मंगळवार, मार्च ०२, २०१०

शामची आई (Shamchi Aai)


"श्यामची आई" म्हणजे साने गुरुजींनी (पांडुरंग सदाशिव साने) त्यांच्या आईवर लिहिलेले पुस्तक. त्या पुस्तकावर आधारित हा सिनेमा आहे. साने गुरुजींची बहुतांशी पुस्तके दुखाची छटा असणारीच आहेत. त्यामुळे या पुस्तकात देखील दुख ओतप्रोत भरले आहे. फक्त हे पुस्तक खऱ्या गोष्टीवर आधारित आहे.


श्यामला एक लहान भाऊ असतो. दोघे एका शाळेत जात असतात. श्याम खूप हुशार आणि थोडा व्रात्य असतो. श्यामचे वडील बरेच कर्जबाजारी झालेले असतात. शेतीसाठी त्यांनी खूप कर्ज काढलेले असते. श्याम च्या आई वडिलांचे लग्न जेव्हा होते, तेव्हा ते खूपच सधन असतात. हळूहळू पैसे कमी होत जातात आणि ते कर्जबाजारी होतात. दोन्ही मुलांचे शिक्षण त्यांना पूर्ण करायचे असते. श्यामची आई या अश्या गरिबीमध्ये देखील दोन्ही मुलांना आयुष्यातील नीतीमूल्य शिकवते. ते देखील तिचे प्रेम आणि कळवळा दाखवून. गरिबी असली तरी आपापसात प्रेम असले तर एकमेकांतील संबंध टिकून राहतात. हे आई-मुलगा, भाऊ-भाऊ, वडील-मुलगा यांच्यातील संवादातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

शाम हुशार असतो, त्यामुळे वडील त्याला मोठ्या गावी पाठवतात. तेथील शाळेतील शामचे मित्र, त्यांचे काही गमती जमती बघण्यासारख्या आहेत. छोटासा शाम खूपच लोभस आहे.

सिनेमा अगदी बघण्यासारखा आहेच. त्याचबरोबर तुमच्या मुलांना देखील दाखवावा असा आहे. तुमची मुले जर मराठी वाचत असतील तर आधी पुस्तक वाचायला द्या आणि मग हा सिनेमा दाखवा. जुन्या काळातील रिती, त्यावेळेची सामाजिक परिस्थिती देखील या सिनेमातून समजू शकेल. शिवाय पूर्वी अभिनय कसा वेगळा होता याचा देखील प्रत्यय येईल. सिनेमा रडका आहे, पण त्याचबरोबर खूप शिकवून देखील जातो. सिनेमाचा शेवट देखील अगदीच दुखद आहे.


आता साने गुरुजींच्या वाट्याला जे काही आले ते त्यांनी शब्दरूपात त्यांच्या पुस्तकात मांडले आहेच. पण तरीही सिनेमा बघण्यासारखा आहे. सिनेमातील गाणी देखील छान आहेत. त्यातील छडी लागे छम छम गाणे मस्त. आणि थोड्याच दिवसापूर्वी मुग्धा वैशंपायनने म्हटल्याने अधिक लक्षात राहिले.

जुना असला तरी क्लासिक म्हणतात न तसा सिनेमा आहे.


Shamachi Aai is one of the Marathi Classic books written by Sane Guruji (Pandurang Sadashiv Sane), a well known freedom fighter. This book describes how Sham as a child was molded my his mother into a fine being.

Sham's family consisted of his Parents, Grand Mother and Younger Brother. Initially the family is well to do, but due to unpredictable weather the farm does not yield much harvests and the family starts developing debt. But both the parents have high values and they wanted their children to study and do well in life. Sham is bright and naughty boy in the school. Small incidences in his life are shown with great details and how he develops wisdom and love for human beings. It also shows how human values are important in building family ties and helps ultimately in developing personality.

This is a old black and white movie but the actors are too good. I am sure it is one of the classics if Marathi Cinema. One of the songs "Chadi Lage Cham Cham" was recently made popular again by Sa-Re-Ga-Ma-Pa Little Champs Mugdha Vaishampayan. In short a must watch for all ages, specially kids.


Cast
  • Madhav Vaze माधव वझे
  • Shankar Kulkarni शंकर कुलकर्णी
  • Vanmala वनमाला
  • Umesh उमेश
  • Baburao Pendharkar बाबुराव पेंढारकर
  • Sumati Gupte सुमती गुप्ते

Director
  • Acharya P. K. Atre आचार्य प्र. के. अत्रे

Story
  • Pandurang Sadashiv Saane पांडुरंग सदाशिव साने (साने गुरुजी)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा