बुधवार, ऑक्टोबर २७, २०१०

न्यूयॉर्क (New York)



या सिनेमाची स्टोरी आधारित आहे ९/११ नंतर झालेल्या अमेरिकेतील मुसलमानांच्या आयुष्यातील बदलाची. सिनेमाची सुरवात ओमार अजीजला एफ बी. आय. चा एजंट रोशन त्याच्या गाडीमध्ये बंदुका सापडल्याच्या आरोपातून पकडून नेतो आणि त्याला त्याच्या मित्राची (सँम) जासुसी करायला भाग पाडतो. ओमार आधी तयार होत नाही पण नंतर, माझा मित्र टेररिस्ट असूच शकत नाही, हे सिद्ध करण्यासाठी मी हे काम करीन असे म्हणून ओमार तयार होतो.



ओमार हा दिल्लीतून स्कॉलरशिप मिळवून न्यूयॉर्क स्टेट युनिवर्सिटी मध्ये MS करायला येतो. तिथे त्याची माया आणि समीर शेख यांच्याशी खूप घट्ट मैत्री होते. ओमारचे मायावर एकतर्फी प्रेम असते. माया मात्र सुरवातीपासूनच समीर उर्फ सॅमवर प्रेम करत असते. ओमारला मात्र याची काहीच कल्पना नसते. सॅम आणि माया ह्या दोघांचे पूर्वज जरी भारतीय असले तर ते आता अमेरिकनच असतात. ओमार आता या दोघांच्या नजरेतून अमेरिका बघायला शिकतो आणि त्याला इकडे मनोमन आवडायला लागते.



असेच एका दिवशी हे तिघे जण पार्टीतून बाहेर पडताना, मायाची पर्स चोरीला जाते, सॅम त्या चोराला पकडण्याच्या भानगडीत जखमी होतो, आणि या दोघांचे एकमेकांवर असलेले प्रेम ओमार समोर उघड होते. याचा ओमारला खूप धक्का बसतो. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे ओमार कॉलेजला जातो, पण त्यांच्या नशिबात वेगळेच काहीतरी वाढून ठेवलेले असते, त्याच दिवशी ट्वीन टॉवर वर टेररिस्ट हल्ला होऊन त्या बिल्डींग कोसळतात. अमेरिकत असलेल्या मुसलमानांवर संशयाने बघायला सुरवात होते. अश्या भूतकाळानंतर, ओमार, सँम व माया यांच्या वाटा वेगळ्या होतात आणि त्यांचा एकमेकांशी संबंध राहत नाही. ओमार हा टॅक्सी मालक होतो. आणि टॅक्सीच्या व्यवसायात असतानाच ओमारला FBI पकडून नेते.



FBI चा एजंट रोशन, ह्याच्याकडे सॅमला पकडण्याचा व्यवस्थित प्लॅन असतो. त्या प्लॅननुसार ओमारला सॅमच्या घरात राहायचे, आणि त्याच्यावर बारीक लक्ष ठेवून FBI ला माहिती पुरवायची, कि सॅम काय टेररिस्ट काम करत आहे. ओमार सॅमकडे शिफ्ट होतो. आता इतक्या वर्ष्यानी भेटल्यानंतर सगळ्यांचे आयुष्य बदलले असते, सॅम व मायाला एक दान्या नावाचा मुलगा असतो. ओमरला त्याच्या घरात काहीही संशय घेण्यालायक दिसत नाही. जेव्हा हे रोशनला समजते, तेव्हा रोशन वेगळा प्लॅन करतो, आणि त्या प्लॅन मध्ये यश येते. ओमारला कळते कि सम आता टेररिस्ट झाला आहे. आणि त्याचा एक मोठी बिल्डींग उडवण्याचा प्लान आहे. या प्लॅन मध्ये सॅम यशस्वी होतो का, FBI सॅमचे काय करते, असे काय होते सॅमच्या आयुष्यात की ज्यामुळे सॅम टेररिस्ट होतो, हे बघा "न्यूयॉर्क" मध्ये.



सिनेमा "चांगला" या विभागात निश्चितच मोडता येईल. फोटोग्राफी छान आहे. सगळ्यांनी काम छान केले आहे. सिनेमाचा शेवट मात्र दुखद आहे, पण तो तसा अपेक्षितच आहे. सिनेमातील गाणी चांगली आहेत. सगळ्या कुटुंबांनी एकत्र बघायला हरकत नाही असा आहे. काही सीन लहानमुलांना त्रासदायक ठरू शकतात, पण चालू शकतील. जसे भारतात, महात्मा गांधीच्या हत्येनंतर ब्राह्मणांवर झाले, नंतर इंदिरा गांधीच्या हत्येनंतर, शिखांवर झाले तसेच ९/११ अमेरिकेत मुसलमानांवर कसे अत्याचार झाले हे सिनेमाच्या शेवटी, काही वाक्यांत सांगण्यात येते. पण अमेरिकेसारख्या प्रगत देशात पण मानवी प्रवृत्ती तीच आहे हे बघून आश्चर्य वाटते.

तुमच्या प्रतिक्रिया जरूर लिहा.


This a story showing how lives of Muslims changed after 9/11 in the United States of America. The movie open with Omar Aziz being arrested by FBI agent Roshan, on the pretext of carrying guns in his car. Then to release Omar without court case, Roshan prepares him to spy on Sam, his college time friend. Omar initially resents, saying his friend can never be a terrorist. Finally he agrees to do spying just to prove that his friend is indeed not a terrorist.

Omar is originally from Delhi, and he joins New York State University for his Masters Degree. He meets Maya and Samir Sheikh aka Sam, and three of them become really good friends. Omar has a one way crush on Maya, but Maya and Sam are in love already, which Omar is not aware of. Both Sam and Maya are of Indian origin but born and brought up in US. With the friendship, Omar learns the American way of life from his friends, and starts enjoying the life there.



One day while returning from a party, Maya's handbag is snatched by a thief, and in the event of catching the thief and recovering the bag, Sam is injured a bit. That was the time, Omar discovers the deep love relationship between Sam and Maya. Omar is shocked by this, but he is trying to recover from this. Next day Omar goes to the University as usual, but the destiny takes a turn. Twin Towers in New York were attacked on that day, and whole course of life changes for them. The incidence changes the way Muslims in US are treated for some time. There is a fear of suspicion around most of them. He looses contact with Sam and Maya. He settles down in New York and gets into Taxi business. After a while he is arrested on charges of carrying guns in his vehicle.



FBI agent Roshan has a plan to fix Sam. He wants Omar to get into Sam's house and stay with him. This will give Omar a great opportunity to spy Sam on regular basis. He should keep FBI updated on kind of activities Sam is doing and weather he is involved in terrorism. Omar manages to go and stay with Sam and Maya. They have a son named Danny. He could not find anything suspicious happening at his place. Roshan changes plan and puts Omar to work with Sam. After that Omar discovers, that Sam is indeed involved in some terrorism activities and is working on a plan to blow away a big building. Whether Sam is able to complete his plan, if Omar conveys this so FBI, if FBI is able to get hold of Sam needs to be watched in the movie "New York"



This movie is good, and a family movie. Scores well on both acting and photography. Some of the stunts with John Abraham and Neil Nitin Mukesh are good. A bit sad but positively ending movie. Can be watched by kids with exceptions of few scenes. Songs are good and catchy. It was disturbing to see how some innocent people are tortured by government agencies in the process of trying to control terrorism, even in developed nations like US.

Please do write your comments.




Cast

Director
  • Kabeer Khan कबीर खान 


Link to watch online

    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

    टिप्पणी पोस्ट करा