अमन कॉलेज मध्ये जाणारा एक तरुण मुलगा असतो. एकदा मित्राकडे पार्टीला गेला असताना तिथे त्याला काया नावाची मुलगी भेटते. पहिल्या नजरभेटीतच दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. आई वडिलांना न सांगताच अमन कायासाठी एक अंगठी आणतो आणि तिच्या हातात घालतो. घरी गेल्यावर आई वडिलांना आपल्या निर्णयाबद्दल सांगायचे असे ठरवून ते निघतात, रस्त्यात त्याला एक भूत दिसते आणि त्या भुताच्या अंगावरून गाडी जाते व ती उलटते. त्यात काया बेशुद्ध पडते. अमनला कुठे खरचटत देखील नाही. कायाच्या घरी तिच्या अपघाताची बातमी कळते व ते तातडीने दवाखान्यात येतात. तिथे तिच्या हातात अंगठी बघून वडील चपापतात. आता आपली मुलगी मोठी झाली आहे आणि त्यांनी दडवून ठेवलेले गुपित तिला सांगायलाच पाहिजे याची जाणीव होते.
तर हे गुपित म्हणजे, कायाच्या घराण्याला मिळालेला शाप. कायाचे वडील हे एका राजघराण्याचे वंशज असतात. ३५० वर्षापूर्वी त्यांचे पूर्वज एक राजघराणे असते. तर या राजाचा भाऊ हा एक स्त्रीलंपट म्हणून प्रसिद्ध असतो. तर हा भाऊ एकदा एका मुलीला नदीवर बघतो आणि मग त्याचे त्या मुलीवर नजर पडते. आता या मुलीवर अत्याचार करायचा असे म्हणून तो तिला राजवाड्यात घेऊन येतो. ती मुलगी खूप गयावया करते पण काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे शेवटचा उपाय म्हणून हि गच्चीवरून उडी मारते आणि तिचा अंत होतो. हे ऐकून राजा खूप घाबरतो कारण त्याला महिती असते कि हि मुलगी त्यांचे आचार्य सच्चिदानंदची आहे. सच्चिदानंद खूप रागावतात आणि रागाच्या भरात राजाला शाप देतात कि तुझ्या पुढील पिढीतील कुठलीही मुलीचे लग्न होणार नाही. कारण माझ्या मुलीचे २ दिवसाने लग्न होते आणि तिला ते सुख मिळाले नाही त्यामुळे तुमच्या पुढील पिढीतील कुठल्याही मुलीला हे सुख मिळणार नाही. हा शाप ऐकून राजा खूप दुखी होतो पण या शापातून मुक्तता मिळणे कठीण असते.
तर असा हा शाप कायाचे कुटुंब भोगत असते. आजवर यांच्या कुटुंबातील कुठल्याही स्त्रीचे लग्न झालेले नसते. कायाला हि बातमी कळल्यावर तिला काहीच सुचेनासे होते. अमनचे आईवडील कायाच्या आईवडिलांशी बोलायला येतात पण ते सांगतात कि आम्हाला तिच्या सुखापेक्षा तिचे आयुष्य जास्त महत्वाचे आहे त्यामुळे आम्ही तुमची मागणी स्वीकारू शकत नाही. अमनचे काया वर निरातिशय प्रेम असल्याने तो मात्र हे सहन करू शकत नाही. त्यामुळे तो ठरवतो नक्की काय शाप आहे तो शोधून काढायचा, हे भूत कुठले आहे, त्याच्या नायनाट कसा करता येईल हे शोधायचे.
यासाठी त्याचा मित्र त्याला मदत करतो. तो त्याला प्रोफेसर पशुपतीकडे घेऊन जातो आणि सांगतो कि हा प्रोफेसर परानोर्मालचा म्हणजे भूत-खेताचा अभ्यास करतो. प्रोफेसर म्हणतो कि तुझ्या मागे लागलेले भूत काही साधे सुधे नाहीये. त्यामुळे तू आपला घरी जा त्या मुलीचा नाद सोडून दे. पण अमन काही ऐकत नाही. तो एक खूप मोठा पराक्रम करून पुन्हा प्रोफेसरला भेटायला येतो आणि शेवटी प्रोफेसर या दोघांबरोबर भुताचा शोध घ्यायला तयार होतो. शेवटी भूत त्यांना भेटते का? सच्चिदानंदाचा शाप कुणाच्या रुपात या कुटुंबाला त्रास देत असतो हे बघा "शापित" मध्ये.
सिनेमा बऱ्यापैकी कंटाळवाणा आहे. काही अनिमेशन चांगली आहेत. पण सिनेमात काही खूप दम आहे असे वाटत नाही. एकूण गोष्ट काहीतरी करून भूतापाशी आणून ठेवली आहे असे वाटते. शिवाय जेव्हा पुरातन काळातील गोष्ट सांगत असतात तेव्हा एक गाणे आहे. त्या गाण्याचे संगीत अगदी आजच्या काळातील आहे. अगदी त्या गाण्यातील कलाकारांचे वेश देखील आजच्या काळातील आहे. म्हणजे ३५० वर्षपूर्वी असलेले वेश आणि आता असलेले वेश याचा अजिबात ताळमेळ घातलेला नाहीये. हा सिनेमा बघावा असे मी अजिबात म्हणणार नाही. सिनेमा बघताना भीती देखील फार वाटत नाही. कलाकारांचे अभिनय पण यथातथाच आहेत.
माझ्या लिखाणावर किंवा तुम्ही हा सिनेमा बघितला असल्यास इथे अभिप्राय जरूर द्या.
Aaman is a college student for a well to do family. Once in a party he meets Kaaya and they are both in love at first sight. Aaman buys a ring for Kaaya and she accepts it with pleasure. They decide to tell it to their parents on returning home. On the way back while driving the car they see a ghost right in the middle of the road. As the car touches the ghost, it turns turtle and Kaaya is unconscious in the accident. Her parents rush to hospital and see Kaaya. Her father is shocked to see a ring in her hand. He realizes that his daughter has grown up and it is finally time to tell her the secret.
There is a curse that is on Kaaya's family. Her family is actually a royal family. For more than 300 years back this curse is causing problems in the family. This started with king who was very courageous and strong. He was also very gentle and responsible king. But his brother was a womanizer and infamous for his deeds. One day he sees a girl on the river and falls for her. He manages to bring her in the palace with bad intentions. The girl pleads to leave her alone, tries to scare him, fight with him and finally commits suicide by jumping out of the palace window in the courtyard. The king finds this out and when he realizes that this girl is daughter of Sacchidananda, he gets really scared. Sacchdainand is a very renowned yogi and learned man, with powers. On learning about the death of his daughter, he comes to the palace fuming with anger. The king tries very hard to convince him, but in anger he curses the the kings family that for generations together in his family no girl can survive if married. The reason being his daughter who died, was supposed to get married in a couple of days. The king is devastated with this, but there is no other go for him.
So this was the kind of curse Kaaya's family is suffering and no girl in her generations together could marry and live after that. Aaman's parents visit Kaaya's parents to convince them for this wedding, but they flatly refuse telling them that they are more concerned about her living than her married life, and politely refuse the proposal. But Aaman is in deep love with Kaaya and is not able to think anything without her. He decides to investigate more about this curse and if there is some way out of this. Basically he wants to save Kaaya family from all this things.
Aaman's real close friend agrees to help him in his mission which has become like life mission for Aaman. He is ready to die for it, rather than living without Kaaya. They quickly find out that there is a Prof. Pashupati, who has done lot of research in paranormal life and ghosts etc. On meeting Dr. Pashupati, he totally discourages Aaman and send him home saying this is very dangerous task and he should totally forget about it both the ghost and Kaaya. Aaman is not convinced at all and decides to prove himself to Professor so that he will help him in his mission. He performs a daredevil act with known ghosts and is able to convince Pashupati that he is serious and capable. That is where the mission starts and we need to watch the movie to understand where all this search leads them in the movie Shaapit.
The movie is fairly boring, with an exception of few of the animations. The story is not really very intriguing, and seems like it is stretched towards a ghost. There are some bloopers like a song sequence in the historical time, has a very contemporary dance, costumes and music. In short the movie is not really worth watching unless you are hardcore fan of ghost stories. All the artists are new and not as good.
Do write your comments about the review and about the movie if you have seen it.
Cast
- Aditya Narayan आदित्य नारायण
- Shweta Agrawal श्वेता अग्रवाल
- Shubh joshi शुभ जोशी
- Natasha Sinha नताशा सिन्हा
- Murali Sharma मुरली शर्मा
- Nishigandha Wad निशिगंधा वाड
- Neha Bam नेहा बाम
- Sunny hinduja सनी हिंदुजा
- Rahul Dev राहुल देव
- Vikram Bhat विक्रम भट
Movie DVD