बोक्या उर्फ चिन्मयानंद सातबंडे हा एक खूप हुशार, पण उद्योगी मुलगा असतो. त्याचे वडील प्रदीप, आई वैशाली, आजी इंदिरा आणि मोठा भाऊ विजू उर्फ विजयेंद्र हे एका मोठ्या हौसिंग सोसायटीत राहत असतात. वडील एका कंपनीत मॅनेजर असतात, आई एका सामाजिक संस्थेत व्यवस्थापिका म्हणून पार्ट टाईम नोकरी करत असते, भाऊ कॉलेजमध्ये शेवटच्या वर्ष्याला असतो. बोक्या हा सगळीकडे बोक्या म्हणून प्रसिध्ध असतो, पण त्याची आजी मात्र त्याला चिन्मयानंद म्हणून हाक मारत असते. बोक्या हा सगळ्या मुलांचा म्होरक्या असतो. पण हा मनाने अतिशय चांगला असतो. त्याला कोणाचेही दुख बघवत नाही, त्यांचे दुख सोडवण्यासाठी त्याला कायम काहीतरी करायचे असते. आणि त्याचे सारखे काही ना काही उद्योग सुरु असतात. कधी कोणाला मदत कर, कधी एखाद्या प्राण्याचे प्राण वाचव, असे उद्योग तर सतत सुरु असतात.
तर असेच एकदा सगळी मुलं क्रिकेट खेळत असताना त्यांचा बॉल पहिल्या मजल्यावर राहणाऱ्या भेलवंडी आजी आजोबांकडे जातो. हे भेलवंडी आजी-आजोबा सोसायटीत खूप कुप्रसिध्ध असतात, सगळ्यांचा मते हे आजी आजोबा खूप खडूस. रागीट आणि कोणातच न मिसळणारे आहेत, त्यांच्या वाटेला कोणीच जात नाही. आता बॉल त्यांच्या घरी गेल्याने सगळ्या मित्रांमध्ये चर्चा होते कि त्यांच्या घरी कोण जाणार/ शेवटी सर्वानुमते असे ठरते कि बॉल आणायला बोक्या जाणार. बोक्या त्यांच्या घरी जातो आणि त्याच्या लाघवी स्वभावाने तो त्या आजी-आजोबांचे मन जिंकून घेतो. त्यांना भेटल्यावर बोक्याच्या डोक्यात सारखे भेलवंडी आजी- आजोबांचे विचार मनात येतात. त्यांचा मुलगा वसंता अमेरिकेत असतो. त्या मुलाने अमेरिकन बाईशी लग्न केलेले असते. त्याला एक मुलगा असतो देवेन नावाचा. देवेनला मरण्यापूर्वी एकदा तरी भेटता यावे असे या दोन आजी-आजोबांना वाटत असते. आता या आजी-आजोबांचे हे स्वप्नं बोक्या कसे पूर्ण करतो बघा "बोक्या सातबंडे" मध्ये.
या सिनेमामध्ये बोक्याची अजून १ गोष्ट आहे ज्यामुळे बोक्याला एक मोठे पारितोषिक मिळते व त्या पारितोषिका मुळे, त्याला जीन्हेवाला जायला मिळते. तर अश्या बोक्याच्या गोष्टी या सिनेमात आहेत. लहान मुलांना हा सिनेमा नक्कीच आवडेल. मोठ्यांना पण बघण्यासारखा सिनेमा नक्कीच आहे. सिनेमातील संवाद चांगले आहेत. एकूण सिनेमा बघावा असा आहे. बोक्याची दुसरी गोष्ट जरी जरा अशक्य आहे असे वाटत असली तरी,त्या गोष्टीमागील उद्देश खूपच चांगला असल्याने या अशक्य गोष्टीकडे कानाडोळा करू शकतो.
सिनेमातील सगळेच कलाकार छान आहेत. सगळ्यात जास्त आवडलेले म्हणजे भेलवंडी आजी-आजोबा. ते दोघेही म्हातारे खूप छान आहेत. आजोबा तर दिलीप प्रभावळकर आहेत, त्यामुळे त्यांच्या कामाबद्दल तर प्रश्नच नाही. पण त्या आजी देखील खूप गोड आहेत. सिनेमा सहकुटुंब बघायला हरकत नाही. तुम्ही हा सिनेमा बघितला असल्यास, अथवा, माझ्या लिखाणावर तुमच्या काही प्रतिक्रिया अवश्य द्या.
Chinmayanand aka Bokya Satbande is a very bright and creative kid. His dad is Pradeep, Mother Vaishali, Grandmother Indira and big brother Vijau aka Vijayendra are staying in a big apartment complex with more than 100 apartments. His father is Manager in a company, Mother is working as administrator in an social organisation, and brother is a college student. Everyone calls him Bokya except his grandmother who makes it a point to call him Chinmayanand. Bokya is a born leader and leads group of his friends in many activities. He is very good by nature and can never see anyone in pain. He always strives to help anyone in trouble. He is always busy with helping someone or the other.
One of such weekend days, while playing cricket, the ball is hit high by a batsman and enters the balcony of an old couple's home. The couple Bhelwandi's are known to be difficult to talk to and angry. These people never socalise with anyone in the apartment complex and hardly anyone visits them ot talks to them. THe cricket team is in trouble and on discussion decides and nominates Bokya to retrieve the ball for Bhelwandi family. Bokya manages to convince Bhelwandis to hand over the ball with his personal skills without much trouble. But he can not take them off his mind. Bhelwandi couple has only one son Vasant, who has married an American and is settles in US. He has one son Deven, who is about 20 years old, but the grandparens have never seen him. Both of them are ore than eager to meet Deven someday, and hoping that the day comes in their life before they die. Now Bokya has this thing always in his mind, how to make Bilwandi couple's dream come true. He manages to that, and one should watch the movie to see how he does it.
There is one more interesting story about Bokya in the movie, which wins him big honors. Bokya is a very lovable character due to his caring nature. This is shown very well throughout the movie with small but creative incidences in the movie. Definitely worth watching for all, specially children will love it and connect to it more.
Overall movie is very good. His encouraging father, his proud but cautious mother, loving Grandmother and supporting brother all have really acted well. Deelip Prabhavalkar as Mr. Bhilwandi is very good. Please do write your comments on the movie as well as our review.
Cast
- Aryan Narvekar आर्यन नार्वेकर
- Dilip Prabhawalkar दिलीप प्रभावळकर
- Jyoti Subhash ज्योती सुभाष
- Vijay Kenkre विजय केंकरे
- Shubhangi Gokhale शुभांगी गोखले
- Chitra Navathe चित्रा नवाथे
- Madhavi Juvekar माधवी जुवेकर
- Alok Rajwade अलोक राजवाडे
- Nisha Satpute निशा सातपुते
- Anjali Bhagwat अंजली भागवत
Director
- Raj Pendurkar राज पेंडुरकर
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा