सोमवार, मार्च १६, २००९

सखी (Sakhi)

"सखी" ही गोष्ट आहे निशी आणि सूर्यकांतची. निशी, परिस्थितीला कंटाळुन जीव द्यायला जाते आणि सूर्यकांत तिला वाचवतो. सूर्यकांत ५० शी ला आलेला आणि निशी विशितली तरुण मुलगी. सूर्यकांतला "CRS" मीळते आणि तो गावाकडे येतो. स्वताचे घर आणि शेती असते तिचा संभाळ करणे अश्या उद्देशाने तो गावाकडे परत येतो. मुंबई मधे कोणीच नसते. आणि "CRS" मधे मिळालेले सगळे पैसे एका सहकारी बँकेत ठेवतो. आणि मग निशीची अश्या विचित्र परिस्थितीत भेट होते. निशी त्याच्याकडेच राहू लागते. सुर्यकान्तला अगदी जीवभावाची असलेली कुन्दाताई सल्ला देते की तू निशीला तिच्या पतिकडे पोचवून दे. गावातील लोक तुझ्याबद्दल वाईट बोलू लागले आहेत. पण सुर्यकंताला निशीला अशी वारयावर सोडून देणे पटत नाही. आणि मग त्याला समजते की निशिला गाण्याची खुप आवड आहे, पण परिस्थितिमुळे तिला गाणे शिकता आलेले नाही. तो तिला उत्तेजन देतो आणि मोठी गायिका बनवतो. अत्यंत अबल असलेली निशी, सबल होते आणि सूर्यकांत तिच्या जीवनातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतो.

सोनाली कुलकर्णी आणि अशोक सराफ यांच्या भूमिका उत्तमच आहेत. सुबोध भावे पण त्याच्या भूमिकेत उठून दिसतो. सिनेमाची स्टोरी लाइन ठीक आहे. सोनाली सगळ्याच भूमिके मधे खुप छान दिसते. उषा नाडकर्णीने कुन्दाताई खुपच छान साकारली आहे. अशोक सराफला आता परत फिर असा सल्ला इतका सुन्दर देते, की आपण हेलावून जातो.

पण सिनेमाला "सखी" नाव का दिले आहे हे मला कळलेले नाही. कारण सिनेमा मध्ये एका अबलेला मदत करून स्वताच्या पायावर उभे केले आहे असे दाखवले आहे. मैत्रीच्या नात्यातला सुर इथे गवसला आहे असा मला वाटले नाही..

सिनेमा पाहाण्यासारखा आहे पण "चुकवू नये" असा काही नाही.

Cast :
Director :

लिंक

आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा.

1 टिप्पणी: