मंगळवार, ऑगस्ट ३१, २०१०

हापूस (Haapus)


अण्णा गुरव म्हणजे वानरवाडी मधील मोठे प्रस्थ. गावातील सगळेच मोठे निर्णय अण्णाच्या सांगण्याशिवाय होत नसत. याला कारण म्हणजे यांचा ज्योतिष शास्त्राचा गाढा अभ्यास व त्यावर नितांत विश्वास. यांचा मोठा परिवार. घरी म्हातारी आई, जिच्यावर अण्णांचा खूप जीव. बायको आणि मुलं. मुलं म्हणजे एक मुलगा अजित. लग्न झालेला, सुनेचे नाव नंदा. हा खूप हुशार, हा हापूस आंब्याची एक संकरीत जात बनवण्याच्या मागे असतो. आणि त्याला त्यात यश पण येत असते. दोन जुळ्या मुली, एक अमृता, आणि दुसरी अंकिता. अमृता एकदम धडाडीची, अगदी Tomboy शोभून दिसेल तशी, तर अंकिता अगदी लाजाळू व गरीब. चौथी मुलगीच नाव आनंदी. वय १३-१४. अंकिता गावातील एका रीक्षेवाल्याच्या "सुभाष उर्फ सुभ्या" च्या प्रेमात पडते. आता हिचे लग्न सुभ्याशी होणे तसे कठीणच असते, कारण पत्रिका आडवी येणार हे दोघांना देखील माहिती असते. अंकिताला बघायला पाहुणे येणार असतात, हे सुभ्याला कळते, त्याला समजत नाही

आता काय करावे. याच विचारात असताना, अण्णा गुरव यांचा पत्ता विचारत एक तरुण मनुष्य त्याच्या रिक्षात चढतो, त्याच्याशी गप्पा करताना त्याला समजते की हा अण्णा गुरवच्या मुलीला बघायला आला आहे. पण प्रत्यक्षात हा वानरवाडी मध्ये शिक्षक म्हणून आलेला असतो व वडिलांच्या मित्राकडे म्हणजे अण्णा गुरव यांच्याकडे राहणार असतो. अश्या तर्हेने "दिगंबर नीलकंठ काळे" याचे वानरवाडी मध्ये आगमन होते



अजितला हापूस आंबाच्या व्यापार करायचा असतो. त्याच्या मते, दलालांना मधल्या मध्ये खूप पैसे मिळतात, त्यामुळे जर का सगळ्या वानरवाडी मधील बागायतदार एकत्र आला तर आंबा विकला जाईल आणि पैसे पण जास्त मिळतील. पण या गावात असणारा दलाल राजेंद्र छाजेड हा अजितच्या मार्गात खूप अडथळे आणतो. व शिवाय अण्णा गुरव यांच्या मते, म्हणजे पत्रिकेच्या मते, गुरव यांच्या कुटुंबात बिसिनेस हा यशस्वी होणार नाही. त्यामुळे अण्णांची पण अजितला साथ मिळत नाही.



अमृता देखील, अण्णांच्या पत्रिका, पत्रिका या विषयावर चिडलेली असते, एकूण घरातील सगळेच लोक ज्योतिष व पत्रिका या विषयावर जरा वैतागलेले असतात. मराठवाड्यातील अंबेजोगाई या गावातून आलेला मास्तर, हे सगळे ओळखतो. त्यात अमृता याच्या प्रेमात पडते. पण अण्णांना कसे पटवायचे हा सगळ्यांसमोर पडलेला प्रश्न. शेवटी, अजित, बिसिनेस करू शकतो का, त्याला अण्णांची साथ मिळते का, दोन्ही प्रेमी युगुलांना आपापले प्रियकर मिळतात का , अण्णा बदलतात का हे बघा "हापूस" मध्ये.



दलाली मोडून काढली पाहिजे, त्याने शेतकऱ्यांना जास्त पैसे मिळतील, त्याचप्रमाणे ज्योतिष्य हेच अगदीच सगळे खर नसतं, तर मनुष्याची मेहनत पण खूप महत्वाची आहे हे दाखवण्याचा प्रयत्न या सिनेमात केला आहे. सगळ्यांच्याच भूमिका उत्तम आहेत. मधुर वेलणकर खूपच छान दिसते. मकरंद अनासपुरे नेहमीप्रमाणेच छान. सुभोध भावेची बायको म्हणून जी कोण नटी आहे, ती त्यापेक्षा वयाने मोठी आहे असा वाटत. पण तिची भूमिका उत्तम आहे. सिनेमा चांगला आहे. पण बघावाच असा नाही.

तुम्ही सिनेमा बघितला असल्यास किंवा बघितल्यानंतर, किंवा माझ्या लिखाणाबद्दल प्रतिक्रिया अवश्य नोंदवा.



Anna Gurav is a famous Astrologer in the village of Vanarwadi. He is one of strongest believer of Astrology and also advises each and every person in is contact to follow. All the major decisions in the village are not taken without consulting Anna's consultation. His family members are his old mother, his wife, son Ajit, Ajit's wife Nanda, twin daughters Amruta and Ankita and youngest member is Anandi.



Ajit is a bright man and has dreams, ideas as well as courage. He is working on a hybrid variety of famous Hapus Mango, and he is already getting some good results. Amruta is a very bold and dashing girl wife Ankita the reverse, very shy and silent. Amruta is always wondering in the village and is involved in fights. She is a true tom boy. Ankita is attending college and is in love with Subhash alias Subhya, who is a Auto Cab driver.



A prospective boy was to visit Anna Gurav's family to explore wedding relationship with Ankita. Subhya is aware of the fact, so he decides to play spoilsport. While waiting with his Cab for business, a guy comes to him and inquires about Anna Gurav's house. Subhya mistakes him for the prospective boy and starts telling him all false stories about Ankita, so he will decide the other way. But unfortunately he is not the right person but he is new school teacher Kale, who is son of Anna Gurav's friend.



There is a middleman Rajendra Chhajed, who is buying all the mangos from Vanarwadi and selling them in Mumbai. He is making a lot of money, and paying the real farmers working hard in Vanrwadi just peanuts. Ajit is upset about it, and tries to bring all the farmers together and tries to convince them that if they all come together and sell mangos they will make almost four times the money they are making now. Naturally Chhajed is creating all sorts of problems in this endeavor of Ajit to save his business and financial margins. Anna is also opposing Ajit because he thinks according horoscopes, his family can not do business successfully. And there is some unknown reason behind this premise.



Amruta is also upset because of Anna's horoscope business. Kale master being an outsider, but staying in their home, realizes this problem and overdose of horoscope and astrology by Anna. So all the family members decide to come together and find a way out of this. Basically how to convince Anna is the issue they have to tackle.



You have to watch the movie Hapus to see if they are able to convince Anna, if the two pairs in love unite, if Ajit is able to venture in business, and if Anna is able to support all hie family in a meaningful way.



Madhura Velankar has done a fabulous job if acting a double role of twin sisters with opposite charactors. Makaran Anaspure is hilarious as usual. Subodh Bhave and Shivaji Satam and established names and they have certainly justified their roles well. Pushkar Kshotri is good too. If you enjoy comedies, you will certainly enjoy the movie.




Cast


Direction




Link to watch online


Movie Trailer

Movie DVD


 

मंगळवार, ऑगस्ट २४, २०१०

नवरा माझा नवसाचा (Navra maza navsacha)




भक्ती आणि वक्रतुंड यांचे एकमेकांवर खूप प्रेम असते. वक्रतुंड चांगला कलाकार असतो. भक्ती आणि वक्रतुंड यांचे एकमेकांवर खूप प्रेम असते. वक्रतुंड चांगला पेंटर / कलाकार असतो. भक्ती टेलिफोन ऑपरेटर असते. या दोघांचे लग्न भक्तीच्या आई वडिलांच्या इच्छेविरुध्ध झालेले असते. वक्रतुण्डाचे आई-वडिलांचे छात्र त्याच्या लहानपणीच हरवलेले असते. वक्रतुंड उर्फ वॅकी जरी खुप चांगला आर्टीस्ट असला, तरी त्याला म्हणावे तसे यश मिळालेले नसते, त्यामुळे घरात पैश्यांची तशी चणचणच असते. लग्न होऊन १० वर्ष झालेली असून देखील ह्यांना मुल झालेले नसते. आणि जोवर सेटल होत नाही तोवर मुल होऊ द्यायचे नाही असे वाकीने ठरवलेले असते.

भक्ती, नावाप्रमाणेच देवावर भक्ती करणारी असते. खूप देवभोळी असते, त्यामुळे ती सारखी देवळात जाऊन नवस बोलत असते. पण तिचा कुठलाही नवस पूर्ण होतच नाही. असेच एक दिवस भक्ती देवळातून दर्शन घेऊन परत येताना तिला वक्रतुंडाची आत्या भेटते. आत्याला घरी घेऊन येते आणि मग तिला समजते, कि वकी हा नवसाने झालेला मुलगा आहे. वॅकीच्या वडिलांनी, मुल जगात नाहीत म्हणून गणपतीपुळ्याच्या गणपतीला नवस बोलला असतो, कि जर हे मुल जगले तर त्याला "नागडा" करून तुझे दर्शन घेईन. त्यातून दुर्दैव असे कि नवस फेडण्याआधीच आई-वडील स्वर्गवासी झालेले असतात. त्यामुळे फेडल्या न गेल्याने वकीला म्हणावे तसे यश मिळत नाहीये. पण हा नवस फेडणे जरा कठीण असते, कारण नवसच तसा कठीण असतो. बर आता हा नवस कसा फेडावा याच्या विचारात भक्ती असते. ती वॅकीला सांगते कि तुला हा नवस फेडावा लागेल तरच तुला यश मिळेल. पण असा विचित्र नवस फेडणार तरी कसा, वॅकी त्याला सरळ नकार देतो.



आता नवस फेडता येणार नसल्याने, भक्ती उदास व त्याचबरोबर वॅकी वर चिडलेली असते. वॅकीला त्याचा खूप जवळचा मित्र किशोर भेटतो. तो त्याला सल्ला देतो कि आपण एका बाबाकडे जाऊ, तो तुला यावर उपाय सांगेल. आणि हा साधू बाबा किशोरचा एक मित्र असतो, जो वेश बदलून साधू बाबा बनतो. या ढोंगी साधुबाबाच्या सल्ल्यानुसार एक पुतळा करून देवळात न्यायचा आणि त्याचे कपडे काढायचे म्हणजे नवस पूर्ण होईल. हा पुतळा गुप्ततेने न्यायला हरकत नाही. पण फक्त चारचौघातून न नेता सगळ्या लोकांसामोरून, गुप्ततेने न्यायचा अशी अट घालतो.



आता हा पुतळा कसा नेणार, असा प्रश्न या दोघांना पडतो. त्यात किशोर असे सुचवतो, कि पुतळा आदल्या दिवशीच गणपतीपुळ्याच्या गाडीत नेवून ठेवायचा आणि मग दुसऱ्या दिवशी तीच बस पकडून पुढे जायचे. आता यांचे असे दुर्दैव असते, कि नेमकी तीच बस दुरुस्ती साठी जाते, आणि त्या बस च्या बदल्यात दुसरी बस पाठवण्याचे ठरते. पण दुसरी बस येण्याच्या आधीच हि बस दुरुस्त होऊन येते व या दोघांचा जीव भांड्यात पडतो. आणि मग भक्ती आणि वॅकीचा गणपतीपुळ्याचा प्रवास सुरु होतो. त्याच प्रवासाबरोबर सुरु होते मस्त धमाल. हि धमाल तुम्ही सिनेमा बघून अनुभवण्यासारखी आहे. शेवटी वॅकी नवस फेडू शकतो का ? तो खरच विवस्त्र होतो कि पुतळ्याला विवस्त्र करून नवस फेडल्या जातो.. हे बघा "नवरा माझा नवसाचा" मध्ये.



सिनेमा खूपच धमाल विनोदी आहे. निर्मिती सावंत अगदी थोड्या मिनिटासाठी येते, पण खूप छान विनोद करून जाते. अशोक सराफचा लालू तर मस्तच. बस मधील सगळी लोक, त्यांच्यातील विनोद सगळे सगळे उत्तम. सचिन आणि सुप्रिया हे दोघेही मस्तच आहेत. दोघांच्या भूमिका, त्यांचे एकमेकांबरोबर असलेले ट्युनिंग खूपच छान आहे. अगदी "नवस फेडणे" हा जरी वादाचा किंवा श्रद्धेचा मुद्दा असला तरी, मनापासून, खळखळुन हसायचे असेल तर सिनेमा जरून बघा. अगदी लहानथोर सगळ्यांनी एकत्र बघण्यासारखा सिनेमा नक्कीच आहे.

सिनेमात सोनू निगम व त्याचे गाणे जरी उगीचच घातले आहे असे वाटत असले, तरी गाणं श्रवणीय असल्याने, हे गाणं उगीच आहे याकडे दुर्लक्ष करू शकतो. तुमच्या प्रतिक्रिया जरून लिहा.



Bhakti and Vaky (Vakratunda) are a very happy couple. They love each other very much. Vaky is a good artist, and Bhakti works as a telephone operator. They have married against the wish of Bhakti's parents and so parents have snapped ties with Bhakti. Vaky's has lost his parents in the childhood itself. Though Vaky is a good artist, he is still not established himself. Since the home is run by Bhakti alone, they are always short of money. Vaky is clear in his mind that they are not ready to raise children, till he establishes himself.



Bhakti is very much devotee of gods. She is always committing Navas to different gods, but none of her wishes are coming true. Once by chance while returning from a temple she meets Vaky's aunt, and she narrates the story behind Vaky's birth and why he got his name. None of Vaky's siblings were surviving, so his dad commits a Navas that he will get his child naked to the temple if it survives, and unfortunately after Vaky's birth, before his father could take him to temple, he passed away. The Navas is not fulfilled. Bhakti decided to fulfill this Navas and tried convincing Vaky to do all that is required. Hearing this strange requirement, Vaky flatly refuses it.


Bhakti is sad thinking till Navas is fulfilled, their life is not going to be happy and Vaky is angry over the request. Vaky's friend Kishore suggests a way out. They decide to make one of Kishor's friend a "Baba" and convince Bhakti. So finally they convince her that the way out of this situation is to carry a real size statue to the temple and remove its cloths there. It should be carried with public transport, though it might be hidden somewhere.


They get the statue made and hide it in the bus which is supposed to go to Ganpatipule the next day. There are some tense moments like the bus does not start the next morning and is sent to garage, a replacement bus is sent, but before the replacement bus could start the journey, the original bus comes. Most interesting part of the movie is the travel to Ganpatipule with the hidden statue and the interesting co passengers they have with them. The climax of whether the Navas is fulfilled or not needs to be watched in the movie "Navara maza Navasacha".


Ashok Saraf is bus conductor named Lalu and the Driver is called Prasad. Nirmiti Saswant is good as guest artist. Sachin and Supriya and very good as always. Short appearance of Sonu Nigam and song is pleasant surprise in Marathi movie. A must watch and with whole family.

Do share your thought and comments on movie and this review.



Cast


Direction


Link to watch online


 

Marathi DVD

सोमवार, ऑगस्ट ०९, २०१०

मुंबई-पुणे-मुंबई (Mumbai - Pune - Mumbai)

एक आकर्षक लग्नाळू मुलगी, पुण्यात येते. नेहमीच मुल्लांनी काय मुलीना, बघायचे, या वेळेस हि आकर्षक तरुणी मुलाला भेटायला मुंबईहून पुण्याला येते. हिला लग्न करण्याची तशी काही घाई नसते, पण हिच्या आईला हिच्या लग्नाची घाई असते. आईच्या आग्रहाला मान देऊन हि पुण्याला येते. मनात अगदी नक्की ठरलेले असते कि या मुलाला नकार द्यायचा. पुण्यात आल्या-आल्या हिचे अगदी "पुणे स्त्य्ले" स्वागत होते. पत्ता विचारायला म्हणून हि एका क्रिकेट खेळणाऱ्या मुल्लांच्या पत्ता विचारायला म्हणून हि एका क्रिकेट खेळणाऱ्या मुल्लांच्या ग्रुपला पत्ता विचारते, हृदय्मार्दाम नावाच्या घराचा. पत्ता कळतो, हि त्या पत्त्यावर पोचते, पण घराला कुलूप असते. आता शेजार्यांना विचारावे म्हणून हि मुलगी शेजारी तर तिला अगदी पुणेरी उत्तरे मिळतात आणि ते बघून तिला अगदी गम्मत वाटते. आता घराला कुलूप, त्या मुलाला तर भेटायचे आहे, पुण्यातील लोक असे उध्धात, त्यातून हिचा फोन बंद पडलेला. म्हणजे मुलाचा नंबर पण हिच्या कडे नाही. आता करावे तरी काय असा विचार करत हि बाहेर पडते. एका दुकानात फोन करायला जाते आणि तिथे नेमका तोच मुलगा येतो ज्याला हिने पत्ता विचारला असतो.


त्यानंतर सुरु होतो ह्या दोघांचा एकत्र प्रवास. मुलगा पुण्याचा आणि मुलगी मुंबईची. मग दोघांची एकमेकांच्या शहराला नाव ठेवण्याचा आणि त्याच बरोबर स्वताच्या शहर कसे छान आहे हे सांगण्याचा प्रयत्न. हे करत असतानाच दोघे एकमेकांना स्वताचा भूतकाळ सांगतात. हि मुलगी, पुण्याला का आली आहे याचे कारण सांगते. आणि मग ह्या दोघांचा प्रवास सुरु होतो, पुणे दर्शनाचा.

पुण्याचा मुलगा पुण्याची महती सांगायला मुंबईच्या मुलीला पुण्यात सगळी कडे फिरवतो. भूतकाळ सांगताना मुलीचे अर्णव नावाच्या मुलावर प्रेम असते, पण आता त्या दोघांनी वेगळे व्हायचे असे ठरवले आहे असे कळते, तसेच पुण्याचा मुलगा सांगतो त्याच्या जीवनात आलेल्या सुन्गची बद्दल. सुरवातीला एकमेकांचा अनादर करणे या एकाच उद्देशांने एकत्र आलेले हे दोघे कधी एकदम जवळ येतात हे दोघांना देखील कळत नाही. शेवटी हि मुंबईची मुलगी पुण्याला ज्या उद्देशाने आली असते तो उद्देश सफल होतो का ? हि हृदयमर्दमला नकार देते का ? हे बघा "मुंबई-पुणे-मुंबई" या चित्रपट.

एकदम सामान्य विषयावर असलेला हा सिनेमा खूपच वेगळ्या पद्धतीने हाताळला आहे. सिनेमात दोनच पात्र आहेत. दोन्ही पात्र एकाच वेशात आहेत. सगळे शूटिंग बाहेर झालेले आहे. म्हणजे एकही सीन घरात नाही. सिनेमात एकाच गाणं ते पण छान. दोघेही कलाकार आपापल्या भूमिकेत उत्तम. पुण्यावर केलेल्या कोट्या खूपच छान. अगदी पुणेरी पाट्या पासून ते चितळ्यांचे दुध याच्या पर्यंत. नावावरून जरी सिनेमा फक्त मुंबई आणि पुणे येथील लोकांना आवडेल असे वाटत असले, तरी इतर ठिकाणच्या लोकांना या दोन्ही शहराबद्दल ऐकायला मज्जाच येते. त्यामुळे हा सिनेमा बघायला खूपच मज्जा येते. सिनेमा एकदम वेगळा आहे, अगदी सहकुटुंब बघायला हरकत नाही.


This is a very interesting movie with only two main characters. We will call them Ms. Mumbai and Mr. Pune. Ms. Mumbai is a fashion designer working in Mumbai and is traveling to Pune to see a prospective Groom for her. She has a negative mindset while leaving itself and she is kind of decided to reject the proposal. She is traveling to Pune just to please her mother, since she has taken pains to fix this appointment.

The movie opens with her trying to locate the address in Pune city. Finally reaching the building, she realizes that the house is locked. Some typical Pune neighborhood and people are shown on the way. Her mobile phone is out of battery, so she looks for a nearby phone booth to call up her mother. She wants to get the boy's phone number to call up. She meets the same man (Mr. Pune) who has helped her earlier to locate the address.

There starts the exchange between Ms Mumbai and Mr. Pune over the superiority of both the cities. Mr. Pune has tremendous pride for Pune and him being Made in Pune. He is proud of almost anything and everything about Pune whether good or bad. Their journey goes through Saras Baag, Tulashi Baag, Sinhagad Fort etc.


They discuss a lot of thing about life. She tells about a person Arnav in her life, and how they have decided to go their own ways. He describes the good time he had with a Japanese friend Sung Chi. They exchange views about life and what kind of match they are looking for. All the time with verbal bouts about superiority of their own cities. The places, the people, the manners, the food specialties are all compared during the conversations.

The whole day passes in all these activities and it is time for her to check if the original boy for whom she came to see is back. It will be interesting to watch the remaining part in the movie itself. Roles plays by both actors are really nice and balance each other. The careless Mr Pune suddenly becoming sensitive on emotional outbursts of Ms Mumbai are depicted well. Hats off to both Swapnil Joshi and Mukta Barve for their performances in the movie. I would recommend it to all.
Cast


Direction

Wikipedia link

Link to watch online

Movie DVD