Tuesday, June 30, 2009

बयो (Bayo)


"बयो" एका हरवलेल्या प्रेमाचे स्मरण...

ही आहे स्वातंत्रपूर्व काळातील एक दुखद प्रेमकथा. रावी आणि प्रसाद भारत सोडून इंग्लंडमध्ये दुतावासात नोकरीच्या निमित्यांने येतात. प्रसाद नोकरीमध्ये व नवनवीन गोष्टीमध्ये खूपच व्यस्त होतो आणि रावी खूपच एकटी पडते. तिच्या असे लक्षात येते कि याच घरात कोणा विश्वनाथला बयो नावाची स्त्री पत्र पाठवते आहे. पत्रामध्ये बयोच्या गावातील, तिच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट अगदी विस्तारून लिहिली आहे. सगळी पत्र अगदी मनाला भिडणारी असतात. रावी विश्वनाथाबद्दल दुतावासात चौकशी करते पण काहीच पत्ता लागत नाही. तिला समजत नाही कि "बयो" ला कसे कळवावे कि तुझी पत्रे विश्वनाथला पोचत नाहीयेत. ती सगळी पत्र क्रमवार लावून वाचून काढते. त्यात "बयो" च्या जीवनाचा सगळा पट उभा राहतो. त्याच दरम्यान तिच्या नवऱ्याची भारतात बदली होते. ते परत जातात तेव्हा रावी "बयो" ला जाऊन भेटते. तिला काही न लागलेले संदर्भ समजतात.

बयो हि एक मुस्लीम मुलगी असते. तिचे वडील स्वातंत्र सैनिक असतात. जेव्हा ब्रिटीश सैनिक त्यांच्यामागे लागतात, तेव्हा ते आपल्या मुलीला एका ब्राह्मण शिक्षकाकडे (अप्पा) सुपूर्द करतात. अप्पांनी लग्न केलेले नसते. ते एका अनाथ मुलाला वाढवत असतात. त्याप्रमाणे ते बयोला पण स्वताच्या मुलीप्रमाणे वाढवतात. हा अनाथ मुलगा म्हणजे विश्वनाथ. आता या दोघांचे प्रेम कसे होते, त्यांची ताटातूट का होते आणि पुढे विश्वनाथ व बयो दोघे भेटतात का हे जाणून घेण्यासाठी बघा "बयो" !!!

सिनेमा अत्यंत सुंदर आहे. जरूर बघावा. सगळ्या कलाकारांनी खूपच छान काम केले आहे. सिनेमातील गाणी ठीक आहेत. शास्त्रीय संगीताचे छोटे छोटे तुकडे अतिशय श्रवणीय आहेत.

Cast:
 • Shreyas Talpade श्रेयस तळपदे
 • Mrunmayi Lagu मृण्मयी लागू
 • Vikram Gokhale विक्रम गोखले
 • Mrunal Dev मृणाल देव
 • Yatin Karyekar यतीन कार्येकर
 • Milind Shinde मिलिंद शिंदे
 • Jayavant Savarkar जयवंत सावरकर
 • Bharati Acharekar भारती आचरेकर

Direction:
 • Gajendra Ahire गजेंद्र अहिरे

This is a sad love story in the early 1940s. Start of the story shows us a character "Bayo", who is writing letters to "Vishwanath". Apparently "Vishwanath" is not staying in the house where letter are going. Raavi and her husband Prasad, are staying in the house. Raavi is a sensitive writer. And is not doing anything as they are in England. Finally Raavi opens all the letters and reads them chronologically. After reading the letters Raavi understands, that "Bayo" is waiting endlessly for Vishwanath. And there must be a heartbroken story behind it. She becomes hysterical and sensitive about the character "Bayo" and decides to meet her when Ravi's husband was transferred back to India. When Raavi meets Bayo, the real life story of "Bayo" comes in front of us.

Bayo is a muslim girl, whose father is freedom fighter. His father requests a Brahmin Teacher to take care of his daughter. This teacher is not married and he has given shelter to "Vishwanath" And that is how the love story starts.

It is a very good movie. A must watch.

Bayo on MarathiTube

6 comments:

 1. I like the Film bayo which makes me to cry in some situation.this was the best love story i ever seen.

  ReplyDelete
 2. Somewhere it touches, somewhere it teaches,somewhere it hurts,somewhere it feels,somewhere it reaches

  just watch the movie that is y looking for some stuff if this novel exist or no

  ReplyDelete
 3. Really touching! Reflection of a true love! So nice!

  ReplyDelete
 4. खुप छान सिनेमा आहे.......

  ReplyDelete
 5. आज बयो बघितला..

  आणि काळजाच्या अत्यंत..खोलवर..रूतून बसला.
  बाहेर मुसळधार पाऊस कोसळतोय..
  मनावर एक जडपणा आलाय, गळ्यात सगळीकडचे ओढे दाटून आलेत.
  सुन्न हा शब्दही अपूराच वाटतोय..
  नेमक्या कुठल्या देवावर श्रद्धा असावी बयोची..?
  विश्वनाथची वाट पाहणं इतकंच काय तिचं जगणं होतं.

  बयो,
  तुझ्या अब्रुचे धिंडवडे निघताना मी सोन्यामोत्याच्या दागिन्यांचा माज पाहीला..
  जरीकाठच्या साड्यांचे फुगलेले काठ पाहिले..गोडाच्या तोंडातून टपकणारी लाळ पाहिली.
  आणि तुझ्या संवेदना जाणून घेणारी निरागस लिहीणारी बायकोही पाहिली.
  बायकोच..कितीही म्हणटले तरी ती लेखिका वगैरे होत नसते. ती बायकोच राहते.

  बयो,
  तु कल्पनेतली कि सत्यातली ?
  तुला पाहिलं अाणि
  घराजवळच्या हायवेवर दिवसभर मोठ्या गाड्याच्या मागे
  हातवारे करत धावणारी सुली आठवली,
  ती ओरडायची, संतापायची.
  गाड्या निघून जायच्या..
  मग ती रस्त्यावरचा एक दगड त्यांच्या दिशेने भिरकवायची.

  तिचे मूल नवर्‍याने पळवून नेले होते, तिला रस्त्यावर सोडून तो गाडीतून निघून
  गेला होता..
  नवर्‍याचा काही शोध लागला नाही..
  तिला हा मानसिक धक्का सहन झाला नाही..मग ती अशीच रस्त्यावर फिरायला लागली
  घरच्यांनी तिची जबाबदारी झटकली..फिरता फिरता खूप दुरवर आली..आता तिला पत्ता, घर काही काहीच आठवत नाही.

  खरंतर मला तुला पाहून तिचीच खूप आठवण झाली.

  बयो,
  तुझ्यासारख्याच बयो अशा काळाशी वेड्यासारख्या भांडताना दिसतात ग मला..
  वेळ, काळ सगळच थांबत त्यांच्यासाठी. त्या तिथेच अडकून जगत असतात..
  त्या सगळ्यांना मी अाता बयोच म्हणणार आहे..
  इतक्या विरलेल्या आयुष्याची कुबट , कळकट झालर कुणाच्याच नशिबी नसते

  काय ग हे जगणं बयो?
  असे किती विश्वनाथ, बयोच्या जगण्याचे गाभारे होत राहतील?

  तु ज्याची वाट पाहिलीस त्याने तुला शेवटपर्यंत मिठीत घेत स्वीकारले नाही.
  "बयो मी तुझा विश्वनाथ, मी आलोय.
  तुला नेण्यासाठी..", म्हणत तुला भानावर आणले नाही.
  ह्या ह्याच दृश्याचा त्रास सर्वात जास्त झाला.
  परक्यासारखं का होईना तुला तर तो घेऊन गेला ..पण मी स्वत: पाहिलंय ती बयो धुळीसारखी रस्त्याला मिळाली.

  बयो,
  असेच असतात का पुरूष?
  भावनांना घाबरणारे..सत्य न स्वीकारता..कल्पनेतच जगणारे..
  सौंदर्याला भुलणारे..वासनेच्या भट्टीत तापणारे...
  जरासे गुंतत जाता पाय सोडवत पळून जाणारे, तुझ्या विश्वनाथासारखे?

  तुला तर विश्वनाथ भेटला ग , पण त्याच्यासाठी तू जमिन, काळ, वेळ माणसे , लाटा सारे भेदत खूप पार निघून गेलीस..
  त्याच्याही मनाला भेदून..
  आणि खरंच तू शेवटी एखादी पोफळी, एखादा माड किंवा एखादा दगड बनून राहिलीस गं.

  डॉ. प्रेरणा पारवे - सिंह

  ReplyDelete