मंगळवार, ऑगस्ट ३१, २०१०

हापूस (Haapus)


अण्णा गुरव म्हणजे वानरवाडी मधील मोठे प्रस्थ. गावातील सगळेच मोठे निर्णय अण्णाच्या सांगण्याशिवाय होत नसत. याला कारण म्हणजे यांचा ज्योतिष शास्त्राचा गाढा अभ्यास व त्यावर नितांत विश्वास. यांचा मोठा परिवार. घरी म्हातारी आई, जिच्यावर अण्णांचा खूप जीव. बायको आणि मुलं. मुलं म्हणजे एक मुलगा अजित. लग्न झालेला, सुनेचे नाव नंदा. हा खूप हुशार, हा हापूस आंब्याची एक संकरीत जात बनवण्याच्या मागे असतो. आणि त्याला त्यात यश पण येत असते. दोन जुळ्या मुली, एक अमृता, आणि दुसरी अंकिता. अमृता एकदम धडाडीची, अगदी Tomboy शोभून दिसेल तशी, तर अंकिता अगदी लाजाळू व गरीब. चौथी मुलगीच नाव आनंदी. वय १३-१४. अंकिता गावातील एका रीक्षेवाल्याच्या "सुभाष उर्फ सुभ्या" च्या प्रेमात पडते. आता हिचे लग्न सुभ्याशी होणे तसे कठीणच असते, कारण पत्रिका आडवी येणार हे दोघांना देखील माहिती असते. अंकिताला बघायला पाहुणे येणार असतात, हे सुभ्याला कळते, त्याला समजत नाही

आता काय करावे. याच विचारात असताना, अण्णा गुरव यांचा पत्ता विचारत एक तरुण मनुष्य त्याच्या रिक्षात चढतो, त्याच्याशी गप्पा करताना त्याला समजते की हा अण्णा गुरवच्या मुलीला बघायला आला आहे. पण प्रत्यक्षात हा वानरवाडी मध्ये शिक्षक म्हणून आलेला असतो व वडिलांच्या मित्राकडे म्हणजे अण्णा गुरव यांच्याकडे राहणार असतो. अश्या तर्हेने "दिगंबर नीलकंठ काळे" याचे वानरवाडी मध्ये आगमन होते



अजितला हापूस आंबाच्या व्यापार करायचा असतो. त्याच्या मते, दलालांना मधल्या मध्ये खूप पैसे मिळतात, त्यामुळे जर का सगळ्या वानरवाडी मधील बागायतदार एकत्र आला तर आंबा विकला जाईल आणि पैसे पण जास्त मिळतील. पण या गावात असणारा दलाल राजेंद्र छाजेड हा अजितच्या मार्गात खूप अडथळे आणतो. व शिवाय अण्णा गुरव यांच्या मते, म्हणजे पत्रिकेच्या मते, गुरव यांच्या कुटुंबात बिसिनेस हा यशस्वी होणार नाही. त्यामुळे अण्णांची पण अजितला साथ मिळत नाही.



अमृता देखील, अण्णांच्या पत्रिका, पत्रिका या विषयावर चिडलेली असते, एकूण घरातील सगळेच लोक ज्योतिष व पत्रिका या विषयावर जरा वैतागलेले असतात. मराठवाड्यातील अंबेजोगाई या गावातून आलेला मास्तर, हे सगळे ओळखतो. त्यात अमृता याच्या प्रेमात पडते. पण अण्णांना कसे पटवायचे हा सगळ्यांसमोर पडलेला प्रश्न. शेवटी, अजित, बिसिनेस करू शकतो का, त्याला अण्णांची साथ मिळते का, दोन्ही प्रेमी युगुलांना आपापले प्रियकर मिळतात का , अण्णा बदलतात का हे बघा "हापूस" मध्ये.



दलाली मोडून काढली पाहिजे, त्याने शेतकऱ्यांना जास्त पैसे मिळतील, त्याचप्रमाणे ज्योतिष्य हेच अगदीच सगळे खर नसतं, तर मनुष्याची मेहनत पण खूप महत्वाची आहे हे दाखवण्याचा प्रयत्न या सिनेमात केला आहे. सगळ्यांच्याच भूमिका उत्तम आहेत. मधुर वेलणकर खूपच छान दिसते. मकरंद अनासपुरे नेहमीप्रमाणेच छान. सुभोध भावेची बायको म्हणून जी कोण नटी आहे, ती त्यापेक्षा वयाने मोठी आहे असा वाटत. पण तिची भूमिका उत्तम आहे. सिनेमा चांगला आहे. पण बघावाच असा नाही.

