेल्स मॅनेजर असतो. केशव, हा पराग च्या सगळ्याच वस्तू वापरत असतो, अगदी मोबाईल पासून ते टॉवेल पर्यंत. परागला त्याचे काहीच वाटत नसते. थोडक्यात सांगायचे म्हणजे या दोघांची खूप मैत्री असते, आणि परागचा केशववर विश्वास असतो.


तर एक दिवस परागला केशव फोन करतो आणि त्याला ऑफिसमधून लिफ्ट मागतो. दोघे येत असताना पोलिसांची गाडी त्यांचा पाठलाग करू लागतो. पराग गोंधळून जातो, गाडी हळू करतो, तर केशव त्याला गाडी हळू न करण्याचा सल्ला देतो, पण त्याच दरम्यान पोलीस त्यांना गाठतात. पोलिसांनी पकडल्याबरोबर केशव पोलिसांवर गोळीबार करतो. परागला काहीच समजत नाही नक्की काय होतंय, पोलीस गोळीबारात केशव जखमी होतो, परागच्या गाडीची झडती घेतली जाते आणि नको ते घडते, केशवने त्या गाडीत ड्रग्स ठेवलेले असतात. पोलीस परागला पकडून जेलमध्ये टाकते. पराग निरपराधी असतो, पण पोलिसांपुढे तो ते सिद्ध करू शकत नाही.


मानसी व परागची आई, वकील ठरवतात. परागला निदान बेल वर तरी बाहेर येत येईल, असा विश्वास वकील त्यांना देतो. वकिलांची भरमसाठ फी द्यायची पण  कबुल करतात. वकील केस लढतो, पण परागला बेल मिळत नाही. त्याची केस कोर्टात दाखल होते आणि त्याला १० वर्ष सक्त मजुरीची शिक्षा मिळते. त्याच्या केसचा निकाल लागायलाच २ वर्ष लागतात. त्यात त्याला बेल तर मिळतच नाही.


या २ वर्ष्यातील त्याच्या जेलच्या वास्तव्यात त्याला बरेच अनुभव येतात. जेल मध्ये सक्त मजुरीची शिक्षा भोगत असलेला, पण मनोवृत्तीने गुन्हेगार नसलेला "नबाब" नावाचे पत्र सूत्रधाराचे काम करतो. नबाब परागला जेलमधील बऱ्याच गोष्टी समजावून सांगतो. त्याची स्वताची गोष्ट सांगतो, तो कसा काय जेल मध्ये आला.

परागला स्वताला खूप आशा असते, की त्याला बेल मिळेल आणि तो बाहेर येईल, पण तसे होत नाही. उलट केशव राठोड जो पोलीस गोळीबारात जखमी झालेला असतो व कोमात गेलला असतो,  त्याचे निधन होते. परागला जो सोडवू शकत असतो त्याचेच निधन होते त्यामुळे परागच्या सगळ्याच आशा मावळतात. त्यातच, एक गुन्हेगार, ज्याने दारू पिऊन गाडी चालवल्याने ६ लोकांचा मृत्यू झालेला असतो, तो बेल वर सुटतो. हे बघून परागचा तोल जातो व पराग त्याला बेदम मारतो. परिस्थितीने गांजून गेलेला पराग, खूप हिंस्त्र होतो. पण नबाब तरी त्याच्या पाठीशी उभा असतो. मानसीला खूप मोठ्या कंपनीमध्ये अमेरिकेत नोकरी मिळते. मानसीने ती नोकरी करावी असे परागला वाटते, कारण त्याच्याजवळील सगळीच आशा संपलेली असते. त्यात त्याला १० वर्ष सक्त मजुरीची शिक्षा मिळते. शेवटी पराग हा निरपराध आहे हे सिद्ध होते का?, मानसी त्याला सोडून जाते का ? हे बघा "जेल" मध्ये.


जेल मध्ये असलेले गुन्हेगार २ प्रकारात मोडतात. एक म्हणजे अट्टल गुन्हेगार, जे जेल मध्ये राहून देखील दादागिरी करणे, जेल मध्ये राहून देखील बाहेरील गुन्हे घडवून आणणे अश्या गोष्टी करत असतात. दुसरा प्रकार म्हणजे, ज्यांनी रागाच्या भारत, किंवा चुकीने गुन्हा केला आहे, पण आता पश्चाताप करीत शिक्षा भोगत आहेत. सगळ्याच गुन्हेगारांनी आशा कधीच सोडलेली नसते हे पण या सिनेमात दाखवले आहे. जेल मधून बाहेर पडण्यासाठी काय काय गोष्टी केल्या जातात याची पण बर्यापैकी माहिती मिळते. 



मला स्वताला हा सिनेमा खूप आवडला. सिनेमा बऱ्यापैकी दुखद आहे. पराग आता कधीच बाहेर पडू शकणार नाही असे वाटायला लागते, पण तरी सिनेमात आशेचा किरण आहे. एकूण जेलमधील गुन्हेगारांची अवस्था बघितल्यावर वाईट नक्कीच वाटते. पावसाळ्यात जेल मध्ये खूप जास्त गुन्हेगार येतात, कारण जे लोक फुटपाथवर राहतात, त्यांना पावसाळ्यात जेल मध्ये राहणे हे सोयीचे आहे हे वाक्य ऐकून अंगावर शहारा येतो व भारतात लोकसंख्या खूपच प्रमाणात वाढते आहे याची मनाला कुठेतरी जाणीव होते. सिनेमात काही दृश्ये थोडीशी भडक आहेत, पण तो सोडता सिनेमा सगळ्यांनी बघण्यासारखा आहे. म्हणजे १४ वर्ष्यावरील मुलांनी हा सिनेमा बघायला हरकत नाही असे मला वाटते.


