गुरुवार, एप्रिल ०७, २०१६

दसविदानिया (dasvidaniya)

अमर कौल हा एका फार्मसुटिकल कंपनी मध्ये अकाऊंट मॅनेजर म्हणून नोकरी करत असतो. मनाने खूप साधा सरळ, प्रेमळ असा हा अमर खूपच लाजाळू व गरीब असतो. सगळी लोक त्याला काम सांगत असतात आणि हा मुकाट्याने करत असतो. ३७ वर्ष्याचा होऊन देखील लग्न झालेले नसते. घरी आई असते, वयोमानपरत्वे हिला ऐकायला कमी येते. याचा भाऊ बॉलीवूड मध्ये डिरेक्टर म्हणून काम करत असतो. भावाचे लग्नावरून आई व अमरचे भांडण होते म्हणून घर सोडले असते. अश्या परिस्थितीत अमर ला पोटाचा त्रास सुरु होतो. डॉक्टरकडे गेल्या त्याला कळते कि त्याला पोटाचा  कॅन्सर आहे. आणि डॉक्टर त्याला सांगतात कि तू आता २-३ महिन्याचा सोबती आहे. हे कळल्यावर हा अतिशय हादरून जातो. व आता थोडेच दिवस उरले म्हणून तू एका दारूच्या दुकानात जातो तिथे दारू पीत बसतो. तेव्हा त्याला एक बिनधास्त माणूस भेटतो.

अमर कौलला रोज सकाळी आज करण्याच्या कामाची यादी करण्याची सवय असते. तो दारू पियुन आल्यानंतर सकाळी यादी करायला बसतो, तर त्याच्या मध्ये दडलेला एक बिनधास्त अमर कौल बाहेर येतो, व त्याला म्हणतो कि तू हि काय यादी करतो आहेस, आता तर तुला मरण्यापूर्वी करण्याच्या गोष्टीची यादी करायला हवी. अमरला हे पटते, व तो त्यात त्याला करण्याच्या १० गोष्टींची यादी करतो. आणि त्या सर्व गोष्टी पूर्ण करण्याच्या मागे लागतो. या १० गोष्टी काय होत्या, त्या सगळ्या तो कश्या पूर्ण करतो हे बघा "दसविदानिया" मध्ये

या सिनेमाबद्दल मी बरेच ऐकले होते, शेवटी काल तो सिनेमा बघण्याचा योग आला. आणि आपण हा सिनेमा आधीच बघायला हवा होता असे वाटले. रशियन मध्ये स्वीदानिया म्हणजे गुड बाय !! अमर त्याच्या उरलेल्या आयुष्यातील काही अतिशय हळुवार क्षण एका रशियन बाई बरोबर घालवता येतात. तिला टाटा कारताना अमर कौल दस = १० आणि स्वीदानिया असे एकत्रित करून म्हणतो. म्हणून सिनेमाचे नाव "दसविदानिया "

सिनेमा अतिशय सुंदर आहे. याची अक्टिंग खूपच सुंदर. खरच जर आपण मरणार असे समजल्यानंतर १० गोष्टी लिहून ते हसत हसत करणे कसे जमू शकेल हा प्रश्न मनात येतो. जगात अर्थातच अशी उदाहरणे डोळ्यासमोर दिसतात. अमर कौल मेल्यानंतर देखील त्याच्या जीवनात आलेल्या लोकांसाठी काहीतरी गिफ्ट ठेवतो आणि या गिफ्ट मध्ये देखील त्याने खूपच विचार केलेला असतो. त्याचा बालपणाचा मित्र आणि अमर मध्ये जी काही भावनिक गुंतवणूक असते, ते बघून गहीवरायला होते. हळव्या लोकांसाठी हा सिनेमा खूपच रडका आहे. पण गंभीर विषय खूपच विनोदाने हाताळला आहे. म्हणजे सिनेमात कोणतेच पात्र रडत नाही. पण प्रसंग असे घातले आहेत कि प्रेक्षकांच्या डोळ्यात नक्कीच पाणी येते.

सिनेमा जरून बघा. तुमची मते अवश्य कळवा.
Amar Kaul is accounts manager in an pharmaceutical company. He is very simple, straight forward, loving and caring person. Everyone asks him for favors and he will happily help them. At his home, he only has his old mother. She has hearing problem. His brother is film director in Bollywood. He is staying alone, because they had a fight over his marriage.  

Amar develops some problem with his stomach. He has severe pain. He is diagnosed with stomach cancer. He has only 2-3 months left. He is shaken within, due to this news. So to ease out his tensions, he enters a liquor shop and starts drinking. There he meets an interesting carefree guy.

Amar is a lists person. He has habit of making list of things to to every day. Now when he sits to make the list next morning, his carefree personality comes out and suggests him, he should start making list of things to do before he dies rather than day today mundane things. Amar is convinced with this thought and makes a bucket list of 10 things he would love to do before he dies. What are those 10 things and whether and how Amar tries to complete the things, which in the movie "Dasvidaniya".
We heard about this movie long back, but finally got opportunity to watch it recently, and we felt, we should have watched this long back. "Svidaniya" literary means good bye forever in Russian. Amar meets a Russian lady during his last days and while saying good bye to her he uses this term hence the name.   

The movie is really good and Vinay Pathak has done really great job. Once a person knows he is going to die in few days, how can one list 10 things and enjoys the process of getting them done and off the list one by one. But we do see a few examples of such people. Amar leaves some really thoughtful gifts for all the near and dear ones. His emotional attachment with his childhood friend is pictured beautifully. Over all a very sentimental movie, but really well done and according to us, a must watch one. 

Do let us know your comments on if you liked the movie as well as our review. 


Direction
  • Shashant Shah शशांत शहा 

Cast
  • Vinay Pathak विनय पाठक 
  • Sarita Joshi सरिता जोशी 
  • Rajat Kapoor रजित कपूर 
  • Saurabh Shukla सौरभ शुक्ला 
  • Neha Dhupia नेहा धुपिया 
  • Joy Fernandes जॉय फर्नांडीस 
  • Manoylo Svitlana मनोय्लो स्वीलीयांना 
  • Gaurav Gera गौरव गेर 
  • Suchitra Pillai-Malik सुचित्रा पिल्लई-मलिक 
  • Purbi Joshi पुरबी जोशी 
  • Bijendra Kala बिजेंद्र कला 
  • Ikshlaq Khan इक्षालक खान 
  • Sachin Khurana सचिन खुराना 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा