गुरुवार, जानेवारी २१, २०१६

तू ही रे (Tu Hi Re)

नंदिनी एका खेड्यात राहण्याऱ्या खूप मोठ्या कुटुंबातील वाढलेली मुलगी असते. तिचे सिद्धार्थ नावाच्या शहरात वाढलेल्या इंजिनियरशी लग्न ठरते. लग्नाच्या पहिल्या रात्री नंदिनी सांगते कि तिला खरतर हे लग्न करायचे नव्हते कारण तिला लव-मॅरेज करायचे होते. पण आता लग्न झालय त्यामुळे जसा काय नवरा असेल तो तिने पत्करला आहे.

नंदिनी आणि सिद्धार्थ या दोघांना एक पीहू नावाची मुलगी असते. सिद्धार्थ एका प्रायव्हेट कंपनी  नोकरी करत असतो. तो इंजिनियर असतो. नंदिनी एका कंपनी मध्ये रिसेप्शिनस्टची नोकरी करत असते. दोघांचे एकमेकांवर निरतिशय प्रेम असते. या तिघांचे कुटुंब एकदम मजेत जगत असते. सिद्धार्थला कंपनी मध्ये एक कॉन्ट्रॅक्ट मिळवायचा असतो, पण तो कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठी जो मनुष्य येतो त्याला बघून सिद्धार्थ चपापतो कंपनीसाठी डील करण्याऐवजी हा मनुष्य सिद्धार्थ बरोबर डील करतो कि, तू नंदिनीला ठेवतोय त्याहीपेक्षा जास्त मी नंदिनीला सुखी ठेवीन. अर्थातच सिद्धार्थ त्याला काही बोलत नाही. घरी पण नंदिनी पासून हे घडलेले लपवून ठेवतो.

सिद्धार्थला त्या मनुष्याने दिलेली ऑफर खूप मानसिक त्रास देत असते. त्याचा परिणाम नंदिनी आणि सिद्धार्थच्या संबंधांवर होतो. दोघांची उगाचच वादावादी होते, सिद्धार्थ नंदिनीवर रागवतो. हे सगळे झाल्यावर नंदिनीला शंका येते कि सिद्धार्थ तिच्या पासून काहीतरी लपवून ठेवतोय. त्यात भर म्हणून पोस्टाने एक पाकीट येते. त्यात सिद्धार्थचे लग्न झालेले फोटो नंदिनीला सापडतात. ते बघून नंदिनी खूपच अस्वथ होते. आणि आता हे नक्की काय प्रकरण आहे हे शोधून काढायचे ठरवते. अर्थातच हे सगळे ती सिद्धार्थच्या अपरोक्ष करत असते. सिद्धार्थला याबद्दल काहीच कल्पना नसते.



सगळ्यात प्रथम नंदिनी सिद्धार्थचा खूप जवळचा मित्र प्रसादला भेटते. प्रसाद तिला सुरवातीला सांगण्याची टाळमटाळ करतो. पण नंदिनी जेव्हा त्याला पोस्टाने आलेले फोटो दाखवते, तेव्हा मात्र तो खोटे बोलू शकत नाही. तो नंदिनीला सगळी गोष्ट सांगायचे काबुल करतो, जेणे करून नंदिनीच्या मनात कुठलीही शंका राहणार नाही. आता नक्की या गोष्टीमध्ये काय असते, त्या फोटोमध्ये असलेले सिद्धार्थचे लग्न ही काय भानगड आहे हे बघा "तू ही रे" मधे. 

सिनेमा चांगला आहे. पण सुरवातीचे सिद्धार्थ आणि नंदिनीचे प्रेम दाखवून स्टोरी खूप लांबवली आहे असे वाटले. त्यात खूप जास्त वेळ गेला आहे. त्याचप्रमाणे पिहुचे बरेच संवाद फारच आगावू वाटतात सिनेमात प्रेमाचा त्रिकोण आहे हे लवकरच उघड होते. पण त्याचा शेवट नक्की कसा होतोय हे बघण्याची उत्सुकता मात्र लागून राहते. सिनेमाचा शेवट अपेक्षित असाच आहे. पण क्लायमॅक्स जवळ आल्यावर नक्की काय शेवट असेल अशी उत्सुकता वाटते. सिनेमा बघावाच असे काही नाही, पण बघितल्यास फार पश्चाताप होणार नाही. सई ताम्हणकर खूपच चांगली दिसतेय तिने काम पण चांगले केलय. अर्थात भैरवीच्या भूमिकेत तेजस्विनी पंडित चांगली दिसतेय. 

हा सिनेमा बघितला असल्यास किंवा इतर काही प्रतिक्रिया असल्यास  द्याव्या. 



Nandini is a girl from a rich family in a village. She gets married to Sidhharth, who is a city guy and an engineer. First chance she gets to talk to him, she tells him that she intended to love someone, and then marry the same person, but now that she is married to him, she will be very faithful to him.

Fast forward eight years, now Nandini and Sidhharth have a daughter called Pihu. Shdhharth has become engineering manager in a private company. Nandini is also working as a receptionist in another company. Both Nandini and Sidhharth are totally in love with each other and the the family of three is very happy family. 

