मंगळवार, ऑक्टोबर २३, २०१२

ब्लू (Blue)

 आरव मल्होत्रा आणि सागर सिंग हे दोघे खूप जिगरी दोस्त असतात. आरवचा बहामा मध्ये फिशरीचा मोठा उद्योग असतो. तर सागर हा आरव बरोबर काम करत असतो. सागर हा खूप चांगला डायवर (म्हणजे हिंदीत गोताखोर) असतो. सागरचे मोनाशी लग्न झालेले असते आणि त्याचे मोनावर जीवापाड प्रेम असते. त्यात उलट आरव मल्होत्रा खूप मुलींबरोबर फिरत असतो व त्याचे प्रेम वगेरे काही नसते. नुसती मुलींबरोबर चंगळ करायची असा स्वभाव असतो. दोघांना फ्री स्टायल कुस्तीचा शौक असतो. त्यात ते दोघे जन एकमेकांशी शर्यत वगेरे लावत असतात.

तर या सागरला एक छोटा भाऊ असतो, त्याचे नाव समीर उर्फ सॅम. हा सम एक खूप वेगवान मोटारसायकल रायडर असतो. एकदा तो अशीच मोटार सायकल चालवत असताना त्याची निक्की नावाच्या खूप सुंदर मुलीशी भेट होते. पण निक्की एका गुलशन नावाच्या मोटार सायकल स्वराकडे नोकरी करत असते. आता या दोघांची शर्यत लागते आणि त्यात सम जिंकतो. अर्थातात आता हि सुंदर मुलगी निक्की सम कडे आकर्षित होते.

हा गुलशन एक मोठा उद्योगपती असतो. त्याचा उद्योग काय असतो हे मात्र समला माहिती नसते. निकी त्याला इतकेच सांगते, कि गुलशनचे एक काम आहे ते काम जर का तू केलेस तर तुला ५० मिलियन डॉलर मिळतील. इतके पैसे मिळणार म्हणून ते काम करायला सम तयार होतो. काम असे असते कि गुलशन ने दिलेली एक पिशवी एका पत्त्यावर पोचवून द्यायची. सम पिशवी खांद्याला लटकावून गाडी वर स्वार होतो. पण अर्ध्या वाटेत त्याच्या मागे पोलीस लागतात आणि पोलिसांना चुकविण्याच्या भानगडीत तो वेडीवाकडी गाडी चालवू लागतो आणि त्या भानगडीत त्याच्या खांद्याला लावलेली पिशवी खाली पडते.


हा गुलशन एक मोठा उद्योगपती असतो. त्याचा उद्योग काय असतो हे मात्र समला माहिती नसते. निकी त्याला इतकेच सांगते, कि गुलशनचे एक काम आहे ते काम जर का तू केलेस तर तुला ५० मिलियन डॉलर मिळतील. इतके पैसे मिळणार म्हणून ते काम करायला सम तयार होतो. काम असे असते कि गुलशन ने दिलेली एक पिशवी एका पत्त्यावर पोचवून द्यायची. सम पिशवी खांद्याला लटकावून गाडी वर स्वार होतो. पण अर्ध्या वाटेत त्याच्या मागे पोलीस लागतात आणि पोलिसांना चुकविण्याच्या भानगडीत तो वेडीवाकडी गाडी चालवू लागतो आणि त्या भानगडीत त्याच्या खांद्याला लावलेली पिशवी खाली पडते. सम त्याचा जीव तर कसाबसा वाचवतो, पण पिशवी पडते, त्यामुळे गुलशन त्याला ५० मिलियन डॉलर मागू लागतो. एकीकडे पोलीस दुसरीकडे गुलशन असा डबल ट्रबल त्याला सुरु होतो. आता काय करावे हे त्याला समाजात नाही. त्यात निकी त्याला सल्ला देते कि तू आता कुठेतरी दूर निघून जा, मी गुल्शानला तू दुसरीकडेच गेला आहे असे सांगीन, त्यामुळे थोडे दिवस तुला या सगळ्यापासून आराम मिळेल आणि मग पैश्याची सोय करायला वेळ मिळेल.

समलं ही आयडिया पटते, त्यानुसार सम बहामाला त्याच्या भावाकडे निघून येतो. सम आता निकीच्या प्रेमात पूर्णपणे पडलेला असतो. तो निकीला बरेचदा फोन करण्याचा प्रयत्न करतो. पण निकी काही त्याला फोनवर भेटत नाही. एक दिवस त्याला निकीकडून फोने येतो, तर काय हा फोन गुलशन च्या हातात असतो. आता गुलशन संचय शोधात बहामाला पोचलेला असतो.

गुलशन पासून वाचवण्याचा एकाच मार्ग म्हणजे ५० मिलियन डॉलर त्याला परत करणे. पण इतके पैसे आणायचे कुठून. आरवला या सगळ्या गोष्टीची माहिती कळते. आरव कडे इतके पैसे असतात, पण कॅश या स्वरुपात नसतात. त्यात गुलशन समलं फक्त २४ तासांची मुदत देतो. इतक्या कमी वेळात इतके पैसे कुठून आणणार या विवंचनेत सम, आरव आणि सागर पडतात. त्यात आरव सागरला सुचवतो, कि "लेडी इन ब्लू" तुला वाचवू शकेल  लेडी इन ब्लू हा सागरचा विक पोइंत असतो. सागर लेडी इन ब्लू चा विषय काढला कि खूप रागवत असतो, पण आता सगळ्यांच्या समोर फक्त तोच पर्याय शिल्लक राहिलेला असतो. आता हि लेडी इन ब्लू नक्की काय भानगड आहे हे बघा "ब्लू" मध्ये.


सिनेमा ठीक आहे. फोटोग्राफी उत्तम आहे. सिनेमा जरी प्रेडीक्तेबल असला तरी बघायला चांगला आहे. सस्पेन्स मध्ये खिळवून ठेवत जरी नसला, तरी कंटाळा नक्कीच येत नाही. सगळ्यांचे अभिनय ठीक आहे. संजय दत्त आता बर्यापैकी म्हातारा दिसू लागला आहे असे या सिनेमात अगदीच जाणवते. ए. आर. रहमान चे संगीत आहे. सगळी गाणी ढांगचिक, ढांगचिक आहेत. काही गाण्यामध्ये अगदीच तोकडे कपडे घातलेली लारा दत्त बघायला मिळते. सिनेमा एकदा बघण्यालायक आहे, पण बघितला नाही तर खूप काही मिस केलाय असाही नाही.

तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर जरूर लिहा.



Aarav Malhotra and Sagar Singh are fast friends. Arav owns a big fisheries business in Bahamas. Sagar is working with Arava and is a really good diver. Sagar is married to Mona and they both love each other. Arav is a flirt nad has affairs with several girls. They are both followers of Free Style Wrestling as sport and enjoy betting with each other.
Sameer aka Sam is Sagar's younger brother. He is a motor cycle rider and has passion for speed. He meet Nikki once while racing another good rider Gulshan. Nikki is working with Gulshan but Sam wins the race against Gulshan so Niki is attracted to Sam now. 
Gulshan runs some sort of business but nature of his business is unknown. Nikki gives an offer to Sam on behalf of Gulashn. The offer is worth 50 Million dollars and which involves just delivering a bag to destination. Sam takes this up since it involves big money and the job seems very simple. But half way through he realizes that police are following him. He rides fast and some rash driving, but in the process the bag is lost. He barely manages to save his own life. When Gulshan knows about the lost bag, he demands Sam to pay 50 million dollars, or he will kill Sam. Now Sam is stuck between Police and Gulshan's men. Finally after consulting with Nikki, he decides to disappear and go to Bahamas to his brother. This will buy him some time to think and manage money. 
Sam reaches Bahamas but he is totally in love with Nikki. He keeps tying to contact Nikki but he is not able to reach her at all. Finally he receives a call form Nikki, bit soon realizes that is is actually a call from Gulshan. Gulshan is already in Bahamas to get hold of Sam. 

Now the only way out is to return Gulshan's money. But no one has that kind of money. Finally Arav comes to know about this, and he wants to help too, bit he too does not have so much liquid cash. Gulshan has given Sam 24 hours time to return the money. While discussing the options Arav tells the only hope now is the "Lady in Blue" Sagar is always upset when Arva talks about Lady in Blue, now that is the only way out and Sagar seems to be ready to explore that option. To find out what Lady in Blue is you need to watch the movie "Blue".

The overall movie is good and worth watching. Though the whole story plot is predictable and the suspense is not one of the best. The photography is really good. The actors have all done a good job. Sanjay Dutt looks a bit too old for his role. Music is by A R Rahamn and most of the songs are fast rap style. Laura Dutta has lot of dance sequences. 

Do let us know your comments about the movie if you have watched it. If you have not watched, do let us know if you found this review useful, to convince you to watch it or otherwise.

Cast
Director
  • Anthony D'souza अन्थनी डिसुझा