सोमवार, जानेवारी १८, २०१०

काल रात्री १२ वाजता (Kaal ratri 12 wajata)



गौतम हा एका शहरात प्रोफेसर म्हणून काम करत असतो. त्याला २ मुले असतात. अचानक त्याच्या बायकोची तब्येत बिघडते म्हणून त्याला गावी जावे लागते. पण काहीच वाहन न मिळाल्याने तो शेवटी सायकल विकत घेऊन त्याने गावी जाऊ लागतो. अचानक जंगलातून जाताना खूप जोरात पाउस पडू लागतो व त्याला सायकल चालवणे अशक्य होते. म्हणून तो समोर दिसणाऱ्या एका मोठ्या हवेलीमध्ये आसरा घेतो.


तिथे त्याला एक इनामदार, त्याची बायको लक्ष्मी, आणि घरी ठेवलेली एक नाचीण "बिजली" भेटते. आणि या सगळ्याच्या एक एक नवीन स्टोरी आपल्या समोर दिसते. तिथेच एक मोती नावाचा शास्त्रज्ञ भेटतो. त्याला पिशाच्च योनीतील लोकांना कायम स्वरूपी देह कसे देता येतील यावर शोध घ्यायचा असतो. हे सगळे बघून गौतम जरा चक्रावून जातो. बिजलीला गौतम म्हणजे "मोहन" वाटत असतो. ती त्याला सारखे म्हणते असते कि तू मला मिठीत घे मी तुझी किती दिवसापासून वाट बघते आहे. शेवटी या सगळ्यांचा एकमेकांशी काय संबंध असतो, व गौतम शेवटी या चक्रातून बाहेर पडू शकतो का हे बघा "काल रात्री १२ वाजता".



अर्थात हा सिनेमा खूपच कंटाळवाणा आहे. नावावरून हा सिनेमा रहस्यमय असावा असा वाटत, पण तसा काहीही नाहीये. उलट यातील संवाद आणि इतर एकूण अभिनय बघून हा सिनेमा विनोदी आहे कि काय असं वाटू लागतो. सिनेमा लवकर पुढे सरकतच नाही. सिनेमातील गाणी तर, अगदीच कंटाळवाणी आहेत. त्यातून प्रत्येक गाण्याची लांबी ७-८ मिनिटाची आहे. अत्यंत कंटाळवाणा सिनेमा आहे. याच्या नावावर अजिबात जाऊ नका. आणि तुम्हाला अत्यंत वाईट सिनेमा कसा असावा हे समजून घ्यायचे असेल तर हा सिनेमा जरूर बघा. हे परीक्षण वाचून जर तुम्ही हा सिनेमा बघण्याची हिम्मत केलीच, तर प्रतिक्रिया जरूर लिहा.



Gautam is a professor, he is traveling to his village to see his wife and two children. He misses the evening bus and could not get any conveyance. Finally he hires a bicycle and starts his way. Halfway through his bicycle tire is punctured, and the rain starts poring. Fortunately he sees a mansion near bye, and he runs in for shelter.


On knocking the door few times, an old servant opens the door. This is a mansion of Inamdar a big shot in the village. There are several people inside. Inamdar is always with a double barrel gun in hand. His wife Laxmi, is mentally ill and keeps laughing out loudly every now and then. She is also violent. Bijali is a dancer, who is forcefully captures and kept in the house. There is another wired scientist Moti, who is researching on Ghosts and if they can take human forms. The movie revels stories for the characters through flashbacks.



Till 12 in the night the stories take twists and turns, so the title. The movie is fully loaded with dialogues full of philosophy of life. Though the movies is supposed to be Mystery at times it sounds funny. In general a movie not worth spending the time unless you are into Philosophy.

Do write your comments.

Cast
  • Pramod Shinde प्रमोद शिंदे,
  • Usha Naik उषा नाईक,
  • Ashok Shinde अशोक शिंदे,
  • Alka Kubal अलका कुबल,
  • Nandu Patil नंदू पाटील,
  • Suhas Kulkarni सुहास कुलकर्णी

Director
  • Bhaskar भास्कर





Wikipedia Link
Link to watch online

३ टिप्पण्या: