विद्या - आनंद व त्यांची मुलगी स्नेहा यांचा त्रिकोणी संसार खूप सुखी असतो. अचानक आनंदला कावीळ होते आणि आनंद या दोघींना सोडून निघून जातो. विद्या नोकरी करतच असते. स्नेह वडील गेल्याचे दुख हळू हळू विसरते. स्नेहा वडील सतत आपल्या बरोबर आहेत अशी एक मनाची समजूत करून आयुष्य सुरु करते. विद्याच्या बॉसचे नाव कारखानीस असते. विद्याला ५०००० रुपये द्यायचे असतात तेव्हा कारखानीस तिला मदत करतात. त्या दोघांची मैत्री वाढते.
पण तरीही विद्या त्याचा खून करते. तिचे वकील पत्र घ्यायला म्हणून स्वाती दांडेकर खूप उत्सुक असते. स्वाती दांडेकर हिचा नवरा आणि मोठे दीर दोघेही खूप नामवंत वकील असतात. ती या दोघांच्या हाताखाली वकिली शिकते, पण जेव्हा ती विद्या राउत ची केस हातात घेते, हे ह्या दोघांना पण मान्य नसते, पण तरीही हट्टाला पेटून ती हि केस लढवायची तयारी करते. पण जेव्हा ती विद्याशी बोलायला जाते, तेव्हा विद्या तिच्याशी बोलायलाच तयार होत नाही. विद्याचे म्हणणे असते कि तिने खून केला आहे आणि तिला तो मान्य आहे. तिला केस लढवायची नाही. शेवटी वकील गरुड स्वातीच्या मदतीस येतो. मग स्वाती विद्याने कारखानिसचा खून का केला याचा शोध घेते. शेवटी स्वातीला काय सापडते, ती घरातील वकिलांशी कशी लढते, आणि विद्याला खरच न्याय मिळतो का बघा "नॉट ओन्ली मिसेस राऊत" मध्ये.
सिनेमा अत्यंत सुंदर आहे. जरूर बघावा असा. मधुरा वेलणकर आणि वंदना गुप्ते यांच्या मधील २-३ मिनिटाचे संवाद खूप विचारणीय आहेत. सिनेमात खूपच नामवंत कलाकार आहेत आणि सगळ्यांनी खूपच मस्त अभिनय केला आहे. सिनेमा आपल्यासमोर असा हळुवार उलगडत जातो. सिनेमाची सुरवातच खुनाने होते आणि पण हिने खरच का खून केलाय असा विचार करत असतानाच कथा मस्त उलगडत जाते. सिनेमाचा शेवट देखील आशादायी केला आहे. जरूर बघाच आणि तुमच्या प्रतिक्रिया पण लिहा.
Anand, Vidya and Sneha is a happy Raut family based in Mumbai. Anand is in a small business, and Vidya working as secretary in a firm. Anand dies due to Hepatetis. Sneha is school going, and manages to collect herself saying her dad is always around her. For Sneha's education Vidya decides to stay in Mumbai rather than going back to Goa with her mother.
Vidya has to pay back fifty thousand, Anand had borrowed from a money lender. Vidya takes this money on loan from her boss Mr. Karkhanis. They get friendly and Mr Karkhanis likes to spend time with her.
In turn of some incidences Vidya kills Mr. Karkhanis and reports to the police station the murder she has committed. She refuses to accept a lawyer, but Swati Dandekar a upcoming lawyer insists to take up the case. Her husband and Brother in law are very renowned lawyers in the city. They did now want Swati to take this case, but she insists and take it up. Vidya Raut is not willing to cooperate at all in the begining. Another lawyer Garud helps Swati. Garud was Vidya's lawyer in earlier case. Finally they get Vidya talking and they have to fight one of the toughest case. Swati also has hurdles from her family members in the case. What kind of struggle Swati has to undergo and if she is able to help Vidya to get justice need to be seen in the movie.
The movie opens with the murder scene, and then slowly takes us through the background in flashback. Several renowned actors have given justice to their roles and overall a really good product. A must watch if you like this kind of movies with court scenes. One more feather in Gajendra Ahire's cap I would say.
Do leave comments if you have seen the movie.
Cast
- Aditi Deshpande अदिती देशपांडे
- Madhura Velankar मधुरा वेलणकर
- Ravindra Mankani रवींद्र मंकणी
- Mohan Joshi मोहन जोशी
- Milind Shah मिलिंद शाह
- Vandana Gupte वंदना गुप्ते
- Ketaki Karadekar केतकी करडेकर
- Vikram Gokhale विक्रम गोखले
Director
- Gajendra Ahire गजेंद्र अहिरे
Link to watch online
baghava laagel..
उत्तर द्याहटवाaadhi he natak asave asa vatal hot... pan baghen... tasahi courtbaji aavadate mala :)
Kharach chitrapat surekh ahe
उत्तर द्याहटवाExtraordinary Story line
Kharach chitrapat surekh ahe
उत्तर द्याहटवाExtraordinary Story line
Very very nice storyline, direction...all actors acted well...milestone for marathi movie world, must watch movie!
उत्तर द्याहटवा