तुम्ही सिनेमा बघितला असल्यास किंवा बघितल्यानंतर, किंवा माझ्या लिखाणाबद्दल प्रतिक्रिया अवश्य नोंदवा.



Anna Gurav is a famous Astrologer in the village of Vanarwadi. He is one of strongest believer of Astrology and also advises each and every person in is contact to follow. All the major decisions in the village are not taken without consulting Anna's consultation. His family members are his old mother, his wife, son Ajit, Ajit's wife Nanda, twin daughters Amruta and Ankita and youngest member is Anandi.



Ajit is a bright man and has dreams, ideas as well as courage. He is working on a hybrid variety of famous Hapus Mango, and he is already getting some good results. Amruta is a very bold and dashing girl wife Ankita the reverse, very shy and silent. Amruta is always wondering in the village and is involved in fights. She is a true tom boy. Ankita is attending college and is in love with Subhash alias Subhya, who is a Auto Cab driver.



A prospective boy was to visit Anna Gurav's family to explore wedding relationship with Ankita. Subhya is aware of the fact, so he decides to play spoilsport. While waiting with his Cab for business, a guy comes to him and inquires about Anna Gurav's house. Subhya mistakes him for the prospective boy and starts telling him all false stories about Ankita, so he will decide the other way. But unfortunately he is not the right person but he is new school teacher Kale, who is son of Anna Gurav's friend.



There is a middleman Rajendra Chhajed, who is buying all the mangos from Vanarwadi and selling them in Mumbai. He is making a lot of money, and paying the real farmers working hard in Vanrwadi just peanuts. Ajit is upset about it, and tries to bring all the farmers together and tries to convince them that if they all come together and sell mangos they will make almost four times the money they are making now. Naturally Chhajed is creating all sorts of problems in this endeavor of Ajit to save his business and financial margins. Anna is also opposing Ajit because he thinks according horoscopes, his family can not do business successfully. And there is some unknown reason behind this premise.



Amruta is also upset because of Anna's horoscope business. Kale master being an outsider, but staying in their home, realizes this problem and overdose of horoscope and astrology by Anna. So all the family members decide to come together and find a way out of this. Basically how to convince Anna is the issue they have to tackle.



You have to watch the movie Hapus to see if they are able to convince Anna, if the two pairs in love unite, if Ajit is able to venture in business, and if Anna is able to support all hie family in a meaningful way.



Madhura Velankar has done a fabulous job if acting a double role of twin sisters with opposite charactors. Makaran Anaspure is hilarious as usual. Subodh Bhave and Shivaji Satam and established names and they have certainly justified their roles well. Pushkar Kshotri is good too. If you enjoy comedies, you will certainly enjoy the movie.




Cast


Direction




Link to watch online


Movie Trailer

Movie DVD


 

२ टिप्पण्या:

  1. "सिनेमा चांगला आहे. पण बघावाच असा नाही" हे मात्र तितकस पटलं नाही.कारण मी हापूस बघितला.खरच खूप गोड लागला.अहो मराठी मध्ये एका वेगळ्या विषयावर सिनेमा काढलाय नि चांगला जमलाय हो.सर्व सामान्य प्रेक्षकांना नक्कीच आवडला.(आमच्या बांधकाम क्षेत्राच्या भाषेत बोलायचं तर ,"आता भिंग लाऊन बघायचं म्हटल तर बाईला सुध्धा मिश्या असतातच कि हो.")असो तुमच्या मता बाबत दुमत अजिबात नाही.शेवटी काय ज्याची त्याची आवड ,खर कि नाही?

    उत्तर द्याहटवा
  2. होय तुमचे म्हणणे खरे आहे. मी यासाठी बघावाच असे नाही असे लिहिले कारण, हा सिनेमा नाही बघितला तरी चालेल, यातून खूप समाज प्रबोधन होतंय अश्यातला काही भाग नाही. पण टिंग्या , नितळ , या सारखे सिनेमे विचार करायला लावतात त्यामुळे जास्त वेळ मनात घर करून बसतात.

    उत्तर द्याहटवा