मंगळवार, मे २४, २०११

सत्य (Satya)


सिद्धांत दिवाकर देशपांडे हा एक खूप हुशार, सद्गुणी मुलगा उटीला हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करीत असतो. याची संजना नावाची मैत्रीण असते. हा खूप हुशार आणि मनमिळावू असल्याने, तो सगळ्याच मित्रांमध्ये लोकप्रिय असतो. एकदा हे सगळे मित्र उटीला ट्रीपला जातात. त्यानंतर पुढील आयुष्यात काय करायचे अशी चर्चा सुरु होते त्यात सिद्धांत म्हणतो कि त्याला त्याच्या वडिलांच्या कंपनीत काम करण्यात खूप जास्त रस आहे. याचे वडील दिवाकर देशपांडे हे मेघना फूड प्रॉडक्ट या कंपनी मध्ये एम डी असतात. वडिलांची अशी इच्छा असते कि सिद्धांतचे शिक्षण झाले कि त्याला कंपनीचे एम डी करायचे आणि स्वत आर अॅंड डी मध्ये काम करायचे. पण सिद्धांतच्या नशिबात काही वेगळेच लिहिलेले असते. उटी हून कोइम्बतुर ला येताना त्यांच्या जीपला अपघात होतो आणि सिद्धांतला बराच मोठा अपघात होतो.

सिद्धांतची आई मरण पावली असते, आणि त्याच्या वडिलांचे लग्न मेघना कर्णिकशी झालेले असते. मेघना कर्णिकचे वडील आबासाहेब कर्णिक हे मेघना फूड प्रॉडक्टचे मालक असतात. सिद्धांतची आई मरण पावल्यावर आबासाहेब त्यांच्या मुलीचे म्हणजे मेघनाचे लग्न दिवाकर बरोबर लावून देतात. सिद्धांतला सावत्र आई येते. आता सिद्धांतला एक भाऊ पण असतो, याचे नाव यश. तर मेघना म्हणजे सिद्धांतची सावत्र आई, सिद्धांतवर प्रेम तर अजिबात करत नसते, पण सारखी यश आणि सिद्धांत मध्ये तुलना करत असते. आबासाहेबांना हे आवडत नसते, पण मुलगीच त्यांची, त्यामुळे ते फार काही बोलू शकत नाही. दिवाकर देखील मेघना कडे दुर्लक्ष करत असतो.

तर अशी परिस्थिती असलेला सिद्धांत अपघाताच्या विळख्यात सापडतो. वडील खूप धावपळ करतात. पण तरीही व्हायचे ते होऊन जाते. त्याच्या मेंदूला मार लागलेला असतो. डाव्या भागाला मार लागतो त्यामुळे, त्याच्या शरीराची उजवी बाजू पण नीट राहत नाही. अत्यंत हुशार असलेला मुलगा पांगळा होतो. त्याला बोलता येत नाही. नीट चालता येत नाही. दिवाकरला एकट्याला सोडून मेघना पुण्याला जाते, फॅक्टरीचे काम आबा बघायचे असे ठरवतात. बऱ्याच दिवसाने सिद्धांत अंथरुणातून उठतो, त्याला घरी घेऊन जायचे असे ठरते. तो घरी येतो, पण त्याचे घरी अजिबात चांगले स्वागत होत नाही.

मेघना त्याला खूप वाईट वागणूक देते, घरी नर्स आणल्या जाते, पण सिद्धांतचे नर्सशी पटत नाही. घरातील शांतता नष्ट होते, शेवटी दिवाकर, सिद्धांतला एका आश्रमात ठेवतो. त्या आश्रमात म्हणजे कामयानी विद्या मंदिर येथे त्याची रवानगी होते. इथे सिद्धांतचे मन रमत नाही. त्याला सारखे वाटते कि कधीतरी त्याला त्याचे वडील घरी घेऊन जातील. पण ते काही होत नाही, मग थोड्या दिवसात त्याला तेथील लोक चांगले वाटू लागतात. पण त्यांच्या आश्रमावर एक संकट येते. आश्रमाच्या संचालकांनी हे घर भाड्याने घेतलेले असते, आता त्या घराचा मालक ते घर रिकामे करायला सांगतो, नाहीतर ७० हजार रुपये द्या असे सांगतो. आता या अपंग मुलांकडून ७०००० रुपये कसे उभे करणार या विवंचनेत संचालक महाजन चिंतेत पडतात. शेवटी सिद्धांतचे पुढे काय होते, आश्रमावरील संकट दूर होते का ? हे बघा "सत्य" या सिनेमात.