तुम्ही सिनेमा बघितला असल्यास, किंवा मी जे काही लिहिले आहे त्यावर काही प्रतिक्रिया दिल्या तर निश्चित छान वाटेल.




This a story of Parag Manohar Dixit and his life in jail. Parag is an executive with a renowned company and is recently promoted to regional director's post. He is a bright and hardworking person, very sincere in his work. He is a gentleman and god fearing. He is in love with Manasi who is flight attendant / air - hostess with an airline company. Parag is staying with a friend Keshav Rathod. Keshav is a sales manager with a car sales company. Both are good friends, but Keshav has a bad habit of using everything that belongs to Parag from Mobile phone to bath towels. Bus since they have good mutual trust, Parag always ignores these small things.



One evening as Parag is leaving for home from office, he receives a call from Keshav, requesting him to pick him up in his car on the way home. After few minutes of picking him up, a car starts chasing them, and they quickly realize that is was a police car. Parag is scared and being a straightforward person, slows down his car. Keshav suggests him the reverse, and tells him to speed up and escape. In the meantime Police car overtakes them and stops them. Before Parag could realize anything Keshav jumps out of the car and tries to run. He takes out a revolver and shoots at Police. Parag is stunned with all this and freezes on the spot. Keshav is injured in the encounter and Parag is arrested. Police seize drugs from the car. Keshav was carrying high quantity of drugs worth hundreds of thousand rupees. Parag is arrested under drug trafficking and put in custody. Though Parag is innocent he has no way to prove it, but to wait for Keshav to gain conscious and talk it out.   

Parag's mother and Manasi try hard to get him out of custody. They hire a good lawyer. Lawyer assures them that he will be granted bail soon. He charges huge amount of fees for this. The lawyer tries, but not successful to get bail and Parag is sent to jail. Finally the case hearing begins, and goes on for two years, in which time Parag does not get bail and finally he is given 10 years of rigorous  imprisonment. 


This movie is mostly about these 2 years, and Parag's experiences in the jail. There is a senior prisoner called Nawab. He is a under long term imprisonment but is a nice person by nature. He mentors Parag about the life in jail. He also narrates his own story on how he landed up in jail for such a long term. 
There are two types of prisoners in Jail. Some are real prisoners, who are trying to dominate within jail too, and have links outside and still involved in the underworld world outside. The other type is of those who have committed crime in spurt of a moment, and now are repenting for that moment. But irrespective of the type, all are hopeful of getting out of the jail one day, and lead their life outside. The movie gives lot of insights in the life within jail. 
All along this, Parag is also hopeful of getting released on bail and also proven innocent. But the person accompanying Parag, Keshav Rathod, who is in coma in the encounter with Police officers, dies in hospital. This was Parag's last hope of release. This frustrates Parag a lot. In the meantime, a prisoner inmate, who is very wealthy and is in jail for drunk driving and killing 6 people in road accident. This person gets bail and Parag looses his patience and in frustration beats up this prisoner. Nawab helps him in all the bad patches, because he always believed that Parag is innocent and a good person by nature. During this time, Manasi gets a good break with an American company. Parag has lost all hopes of his release, so he advises Manasi ti take up the job. Is Parag proved innocent ? Does Manasi go for the high flying job ? Needs to be watched in the movie "Jail".


The movie is well made by Madhur Bhandarkar. The whole episode is sad and highlights some dark sides of todays society, but throughout the movie, there is always a ray of hope depicted nicely by the director. In one scene there are suddenly lot of prisoner brought in the jail and a seasoned prisoner remarks, since it is beginning of rainy season, many homeless commit small crimes and make sure they are jailed, just to escape the harsh weather outside. This highlights population related problems in metro cities in India. The movie has some scenes not fit for children, but should be make a good family movie for grown up kids and adults. 

The movie leaves a fact in our minds at the end the factual numbers of prisoners are shown.  "Out of 3.73 lakh prisoners in india, 2.45 lakhs have not yet been found guilty. They may be innocent...". We need to think over it.

Do leave your comments about the movie as well as review in the comments section.





Cast
  • Neil Nitin Mukesh  नील नितीन मुकेश -  Parag dixit
  • Mugdha Godse  मुग्धा गोडसे -  Manasi Pandit
  • Arya Babbar आर्य बब्बर -  Kabir Malik
  • Chetan Pandit चेतन पंडित -  Aravind Joshi
  • Rahul Singh   राहुल सिंग - Abdul Ghani
  • Vinay Aravind Lad विनय अरविंद लाड - Vinay Lad
  • Ashok Samarth  अशोक समर्थ  -  DCP nagesh Patil
  • Sandip Mehta संदीप मेहता  -  Harish Bhatiya
  • Navani Parihar  नवनि परिहार  -  Alka Dixit
  • Mahish Mehta  महिष मेहता - Galib Suratwala
  • G.K.Desai  जी. के. देसाई -  G.K.Desai
  • Raj Nair  राज नायर -  Anna
  • Manoj Bajpeyi  मनोज वाजपेयी -  Nabab
  • Ali Quli   अली कली -  Joe D'souza
  • Parvez Khan  परवेज खान -  Bababhai
  • Atul Kulkarni  अतुल कुलकर्णी -  Guest appearance


Direction

  • Madhur Bhandarkar मधुर भांडारकर


 

Link to watch online

Movie DVD