व्यंकट सुब्रम्हण्यम हे एका कॉलेजात गणिताचे प्रोफेसर असतात. यांचा प्रॉबॅबलिटीवर काही संशोधन सुरु असते. पण जर वेळेस पेपर पाठवला कि तो परत येतो. त्यांचा पेपर प्रसिध्ध होत नाही. आणि त्यांची निवृत्त होण्याची वेळ पण जवळ आली असते. असेच एक दिवस विचार करताना त्यांना काही गोष्टी सुचतात. आणि त्याचा प्रयोग म्हणून ते जुगारात त्याचा वापर कसा होऊ शकतो हे त्यांच्याच डीपार्टमेंटमधील एका तरुण प्रोफेसर शांतनूला सांगतात. शांतनूला व्यंकट सरांबद्दल आदर असतो. व्यंकटच्या मते या थेयरी प्रमाणे, तो जुगारातील खेळात कोण जिंकणार हे ठरवू शकतो. शांतनू म्हणतो कि हि थेयरी जर आपल्याला पडताळून बघायची असेल तर आपण खरच अड्ड्यावर जायला हवे.
त्यांचा शोध समजावून सांगायला त्यांना अजून ४ लोकांची गरज असते. त्यासाठी शांतनू ४ विद्यार्थ्यांना घेऊन येतो. आता या ४ विद्यार्थ्यांच्या मदतीने नक्की कोण जिंकणार हे ठरवता येणार असते. आता सगळे लोक जुगार खेळताना एकमेकांशी कसे बोलणार, म्हणून ते आपापसात एक संकेतांची भाषा ठरवतात. व्यंकटची थेयरी पडताळून बघण्यासाठी मग ते जुगाराच्या अड्ड्यावर जातात. काही खेळानंतर त्यांना कळते कि व्यंकट यांची जी काय पद्धत आहे ती बरोबर आहे. मग सगळ्याच लोकांना पैशे मिळणार याची आशा निर्माण होते आणि पैश्याच्या मोहात सगळे म्हणतात कि आपण आता कायमच जुगार खेळायला जाऊ. व्यंकट सरांना हे मान्य नसते. ते म्हणतात कि मी हा जो शोध घेतला आहे तो फक्त रिसर्च आहे आणि त्यासाठी आपण पुरेसे पडताळे घेतले आहेत. आता आपण जुगाराच्या अड्ड्यावर जाणे बंद करू. पण यांच्या टीम मधल्या सगळ्या लोकांचा जुगाराची नशा चढलेली असते. सगळे म्हणतात कि आपण खेळायचेच, त्यात व्यंकटला काही धमकीचे फोन येऊ लागतात. कि तुम्ही जुगार खेळायला जायलाच हवे नाहीतर तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांबद्दल कॉलेज मध्ये तक्रार करू. या धमकीमुळे व्यंकट त्या चक्रात पडतात. ते जितके जितके या चक्रातून बाहेर यायचा प्रयत्न करतात, तितके तितके ते त्यात फसत जातात.
शेवटी, व्यंकट या चक्रातून बाहेर पडतात का, त्यांना जुगार खेळायला भाग कोण पाडत असतो, हे बघा तीन पत्ती या सिनेमा मध्ये.
सिनेमा ठीक आहे. मुख्य म्हणजे या सिनेमातील गोष्ट अगदी नेहमीच्या पठडीतील नाहीये. हा सिनेमा कुठल्यातरी इंग्लिश सिनेमावर आधारित आहे असे कळले. शेवटी शेवटी नक्की कोण या सगळ्यामागचा सूत्रधार आहे हे आपण ओळखू शकतो. सिनेमा संपूर्ण फ्लॅशबॅक मधेच आहे. फक्त शेवट वर्तमानात आहे. आणि शेवट देखील अनपेक्षित आहे. अमिताभ या सिनेमात नेहमीसारखाच बेस्ट. माधवन पण त्याच्या भूमिकेत छान दिसतो आहे. सिनेमातील गाणी इतकी चांगली नाही. एकूण सिनेमा ठीक आहे बघावाच असा नाही. तुमच्या प्रतिक्रिया अवश्य लिहा.
Venkat Subramaniam is a mathamatics professor doing research on Probability theory. For some reason, none of his papers are getting published even though he is very senior and nearing retirement. He is bit frustrated about this and is thinking about his probability research all the time. He struck some ideas about how it can be used in gambling. He discusses these ideas with a young professor called Shantanu. Shantanu had very high respect for Prof. Venkat Subramaniam so he listens to the theory very attentively which can predict the winner a gambling bid. He suggests Prof. Venkat, that it needs to be validated in real life and they should try it out in a casino.
To validate this properly, they need a team of six people totally. So Shantanu inducts four students in this experiment. They decide and practice a convention on communicating among themselves without talking and being noticed too. Then they go to a local casino to practically test the theory. In a very short time they discover that the theory is perfect. They make decent money from their maiden attempt. But this spoils their conscious and all start thinking of making some extra bucks using this discovery. They plan on going to casino regularly to make money. But Prof. Venkat is not in favor of this. He makes it clear to all the team that this was meant to be an experiment and we are done with it. Let us stop the business of visiting casinos. But Prof. Venkat gets some anonymous phones threatening his students if he does not go to casinos again, and he finally bows to that. He tries hard to retaliate or escape, but he goes on tangling more into it.
Watch the movie Tin Patti to see the fate of Prof. Venkat and his team taking advantage of this newly found theory of probability to predict gambling results.
This movies is good, with exceptions of some things out of the place. This is based on a famous Hollywood movie, which claims to be based on true life story of a professor and students in MIT and the game of blackjack. The mystery dissolves towards the end, before they reveal it in the movie, and we can guess who is the culprit. Amitabh Bacchan is very good as usual. Madhavan is acted well too. The songs have not very famous, but in general a movie you might enjoy. Please do give your comments.
Cast
- Amitabh Bachchan अमिताभ बच्चन
- Ben Kingsley बेन किंग्जले
- Madhavan माधवन
- Dhruv Ganesh ध्रुव गणेश
- Shraddha Kapoor श्रद्धा कपूर
- Siddharth Kher सिद्धार्थ खेर
- Vaibhav Talwar वैभव तलवार
- Saira Mohan सायरा मोहन
- Raima Sen रिमा सेन
- Ajay Devgan अजय देवगण
- Jackie Shroff जॅकी श्रॉफ
- Mahesh Manjarekar महेश मांजरेकर
- Shakti Kapoor शक्ती कपूर
- Tinnu anand टिनू आनंद
- Ganesh Yadav गणेश यादव
Director
- Leena Yadav लीना यादव
Movie DVD
Mi teen patti baghitla ter nahiye, pan story wachun, i can relate to a english movie called "21"
उत्तर द्याहटवाBase-story line is same, that movie also have a maths professor, students, who play cards and win lots of cash based on the forumla and a cryptic language of hands and faces. Only thing is in that movie professor itself asks his students to play.
Aniket
हा सिनेमा त्यांनी "२१" नावाच्या भयंकर सुंदर हॉलिवुड सिनेमावरुन ( नेहमीप्रमाणे ) उचलण्याचा प्रयत्न केला आहे.
उत्तर द्याहटवा२१ फारच क्लासिक आहे, डायलॉग्स सुंदर आहेत, त्यामानाने '३ पत्ती' जरा फिक्का पडला आहे.
तुम्हाला जर ३ पत्त्ती आवडला असेल तर '२१' जरुर बघाच ...
- छोटा डॉन
मूळचा 21 खुपच छान चित्रपट आहे. मुख्यतः केविन स्पेसी (तीनपत्ती मध्ये अमिताभ) चा अभिनय अतिशय वाखाणण्याजोगा आहे !
उत्तर द्याहटवाhttp://www.imdb.com/title/tt0478087/