त्यासाठी त्याचे स्टोरी लिहिण्याचे काम सुरु करतो. शेखर हा एका अगदी छोट्याश्या घरात एका चाळीत (हंसराज वाडी चाळ) राहत असतो. या चाळीचा मालक कांतिभाई नावाचा एक गुजराती मनुष्य असतो. हा खूपच चांगला असतो. याला चाळ विकण्याच्या बऱ्याच ऑफर्स येतात पण हा चाळ विकत नाही. या चाळीत राहणारी जनता पण खूप चांगली असते. या चाळीतील सगळे जण शेखर वर प्रेम करत असतात. शेखर आता नोकरी सोडून दिग्दर्शकाचे काम करणार, स्वत स्क्रिप्ट लिहिणार हे ऐकून सगळ्यांना आनंद होतो. सगळे लोक त्याला सहकार्य करतात.
मानसी ही एक इंडस्ट्री मधील मोठी नायिका असते. हिच्या घरचे हिला ३ शिफ्ट मध्ये काम करायला लावतात व सगळे पैसे स्वत घेतात. हिला आता एकूण तिच्या कुटुंबांबद्दल प्रेम राहिलेले नसते. हिचा भाऊ विक्रम सतत हिच्या मागे असतो. मानसी यशस्वी नायिका होण्याच्या आधी पासूनच शेखरवर प्रेम करत असते. शेखरला हे प्रेम मान्य असते पण त्याला मानसीचे असे भेटणे मान्य नसते. कारण त्यामुळे तिच्या प्रतिमेवर काही परिणाम होईल असे त्याला वाटते.
अन्वर एक ज्युनियर आर्टीस्ट म्हणून काम करत असतो. हा शेखरचा मित्र असतो. या दोघांचा एक मित्र राजू ह्याचे पण सुपरस्टार होण्याचे स्वप्न असते. पण त्यासाठी त्याला मेहनत करायची नसते. तर सगळीकडे शॉर्टकट कसा मारता येईल हेच तो बघत असतो. अन्वर आणि राजू हे शेजारी राहत असतात. घरमालक राजूचे सामान घराबाहेर काढून टाकतात, तेव्हा अन्वर ते सामान राजूकडे पोचवतो पण सांगतो कि माझ्या घरी तुला जागा नाहीये. त्यावेळी राजूच्या मनात शेखरच्या घरी जाऊन राहण्याची कल्पना येते. तो राजूच्या घरी जातो, राजू त्याला राहण्याची परवानगी देतो. राजू ज्यावेळेस येतो तेव्हा शेखरची स्क्रिप्ट लिहून पूर्ण झालेली असते.
त्याने एका निर्म्यात्याबरोबर काम करण्याचे ठरवलेले देखील असते. इकडे राजू लवकर सुपरस्टार कसे होता येईल याचे विविध मार्ग शोधत असतो. जेव्हा त्याला कळते की शेखरने एक स्क्रिप्ट लिहिली आहे तेव्हा तो ती स्क्रिप्ट पळवतो आणि तोलानी नावाच्या एका निर्मात्याला देतो. राजूच्या स्क्रिप्टच्या बदल्यात या सिनेमात हीरोचे काम करण्याची मागणी करतो. स्क्रिप्ट खूपच छान असते त्यामुळे, तोलानी राजूची मागणी मान्य करतो. शेखरला स्क्रिप्टची चोरी समजत नाही. जेव्हा राजूचा सिनेमा तयार होतो तेव्हा त्याला कळते कि त्याची स्क्रिप्ट चोरून हा सिनेमा केलेला आहे. तोलानीचे सगळे पैसे त्यात अडकलेले असतात, त्यामुळे शेखर केस करण्यास नकार देतो. हा सिनेमा सुपरहिट होतो व शेखरचा चांगुलपणा बघून तोलानी त्याला काही पैसे देऊ करतो. पण राजू ते स्वीकारत नाही. याच दरम्यान मानसी घर सोडून शेखर कडे राहायला येते. दोघे लग्न करतात.
राजूने चोरलेली स्क्रिप्ट, लग्नाचा भार, नोकरी गेलेली, या दरम्यान शेखर खूप खचून जातो. सिनेमा सोडायचे ठरवतो, पण त्याला साधी नोकरी करणे पण दुरापास्त होते, कारण सगळे जण त्याला मानसीचा नवरा म्हणून ओळखू लागते. एक दिवस शेखर आणि मानसीचे भांडण होते, आणि त्यात मानसी घर सोडून निघून जाते. परिस्थितीच्या भोवऱ्यात अडकलेला शेखर शेवटी कसा वर येतो हे बघा "शॉर्टकट" मध्ये.
सिनेमा ठीक आहे. ठीक म्हणण्यापेक्षा कंटाळवाणा या स्तरात जास्त मोडतो. सुरवातीला तर खूपच कंटाळा येतो, पण उत्तरार्धात जरा जोर पकडतो. म्हणजे गोष्ट थोडी पुढे सरकते. आणि आता पुढे काय असेल हे बघण्याचा उत्साह येतो. सुरवातीला अर्षद वारसी खूप रिळे खातो आणि त्याचा अभिनय, आणि एकूणच सगळे कंटाळवाणे होते. सिनेमातील काही गाणी तर का टाकली आहेत असा प्रश्न पडतो. एका गाण्यात अनिल कपूर आणि संजय दत्त, या सिनेमातील नायिके बरोबर नाचतात. सिनेमातील गाणी सिनेमाची लांबी वाढायला टाकली आहेत हे सांगण्याची गरज नाही. या सिनेमाचा निर्माता अनिल कपूर आहे. अक्षय खन्नाचा अभिनय ठीक आहे. बाकी सिनेमा बघितला नाही तरी चालेल असा आहे.
माझ्या लिखाणावर काही प्रतिक्रिया असतील तर जरूर लिहा.
Shekhar has passion for movies. He has a lifetime dream of making a movie of his own. He has been putting a lot of hard work for this. He gets a job as assistant director for a renowned director and performs well. At one point he decides to use his experience and direct a movie of his own. He has to do that by quitting his job and getting into it full time.
Shekhar is staying in a place called Hansa Raj Chawl. This is a small place, owned and rented by a Gujrathi person called Kantibhai. He is a very good person and is not willing to sell the Chawl to any builder. All the people in the Chawl like Shekhar and have lot of love and respect for him. All are really happy with his decision of getting into movie direction on his own and help him with whole heart.
Manasi is a budding but famous artist in the movie industry. Her family members are very greedy and make her work in three shifts to make lot of money for her work. At one point finally she starts hating her family members, specially her brother Vikram, who just follows her and spies on her rather than doing any work of his own. She is in love with Shekhar from the beginning of her career. Shekhar to loves her a lot, but not comfortable with meeting her like this, he feels that might affect her image as a lead artist.
Anwar is a friend of Shekhar and is just a junior artist. Another friend of them is Raju, who has ambition of becoming a superstar but is not ready to work hard for that. He is always on a lookout of a shortcut in life to achieve anything. One day due to non payment of the rent, the landlord vacates Raju's house and keeps all his belongings outside. Anwar just help Raju as courtesy and passes on all his stuff back to Raju. Anwar tell him that he can not accommodate Raju in his house, so Raju decides to go and stay with Shekhar. Since Shekhar has finished writing the script, he decides to help Raju and let him stay with him for a few days.
At this time time Shekhar is already in discussion with a producer about making the film. Raju is still exploring his ways and means in life to become a superstar. When he knows that Shekhar has a good script ready for a movie, he steals the script, and takes it to a producer called Tolani. Tolani is impressed with the script and he agrees with Raju that he will be made a hero of that movie. Shekhar is not aware of the theft and without his knowledge the movie is made. When Shekhar learns that the script is stolan and the movie is made he decides to go legal way to stop the movie. But Tolani pleads to him telling all his money is stuck in the movie and he will be bankrupt if the movie does not make it to the theaters. Being a good nature person Shekhar agrees not to get into legal matters, and the movie is super-hit at box office. Tolani offers him some money for but Skekhar denies to take anything from him. During this time Manasi get fed up at the situation at her home and leaves the house to stay with Shekhar and they get married.
Shekhar is really in a big psychological depression with stolen script, marriage and no job. He decides to quit movie industry because now he is known as Manasi's husband and is not offered a proper job. With this stress he has a argument with Manasi and she leaves his home. How does Shekahr deal with the situation and what kinds of shortcuts he explores needs to be watched in the movie Shortcut.
The movie is not very good but okay one. It is slow movie in the first haff, and get bit interesting the later part. Arshad Warasi has got lot of face time but he has not justified his role. His acting and has not shown any spark in this movie. The songs are most of the time out of place. Being Producer of the movie Anil Kapur has performed a dance sequence along with Sanjay Dutt in the movie, just to add length to the movie. Akshay Khanna has acted well, that is the only plus point of the movie. In short a family movie but need not watched if you have a better option.
Do comment on the review and the movie if you have seen it.
Cast
- अक्षय खन्ना Akshay Khanna
- अर्षद वारसी Arshad Warasi
- अम्रिता राव Amrita Rao
- चंकी पांडे Chunkey Pande
- सिद्धार्थ रंदेरिया Siddarth Randeria