सिनेमा अत्यंत टुकार आहे. काहीतरी करून गोष्टीची सांगड घालण्याचा प्रयान्त केला आहे. सगळ्या कलाकारांचा चुथडा केला आहे असे वाटले. या सिनेमात नक्की काय दाखवायचे होते हे समजत नाही. सिनेमात सुरवातीला एक हिंदी गाणं का घातला आहे हे पण कोड मला नक्कीच पडले. सिद्धांतचा बोलण्याचा प्रयत्न करणे, अगदी बालिश पानाचे वाटले. सिद्धांतचा सगळ्या जगावर राग काढण्याची जी पद्धत दाखवली आहे, ती पण अजिबात पटली नाही. त्यात ना काही अभिनय होता, ना काही ताकद.

एकूण हा सिनेमा बघू नये असा आहे.


Siddhant Diwakar Deshpande, is a bright and lovable boy studying Hotel Management in Coimbatore. Sanjana is his friend. He is very popular among his friends as he is bright and very helping and caring. Once while on picnic to Ooty, all are discussing about the future and their careers. Siddhant expresses his interest in joining his father's company and make career. His father is MD of a company called Meghana Food Products. He wishes that Siddhant joins his company as MD soon and he himself can work with the research and development for the company. But Siddhant's destiny has a different story. While returning from Ooty, they meet with an accident and Siddhant is the one who suffers the most.

Years back Siddhant had lost his mother and now his father has married Meghana, daughter of Aabasaheb Karnik and owner of Meghana Food Products. Siddhant had a step brother called Yash. Meghana is not as good to Siddhant as to Yash. She always likes to compare them. Abasaheb does not like this at all, but Meghana being his daughter, he just keeps mum. Same is the situation of Diwakar.

On hearing the news of the accident all rush to Coimbatore, and Diwakar tries all he could to save Siddhant. His life was saved, but has some brain injury. He develops kind of paralysis and is a handicapped person. He is not able to speak and walk. Meghana just leaves him and goes back to Pune and Aabasaheb decides to run the factory till things improve. Finally after few days Siddhant improves to level that he could go home. But on his return back home, he faces several problems.

Meghana is not treating him well at all. A nurse is brought home to take care of him, but he is not able to cope up with her, and has frequent problems. The whole house is troubled. Finally Diwakar decides to shift Siddhant in a nursing home (Aashram). He is sent to Kamayani Vidya Mandir. Siddhant is not really happy and eagerly waiting for his dad to come and take him home. Slowly he gets used to the place and starts getting friends with people there. But his life is still not free of troubles. The Kamayani mandir has rented the place, the the landlord now needs money, so he tell them to either pay him 70 thousand rupees, or vacate the place and go. Mahajan, the director of Kamayani is not sure how to handle this problem. How are they able to manage it? What role does Siddhant plays in it ? Does his father take him home ? Watch this in "Satya".

In general the storyline is not up to the mark of a good movie. All along it seems like a stretched story. So many talented artists are there but are not at all justified. It remains a mystry why there is a Hindi song sequence in the movie in the beginning. Siddhant's attempts to talk again after the accident look funny and childish. His anger expressions are not good too.

I would not recommend one to watch this, but if you have seen it, do write your comments on this.

Cast
  • Pushkar Jog पुष्कर जोग
  • Ravindra Mankani रवींद्र मंकणी
  • Resham Tipnis रेषम टिपणीस
  • Mohan Joshi मोहन जोशी
  • Smita Gondkar स्मिता गोंदकर
  • Shrikant Moghe श्रीकांत मोघे
  • Deepak Rege दीपक रेगे
  • Aruna Bhat अरुणा भट
  • Anant Kulkarni अनंत कुलकर्णी
  • Shailesh Pitambare शैलेश पितांबरे
  • Sneh Lakshmeshwar स्नेह लक्ष्मेश्वर
  • Sai Nimbalkar सई निंबाळकर
  • Nilesh Gadre निलेश गद्रे
  • Supriya Badekar सुप्रिया बडेकर
  • Saagar Barate सागर बराटे
  • Ramesh choudhari रमेश चौधरी
  • Athashri Thube अथश्री ठुबे
  • Sachin Kambale सचिन कांबळे

Direction
  • Pushkar Jog पुष्कर जोग

Link to watch online

1 टिप्पणी:

  1. सिनेमा अत्यंत टुकार आहे..... बरं झालं वाचलो. तरि म्हटलं, कथ आशि का लिहिलि आहे, त्याला तुम्ही तरी काय करणार :-)

    उत्तर द्याहटवा