One day, when Sidhharth reaches office, he meets a high official. Sidhharth looked shocked to see him, but pretends nothing has happened. The person is suppose to sign a very big deal with the company. He offers Sidhharth to sign the contract on condition that Sidhharth should let him take care of Nandini, and he will do it in much better way. Sidhharth keeps quiet and does not even mentions this to Nandini.


Sidhharth is very disturbed by the offer and his behavior changes at home with family. Him and Nandini have frequent arguments without much reason. At that point Nandini starts thinking there is something going on in Sidhharth's mind, which he is not talking out. To add fuel to this suspicion Nandini receives a envelop with photographs showing Sidhharth getting married. This now causes turmoil in Nandini's mind. She decides to find out the truth behind all this, without confronting Sidhharth. Sidhharth is totally unaware of Nandini's struggle. 

Nandini starts with Prasad, who is Sidhharth best friend and knows him for years. He was also there in one of the photos that Nandini received. Prasad denies any knowledge of this, but when Nandini confronts him with the photographs, he agrees to tell her everything in detail, so that there is no confusion in her mind. Now telling you what was the incidences that Prasad narrates would be spoiler and should be watched in the movie "Tu hi re".

Cinema is good. But goes bit slow while Sidhharth and Nandini's happy married life is continuing. But later catches some good pace. Pihu seems to be over smart and bit of over acting. The love triangle is known but still remains interesting for a while. Close to climax, the story line is clear but continues well till the end. Both Sai Tamhankar and Tejaswini Pandit are looking good and acted well. Won't recommend movie as must watch but a good pass time.

Do let us know your comments.  



Direction

गुरुवार, जानेवारी ०७, २०१६

मुंबई-पुणे-मुंबई - २ (Mumbai - Pune - Mumbai - 2 )


पहिल्या चित्रपटात असलेल्या मिस मुंबई चे नाव गौरी देशपांडे, आणि मिस्टर पुणे यांचे नाव गौतम प्रधान. आता या दोघांनी लग्न कारण्याचे ठरवले आहे.  घरातील सगळी मंडळी खुश असतात. गौरीच्या घरी तिचेआई-वडील, बहिण रश्मी, लग्न न झालेली मावशी, गौरीची मैत्रीण मैत्रीण तनुजा यांच्या उत्साहाला उधाण आलेले असते. तर गौतमच्या घरी, त्याचे आई-वडील, आजी आणि इतर नातेवाइक भयंकर खुश असतात.

आता दोघांचे फोन, SMS, WhatsApp वर मॅसेज पाठवणे असे सगळे सुरु असते, पण अजून साखरपुडा झालेला नसतो. गौरीच्या आईला साखरपुडा करावा आणि लग्न करून दोघांचा संसार लवकर सुरु करावा असे वाटते. मग बोलणी सुरु होतात. साखरपुडा होतो. आता दोघांना लायसन्स मिळालय त्यामुळे दोघे पण तसे आनंदात असतात, एकत्र भेटणे वगेरे सुरु असते.

तसेच एकदा गौरी, गौतमशी बोलत असताना, तिला तिचा आधीचा मित्र अर्णव भेटतो. तो तिला पूर्वी झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागतो आणि म्हणतो कि मला तुझ्या शिवाय खूप त्रास होतोय. तेव्हा गौरी म्हणते, कि मी आता खूप पुढे निघून गेलीय आणि आता तिला गौतमशी लग्न करायचे आहे. हे ऐकल्यावर अर्णवला खूप दुख होते, तो म्हणतो लग्न झाल्यावर तू माझ्याशी कॉन्टॅक्ट ठेवशील न, मी फोन केला तर गप्पा मारशील न. गौरी अर्थातच त्याला हो म्हणते.

तर एकदा गौरी आणि गौतम भेटतात तेव्हाच नेमका अर्णवचा फोन येतो आणि तो तिला विचारतो कि त्याला एका लग्नाच्या कपड्यांची ऑर्डर मिळालीय आणि त्यात नवऱ्या मुलीचे कपडे डिझाईन करण्यासाठी, गौरीची मदत हवीय. गौरी गौतमला विचारून अर्णवला हो म्हणते. अर्थात हा निर्णय गौरीच्या घरच्यांना आवडत नाही. पण गौतमच्या मते, गौरीने कोणाबरोबर काम करावे, हे तिचे तिने ठरवावे आणि अर्णव बद्दल त्याच्या मनात काहीच घृणा नसते. गौरीला या प्रसंगात गौतमच्या मनाचा मोठेपणा जाणवतो. पण एका अश्याच भेटीत, जेव्हा गौरी मुंबईहून पुण्याला येते आणि गौतम तिला घ्यायला येऊ शकत नाही, तेव्हा मात्र गौरी खूप चिडते. आणि तेव्हा पासून तिच्या मनात आपण गौतमशी लग्न करावे कि नाही या बद्दल शंका येणे सुरु होते. तिच्या म्हणण्यानुसार, लग्न ठरल्याने तिने तिच्या आयुष्यातील प्रायारीटीज बदलल्या आहेत तश्याच गौतमने देखील बदलायला हव्यात. पण तसे काही तिला दिसून येत नाहीये, त्यामुळे तिला अजून विचार करायला वेळ हवाय. गौरीचा गौतमशी लग्न करण्याबद्दल नक्की काय विचार होतो  हे बघा "मुंबई-पुणे-मुंबई २" या सिनेमात.

पहिल्या मुंबई-पुणे-मुंबई सिनेमाने या सिनेमाची अपेक्षा खूपच उंचावून ठेवली, त्या उंचावलेल्या अपेक्षेला मात्र हा सिनेमा नक्कीच उतरला नाहीये. सिनेमात खूपच पात्र आहेत. आपण सुरज बडजात्याचा हिंदी सिनेमा बघतोय कि काय असे वाटू लागते, एकूण लग्नाची तयारी त्यावेळी दाखवेलेले एक प्रसंग बघुन. त्याचप्रमाणे सिनेमात नक्की काय होणार ह्याचा अंदाज येतो. सिनेमा खूपच लांबवला आहे. बऱ्याच गोष्टी तर्कात बसत नाहीत. उदाहरणार्थ , जेव्हा गौतम, गौरीला एक भेटवस्तू म्हणून एक G अक्षर असेलेले लॉकेट देतो, तेव्हा ती ते घ्यायला नकार देते, कारण तिला G म्हणजे गौतम असे  अक्षर नको असते . हे मात्र अगदीच तर्काला धरून वाटले नाही. सिनेमाचा शेवटी देखील गौरीचे संवाद चांगले वाटले नाहित. एकूण सिनेमा बघावाच असा आहे, असे पहिल्या सिनेमासारखे छातीठोक पणे म्हणता येणार नाही. सिनेमाची कथा जरी मार खाणारी असली, तरी कलाकारांनी त्यांच्या त्यांच्या भूमिकेला उत्तम न्याय दिला आहे. एकूण ममराठमोळे लग्न बघतोय असा मात्र या सिनेमात नक्कीच वाटत नाही

हा सिनेमा बघितला असल्यास किंवा तुमच्या इतर काही प्रतिक्रिया असतील तर अवश्य लिहिव्या.

This is continuation of the movie Mumbai-Pune-Mumbai. Miss Mumbai is Gauri Deshpande and Mr. Pune is Gautam Pradhan. After their long meeting in Pune in part 1, they have decided to get married. Both the family members are really happy and excited about the marriage ceremony. Gauri has her parents at home and her younger sister. She also has an unmarried aunt and a very close friend Tanuja. Gautam has his parents and Grand mother at home. All his family members and cosines are super excited too.

Both of them are in constant contact using Phone, SMS, What'sapp etc. They are not officially engaged yet but Gauri's mother wants this to happen soon. She is looking forward to official engagement followed by marriage ceremony at the earliest. Finally the two families meet and formalize the engagement and the preparation of wedding function start in full swing. Both Gauri and Gautam are also happy and start looking for opportunities to meet.
One of these days, Gauri meets her ex boyfriend Arnav. He apologize about the earlier incidents and confesses that he is finding it difficult to live without her. But Gauri tells him firmly, that the time has passed and she has moved forward in life now. She tells him that she is planning to get married to Gautam soon. Arnav is shocked and asks her, if she will still maintain contact with him and meet him sometime as a friend. Gauri graciously agrees.
Once while talking to Gautam, she receives a call from Arnav. He wants to know if she could help him in his work, he has received a fashion design contract for a high profile wedding and wants Gauri to help with costume design for the bride. Gauri gets Gautam's permissions and agrees to work on the assignment. Gautam feels that Gauri should decide what and with whom she wants to work, but Gauri's family is not happy with this new job contract. Gauri learns about Gautam through this incidence. 
Soon Gautam misses an appointment with Gauri, due to his work, he was not able to pick up Gauri from Train station when she came to visit him for some shopping for the wedding, and requests her to take an auto rikshaw and come over to the place he was. At that moment, Gauri starts doubting Gautam's behavior and she feels if he starts ignoring her later once they are married, or changes his priorities, she will be stuck. She tells this to Gautam on face, and tells she is not sure if she should go ahead with this relationship or not, and she needs time. How much time does she take? Is she finally convinced and gets married or not? Watch this is the sequel Mumbai-Pune-Mumbai 2
The first movie was really good and like most sequels, this fails to live by the expectations. This movie has lot many actors than the first one which had only two. But they all were not utilized that well, specially Prashant Damale. During the marriage preparation song sequence, the movie felt like big budget Hindi movie by Suraj Badajatya. The movie gets very predictable at times. Also the movie feels too slow and lengthy at times. Towards end of the the movie, the dialogues are not that sharp and interesting as most of the other works of Satish Rajwade. The story line is not that interesting but the actors have managed to pull off a decent performance to manage that lacunae. Finally if you are fan of Swapnil - Mukta pair, you might enjoy the movie.

If you have watched the movie or if you have comments on our review, please leave us a comment.


Direction

Cast