मंगळवार, ऑगस्ट ०९, २०११

रिंगा रिंगा (Ringa Ringa)

 सिद्धार्थ देसाई हा रंगराव उर्फ श्रीरंग नाईक यांच्या आतल्या गोटातील एक मनुष्य असतो. सुरवातीला तो त्यांचा बॉडी गार्ड म्हणून काम करत असतो, पण एकदा रंगरावचा जीव वाचवल्यामुळे तो रंगरावच्या आतील गोटातील एक मेम्बर होतो. श्रीरंग नाईक हा एका कोळ्याचा मुलगा असतो, खूप गरीब घरात जन्माला येतो. मोठा झाल्यावर समुद्रमार्गाने स्मगलिंग करायला सुरवात करतो. आणि आता राजकारणात येऊन मुख्यमंत्री पदाकडे वाटचाल सुरु असते. रंगरावच्या पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब मराठे असतात. यांना रंगरावाबद्दल बऱ्याच गोष्टी माहिती असतात. पण त्याचे काळे धंदे माहिती नसतात.

सिद्धार्थ, बरोबरच रंगरावच्या आतल्या गोटात, एक असतो जानी ज्याचे काम म्हणजे रंगरावच्या वाटेत येणाऱ्या सगळ्या काट्यांचा खून करणे, प्रत्येक खूप करताना हा बालवाडीत शिकलेल्या इंग्लिश कविता म्हणत असतो. याला बॅन्जो भयंकर प्रिय असतो. आणि तो बॅन्जो चांगला वाजवू पण शकतो. दुसरी व्यक्ती म्हणजे विश्वास दाभोळकर, हा एकदम चॉकलेटी हिरो असतो. जिथे धमक्या व जोर जबरदस्तीने चालत नाही तिथे हा चॉकलेटी हिरो गोड बोलून गोष्टी काढून घेण्यात पटाईत असतो.


सिद्धार्थ देसाईचे लग्न झालेले असते, मानसीशी. मानसीच्या वडिलांना एक मानसिक रोग झालेला असतो, त्यामुळे ते हॉस्पिटलमध्येच असतात. मानसीच्या आईचे अपघातात निधन होते, त्यानंतर तिच्या वडिलांना तिची आई दिसत असते, आणि ते तिच्याशी प्रत्यक्ष बोलल्यासारखे बोलत असतात. अपघातानंतर सुरवातीचे २ वर्ष वडिलांच्या तब्येतीत काहीच सुधारणा होत नाही. पण ६ महिन्यापूर्वी पासून मानसी देखील आई दिसल्याचे नाटक करून त्यांच्याशी गप्पा करते आणि वडिलांच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागते. मानसीला माहिती नसते कि हे नाटक अजून किती दिवस करावे लागणार.

सिद्धार्थचे लग्नापूर्वी एका सोनाली नावाच्या मुलीबरोबर लफडे असते आणि सिद्धार्थ, माणासीला चिडवण्यासाठी, सोनालीचा फोन आलाय असा नाटक करत असतो आणि या नाटकात बरेचदा विश्वास सामील असतो.

जरी रंगरावचे स्मगलिंगचे धंदे सिद्धार्थला माहिती असतात, तरीही रंगराव त्याचा हिरोच असतो. पण एकदा त्याला कळते कि स्मगलिंग मध्ये रंगराव ने RDX आणले आहे तेव्हा मात्र सिद्धार्थला रंगराव देशद्रोही आहे असे वाटू लागते आणि अश्या देशद्रोह्याला मात्र गोव्याचे मुख्यमंत्रीपद मिळायला नको असे सिद्धार्थला मनापासून वाटते. RDX स्मगलिंगच्या केसेस इंस्पेक्टर कामत कडे जातात, कामत अंथोनीला पकडतो, ज्याच्याकडे सगळे पुरावे असतात. कामत हा खरतर इमानदार असतो. तो यांच्या धमक्यांना घाबरत नाही, पण विश्वास मध्यस्थी करून कामतला रंगरावबरोबर बोलायला तयार करतो. कामत सगळे पुरावे ५ करोड रुपयांच्या बदल्यात देण्याचे काबुल करतो. हेच सांगण्यासाठी सिद्धार्थ, अण्णासाहेब मराठे यांच्याकडे येतो. अण्णासाहेब म्हणतात, कि तू त्या सगळ्या फाईल्स माझ्याकडे आणि फक्त माझ्याकडेच आणून दे. अश्या माणसाला मुख्यमंत्री पद द्यायला नको.

जेव्हा कामत आणि रंगरावचा सौदा होणार असतो, तेव्हा सिद्धार्थ देखील तिथेच असतो. आणि संधी साधून तो सगळ्या फाईल्स घेऊन पळतो. मानसीला फोन करून सांगतो कि भेटायला ये जशी असेल तशी. रस्त्यात मानसीला जानी भेटतो, त्याला कसेबसे सोडवून ती सिद्धार्थला भेटायला जाते, रंगराव, जानी आणि विश्वास तिथेही मानसीवर पाळत ठेवून असतात. सिद्धार्थला मानसी भेटते, ते काही क्षण एकत्र असतात, पण तितक्यात जानी आणि रंगराव देखील तिथे पोचतात. झटापटीत सिद्धार्थ जानीवर गोळी झाडतो, आणि जानी सिद्धार्थवर. यामध्ये मृत्यू होतो, पण नक्की कोणाचा हे आता सांगितले तर मज्जा येणार नाही त्यामुळे ते गुपित ठेवून गोष्ट पुढे सरकते.

हे बघून मानसीला जबरदस्त धक्का बसतो आणि तिला तिच्या वडिलांसारखेच व्हायला लागते. तिला सिद्धार्थ सगळीकडे दिसतो, तसेच जानी पण सगळीकडे दिसतो. सिद्धार्थ- सोनिया च्या बरोबर सगळीकडे घरभर फिरतो असे दिसायला लागते. जॉनी सगळीकडे बेंजो वाजतात, नर्सरी राहीम्स म्हणतो आहे असा भास व्हायला लागतो. इकडे रंगरावची मुख्यमंत्री पदाकडे घोडदौड सुरु होते. मानसीच्या आजारावर काही उपाय सापडतात का? रंगरावचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्नं पूर्ण होते का? नक्की कोणाचा खून झालेला असतो, सिद्धार्थ / जॉनीचा ? ज्या कारणासाठी खून झाला असतो ती फाईल शेवटी रंगरावला सापडते का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे बघायला "रिंगा रिंगा" बघायला हवा.

सिनेमा अफलातून आहे. रहस्यमय आहे हे सांगायलाच नको. सुरवातीला सिनेमा खूपच वेग घेतो सिद्धार्थ पडद्यावरून नाहीसा झाल्यावर मात्र जरा मंदावतो आणि आपण पण चक्रावून जातो. नक्की काय होतंय हे अगदी पटकन समजत नाही. नक्की कोणाचा मृत्यू झालाय हे ओळखण्यात बरीच बुद्धी नष्ट होते, आणि त्यात सिनेमा जरा संथावलेला असल्याने, मेंदू नक्कीच विचार करण्याचा प्रयत्न करतो. हा सिनेमा चेकमेट च्या दिग्दर्शकाने केलेला आहे, त्यामुळे रहस्य सुरवातीला कळू न देता प्रेक्षकांना खिळवण्याचे काम निश्चित साधले आहे. अजिंक्य देव चा रंगराव, संतोष जुवेकारचा जॉनी, अंकुश चौधरीचा विश्वास, भारत जाधवचा सिद्धार्थ आणि सोनाली कुलकर्णीची मानसी सगळे सगळे उत्तम आहे. थोड्यावेळासाठी येणारी सोनाली म्हणजे अदिती गोवारीकर खरं तर एकही संवाद म्हणत नाही. पण तिचा आभास संपूर्ण सिनेमाभर असतो. सिनेमा सगळ्यांनी बघावा असा आहे, कुठेही अश्लील किंवा बिभित्स प्रसंग नाही.

तुम्ही हा सिनेमा बघितला असल्यास, किंवा माझ्या लिखाणावर तुमचे काही मत असल्यास जरूर द्या.

Sidharth Desai is working for Rangarao aka Shrirang Naik. He is actually his right hand man, after he saved his life in an attack on him when he was still his bodyguard. Rangarao was a son of a fisherman, get into smuggling though sea in Goa. Slowly he becomes rich and becomes a politician. Now he is eying the post of Chief minister. Annasaheb Marathe is the party chief. He is aware about Rangarao but not the levels he can get down to become a Chief Minister.

Two other men really close to Rangarao are Johney and Vishwas Dabholkar. Johney is a sharp shooter, using a long range rifle and killing people who are problematic for Rangarao. He has a passion for music, mainly Bango. He likes to play it most of the time and he plays it well too. When is is killing people using his rifle, he keeps humming and singing nursery rhymes. On the other hand Vishawas is chocolate hero. He is very talkative, and has a knack to get things done just by talking sweet.

Manasi is Sidharth's wife. Her father is getting treated for a psychological condition in a nursing home. After Manasi's mother's death in a accident, her father sees her always around and keep talking with her. They try a lot for his recovery, but there were no hopes, so finally Manasi starts to pretend as if her mother is there ans she can see her too. This helps in improving her father's health and she continues to do this for a while.

Sidharth had an affair with Sonali, long before he met Manasi. Once in a while Sidharth pretends in front of Manasi that Sonali has called up and Vishwas is helping him in these pranks.

Though Sidharth knows about Rangarao's smuggling business, he is alright with that, and he helps him in most of his business. But at one point he learns that Rangarao is smuggling in RDX. This really disturbs Sidharth, he can not take this any more now. He is worried of a traitor like this becomes Chief Minister of Goa, that will be a big problem. There is a inspector Kamat who is handling this RDX case, who has a guy called Anthony in his possession. Anthony is the guy who knows everything about the smuggling case. Inspector Kamat is a clean d honest person, and is fearless too. So he does not care about the threats posed by Rangarao. Finally Vishwas comes into play and makes sure that Kamat strikes a deal with Rangarao. Kamat agrees to sell all the evidences to Rangarao fot 5 crore. Sidhharth meets Annasaheb Marathe to tell this situation and request him to make sure Rangarao does not become the Chief Minister. Annasaheb tells him to hand oer the evidences to him and him only, so that he can make sure that Rangarao does not become Chief Minister.

At the time of the real deal execution between Inspector Kamat and Rangarao, Sidharth steals the file and runs away. On the way he calls Manasi to start as she is and come to a particular place to see him. Unfortunately Johny meets Manasi on the way and offers to take her where ever she needs to go. Somehow she manages to escape from Johny but Rangarao, Johney and Vishwas are trying to track Manasi and Sidharth. At one point in this running around, Manasi and Sidharth meet briefly, but Johny and Rangarao reach there in moments. In the scuffle, both Sidharth and Johny pull out guns and fire at each other. It is not disclosed at this point who dies.

But the whole incidence leaves Manasi a mental shock. She starts seeing Sidharth and Sonali together everywhere. She also sees Johny singing his nursery rhymes. She always sees Sidharth and Sonali moving around the home, and she is disturbed. Rangarao is improving his position for grabbing the Chief Minister-ship. Who is able to treat Manasi ? Does Rangarao become CM, Where does the file go ? Can Annasahb Marathe get the file and what intentions he has for using the file. You must watch the thriller Ringa Ringa.

This is a nice movie. The mystery is really good. The story moves fairly fast in the beginning but slows down after the incidence that took lace which changes the course of the movie. The story gets a bit too complicated at times. And even we loose track of what is real and what is imagination of Manasi. This Movie is done by the same director of movie Checkmate He has handled this one also with lot of strength. Rangarao by Ajinkya Dev, Johny by Santosh Juwekar, Vishwas by Ankush Chaudhari, Sidharth by Bharat Jadhav and Manasi by Sonali kulkarni are all really good. Sonali played by Aditi Gowarikar does not have a single line but her illusions are all over the movie. This movie is for all age groups and is fairly child safe.

Do write your comments on the movie or about the review.

Cast

  • Sonali Kulkarni सोनाली कुलकर्णी
  • Ajinkya Dev अजिंक्य देव
  • Bharat Jadhav भारत जाधव
  • Santhosh Juvekar संतोष जुवेकर
  • Ankush Choudhari अंकुश चौधरी
  • Sanjay Mone संजय मोने
  • Uday Sabnis उदय सबनीस
  • Kamlesh Sawant कमलेश सावंत
  • Jayant Savarkar जयंत सावरकर


Direction

  • Sanjay Jadhav संजय जाधव



Link to watch online


मंगळवार, ऑगस्ट ०२, २०११

मी सिंधुताई सपकाळ (Mee Sindhutai Sapkal)


"चिंधी" ही अभिराम साठे या अतिसामान्य शेतकऱ्याची मुलगी. हिला शाळेत जाण्याचा व नवीन गोष्टी शिकण्याचा खूप उत्साह. पण आईचे मत असे कि मुलीला शाळेत घालून, शिकवून काय उपयोग. लग्नाचे वय झाले कि लग्न करावे झाले. शिवाय घरकाम यायला पाहिजे त्यामुळे आई सतत घरात काही न काही काम सांगायची. शिवाय म्हशी चरायला नेणे हि पण "चिंधी" चीच जबाबदारी. बिचारी, म्हशींना चरायला सोडून अर्ध्या सुट्टीनंतर का होईना पण शाळेत दाखल होत असे. मन लावून अभ्यास करीत असे. उशिरा येऊन देखील मुलगी ४ थी पास होते. ४ थी पास झाल्यावर हिच्या आईला खूप घाई होते, कि आता हिचे लग्न करायचे. वडील मनाने आणि विचाराने पुरोगामी असतात, पण बायकोपुढे त्यांचे काही चालत नाही. त्यामुळे ह्या १० वर्षाच्या मुलीचे एका टोणग्याबरोबर लग्न लावून देण्यात येते. सासरी २ दीर, सासू, सासरे व दिरांची मुले अशी बरीच मंडळी असतात. आता शिकणे वगेरे तर दूरच राहते, पण घरात सासूच्या हाताखाली राब राब राबावे लागते. त्यात सासू सारखी नवऱ्याचे काही न काही कान भरतच असते.



या सगळ्या त्रासात देखील चिंधी तिच्या वाचनाचे वेड सोडत नाही. घरात कुठलाही पेपरचा कागद घरी आला कि त्यावर लिहिलेले सगळे वाचून काढायचे असा उपक्रम सुरु करते. बरेच वेळा ती वाचत असताना, सासू बोलते, तेव्हा कागद लपवून ठेवून नंतर वाचायचा असे करून तिचे वाचनाचे वेड पूर्ण करते.

लग्न झाल्यानंतर माहेर तर सुटल्यासारखेच असते. वडील मधून-मधून चिंधीला भेटायला येतात. काही वर्ष्यांनी हिला ३ मुले होतात. यांच्या गावात जंगलात जाऊन शेण गोळा करायचे आणि ते गावातील कंत्राटदाराला द्यायचे. तो कंत्राटदार ते शेण जाऊन विकतो, पण गावातील लोकांना त्याच्या बद्दल काहीच मोबदला मिळत नाही. चिंधीच्या हे कधीच लक्षात येते, पण गावात कोणाचीच हिम्मत नसते याबद्दल बोलण्याची. त्याच दरम्यान चिंधीला चवथ्यांदा दिवस गेलेले असतात. चिंधी या कंत्राटदारा बद्दल मोठ्या वन अधिकाऱ्याकडे तक्रार करते. यामुळे चिंधी बद्दल सगळ्या गावात खूप आदर वाढतो. घरी पण अचानक सासू, आणि जावा तिची एकदम काळजी करायला सुरवात करतात.



पण हे प्रेम काही खूप काळ टिकून राहत नाही. गावातील कंत्राटदार चिंधीच्या नवऱ्याचे कान भरतो कि तुझ्या बायकोच्या पोटातील मुल तुझे नसून माझे आहे. हिचा नवरा इतक्या हलक्या कानाचा असतो कि त्याला ते सगळे खरेच वाटते. आणि नवव्या महिन्यातील गर्भारशीला घराच्या बाहेर काढण्यात येते. कधीहि बाळतीन होणार अश्या स्थितीत असलेली, चिंधी कोठे जाणार? हि बिचारी घरातील गोठ्याचा सहारा घेते. आणि तिथेच तिचे बाळंतपण होते. कोणीच नाही जवळ, स्वताच बाळाची नाळ तोडते. ओळी बाळंतीण घर, गोठा सोडून माहेरी जायला निघते. हातात पैसे नाही, खायला अन्न नाही, हातात तान्हे बाळ, जाऊन जाऊन कुठे जाणार. चिंधी कसे बसे माहेरी पोचते. वडील काही वर्षापूर्वीच गेले असतात, फक्त आईच असते. आई तिला बघून म्हणते कि तू इथून निघून जा, तोंड काळे केल्यावर इथे का आलीस. इतक्या छोटा मुलीला घेऊन कुठे जाऊ असे विचारल्यावर आईचे उत्तर असते कि कुठेही जा, कुठेच नाही जमले तर विहिरीत उडी मार. अशी प्रतिक्रिया आल्यावर चिंधी अगदी हिरमुसली होते. आणि आत्म्यहत्या करायला म्हणून रेल्वेच्या रुळावर जाते. तिथे गेल्यावर तिचे नक्की होते, चिंधीची सिंधू कशी होते हे बघा "मी सिंधुताई सपकाळ" मध्ये.



खरंतर इथे या सिनेमाचे कथानक लिहिणे कठीण आहे कारण एकतर सिंधुताईने जे काही भोगले ते शब्दात लिहिणे कठीण आहे आणि बहूतेक सगळ्यांनीच सिंधुताईच्या तोंडून त्याची गोष्ट ऐकली आहे. पण तरीही कथानक लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. सिनेमा खूपच छान आहे. सिंधुताई जेव्हा सांगतात त्याच्या जीवनातील प्रसंग, तेव्हाच डोळ्यातून पाणी येते. पण जेव्हा सगळे चित्र पडद्यावर बघितल्यावर तर रडायला येतेच येते. मुख्य म्हणजे मला चिंधीच्या आईची मानसिक व्यवस्था अजूनहि नीटशी समजलेली नाहीये. जेव्हा एकदम १-२ दिवसाचे बाळ घेऊन मुलगी घरी येते, तेव्हा कुठली आई आपल्या मुलीला घरातून हाकलून देऊ शकेल.



सिंधुताई जसे तिच्या नवऱ्याला त्यांच्या आयुष्याला वळण दिल्याचे श्रेय देते, तसेच त्यांच्या आईने हाकलून दिल्यामुळे पण, चिंधीच्या मनात जगण्याची इच्छा निर्माण झाली असावी. सिनेमा फ्लॅशबॅक मध्ये आहे. पण वर्तमान आणि भूतकाळ याचा संगम खूप छान केला आहे. तरुण वयाची चिंधी आणि वयस्कर सिंधुताई, दोघीही खूप छान. सिनेमा सगळ्यांनी बघावा असाच आहे. वाचकांना सिंधुताईच्या तोंडून त्यांच्या कामाची, आणि त्यांच्या आयुष्याची माहिती मिळावी म्हणून इथे त्यांच्या भाषणाची क्लीप इथे देते आहे.

मला आवडलेले या सिनेमातील / सिंधुताईचे लक्षात ठेवण्यासारखे वाक्य. "देवा आम्हाला हसायला शिकव परंतु आम्ही कधी रडलो होतो याचा विसर पडू देऊ नकोस."

तुमच्या प्रतिक्रिया जरूर लिहा.



This is a story of Chindhi, daughter of Abhiram Sathe, a poor farmer from Wardha district of Maharashtra. She is fond of studies and attending the school. But hardly gets a chance to attend it since she has to take care of her buffaloes. Her mother feels that girls should be married off as soon as possible and there is no need of education for them. And for that they need to be good in household chores, so she makes sure Chindhi always has her plate full for chores and does not get a chance to even look towards school. But due to her dedication towards studies, she manages to sneak into the school somehow for few hours. Doing all this she manages to pass fourth grade.



At this stage her mother decides to marry her off. Though her father is not in favor of this he is not able to convince his wife and her mother manages to find a guy much elder to her and marries her. This was at mere age of ten. Her new home has her mother in law, two brother in laws and their families. So there is no way she can continue her studies, but is put to lot of work. Ans still at the end of the day her mother in law will not talk good of her.

Managing all this, Chindhi still continues to read whatever she could lay her hands on. Mostly she could get only the packing newspapers that come with grocery and she will read it all. Her mother in law will cause her trouble even for this ans then she will hide the papers some place and read at leisure when she is able to get a bit of freedom sometime.



The years pass like this, she grows up in age and has three sons. In those days after marriage she hardly gets to meet her parents, only rarely sometime her father will manage to come and see her briefly. She was staying in the buffer area of a wildlife sanctuary, so they can not keep too many cattle. Even the cow dung collected from the forest will have to be deposited with the local contractor and he used to sell it off without paying to the local villagers. Chindhi is angree with this. No one else in the village has guts to talk against the contractor, and finally Chindhi speaks out to the forest officer and the contractor has to take care of the matter. This brings Chindhi respect form all the villagers and even in her own home. Her Mother in law and co systers start taking care of her since she is pregnant for the fourth time.



But this good times are short lived for Chindhi. The contractor manages to cheat Chindhi's husband and convinces him that the baby Chindhi is carrying is not her husbands but of the contractor. Her husband is really a big fool and he is immediately convinced with this. By this time Chindhi is almost 8 monthd pregnant but her husband mercilessly kicks her out of the house. Now she does not have nayone to help but manages to survive and gives birth of her child herself in the cow shade. The only place she could think of was her own home. She knew that her father is no more, but hopes her mother will help her in this tough time. She does not have any cash, no food to eat but manages to reach her mothers home. She is totally disappointed by her mothers attitude. She just tells her to go away after all the bad name she has earned and all the deeds she has done. And on asking where Chindi can go in such a situation, her mother says go anywhere you want and if you can think of nothing else go jump in a well. Chindhi is totally devastated by this attitude and goes on a Railway track and is waiting for a train to come. What happens next to her and her baby ? How Chindhi becomes Sindhu ? You must watch in "Mi Sindhutai Sapkal" .


It is very difficult to explain what Sindhutai has gone though in her life. It is really difficult to express it words, one much watch it and hear it from her. Of cource Sindhutai's story is well known now and most of you must have heard it from her. The movie is really well made, and when she tells her own story, it is touching. Her mother attitude is really crazy, to make her own daughter with less than a week old baby, to drive away when she has come for help.


Sindhutai credits her husband for putting her into this situation and helping her indirectly to become what she is today. may be she should credit her mother too, she was the one who helped her take the challenge of life by driving her away without entertaining her in the house at all. All the three actress who have played Chindhi are really good, and so are most of the actors i the movie. This is also a must watch for all age groups. We have added some clips of Sindhutai here for more information. Do write your comments.



Cast
  • Tejswini Pandit तेजस्विनी पंडित
  • Upendra Limaye उपेंद्र लिमये
  • Jyoti Chandekar ज्योती चांदेकर
  • Neena Kulkarni नीना कुलकर्णी
  • Pranjal shete प्रांजळ शेते
  • Suhas palashikar सुहास पळशीकर
  • Charusheela Wacchaani चारुशीला वाच्चानी
  • Jayavant wadkar जयवंत वाडकर
  • Vaibhav Mangale वैभव मांगले
  • Ganesh Yaadav गणेश यादव
  • Kashyap PArulekar कश्यप परुळेकर
  • Amey Hunasvadkar अमेय हुनासवाडकर
  • Parag Aajgaokar पराग आजगावकर
  • Urmila Nimbalkar उर्मिला निंबाळकर
Direction
  • Anant Narayan Mahadevan अनंत नारायण महादेवन

Link to watch online




Movie DVD