गुरुवार, मार्च २६, २००९

आम्ही सातपुते (Amhi Satpute)




"आम्ही सातपुते" म्हणजे हिन्दीतल्या "सत्ते पे सत्ता" ची कॉपी. जो खर तर Seven Brides for Seven Brothers (1954), या सिनेमाचा रीमेक आहे. गोष्ट त्याच स्वरुपाची आहे. थोडासा बदल केला आहे. सिनेमातील नायक "मुकुंद सातपुते उर्फ़ कांद्या", हा शेतकरी असतो. एकुण ७ भाऊ असतात. सगळे अगदी रानटी. त्यातल्यातात कांद्या जरा माणसाळलेला. सगळ्या भावांची नावे भाजीची. आणि नायिका असते एक अनाथ मुलगी, पूर्णा . खानावळीच्या मालकाने , तिला लहानाचे मोठे केले असते. याला ६ मुली. आणि आपली नायिका मोजता एकुण सात मुली. पूर्णा वयाने खुप मोठी होते, तिने लग्नाचा काहीच विचार केलेला नसतो. सिनेमातील खलनायक तिच्या मागे लागतो आणि त्या रागाच्या भरात ती कान्द्याशी लग्न करण्याचा निर्णय घेते. लग्न करून घरी आल्यावर तिला जो प्रकार दिसतो तो बघून बिचारी अवाक् होते. आणि मग सुरु होतो रानटी लोकांना माणसाळवण्याचा प्रयत्न.

सिनेमातील काही काही विनोद चांगले आहेत. घर कसे बदलते, त्याचबरोबर घरातील लोकांचे बदललेले कपडे पण खुपच फ्रेश आहेत. मला स्वतःला असे "bright" झब्बे खुप आवडले. घरातील पडदे आणि एकुण घरातील interior साजेशे दाखवले आहे. सुप्रिया खरच प्रौढ़ दिसते. सचिन आणि सुप्रिया ची जोड़ी नेहमीप्रमाणेच मस्त. या सिनेमातील गम्मत म्हणजे सचिन या सिनेमात मोठे भाऊ आहे आणि सचिनने सत्ते पे सत्ता या सिनेमा मधे लहान भावाची भूमिका केली होती. अशोक सराफ "अण्णा खानावळवाले" च्या भुमिकेमधे मस्तच शोभून दिसतो.

तुम्हाला सचिन आणि सुप्रिया आवडत असल्यास हा सिनेमा बघा. हलका फुलका विनोदी सिनेमा आहे.
कृपया आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा.



Direction
Cast 

Link


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा