मंगळवार, एप्रिल ०५, २०११

वॉटर (Water)



१९३८ साली भारतात बाल विवाह आणि सतीची प्रथा होती. तर हा सिनेमा त्याकाळातील त्यांच्या आयुष्यावर आधारित आहे तर चुयीया हि एक ९ वर्षाची मुलगी. जिचे एका ३० वर्षाच्या माणसाशी लग्न झालेले असते. चुयीयाला हे आठवत देखील नसते कि तिचे लग्न झाले आहे. तर तिचा नवरा काहीश्या आजाराने मारतो. आता विधवा स्त्री कडे दोनच पर्याय असतात. एकतर सती जाणे किंवा विधवा म्हणून आयुष्यभर जगणे. ते जगणे पण घरी नाही तर विधवा आश्रम मध्ये जाऊन राहणे. आई - वडील गरीब असतात. ते चुयीयाला विधवा आश्रमामध्ये आणून सोडतात. चुयीयाला काहीही समजत नाही. तिच्या कायम वाटत असते कि आपली आई, आपल्याला इथून कधीतरी घेऊन जाईल.

या विधवा आश्रमाची प्रमुख एक मधुमती नावाची गलेलठ्ठ विधवा असते. ती त्यामानाने दुष्टच असते. ही मधुमती हा आश्रम चालवत असते. पण आश्रमातील सगळी काम शकुंतला म्हणून दुसरी एक विधवाच करत असते. शकुंतला मनाने खूप चांगली असते. मुख्य म्हणजे हिला लिहिता-वाचता येत असते. हिला विधवा प्रथेबद्दल काहीच प्रेम नसते. पण पूर्वी काही दुसरे करणे शक्यच नसल्याने हि बिचारी तिथेच आपले भोग भोगत असते. एक खूपच जख्ख म्हातारी "बुवा" सारखी लाडू मागत असते. ह्या म्हातारीला हिचे लग्न आणि त्यात तिने खाल्लेले खूप मिठाईचे पदार्थ हे आठवत असते. कल्याणी नावाची एक तरुण आणि सुंदर विधवा इथेच राहत असते. हिचेच केस फक्त कापलेले नसतात. हिला जरा चांगली वागणूक मिळत असते. कारण मधुमती आणि गुलाबी नावाचा एक हिजडा हिला पैसे कमवायला जमीनदारांच्या कडे पाठवत असतात. त्यामुळे हीच या आश्रमाची एकमेव पैसा कमावणारी विधवा असते. एकूण सगळ्याच विधवा त्यांच्या नशिबी आलेले भोग निमुटपणे भोगत असतात.

तर अश्या आश्रमात चुयीया आल्याने जरा हालचाल जास्त होते. कारण हि अगदीच लहान असते. चुयीयाची बुवा, कल्याणी आणि शकुंतला बरोबर चांगली मैत्री होती. शकुंतला चुयीयावर मनापासून प्रेम करते तसेच कल्याणी देखील. शकुंतलाचे चुयीयावर आईसारखे प्रेम असते तर कल्याणीचे मोठ्या बहिणीसारखे. कल्याणीकडे एक छोटेसे कालू नावाचे कुत्र्याचे पिल्लू असते. चुयीया या पिल्लाबरोबर खेळत असते. एकदा त्याला गंगेवर अंघोळ घालत असताना ते पिल्लू पळत खूप दूर जातं आणि चुयीया त्याच्या मागे धावते. पिल्लाला एक नारायण नावाचा तरुण मुलगा पकडतो आणि मग नारायणची चुयीया बरोबर ओळख होते आणि चांगली मैत्री पण होते.

नारायण, कल्याणीला बघून तिच्या प्रेमात पडतो. नारायण हा एक वकील असतो आणि गांधीजींचा शिष्य. त्याला मनातून विधवा पद्धती मान्य नसते. कल्याणीच्या प्रेमात पडल्यावर हा ठरवतो कि कल्याणीशी लग्न करायचे. कल्याणी चुयीयाला सांगते कि ती नारायणबरोबर लग्न करणार आहे. ही बातमी चुयीया रागाच्या भरात मधुमतीला सांगते आणि मग विधवा आश्रमात एकच हल्लकल्लोळ माजतो. आता या सगळ्या प्रथे विरुध्ध जाऊन नारायण कल्याणीशी लग्न करू शकतो का ? छोट्याश्या चुयीयाचे पुढे काय होते हे बघा "वॉटर" या सिनेमामध्ये.

जेव्हा चुयीया विधवा होते आणि तिचे वडील सांगतात कि तुझा नवरा मेला आणि तू विधवा झालीस तेव्हा चुयिया विचारते "कब तक बाबा" हा निरागस प्रश्नाने हृदयात कालवाकालव निश्चित होते. तसेच विधवा आश्रमात आल्यावर मधुमतीला दिलेले उत्तरे देखील खूप विचार करायला लावतात. तसेच एकदा गंगेच्या काठावर, चुयीया विचारते की बायकांचे जसे विधवा आश्रम असतात तसे पुरुषांचे कुठे असतात. अश्या काही काही संवादातून त्या काळाच्या बाल विधवांना पडणारे प्रश्न खूप छान समोर आणले आहेत.

सिनेमा खूपच छान आहे. या सिनेमाच्या विरुद्ध खूप निदर्शने झाली होती त्यामुळे दीपा मेहताला हा सिनेमा भारतात काढता आला नाही, शेवटी तिने परदेशी लोकांबरोबर हा सिनेमा काढला. हि खरंतर शरमेची बाब आहे. या सिनेमाचे सगळे चित्रण श्रीलंकेमध्ये झाले आहे. सिनेमात कुठेच काहीही वावगे दाखवले नाहीये. पूर्वी विधवा आश्रम होते तिथे असे काही प्रकार घडत असणार. त्यात तिने समाज कसा बदलतो आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. विधवा आश्रमात राहून देखील शाकुंतलाच्या विचारांची प्रगल्भता तिने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.


सिनेमा सगळ्यांनी बघावा असा आहेच अगदी, १० वर्षापुढील मुलांना दाखवायला हरकत नाही. तुम्ही हा सिनेमा बघितला असल्यास किंवा तुमच्या माझ्या लिखाणावर काही प्रतिक्रिया असतील तर त्या जरूर लिहा.
 
This is a story set up in late 1938 when Child Marriages and Sati were common customs in India. This is s story of Chuiya, a nine years old girl, married to a thirty year old man. She hardly knows what a marriage means and her husband dies of some illness. Now there are only two options for Chuiya, either die as Sati or live as a widow the whole life. According to prevalent  custom of the times, she will not stay in her or her husbands home, but in a community widow home. Chuiya's poor parents leave her at one such home in Calcutta. At this young age, Chuyiya does not understand the situations, and keeps thinking that her parents would come some day and take her home.

This home is controlled by Madhumati, an old and cruel widow. Though she is in control of the home, Shakuntala is actually doing all the work there. Shankutala is a very good by nature, and literate lady, but since she became widow, she had to stay in this home. There are several characters in this home with specialties. There is one old lady called Bua, who always remembers the sweets she had as part of her marriage party. Kalyani another beautiful and young widow, who is the only one with long hair is getting good treatment. The reason being Kalyani is the only earning member of that widow house. Madhumati with the help of a eunuch called Gulabi, are sending Kalyani to landlords in return of money. All the widows are basically living the tough life that is sentenced to them by the society of the times.

Now with entry of a young member Chuiya, the widow house is disturbed a bit. The atmosphere changes due to young and energetic member. Very soon Chuiya gets friendly with Shankutala, Kalyani and Bua. Shakuntala and Kalyani too start loving her a lot. Shakuntala is like her mother and Kalyani like her elder sister. Kalyani has a small puppy called Kalu, which is additional attraction for Chuiya to play with, in otherwise elderly and serious type widows in the home.

Once Chuiya and Kalyani get a dip in the river Ganga. While playing with Kalu, he starts running erratic, and Chuiya starts following him. Even after a long chase Chuiya was not able to catch him. Finally a young man called Narayan catches Kalu and hands back to Chuiya. Chuiya gets introduced to Narayan and quickly becomes friends with him. She also introduces him to Kalyani and he immediately fells for her.

Narayan is a well educated Lawyer and he is also follower of Mahatma Gandhi. He hates the custom of socially boycotting the widows and feels that they should be rehabilitated after the unfortunate incidences. He decided to marry Kalyani and finally Kalyani too starts to like him and agrees to it. She shares this secret to Chuiya too. Once while having a heated agreement with Madhumati, she tells her this news her and the whole widow home explodes with mixed reactions.

Some of the scenes in the movie are very powerful and touching. One of the scenes, when Chuiya's husband dies, her father conveys her that now her husband is dead and she will be widow. She quickly and innocently asked him "Till when she is going to be Widow?" Some of the conversions on Chuiya entry in the widow house are also thought proving. Once Chuiya asks where are the widow homes for the men ? Some really good contemporary questions are raised in the movie.

This movie making faced severe demonstrations and had to be closed several times in India. Finally Deepa Mehta had to shoot this movie abroad, which I felt was shame. I liked the movie with positive note and change shown in it. I did not feel the movie showed something baseless. There could have been similar incidences in the society of the times. Shankutala's maturity of thinking was very nicely depicted in this movie.

This is a really nice movie and specially for the people who enjoy thought provoking movies. This can be shown to the kids above ten year of age. If you have seen the movie, do write your views on this and if you have not seen it, your comments on the review.


Cast
  • Lisa Ray लिसा रे
  • John Abraham जॉन अब्राहम
  • Seema Biswas सीमा बिश्वास
  • Sarala सरला 
  • Manorama मनोरमा
  • Rishma Malik रीश्मा मलिक
  • Meera Biswas मीरा बिश्वास
  • Vidula Javalgikar विदुला जवळगीकर
  •  Buddhi Wickrama बुद्धी विक्रमा
  • Rinsly Weerarathne रीन्सले वीराराथाने
  • Iranganie Serasinghe इरांगणी सेरासिंघे
  • Hermantha Gamage हेर्मान्था गंगे
  • Ronica Sajnani रोनिका सज्ननी
  • Kulbhusham Kharbanda  कुलभूषण खरबंदा
Direction
  • Deepa Mehata दीपा मेहता


Movie DVD

२ टिप्पण्या: