मंगळवार, जानेवारी ११, २०११

99 Part Fact. Part Fiction. Pure Fun



सचिन आणि झरामूद असे दोघे मित्र सीम कार्डाचे डुप्लिकेट कार्ड करण्याचा धंदा करत असतात. सीम कार्ड सॉफ्टवेअर वापरून डुप्लिकेट करायचे आणि मग कितीही फोन केले तरी, तुम्हाला काहीच बिल न येत, ओरिजिनल फोन ज्याच्या नावावर असेल त्याला खूप बिल येत असे. या धंद्यात ओळखीच्या माणसाला कार्ड डुप्लिकेट करून द्यायचा नाही असा यांचा दंडक होता. पण एकदा, यांनी एका ग्राहकाला कार्ड दिले, त्याने खूप फोन केले आणि फोनचे बिल ९ लाख आले. त्यामुळे टेलेफोन कंपनीने या दोघांच्या विरुध्ध तक्रार नोंदवली. पोलीस यांच्या मागे लागले, पोलिसांना चुकविताना, यांनी एक नवीन कोरी मर्सिडिस पळवली पण ती गाडी या दोघांना चालवता न आल्याने तिचा जबरदस्त अपघात झाला. अर्थात हे दोघेहि वाचले पण गाडीचा अगदीच चक्काचूर झाला. आता या दोघांच्या नशिबाने, ही गाडी नेमकी एका भाईची होती.

या भाईला सगळे जण एजीम म्हणत असतात. सचिन आणि झारामूद पोलिसांचा ससेमिरा तर टाळतात, पण एजीम त्यांना पकडतो. त्यांना म्हणतो कि माझे खूप नुकसान झाले आहे, त्याची भरपाई म्हणून तुम्हाला माझ्यासाठी पैसे वसुलीचे काम करावे लागेल. दोघांना पण हे काम काही आवडत नाही, पण काय करणार. यांच्या कडे दुसरा काहीच उपाय नसतो.

असेच पैसे वसूल करायला यांना दिल्लीला पाठवण्यात येते. दोघेही मस्त छान हॉटेल मध्ये राहतात. हॉटेल मध्ये काम करणारी मनेजर पूजा सचिनची चांगली मैत्रीण होते. सचिनचे एक स्वप्नं असते की एक खूप छान कॉफी जॉईंट उघडायचा. तो त्याचे स्वप्नं पूजाला सांगतो आणि तिला पण त्यातल्या भागीदारीत इंटरेस्ट असतो. पण हे सगळ करायला पैसे नसतात. आणि आता तर दुसऱ्यासाठी पैसे गोळा करायला बाहेर जाणे इतकाच उद्योग झालेला असतो.

असेच पैसे गोळा करायला ते एकदा राहुल नावाच्या व्यक्तीकडे जातात. आता या राहुलची वेगळीच स्टोरी असते. राहुलची एक थेयरी असते. की सगळ्यांचे नशीब सारखेच असते. पण पुढे काय होणार आहे हे जर का तुम्हाला मिळणाऱ्या संकेतांवरून तुम्ही निर्णय घेतले तर तुमचे नशीब बदलू शकते. आणि असे संकेत सारखे मिळत असतात. याला भारताच्या क्रिकेट टीमवर बेटिंग करायला खूप आवडत असते. त्याची बायको त्याच्या बेटिंगच्या सवयीवरून आणि त्याबाबत तिच्याशी फसवणूक केल्यावरून सोडून जाते. हा एका सॉफ्टवेअर कंपनी मध्ये नोकरी करत असतो. पण बेटिंग मुळे कफल्लक झालेला असतो.

बेटिंग करण्यासाठी पैसे हवे असतात म्हणून हा एजीम कडे जातो, पैसे हरतो आणि मग एजीम त्याच्या कडे सचिन आणि झरामूदला पाठवतात. इथेच या तिघांचे सूर जुळतात. तिघेही तसे बघितले तर चांगल्या मनोवृत्तीचे असतात. पण परिस्थितीमुळे आणि काही वाईट सवयींमुळे या सगळ्या लफड्यात अडकलेले असतात. शेवटी राहुल या दोघांना पटवतो की जर आपण क्रिकेट मध्ये बेट लावली तर सगळे पैसे परत मिळवू शकू आणि मग आपण पुढे हे सगळे वाईट धंदे सोडून देऊन सुखाने आयुष्य जगू. मग पुढे या तिघांना यश येते का? त्यात काय अडचणी येतात ? हे बघा "९९ पार्ट फक्त पार्ट फिक्शन प्युअर फन मध्ये.

सुरवातीला या सिनेमात नक्की काय चाललाय ते समजत नाही. पण सिनेमा नंतर ग्रीप घेतो. बोमन इराणी सगळ्यात बेस्ट. सिनेमा बघायला हरकत नाही असा आहे, पण बघावाच असा निश्चित नाही. महेश मांजरेकर तितकासा प्रभाव पाडू शकलेला नाही. काही काही ठिकाणी तर याची अक्टिंग अगदीच फालतू वाटते. प्युअर फन असे जरी टायटल असले, तरी सिनेमा इतका काही विनोदी वाटला नाही. म्हणजे निखळ मनोरंजन झाले नाही.

तुमच्या प्रतिक्रिया अवश्य लिहा.



Sachin and Zaramud are two childhood friends now running a duplicate SIM cards business. The business model involves duplicating a working SIM card using some software and hardware tools and to sell to customers. They will use the SIM to make any number of phone calls without any charge and the calls will be billed to the original phone owner. The business is going on very well and they are enjoying it. One of the rules they had in business was not to sell these cards to strangers. But one day thinking of making more money, they sell a card to a stranger. He made unlimited calls to foreign countries and the bill amount came out to be 900 thousand rupees. The customer gave a written complaint to police and the company. Police started looking for people behind this fraud, and reach the shop from where Sachin and Zaramud are operating the business. In the process of destroying the stuff and running away, they steal a new Mercedes Benz car. Since both of them did not know driving well, they meet with an severe accident. Both of them survive, but the car is damaged beyond repairs. This car belonged to a local Bhai (Underworld Mafia)

This Mafia is called AGM by all the underworld. Now Sachin and Zaramud are hiding from Police, but AGM manages to catch them. He makes a deal with them, rather than killing them for the damage of his Mercedes, he will have them work for him. Their job will be to recover money for AGM from his non paying client using whatever means they need to use. Both of them hated the deal, but they had no choice. This becomes a question of life and death for them.

For one such money recovery, AGM sends them to Delhi. There both of them stay in a good hotel, using AGMs credit card. Sachin makes friendship with one of the hotel employees called Pooja. Sachin has a long time dream of opening a big coffee joint, where people will not only come for coffee but for hanging out with friends and loved ones. They will be served variety of coffees and snacks. Pooja likes the dream and shows interest in partnering with him for this. But unfortunately Sachin is stuck with money recovery for some other person and for the time being had no way out of all the situation.

They reach an interesting client Rahul. He has huge debts from AGM and several others. He is working as manager for a company, but had a habit of gambling and baiting. His wife has left him due to his habit, and he is trying hard to patch up with her. Interesting thing about him, was a theory he is following. He says everyone comes with the same amount of luck. But in gambling, you have to rely on the signals that you receive from the surroundings. If one is wise enough, he takes decisions looking at the signals and can change the luck and make lot of money. He enjoys baitng on Indian Cricket Team a lot.

Once while in Mumbai, he needed some money urgently for baiting and he lands up borrowing it from AGM. Unfortunately he looses that bait and now owes big money with interest to AGM. That is the reason Sachin and Zaramud and sent to Delhi by AGM. All the three people are without any criminal nature, but are into these things due to destiny. They start getting together well, and Rahul convinces them about his big plan. He proposes to play a big bait on the upcoming cricket match and win big money. They all can pay back the required amount to respective people and can get free to live their lives as they want. They all are desperately looking forward to get their lives on track and live a truthful life. Can they really do it ? Do they face with lot of difficulties ? Are they able to survive them ? Do watch in Hindi movie 99 Part Fact, Part Fiction Pure Fun.

Initially the movie is very confusing. It takes a while to really get a grip over the happenings and the story line. Boman Irani is good but Mahesh Manjrekar fails to make a good impact on this movie. Soha Ali Khan does not have much role. Most other actors seem to be new faces, not much established. The movie is okay and good pass time, but not of must watch category. Though the title says pure fun, it is not really very funny.Do write your comments.

Cast


Direction


Movie DVD

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा