८४ दिवस रिकामे गेल्यावर सान्तियागो मासे पकडण्याच्या निर्धाराने समुद्रात जातो. आज दूरवर जैन आणि नक्की मासे पकडून आणीन असे मनोलीनला सांगतो. खूप आतपर्यंत गेल्यावर त्याला एक मोठा मासा गळाला लागतो. बरीच झटपट होते, पण सान्तियागो च्या लक्षात येते कि हा मासा खूपच मोठा आहे. तो मासाच त्याची होडी ओढू लागतो. झटापटीमध्ये जखमी झालेला सान्तियागो जिद्द सोडत नाही. जीवाची बाजी लाऊन मासा पकडूनच ठेवतो. शेवटी दुसर्या दिवशी मासा थकून जातो आणि सान्तियागो त्याला मारतो. मनोलीन चातकाच्या नजरेनी सान्तियागोची वाट पाहत असतो. तिसर्या दिवशी त्यालाही काळजी वाटू लागते.
परंतु या सर्व प्रकारात सानातीयागो ची होडी फारच दूर निघून गेलेली असते. परतीच्या प्रवासात माश्याच्या रक्ताच्या वासाने शार्क मासे येतात. थकलेला आणि उपाशी म्हातारा त्यांच्याशी पण झुंजतो. त्याचा भाला एका शार्क माशाच्या बरोबर जातो. सुरा बांबूला बांधून तो दुसरा भाला तयार करतो, आणि दुसरा शार्क चा हल्ला पण परतवून लावतो. पण बराचसा मासा शार्क खातात. अखेरीस सान्तियागो काठावर सुखरूप पोहोचतो.
निसर्ग आणि मानव यांच्यामधला संघर्ष आणि स्वाभिमानी माणसाचा दुर्दम्य लढा या दोनही गोष्टींचे प्रभावी दर्शन या चित्रपटात होते. अरनेस्ट हेमिंगवे या नोबेल पारितोषिक विजेत्या लेखकाच्या कादंबरीवरून हा चित्रपट काढला आहे. या पुस्तकाचा अनुवाद पु ला देशपांडे यांनी "एका कोळीयाने" अशा नावाने प्रसिद्ध केला आहे. ऍन्थानी क्वीन यांनी सान्तियागो फारच अप्रतिम साकार केला आहे.
जरून बघावा असा हा चित्रपट नक्कीच आहे.
The fisherman, who is named Santiago, has gone 84 days without catching any fish at all, His young apprentice, Manolin, has been forbidden by his parents to sail with the old man and been ordered to fish with more successful fishermen. Still dedicated to the old man, however, the boy visits Santiago's shack each night, hauling back his fishing gear, feeding him.
Santiago tells Manolin that on the next day, he will venture far out into the Gulf to fish, confident that his unlucky streak is near its end.
Santiago sets out alone, taking his skiff far into the Gulf. He sets his lines and, by noon of the first day, a big fish takes his bait. Unable to pull in the great marlin, Santiago instead finds the fish pulling his skiff. Two days and two nights pass in this manner, during which the old man bears the tension of the line with his body. Though he is wounded by the struggle and in pain.
Santiago, uses all the strength he has left in him to pull the fish onto its side and stab with a harpoon, thereby ending the long battle between the old man and the tenacious fish.
While Santiago continues his journey back to the shore, sharks are attracted to the trail of blood left by the marlin in the water. The first shark, Santiago kills with his harpoon, losing that weapon in the process. He makes a new harpoon by strapping his knife to the end of an oar to help ward off the next line of sharks. But by night, the sharks have almost devoured fish's entire carcass. Finally reaching the shore before dawn on the next day, he struggles on the way to his shack.
This movie is based on Nobel Lauriat Ernest Heminway's novel. Anthony Quinn is amazing as Santagio and a must watch movie.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा