2007 लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
2007 लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, सप्टेंबर ०७, २०१०

जिंकी रे जिंकी (Jinki re Jinki)


एका खेडेगावात एक शेतमजूर असलेल्या कौसल्याबाई उर्फ कोंडाबाईला मुलगा मुलगी. नवरा साप चावून गेल्याने ही एकटीच दोन्ही मुलांचा सांभाळ करत असते. पण शेतावर काम करून खूप पैसे मिळत नसल्याने, पोट भरण्याची मारामार. त्यामुळे ती मुलांना शाळेत घालू शकल्याने दोन्ही मुलं खूप व्रात्य आणि दंगा करणारी असतात. त्यात मुलगी इंदू आता जरा मोठी झाल्याने तिला शेतावर काम करायला कोंडाबाई घेऊन जात असत. पण मुलगा भाऊराव दिवसभर खूप खोड्या काढत गावात फिरत. रोज संध्याकाळी घरी आली की, हिला भाऊराव बद्दल काहीतरी तक्रार ऐकायला मिळत असे. रोज भाऊरावला मार मिळत असत. गावातील एक सज्जन गृहस्थ, कोंडाबाईला समजावतात की मुलांना शाळेत घायला हवे, त्यांना शिक्षण घ्यायला हवे. कोंडाबाईच्या मते ती फक्त भाऊरावला शाळेत घालेल, कारण रोज दिवसभर त्याच्या तक्रारी येतात, दिवसभर शाळेत त्या राहिल्याने बंद होतील. शेवटी भाऊराव शाळेत दाखल होतो. त्याच्या जन्मदाखला मिळवायला जरा कष्ट पडतात, पण शेवटी हा शाळेत दाखल होतो.

शाळेत दाखल तर होतो, पण शाळेत एक भोबडा मास्तर म्हणून शिक्षक असतात, ते मुलांना खूप मारत असतात. या शिक्षकाची सगळ्यांना भीती वाटत असते. त्यात भाऊरावला हा शिक्षक घरून डाळ आणि तांदूळ घेऊन यायला सांगतो. घरी इतकी वाईट परिस्थिती असते की भाऊराव काही घरी आईला याबद्दल सांगत नाही. याचे शाळेत लक्ष कमी आणि मास्तरांची भीती जास्त अशी स्थिती असते.

बरेच दिवस झाले तरी भाऊराव डाळ आणि तांदूळ आणत नाही, असे बघून एक दिवस भोबडा मास्तर भाऊरावला पट्टीने बेदम मारतो. भाऊरावचे अंग काळेनिळे होते. भाऊरावला याचा खूप त्रास होतो. दुसऱ्या दिवशी भाऊराव वर्गात जाऊन भोबडा मास्तरला जोरात एक दगड मारतो. आणि या प्रकारानंतर भोबडा मास्तर नोकरी सोडून निघून जातो. त्याचबरोबर भाऊरावची शाळा देखील बंद होते. भाऊराव पुन्हा गावात खोड्या काढत फिरू लागतो. या सगळ्या प्रकाराने, कोंडाबाई खूप वैतागते आणि भाऊरावला शेतावर काम करायला घेऊन जाते.

पण त्याच दरम्यान शाळेत एक दुसरा शिक्षक येतो अरुण देशमुख. हा मास्तर भाऊरावला शाळेत यायला सांगतो पण भाऊराव शाळेत जायला तयार नसतो. मग भाऊराव शाळेत जातो का ? त्याला देशमुख मास्तर कश्या प्रकारे शिक्षण देतात, हे बघा "जिंकी रे जिंकी" या सिनेमात.

सिनेमातील बहुतेक सगळे कलाकार नवीन आहेत. सिनेमाची थीम जरी चांगली असली, तरी सिनेमाचे दिग्दर्शन अजिबात नीट झाले नाहीये. बऱ्याच गोष्टींचा एकमेकांशी काहीच संबध नाही असे संवाद आणि सीन आहेत. सिनेमातील कलाकारांची अक्टिंग पण अगदीच सुमार आहे. एकूणच सिनेमा अतिशय कंटाळवाणा आहे. मी ज्या वेबसाईटवरून हा सिनेमा बघितला तिथे, जरी हा सिनेमा "Must Watch " अश्या विभागात टाकला असला तरी माझ्या मते हा सिनेमा "Must Not watch" या विभागात घालायला हवा. या सिनेमाला बरेच अवार्ड मिळालेले आहेत. पण तरी देखील सिनेमा आम्हाला आवडला नाही .

तुमच्या प्रतिक्रिया जरूर लिहा.

या चित्रपटाला मिळालेले अवार्ड
. देवाशिष परांजपेला उत्कृष्ट बाल कलाकार म्हणून झी गौरव मध्ये पुरस्कार
. हैद्राबाद येथे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गोल्डन एलिफंट अवार्ड.
. कलकत्त्याला उत्कृष्ट चित्रपट म्हणून गणल्या गेला.
. कैरो, इजीत्प्तची राजधानी, येथे देखील उत्कृष्ट चित्रपट.
. नाशिक महोत्सवात उत्कृष्ट फोटोग्राफी
. झी गौरव मध्ये उत्कृष्ट कथा, सहाय्यक अभिनेत्री आणि उत्कृष्ट बालकलाकार साठी नामांकन
. उत्कृष्ट शैक्षणिक चित्रपट म्हणून युनेस्कोने शिक्षण प्रशिक्षणासाठी निवड.
. भाऊ गावंडे यांच्या "प्रकाशाच्या उंबरठ्यावर" या कादंबरीवर आधारित.

Kausalyabai alias Kondabai is a farm laborer. She has two children, elder daughter is Indu and younger son is Bhaurao. Her husband has died few years back by snake bite. Kondabai is having hard time managing family of three with her income. Indu is also accompanying Kondabai on the farm to help get some support for the family income. Bhaurao wonders in the village with few more kids, who do not attend school and keeps creating troubles. Many days, in the evening Kondabai has to listen to complains from villagers, and ultimately Bhaurao gets beating from her.
One day a village leader approaches Kondabai requesting her to admit both her children to school. Kondabai finally decides to admit Bhaurao, since Indu is helping her in work. She manages to approximate his birth date and get birth certificate, and admit him in the school.

There is a teacher called Bhobade Master, he is a terror for children. Bhaurao has earlier seen him beating children, so he is already scared of him. Master demands Bhaurao to get Rice and Millet for him, but since Bhaurao is poor, he did not tell this message to his mother at all. Bhaurao is not learning much, due to this terror in him mind and the whimsical behavior of the teacher.


After few days, master asks Bhaurao about the Rice and Millet he told him to bring, and Bahurao tells him that is not possible. Furious master beats him with a ruler till principle of the school had to intervene. Bhaurao suffers this beating and is really upset with this incidence. Next day, again master picks up some reason to attack Bahurao, but this time Bahurao is prepared and he hit Master back with a stone. Master is injured and Bhaurao is rusticated from the school. After a while master quits the school and leaved the village. Bhaurao is back to his naughty company and starts bringing complains every day. Finally Kondabai decides to take him to farm every day.

After a few days, Deshmukh master joins the school. He invites Bhaurao back to school. But Bhaurao is adamant and does not want to go back to school due to the incidences in him recent past. Was Deshmukh master able to convince Bhaurao, or he not is to be watched in the movie.

It has a really nice theme, but the my opinion is the director has failed to deliver. The actors are all not well known yet. The movie is like an experimental movie made by some students of film school. If you have not watched it, you need not but by chance of you have watched it, please do write your opinion in the comments section below. In spite of being awarded for a good film ( as mentioned below), I did not like the movie.


Awards for this movie:
  1. Devashis Paranjpe Best Chile Artist Zee Gaurav Puraskar
  2. Hyderabad International Film Festival - Golden Elephant Award
  3. Kolkata - Best Movie Award
  4. Cairo, Egypt - Best Movie Award
  5. Nashik Festival - Best Photography Award
  6. Zee Gourav Puraskar - Nominations for Storyline, Supporting Actress, Child Artist
  7. Best Educational Movie - UNESCO has chosen for Educational Training
  8. Based on Novel "Prakashachya Umbarthyawar" by Bhau Gavande

Cast
  • Devashish Paranjape देवाशिष परांजपे
  • Tanay Dighe तनय दिघे
  • Varnita Aaglave वर्णिता आगलावे
  • Rajashri Waad राजश्री वाड
  • Sharad mone शरद मोने

Direction

  • Rishi Deshpande ऋषी देशपांडे

Link to watch online

Director's blog






सोमवार, ऑगस्ट ३१, २००९

टिंग्या (Tingya)



"टिंग्या", भारतातील ग्रामीण भागातील एका गरीब शेतक~याच्या मुलाची आणि त्याच्या एका बैलाच्या भावविश्वाची एक हृदयस्पर्शी गोष्ट. कारभारी व त्याची पत्नी अंजना यांना दोन मुले असतात. त्यांचे अगदी छोटेसे शेत असते आणि त्यावरच यांचे पोट असते. शेत नांगरायला २ बैल (चितंग्या व पतंग्या) इतकीच संपत्ती. टिंग्याचे चितंग्या वर निरातिशय प्रेम असते. कारभारी बटाटे शेतात पेरायला विकत घेतो आणि आता पेरणीची वेळ आली असताना, चितंग्या जंगलातून येताना एका वाघाच्या तावडीत सापडतो व त्याचा पाय निकामी होतो. बरेच उपाय करून देखील चितंग्याला नीट उभे राहता येत नाही. त्यामुळे पेरणी करायला चितंग्या उभाच राहू शकत नाही. इकडे बटाट्याला कोंब फुटू लागतात. अतिशय कर्ज झाल्याने शेतकरी आत्महत्या करत आहेत अश्या बातम्या कानावर येत असतात. कारभारीला सावकार तात्याकडून अजिबात कर्ज घेण्याची इच्छा नसते. त्यात सगळीकडून येणारी संकटे बघून कारभारी खूप चक्रावून जातो. शेवटी चितंग्याला विकून दुसरा बैल विकत घेणे हा एकाच पर्याय शिल्लक असतो. जेव्हा टिंग्याला कळते कि चितंग्याला विकणार आहे तेव्हा तो वेडापिसा होतो. चितंग्या हा नुसता बैल नसून त्याचा मित्र, सखा, सर्वस्व असतो. त्याला विकणार हि कल्पनाच टिंग्याला सहन होत नाही. तो सर्वस्वी प्रयत्न करतो कि चितंग्याला विकणार नाहीत. पण शेवटी चितंग्याला विकायला घेऊन जातात. चितंग्या खरच विकला जातो का? पुढे काय होते हे बघा टिंग्या मध्ये.
टिंग्याच्या चितंग्या बरोबरच्या गप्पा खूपच छान आहेत. टिंग्याची शेजारी असलेली मैत्रीण आणि त्यांचे एकमेकांशी असलेले संबंध खूपच भावपूर्ण आहेत. या सिनेमातून शेतकऱ्याची होत असलेली दैना दाखवण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. नुसती दैना न दाखवता त्यात एक टिंग्या व चितंग्याची भावपूर्ण गोष्ट गुम्फाल्यामुळे सिनेमा एकदमच सुंदर झाला आहे. सिनेमा जरूर बघावा असाच आहे. या सिनेमाला बरीच अवार्ड्स मिळाली आहेत. ऑस्कार अवार्ड साठी पण प्रयत्न झाला होता. International film festival of India मध्ये इंडिअन पानोरामा सेक्टीओन मध्ये पण हा सिनेमा दाखवण्यात आला होता.

सिनेमाच्या विषयावर, माझ्या परीक्षणावर तुमची मते जरूर लिहा. तुमच्या प्रतिक्रियांची अपेक्षा आहे.



Tingya is a young village boy, from a poor family consisting of Mother, Father and Elder Brother. They also have a pair of bullocks. They are names Patangya and Chitangya. Tingya is taking care of Chitangya and his brother Patangya.

The family is suffering rough time in the farms due to unpredictable weather. The crops are not doing well, and the loan amounts are soaring season by season. There are lots of incidences of suicides in the region due to heavy pending debts faced by the farmers.

Chitangya get injured and is not able to work in the farm. The Potato propogules are ready, but the farm is not getting ready due to lack for bullock. With huge loan on him, Karbhari (Tingya's Father) had no option but to sell Chitangya and buy a new one. TIngya is very upset with the plan and tries hard to convince everyone that is not a good idea. He uses an example of an old person in the neighboring family how everyone is trying to treat her and not trying get rid of her.

It will be spoiler to give any more details on what happens next ... A very realistic story with emotional drama in the mind of small child is filmed very effectively.

Do share your thoughts on movie.


Cast:
Director:

    शुक्रवार, मे २२, २००९

    नितळ (Nital)




    कथा आहे "नीरजा कौशिक" या एका अत्यंत हुशार डॉक्टरची. नीरजा जरी एक हुशार डॉक्टर असली तरीही तिचे आयुष्य इतके सरळ सोपे नसते. तिला डागाळलेल्या चेहऱ्याचा शाप असतो. तिला कोड असतं आणि ते मुखत्वेकरून चेहरा आणि हात यावर असतं. तिच्या हुशार, मनमिळावू, प्रेमळ स्वभावाच्या प्रेमात "अनन्या रानडे" पडतो. तो तिला बंगलोरहुन पुण्याच्या घरी घेऊन जातो आणि मग रानडेच्या कुटुंबात जे वादळ सुरु त्याचे यथार्थ चित्रण या सिनेमात केले आहे.

    अत्यंत पुरोगामी विचाराचे रानडे खरंच किती पुरोगामी असतात याचे दर्शन होते. घरात बरीच मंडळी असतात. सगळ्या लोकांच्या नीरजाला बघून वेगवेगळ्या प्रतिक्रिया होतात. नीरजाला घरी आणेपर्यंत ठाम असलेला अनन्या , घरीतील लोकांचा प्रतिक्रिया बघून खूप confused होतो. काय करावे आणि काय करू नये अश्या संभ्रमात पडतो. पण रानडेच्या घरातील नवीन पिढी नीरजाला समजावून घेते आणि तिचा स्वीकार करायला तयार असते. सिनेमाचा शेवट मात्र खूपच आशादायक केला आहे.


    सिनेमातील लोकांच्या प्रतिक्रिया अगदी बघण्यासारख्या आहेत. प्रत्येक माणसाच्या स्वभावानुसार प्रतिक्रिया असतात. रीमा लागू (अनन्याची आत्या), नीरजाला तिचे डाग लपवायला सांगते तर नीना कुलकर्णी (अनन्याची काकू), रानडेच्या घरात कसे सौंदर्याला महत्व देतात ते सांगते. काही लोक तिचा स्वीकार करायला तयार असतात, पण प्रत्यक्ष सांगत नाहीत. अगदी वेगवेगळ्या दृष्टीकोनातून लोकांच्या कोडावरील प्रतिक्रिया दाखवण्याचा सर्वांगसुंदर प्रयत्न केला आहे. दीपा श्रीराम (अनन्याची आजी) नीरजाला स्पर्शाने ओळखत असते, त्यामुळे तिच्या दृष्टीने सौंदर्य हे दृष्टीत नसून स्पर्शात असते. त्याप्रमाणे नीरजा सुंदरच असते. नंतर तिला आलेली दृष्टी नीरजाला कसे स्वीकारते ते खरंच बघण्यासारखे आहे. विचारवंत रानडेंच्या भूमिकेत (अनन्याचे आजोबा) विजय तेंडूलकर आहेत.

    नीरजा तिच्या लहानपणातील काही प्रसंग जेव्हा सांगते तेव्हा खरंच हृदय द्रवते. देविका दफ्तरदार ची नीरजा मनाला खूपच भावते. तिने या भूमिकेला अगदी योग्य न्याय दिला आहे. सिनेमामध्ये खूपच मोठे कलाकार आहेत व ते आपापल्या भूमिकेत छान शोभून दिसतात. दिग्दर्शकाने कलाकारांची निवड अगदी योग्य केली आहे. सिनेमातील ३ गाणी खूपच सुंदर आहेत. ओठावर घोळत राहतात.

    या सिनेमात कोडाविषयी जागरुकता निर्माण करणे व लोकांचे मन स्वच्छ करणे हा उद्देश जर असेल तर तो अगदी सफल झाला आहे असा मला वाटले. अगदी नावाप्रमाणेच सिनेमा "नितळ" आहे. सिनेमा खूपच सुंदर आहे, अजिबात चुकवू नये असा. मला अजून बरेचदा बघायला आवडेल.

