मंगळवार, ऑगस्ट ३०, २०१६

दृश्यम (Drushyam)

विजय साळगावकर हा चौथी पास असून याचा व्यवसाय केबल ऑपरेटरचा असतो. याला सिनेमा बघण्याची खूपच आवड असते. त्याला इतकी पराकोटीची आवड असते, कि घरून आलेला फोन देखील हा मनुष्य घेत नाही, जेव्हा सिनेमा बघत ऑफिस मध्ये बघत बसतो. जरी हा चौथी पास झालेला असला तरी तसा तो खूप हुशार, आणि व्यवहारज्ञान असलेला मनुष्य असतो. आणि घरातील सगळ्या माणसांवर खूप प्रेम करत असतो. घरात दोन मुली आणि बायको इतकेच लोक असतात.

मोठी मुलगी कॉलेजमध्ये असते. आणि लहान मुलगी शाळेत जाणारी असते. विजय साळगावकरचे सासर पणजीला असते. मार्टिन नावाचा एक हॉटेल मालक हा विजय साळगावकरचा खूप चांगला मित्र असतो. या हॉटेल समोरच पोलिस स्टेशन असते. त्या पोलिस स्टेशन मधला सब-इंस्पेक्टर गायतोंडे हा खूप वाईट काम करत असतो, लोकांना उगीचच त्रास देणे, त्यांच्या कडून पैसे उकळणे, अशी काम करण्यामुळे विजयला गायतोंडे बद्दल अजिबात आदर नसतो. त्यामुळे जेव्हा जेव्हा मोका मिळेल तेव्हा विजय साळगावकर गायतोंडे ला त्याच्या या वागण्यावरून टोकत असतो. पण विजय हा एक खूप चांगला मनुष्य आहे असे मात्र इतर सगळ्या पोलिस ऑफिसरचे मत असते.

विजयच्या मोठ्या मुलीला अंजूला एकदा एका ट्रीपला जायचे असते, त्यासाठी विजयची बायको खूप आग्रह करून विजयला पटवते आणि अंजूला ट्रीपला पाठवते. त्या ट्रीपमध्ये एक सम नावाचा मुलगा, ट्रीपला आलेल्या मुलींचे फोटो काढत असतो. जेव्हा एका मुलीच्या लक्षात येते, तेव्हा ती सॅमवर खूप ओरडते आणि मग सॅम फोटो काढणे बंद करतो. पण हे सॅम रुपी वादळ अंजूच्या मागे लागते. एकदा अंजू कॉलेज मधून घरी येत असताना सॅम तिला अडवतो, आणि तिला म्हणतो कि मला भेटायला ये, पण अंजू त्याला नकार देते. मग सॅम तिला ब्लॅकमेल करतो आणि तो तिला तिचा ट्रीपला गेला असताना, ती अंघोळ करत असतानाचा व्हिडियो दाखवतो. आणि म्हणतो कि जर तू मला भेटली नाहीस तर हा व्हीडीओ सगळी पाठवला जाईल. हे ऐकून अंजू खूप घाबरते. घरी येते आणि तिला काहीच सुचेनासे होते. तिच्या आईच्या हे लक्षात येते.

अंजू, आईला सगळे सांगते, तोवर सॅम अंजूच्या घरी पोचलेला असतो. आता अंजूची आई सॅमला समजवायला जाते, पण सॅम आता विजय च्या बायकोच्या मागेच लागतो, आईला वाचवण्याच्या झटापटीत सॅमचा मृत्यू होतो.  दोघीही खूप घाबरून जातात, विजयला फोन करतात, पण विजय सिनेमात बघण्यात दंग असतो, तो फोन घेतच नाही.

घरी आल्यावर विजयला घरातील सगळी परिस्थिती कळते, मग ते ठरवतात कि आता आलेल्या परिस्थितीला धैर्याने तोंड द्यायचे. सगळ्या कुटुंबाने एकत्र ह्या संकटाचा सामना करायचा. विजय साळगावकरचे कुटुंब हि आलेली बला परतवून लावू शकतात का हे बघा "दृश्यम" या सिनेमात.

सिनेमा अफलातून आहे. प्रत्येक गोष्ट खूप सुंदर रीतीने मांडली आहे. सॅमच्या मृत्युचे पुरावे लपवणे असू दे, पोलिसांची तपास करण्याची दिशा असू देत, सगळ्या गोष्टी खूप उत्तम रीतीने मांडल्या आहेत. आपण कल्पना करू शकत नाही असे प्रसंग खूप बारकाईने दाखवले आहेत.

सगळ्या गोष्टींचा उलगडा सिनेमाच्या शेवटीच होतो. सिनेमा अक्षरश प्रेक्षकांना जागेवर  खिळवून ठेवतो. सिनेमा अगदी बघावाच असा आहे.


Vijay Salgaonkar is a school dropout and running a Cable Television business. He is a big fan of movies and spends a lot of time watching movies in his office. At times he woulf just remove telephone receiver off the hook, so that his wife does not disturb him while watching movies. Even thought he is a school drop out, he is very sharp and wise person. He just loves his family a lot. He has a small family of wife and two daughters.

His elder daughter is studying in college and younger one is in elementary school. His in laws are in a near bye town. There is a hotel near his office, where he frequents for break fast and tea. The owner Martin is a good friend of VIjay. Opposite the Hotel is the police station, so most of the police too frequent the hotel. One of the sun inspectors Gaitonde is particularly notorious person. He always troubles people around him, and also tries to extract undue advantage of his powers as police person. Vijay being a genuine person hates Gaitonde and on many occasions, tries to correct Gaitonde or stop for wrong doings. All the other police personnel have high respect for Vijay. 
Vijay's elder daughter Anju wants to attend a school educational camp. Vijay was not very keen but the ladies in the house convince him that it will be very useful. In that camp, there was guy called Sam. He was always with his cell phone camera taking pictures of all the girls. Finally one of the girls scolds him for that and he stops that non sense. But after a few days after the camp, Sam meets Anju again and tells her to meet him in a particular location. Anju denies that proposition ans then he shows her a video of her taking shower during the camp. He tells Anju, if she does not comply with what he is telling, the video will be circulated to lot of people on internet. Now Anju is scared and goes home. She is not able to tell this to her mother too. But the mother realizes that something is wrong.

 Finally Anju tells what has been happening since the afternoon. In the meantime Sam reaches Anju's backyard. Anju and her mother try to request him that he shoild not try to trouble or blackmail them, but at this point Sam gets attracted to Anju's mother and before he could touch her, Anju and attacks him and in the event Sam dies on the spot. Both of them scared now try calling Vijay, but as usual he is busy watching movie and is not reachable on phone. 
On reaching home, Vijay knows the whole situation, the family decides to face the situation together with courage. But it really possible to to manage such a situation with four members of the family? Specially with a person like Gaitonde seeking every opportunity to frame them? Watch it in Hindi Movie Drishyam.

This is one of the most interesting movie we have watched in recent times. It is really well done. The situations like hiding the evidences of death of Sam, anticipating course of action that police will take, and preparing the whole family to face it etc. The plot and execution is really done well. A lot of suspense really remains suspense till the end. 

This is certainly a must watch movie, and it is already being remade in several Indian languages from the original Malayalam version. 


Direction
  • Nishikant Kamat

Cast


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा