Wednesday, January 11, 2012

गुड बॉय (Good Boy)

ओवेन हा एक १२-१३ वर्षाचा मुलगा त्याच्या आई वडिलांबरोबर राहत असतो. याच्या आई वडिलांना घर घेऊन त्यात थोडे दिवस राहून मग ते घर जास्त किमतीला विकण्याचा खूप उत्साह असतो. त्यामुळे ओवेन बऱ्याच वेगवेगळ्या घरात राहिलेला असतो. मुख्य म्हणजे त्याला सारखं घर बदलण्याचा कंटाळा आलेला असतो. सारखे घर बदलणे, नवीन शेजार, त्यातून ओवेनचा एकलकोंडा स्वभाव, त्यामुळे याला मित्र तसे कमीच असतात. कमीच असतात असे म्हणण्यापेक्षा याला कोणीच मित्र नसतात. परंतु याला कुत्रांबद्दल खूप प्रेम असते. आणि याची अशी इच्छा असते कि घरी एक कुत्रे पाळावे.

अर्थात आई-वडिलांना खूप मान्य नसते. त्यामुळे ते ओवेनला सांगतात कि तू शेजारील लोकांच्या कुत्रांना रोज सातत्याने फिरवले तर आम्ही तुला कुत्रा घेऊन देऊ. ओवेनला कुत्रांचे इतके वेड असते की तो ही अट मान्य करतो. त्याप्रमाणे तो ४ कुत्रांना रोज फिरायला घेऊन जातो. प्रत्येक कुत्रा हा वेगळ्या जातीचा असतो. ओवेनला सगळ्या कुत्रांबरोबर खेळायला त्यांना रोज फिरायला न्यायला खूप आवडते. हा रोज सकाळी त्यांना घेऊन जाणार आणि तेव्हाच त्याच्या शेजारील काही टारगट मुलं याल चिडवणार असा नित्य नियमच असतो. ओवेन तरीही त्यांच्या कडे दुर्लक्ष करून त्याचे काम इमाने इतबारे करत असतो. या मुलांमध्येच एक मुलगी असते "केनी". तिला या टारगट मुलांचे वागणे मान्य नसते पण तिचा त्याबाबत काहीच इलाज नसतो.

तर अश्या या ओवेनला त्याच्या मेहनितीमुळे आई-वडिलांकडून कुत्रा पाळण्याची परवानगी मिळते. पेट स्टोर मध्ये एक कुत्रा पसंत पडतो. तो कुत्रा घरी आणल्या जातो त्याचे नाव हबल असे ठेवतो. तर हा हबल खूप हुशार असतो. आता कुत्र्याला ट्रेनिंग द्यायचे म्हणून ओवेन त्याला पटांगणावर घेऊन जातो. पहिल्या सांगण्यातच हबल सगळे करतो, हे बघून ओवेन खूप आश्चर्यचकित होतो. एक दिवस रात्री, हबल घरातून बाहेर पडतो, तेव्हा नेमकी ओवेनला जाग येते. तो पण हबलच्या मागे जातो तर त्याला दिसते कि हबल एका स्पेसशिपच्या जवळ जातो आहे आणि तिथून त्याला काही संदेश येत आहेत. ओवेन, हबलला हाका मारतो, हबल अचानक ओवेनचा आवाज ऐकून दचकतो आणि त्याच्या मशीनमधील काही किरणे ओवेनच्या अंगावर पडतात. त्यानंतर ओवेनला कुत्रांची भाषा कळायला लागते.

हबल मग ओवेनशी अगदी नीट गप्पा करू लागतो. हबल इथे का आला आहे, त्याचा उद्देश काय हे सगळे हबलला सांगतो. तर हबल हा एक परग्रहावरून आलेला एक कुत्रा असतो. त्याच्या माहितीनुसार पृथ्वीवर आलेली सगळीच कुत्री परग्रहावरून आले आहेत. परग्रहावरील प्रमुखांनी सगळ्या कुत्रांना इथे पाठवले, जेणे करून सगळी कुत्री इथे राज्य करतील. आता सगळी कुत्री नक्की काय करत आहेत याचा सविस्तर रिपोर्ट देण्यासाठी हबल इथे आलेला आहे. हे सगळे ऐकून सुरवातीला ओवेनला गम्मत वाटते. पण मग इतर कुत्र्यांचे बोलणे ऐकून ओवेनला ते पटते.

इथे आल्यावर सगळ्या कुत्रांची जी स्थिती आहे ती बघून हबल हबकून जातो. तो बघतो कि इथे कुत्र्याला पाळीव प्राणी म्हणून पाळले जाते. सगळी कुत्री माणसांचे बोलणे ऐकतात. हबल ओवेनला सांगतो की आता हा रिपोर्ट गेला, कि सिरिअस या ग्रहावरून पृथ्वीवरील कुत्र्यांना बोलावणे येईल. आणि जगातील सगळी कुत्री नष्ट होतील. ते जर का टाळायचे असेल तर जेव्हा सिरिअस वरील प्रमुख इथे भेट देईल तेव्हा, सगळ्या कुत्रांनी वेगळ्या पद्धतीने वागायला हवे. ओवेनला मिळालेला हा एकुलता एक मित्र, त्याला सोडून जाईल या भीतीने तो म्हणतो कि आपण सगळ्या कुत्रांना शिकवू या. मग हबल सगळ्या कुत्रांना वेगवेगळ्या पद्धती शिकवतो, ज्या त्यांच्या मुळ ग्रहावर सगळी कुत्री करत असतात. शेवटी हबल त्याच्या मिशनमध्ये यशस्वी होतो का? हबल पुन्हा सिरिअस वर परत जातो का ? हे बघा "गुड बॉय" मध्ये.

सिनेमा मस्त आहे. लहान मुलांना तर अगदीच नक्की आवडेल. बरीच कल्पनाशक्ती लावून हि गोष्ट लिहिली आहे असे वाटते. सगळ्या कुत्रांचा अभिनय बघून चाट व्हायला होते. या कुत्रांना त्यांच्या ट्रेनरने कसे शिकवले असेल याचे आश्चर्य तर निश्चित वाटते. ओवेन हा त्याच्या पात्रासाठी एकदम योग्य वाटला. सिनेमा लहान मुलांना नक्कीच दाखवावा.

तुम्ही हा सिनेमा बघितला असल्यास किंवा माझ्या लिखाणावर काही प्रतिक्रिया असल्यास जरून लिहा

Owen is a boy in his early teens staying with his parents. His parents always buy a house, stay in that for few days and sell it for a better price. This has led Owen stay in several different houses. Bit now he is getting fade up of this regular shifting of houses. Owen is a lonely child and hardly has any friends. But he likes to make friends with dogs and he really wants to have one as a pet.


His parents are not too much in favor of his plan to get a dog. So to indirectly avoid this they make a deal with Owen. If he regularly helps some of the dog owners in the neighborhood, to walk their dogs, they will let him have one. Owen loves dogs so much that he happily agrees to this and starts walking four different dogs. All the four dogs are of different breeds and Owen starts to enjoy his new task of walking the dogs and playing with them. When every morning Owen takes the dogs for the walk few naughty kids used to tease him.Owen is very sincere in his work and always ignores the kids teasing him. One of the kids there was Keny, she id not happy with the kids teasing Owen, but she is also helpless.

Looking at Owen's hard work his parents decide to get him a dog. They go to the pet store and Owen liks a dog. His parents get that dog for him. He names the dog Hubble. This new dog Hubble turns out to be a very cleaver dog. When Owen takes him to the ground and start to train him, he is really surprised. Hubble is very quick learner and learns almost all the things Owen wants him to do.


One night while in his bed, Owen senses Hubble is going out of the house. So out of curiosity Owen follows him. Hubble goes out and walks up to a space sheep. Hubble is communicating with the spaceship and Owen calls him. Hubble is startled due to this, and in the process Owen is exposed to some rays coming out of the spaceship. Owen starts to understand the language the dogs use from that moment.

Hubble is very good friend of Owen now and they can communicate like good friends. Over the time Hubble explains Owen why he is on earth. Hubble is from a planner called Serious, and in fact all the dogs are form the same planet. The dogs are supposed to rule the earth and that is why they are all sent. Not the chiefs want to know the progress the dogs have made and that is the reason Hubble is sent. Owen finds this hilarious to start with but after carefully listening to many dogs, he is convinced this is the truth.

Hubble is scared to see the situation the dogs are in here. He is surprised to see the dogs kept as pets by humans. More surprised to see that all the dogs are obeying the humans. Now once this reports reaches the planet Serious, all the dogs would be called back. There will not be any dogs on earth. If this is to be avoided, when the chiefs visit earth to check out, dogs should be able to convince that they are in command. Owen is sad with the thought that he might loose his only friend Hubble.

So Hubble and Owen decide to work together train and teach all the dogs. Hubble teaches all of them the way the dogs are behaving on the planet Serious. We need to watch the Movie to see how much they are successful and if Hubble gets to live with Owen or not.

The movie is really good and a must watch for kids. The story is really well written and all the dogs have really played the roles very well. While watching the movie, we are amazed by the great job done by the trainers. Owen is played very well by the boy too.

Cast
Direction
  • John Hoffman

No comments:

Post a Comment