    सिनेमाच्या विषयावर, माझ्या परीक्षणावर आणि कोडाच्या समस्याबद्दल तुमची मते जरूर लिहा. तुमच्या प्रतिक्रियांची अपेक्षा आहे.




    A very thought provoking and intriguing movie on vitiligo. This is a story of a young and intelligent doctor "Neeraja kaushik" whose life is not so easy going because of vitiligo. she has white patches on her hand and face. Doctor is very humane by nature. Ananya Ranade falls in love with Neeraja. Both are working together in Bangalore. Ananya invites Neeraja, who is ophthalmologist to his house in Pune on pretext of examining his grandmother.

    Before seeing Neeraja, all family members are very supportive Ananya and Neeraja's relationship. Neeraja comes with carefully choosed presents for each family members. As everyone sees her with Vitiligo, their reactions change. Everyone is taken aback by Ananya choice. After a while, some of them provide solutions to her white patches, some of them reject idea of their relationships. But the younger generation becomes friendly and accepts Neeraja.

    The dilemma among intellectual and socially forward "Ranade" family is depicted here strongly. People in the family shows different reaction as per their nature. Reema lagu, who is an actress, suggests Neeraja for makeover. While Nina Kulkarni, who is most beautiful daughter-in-law, tells Neeraja about Ranade's perspective towards their daughter-in-law. Deepa shriram, who is blind folded due to operation, knows Neeraja by touch. So she do not consider her as ugly. But when she starts seeing Neeraja, whether she accepts her or not... should be seen in the movie.

    Director has chosen all the characters carefully. All the actors have given justice to their cast. A very good movie indeed. For Non-Marathi audience also, I feel it is worth watching with English subtitles. All the songs in the movie are good

    Do share your thoughts on movie, my review and the social stigma of Vitiligo.




    Director
    Cast

    गुरुवार, एप्रिल ०२, २००९

    कदाचित (Kadachit)


    "कदाचित", कथा गायत्रीची. गायत्री एक खुप ख्यातनाम Neurosurgeon असते. तिला एक गोड मुलगी असते. नवरा anesthesia specialist असतो. उत्तम संसार सुरु असतो. आणि अचानक, २० वर्षांनी तिचे वडिल येतात. त्यांना बघून गायत्री चक्रावून जाते. तिचा असा विश्वास असतो की तिच्या वडिलांनी, आईचा खून केला आहे. तिला त्यांना अजिबात त्यांना घरात ठेवून घ्यायचे नसते. पण ते येउन चिकटतात. त्यांच्याशी नाईलाजाने बोलल्यानंतर तिला वेगळीच गोष्ट कळते. मग गायत्रीचा सत्य शोधण्याचा आटोकाट प्रयत्न सुरु होतो. सत्य समजल्यावर तिची कशी मानसिक ओढाताण होते, तिच्यातल्या अपराधीपणाची भावना कशी तिला त्रास देते. हे बघा कदाचित मधे. माणसाच्या अपरम्पार जपलेल्या विश्वासाला जेव्हा तडा जातो तेव्हा कसे होऊ शकते याचे सुरेख दर्शन आपल्याला इथे घडते.

    अश्विनी भावे ची गायत्री अप्रतिम. मनोरुग्णाची भूमिका खुपच छान साकारली आहे. सदाशिव अमरापुरकरचे वडिल खुपच सही. आपल्याला खलनायक वाटणारे सदाशिव अमरापुरकर कधी नायक बनुन आपल्या ह्रुदयात स्थान घेतात हे आपल्याला देखिल कळत नहीं. सचिन खेडेकर गायत्रीच्या नवरयाच्या भूमिकेत छान शोभुन दिसतो. सिनेमा बघताना ३ तास कसे निघून जातात ख़रच कळत नाही. सिनेमाचा शेवट नक्की काय असेल हे देखील शेवटपर्यंत समजत नाही.

    सिनेमा खुप छान. जरुर बघाच.

    Direction
    • Chandrakant Kulkarni चंद्रकांत कुलकर्णी 
    Cast
    • Ashwini Bhave अश्विनी भावे
    • Sachin Khedekar सचिन खेडेकर
    • Sadashiv Amarapurkar सदाशिव अमरापूरकर
    • Tushar Dalavi तुषार दळवी

    Link



    आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा.