Tuesday, October 20, 2009

क्षण (Kshan)"क्षण" म्हणजे निखील, निलांबरी आणि विहंग यांच्या आयुष्यात आलेल्या अविस्मरणीय क्षणांची गोष्ट.

निलांबरी आणि विहंग एकाच कॉलेजमध्ये शिकत असतात. तिथेच त्यांची खूप मैत्री होती आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात. विहंगला कविता लिहिण्याचा आणि गाणं म्हणण्याचा छंद असतो. छंद असे म्हणता येणार नाही, तर त्यात त्याला गती असते. कविता आणि गाणी म्हणत असताना तो एका छोट्याश्या कम्पनीमध्ये नोकरी देखील करत असतो. निलांबरीचे आई वडील सधन असतात. जेव्हा निलाम्बरीच्या वडिलांना कळते कि निलांबरी आणि विहंगचे प्रेम आहे तेव्हा ते त्याला होकार तर देतात. पण विहंग थोड्या दिवसाने नोकरी सोडतो आणि निलूच्या वडिलांचे डोके संतापाने फिरते. ते निलूला विहंगबरोबर लग्न करायला नकार देतात. पण निलूचे विहंगवर खूप प्रेम असते त्यामुळे ती वडिलांशी भांडण करते आणि त्यातच वडिलांना हृदयविकाराचा झटका येतो. या प्रसंगाने घाबरून जाऊन निलू शेवटी वडिलांच्या आग्रहास बळी पडते आणि निखीलशी लग्न करते. निखील खूप मोठा बिसिनेसमन असतो. पैश्याला काहीच कमी नसते, तो निलांबरीवर खूप प्रेम देखील करत असतो. हे सगळे सुरु असतानाच निलूला खूप मोठा आजार होतो. थोडा हवापालट म्हणून निलू व निखील दुसऱ्या गावाला जातात आणि तिथेच विहंगची निलू बरोबर पुन्हा भेट होते. आता विहंग खूप मोठा कवी / गायक झालेला असतो.


आता बऱ्याच दिवसाने भेट झाल्याने खूप जुन्या गोष्टी आठवतात. विहंग अजूनही निलू सोडून गेली त्यात क्षणात अडकून पडलेला असतो. निलू, निखील आणि विहंग एकत्र येतात. निलूचा आजार खूपच वाढतो आणि ती या आजारातून बाहेर पडणार नाही असे निखीलला कळते. निलूला पण समजते कि आता आपण फार दिवसांचे सोबती नाही. परिस्थितीमुळे विहंगला सोडून गेल्याचे दुख तिला अजूनही त्रास देत असते. त्यामुळे ती निखील जवळ, विहंगबरोबर राहण्याचे थोडे "क्षण" मागते. पुढे काय होते हे तुम्हीच बघा "क्षण" मध्ये.

सिनेमा जरूर बघावा असा आहे. जरा वेगळी गोष्ट आहे. सिनेमा थोडा दुखद आहे असे म्हणायला हरकत नाही. सुबोध भावेची अक्टिंग मस्तच आहे. सगळ्यात जास्त आवडलेला प्रसंग म्हणजे जेव्हा निखीलला, निलूच्या आजाराबद्दल कल्पना येते आणि तो ते लपवण्याचा प्रयन्त करतो तेव्हा तो एका क्षणी हसतो आणि दुसऱ्याच क्षणी रडतो हा प्रसंग सुबोधने खूप चांगला रंगवला आहे. सिनेमातील गाणी म्हणावी तितकी मला आवडली नाहीत. फक्त शेवटचे गाणे खूप छान आहे. प्रसाद ओक आणि दीपा परब हे दोघांनी पण त्यांच्या भूमिकेला न्याय दिला आहे.

या सिनेमाबद्दल व माझ्या मताबद्दल तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.
Kshan which literally means moment is a story about moments in lives of Nilu, Nikhil and Vihanga.

Vihanga is an performing artist, struggling to establish as a poet and singer. He has a day job and managing to perform in stage shows. Nilambari or Nilu is a college student few years junior to Vihanga and they fall in love with each other.

Vihanga and Nilu decide to talk to parents of Nilu once Vihanga manages to get a own house and for that he is also waiting for his promotion in job. But one day Nilu's father finds out about their love and invites Vihanga for discussion. He agrees for their marriage.
Vihanga decides to quit the job on Nilu's insistence when he was denied the promotion. He decides to concentrate on his music career. But this upsets Nilu's father and they has a heated argument with Nilu. In the process he suffers a stroke. He emotionally blackmails Nilu to forget Vihanga and agree to marry a person of his choice.

On Vihanga's birthday Nilu gives this bad news and walks away from his life forever. Vihanga is shattered and stuck to those moments in his life. Nilu is married to Nikhil and is trying to be happy with him. They have very good relationship with transparency between them.

Destiny brings them together while Nilu is suffering with an unidentified health condition. And soon they realise Nilu hardly has any time in here life. In her final days when Nilu realised that Vihanga is still stuck with their moments together, convinces Nikhil to lend of her final few moments to help attempt Vihanga to recover from his failed love life.

Though a popular love triangle, the storyline has a charm in it and a must watch if you like movies with a difference. All three main characters are well justified by Deepa Parab, Subodh Bhave and Prasad Oak.Cast:Director:

No comments:

Post a Comment