Thursday, December 24, 2009

अलास्का (Alaska)जैक हा पायलट असतो आणि Boeing ७४७ विमाने चालवत असतो. त्याला २ मुले असतात, जेसी आणि श्यान. अचानक त्याच्या बायकोचा मृत्यू होतो व सगळे जगच त्याला नकोसे होते, त्यामुळे तो नोकरी सोडून अलास्का मध्ये एका कंपनी मध्ये नोकरीला लागतो, जी कंपनी community service करते, म्हणजे मोठ्या गावात जाऊन लोकांना आवश्यक असणाऱ्या गोष्टी पुरवणे. Quency नावाच्या गावात सगळी कडे बर्फ असल्याने विमानाने / हेलीकॉप्तेरणे येणे जाणे करावे लागते. तर जैक त्या कंपनी मध्ये एका विमानाचा पायलट म्हणून पुन्हा नव्याने आयुष्य सुरु करतो. त्याची मुलगी जेसी तिथे लवकरच रुळते, आणि तिला तिथले निसर्ग सौंदर्य आवडू लागते. ती आई गेल्याच्या दुखातून लवकरच बाहेर येते. पण मुलगा श्यान हा इथे रमत नाही. त्याला शिकागो ची आठवण येते, व त्याला इथून बाहेर पडायचे असते. त्याचे व त्याच्या वडिलांचे यावरून सारखे वाद होत असतात. असाच एकदा वाद होतो, आणि जाचक ला emergency call येतो व औषध आणायला त्याला मोठ्या गावात जाणे आवश्यक होऊन बसते. संध्याकाळ होत आलेली असते, त्यामुळे त्याने जाऊ नये असे त्याच्या मुलीला वाटत असत, पण तरीही तो बाहेर पडतो आणि अचानक येणाऱ्या वादळात फसतो.
इकडे १ दिवसभर त्याचा शोध घ्यायला २ हेलीकॉप्तेर जातात पण त्याचा शोध लागत नाही, कारण येणाऱ्या वादळामुळे जैक नेहमीचा रस्ता न घेता, दुसरा रस्ता घेण्याचा प्रयत्न करतो. वडील सापडत नाही, व इतर कोणीच त्यांना शोधायला जाणार नाही ह्याची खात्री पटल्याने, श्यान व जेसी त्यांना शोधायला बाहेर पडतात. शोध घेत असताना त्यांना, काही पोचेर्स पोलर बेअर ची तस्करी करताना दिसतात. ते तश्याच एका पोलर बेअर च्या पिल्लास सोडवतात. त्यानंतर ते पिल्लू या दोघांची पाठ काही सोडत नाही. हे त्याला सोडून पळून जाण्याच्या प्रयत्न करतात, पण तरीहि ते या दोघांना शोधून काढतो. अलास्काच्या तीव्र हवामानाच्या व कठीण प्रदेशात ते कसे वडिलांना शोधून काढू शकतात का व वडील तो वर जिवंत असतात का हे बघा "अलास्का" या सिनेमात.

अलास्काचे रम्य दर्शन इथे या सिनेमात घडते. त्यानंतर या दोघा मुलांचे साहस व प्रसंगावधान इथे खूपच छान दाखवले आहे. पोलर बेअर आपली एकदम करमणूक करतो. पोलर बेअर खरच प्रेमात पडावा असा प्राणी आहे. सिनेमा खूपच छान आहे. नक्की बघावा.

This is a story of Jack, a pilot, and his family. Jack used to work in the company, where he used to ride Boeing 747. He has 2 children, Jessi and Sean. Unexpected death of his wife, puts his family in distress and he decided to leave Chicago, and go to Quency, a small town in Alaska, to start a new life. He joins the company, where he pilots small plane and which helps community to get daily commodities.His daughter, Jessie, settles quickly with the new environment and Sean still lives in the past. He wanted to go back to Chicago and he abuses his father about this decision. One night, Jack gets a call from the company to get emergency medicine from the big city. As it was about to get dark Jessie, request Jack not to go, but he decides to leave and get stuck in the unexpected snow storm.

Two days, search operation continues, but still crew do not find him. And they decide to stop the operation. When Sean knows about this decision, he decides to find his father himself. Jessie also joins him. These 2 children go in search of Jack. While trying to find their way, they see one camp by poachers, who are poaching of polar bear. These 2 children rescue a baby polar bear from the cage of poachers. This baby polar bear gives them company till the end.

This is a really good movie, not only for children for even for adults. Adventures of Jessi and Sean is really admirable. The movie shows the beautiful nature of Alaska to us. Baby Polar bear is really adorable. A must watch movie.Cast
  • Thora Birch थोरा बिर्च
  • Vincent Kartheiser विन्सेंट कर्थेइसर
  • Dirk Benedict डिर्क बेनेडिक्ट
  • Charlton Heston कार्लटन हेस्टन
  • Duncan Fraser डंकन फ्रेसर

Director
  • Fraser Clarke Heston फ्रेसर क्लार्क हेस्टनNo comments:

Post a Comment