Sulabha Deshpande लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Sulabha Deshpande लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, जून ०६, २०१२

अंकगणित आनंदाचं (Ankaganit Anandacha)


आनंद प्रकाश कुलकर्णी हा मुंबईमध्ये एका बँकेत नोकरी करीत असतो. बायको रागिणी व मुलगा समीर असे त्रिकोणी कुटुंब खूप सुखात असते. समीरवर आनंदाचे निरतिशय प्रेम असते. त्याला मुंबईचे धकाधकीच्या जीवनात त्याला वाटते की त्याला खरा आनंद मिळत नाहीये. गावाकडील जीवन जास्त सुखी असेल असे त्याला वाटते व त्यामुळे तो रागिणीला म्हणतो की आपण गावीच राहून शेती करावी. आनंदला वाटते की वडिलांच्या हाताखाली शेती शिकावी व गावातच राहावे. अचानक आनंदच्या वडिलांची तब्येत बिघडते आणि ते त्याला गावी बोलावून घेतात. परंतु वडिलांचा मृत्यू अचानक ओढवतो, त्यामुळे शेती नीटशी शिकता येत नाही. वडिलांनी आनंदच्या शिक्षणासाठी शेतीवर बरेच कर्ज घेतले असते.

आता ती शेती सोडून जाण्याचे आनंदला नकोसे वाटते. पण शेती न शिकल्याने, याला शेतीत फारसा नफा देखील होत नाही. आता घर चालवण्यासाठी म्हणून बायको रागिणी एका शाळेत नोकरी करते. मुंबई मध्ये एका मोठ्या कंपनीत टीम लीडर असलेली इथे एका शाळेत १०००० रुपयासाठी नोकरी करते. त्यात देखील तिला ८००० रुपयेच मिळतात. शिवाय बरेचदा शाळेत जायला १-२ मिनिट उशीर झाल्यामुळे, लेट मार्क पण लागतो. व पैसे कापल्या जातात. रागिणी नोकरी करत असल्याने, समीरला जोशी काकूंच्या पाळणाघरात ठेवण्यात येते. रागिणीच्या आईला त्यांचे असे मुंबई सोडून जाणे अजिबात पसंत नसते. तरीपण रागिणी समीर आणि आनंदवर असलेल्या प्रेमापोटी गावी येते.

पण अप्पा गेल्यानंतर व शेती जमत नसताना उगाचच गावी राहून कर्ज बाजरी होतो त्याचे रागिणी दुख व राग असतो. त्यात शेती करताना त्याचे उसाचे उत्पादन एक अहलुवालिया नावाचा मनुष्य खूप पैसे देईन असे म्हणून लुबाडतो, त्यानंतर तर आनंद कडे अजिबातच पैसे उरत नाहीत. त्यामुळे या दोघांमध्ये सारखे वाद सुरु असतात. रागिणीची खूप चीडचीड होत असते. पण आनंदला वाटते की पैसा नसला म्हणून काय झाले आपण आनंदात आहोत. रागिणीला वाटते की आता या शेती करण्यात काही अर्थ नाही. एकतर आनंदची तशी काही फारशी मदत तिला होत नाही, शिवाय घर शाळा सांभाळले व शिवाय पुन्हा पैश्याची मारामार, त्यामुळे रागिणीला आता शहरात जावे असे वाटू लागते. रागिणीच्या शाळेत असणारा नेमाडे नावाचा क्लार्क रागिणीला त्रास देत असतो. एकदा तो लेट मार्क लागल्याबद्दल तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करतो, ती रागाच्या भरात त्याला दोन थोबाडीत देऊन ठेवते.

घरी आल्यावर आनंदला सांगते पण आनंद, रागिणीची बाजू घेण्याऐवजी, तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. हे बघितल्यावर रागिणी भयंकर चिडते व सांगते की आता तिने ती नोकरी सोडली आहे व ती मुंबईला परत तिच्या आईकडे जाते आहे. आनंद तिला समजावण्याचा पर्यंत करतो पण तो व्यर्थ असतो. रागिणी समीरला घेऊन निघते, तेव्हा आनंद, समीरला जाऊ देत नाही. रागिणी गेल्यानंतर तो त्याच्या घरी शेतीत मदत करणाऱ्या सुदामा नावाच्या नोकराला देखील काढून टाकतो कारण आता त्याला हे चैन परवडणारी नसते जेव्हा रागिणी सोडून जाते, तेव्हा आनंदचे डोळे अचानक उघडतात, तो नोकरी करण्याचे ठरवतो. आनंदच्या डोक्यावर कर्ज झालेले असते. त्यामुळे त्याची गाडी बँक जप्त करते. शिवाय लोन फेडण्याबद्दल त्याला एक-दोनदा जेल मध्ये देखील जावे लागते.

त्याच्या नशिबाने त्याला नोकरी मिळते, पण त्यात गोम अशी यासाठी कि १०० दिवस काम करायचे, पण पगार मिळणार नाही. १०० दिवसाने जर चांगले काम केले तर महिन्याला १५००० रुपये मिळतील. आनंदकडे काहीच पैसे नसतात, त्यामुळे तो विचारात पडतो की हे गणित जमवायचे कसे, त्यात हिशोब केल्यावर त्याला असे वाटते कि ३ महिन्याला लागतील इतके पैसे शिलकीत आहेत, ते वापरून नोकरी घ्यावी. पण रागिणी कडे मुंबईला न जाता गावीच राहून आनंद मिळवावा व जीवनाचे अंकगणित सोडवावे. आनंदला त्याच्या जीवनातील आनंद व अंकगणित याची सांगड घालता येते का हे बघा "आनंदाचे अंकगणित" या सिनेमा मध्ये. आनंदाचे अंकगणित असे नाव का दिले असावे असा विचार मनात येतो. कारण हे आनंद या व्यक्तीच्या जीवनातील गणित आहे की आनंद मिळवायला लागणारे जे गणित असते ते गणित या सिनेमात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे हे नीटसे समाजात नाही. माझ्या मते सिनेमा अत्यंत बेसलेस आहे. नक्की या सिनेमात काय दाखवायचे आहे हे समजत नाही. म्हणजे मुंबईला नोकरी करताना कंटाळा येतो म्हणून आनंद शेती करायला गावी येतो, पण पुन्हा नोकरी करणारे लोक कसे सुखी आहेत हे बघून नोकरी करायला लागतो. बायको सांगत असते की शेती वगेरे आपल्याला जमणाऱ्या गोष्टी नाहीत तरी तिच्याकडे दुर्लक्ष करून शेती करतो व बायको सोडून निघून गेली म्हणून व स्वत: हलाखीच्या परिस्थितीत असताना, मुलाला बायको कडे न पाठवता उगीचच काहीतरी उद्योग करत बसतो. एकूण नक्की काय करायचं या सिनेमातील हिरोला हे समजत नाही. एका भरकटलेल्या जहाजाचा प्रवास दाखवण्याचा प्रयत्न केला आहे का ? अशी शंका येते. एकूण या कथानकातील अंकगणित मला तरी फारसे समजलेले नाही. चांगल्या कलाकारांचा अगदीच चुथडा केला आहे असे वाटले. सिनेमा बघू नये. वेळ वाया जाईल.

Anand Prakash Kulkarni was a bank employee in Mumbai. His wife is Ragini and son Samir. Small and happy family. Anand loves Sameer a lot. He feels the busy Mumbai life is putting a lot of stress on him and on the whole family in general. He thinks life at his town will be less stressful and happy. He initiates discussion with Ragini, about shifting to the villages and farming. He decides to learn farming from his father and stay in his town. While he is thinking about it, his father is unwell and he had to rush. Unfortunately his father passes away and Anand did not get time to learn farming from him. At this point Anand decides to farm rather than going back to his job. But since he does not know farming well, he is not very good at that and not able to make much money. To help him financially, Ragini takes a job in a high school. She was team leader in a corporate company earlier. Here her salary is merely 10K and the fraudulent school administration takes another 2K cut and at end of month she gets only 8K in hands. Since Ragini is working, their son Sameer is in  day care facility after school which is run by Mrs Joshi. 

Ragini's mother is not happy with this change in her life. But Ragini wants to support Anand so she decides to do all this for him. But Anand's failure to generate substantial income from agriculture due to no proper training is bothering her. During these days a person named Ahulwalia cheats him for big amount of money, in sugarcane deal. Anand is under raising burden of loans. This is more and more disturbing for Ragini and they frequently fight. Anand still keeps insisting that even without money they are leading happy life. Ragini makes it clear to Anand that he should stop spending time and money on agriculture and rather do something else. Financially Anand is not getting anything out of it and Ragini is under severe stress in school, and also has to do lot of work in home to keep things moving. She start thinking they should rather go back to city and find better jobs there.

A clerk called Nemade is a troublesome guy in Ragini's school. He is always trying to catch Ragini, and one day when she was bit late for signing the attendance he crosses the limit. Ragini gives him a tight slap and decides to quit her school job at that moment itself. While discussing with Anand, he tries to convince her that she should have taken it cool and the job is important for her. Ragini looses temper that moment, decides to quit all this and stay with her mother in Mumbai. When she actually try to leave with Sameer, Anand stops Sameer and Ragini leaves alone.

After this Anand really starts thinking about his life. He has to remove his domestic assistant Sudama. And finally he decides to take up a job. Due to non payment of loan bank confiscates the vehicle and Anand is in real trouble now.

He manages to get a job, but with a very strange condition, that he will not receive salary for first 100 days and he may not get to work all days. He does lot of calculations and decides he can barely manage for those 100+ days with whatever money he has in his account and will try be happy with Sameer in his town only. So he decides to give it a try. If he is able to do that successfully or Ragini needs to intervene needs to be seen in "Ankaganit Anandache"

Looks like in the title of the movie "Anand" is used in two senses, name of lead character Anand and happiness. The movies storyline is very average and the script is not impressive. The take home message for the movie is very vague and may be interpreted in different ways. He initially quit job to to work on farm, but after a while takes a job and tries to be happy and prove his point. When Ragini tells Anand that farming is not suitable profession for him, he did not listen, but in the end lands up with a job but again in his small town instead of staying with Ragini in Mumbai. When he was in real financial trouble, he keeps his son with him and make him suffer too, when he could have taken good care of him by sending his son to his wife. The director has failed to utilize some really good talent like Sandeep Kulkarni, Aishavarya Naarkar and Sulabha Deshpande.


 Cast
Direction
  • Girish Kolapkar गिरीश कोळपकर

मंगळवार, नोव्हेंबर ०२, २०१०

चौकट राजा (Choukat Raja)

 राजन व मीनल केतकर व त्यांच्या मुलगी राणी यांचे एक त्रिकोणी छान कुटुंब. राजनला मुंबईला नोकरी मिळाल्याने, हे तिघे जण एका लहानश्या गावातून मुंबईला येतात. मीनलला मोठ्या गावात राहण्याची सवय नसते, ही खेड्यात वाढलेली. त्यामुळे मुंबईमधल्या धावपळीशी जुळवून घेण्यात हिला नाही म्हटले तरी जरा कष्ट घ्यावे लागतात. असेच एक दिवस राणी सोसायटी मध्ये खेळायला जाते आणि तिथे एक मंदबुद्धी मुलगा तिला झोक्यावर खूप जोरात झोका देतो. आणि हि घाबरून जाते. पण हा झोका देण्याचे थांबवत नाही. राणी घाबरून ओरडते, मीनल हे सगळे बघून त्या मंदबुद्धी मुलाच्या थोबाडात मारते. तितक्यात त्याची आई, उषा आजी येते. तेव्हा मीनलला कळते की या मुलाचे नाव नंदू आहे.



नंदूबद्दल मग त्यांना बरीच माहिती कळते, हा सोसायटीत दुध टाकणाऱ्या आजींचा मुलगा आहे. त्याला डोके जरा कमी आहे आणि हा सगळ्या लहान मुलांना आणि सोसायटीतील स्त्रियांना त्रास देतो. त्याच्या बद्दल बऱ्याच तक्रारी कळतात. पण तरीही मीनलला त्याच्या बद्दल कणव वाटत असते व त्या दुधवाल्या आजींचा चेहरा खूप ओळखीचा वाटतो. नंदूला मीनलची खूप भीती वाटत असते, कुठेही मीनल दिसली की हा लपून बसायला लागतो. याच नंदूच्या घराजवळ राहत असतो, गणा. हा मात्र नंदूवर लहान भावासारखे प्रेम करतो. व तो माईला स्वताची आईच मनात असतो. जेव्हा जेव्हा नंदूला कोणी काही बोलता, तेव्हा गणा त्याची बाजू घेऊन त्याचे रक्षण करत असतो. नंदूला चित्र काढण्याची खूप आवड असते. माईला सारखे वाटत असते, कि मी गेल्यावर नंदूचे काय होणार. त्याला काहीतरी करून त्याला त्याच्या पायावर उभे करायला हवे, पण त्याला कुठे नोकरी वगेरे मिळणे शक्यच नसते. त्यात सगळे लोक नंदूला शी, थू करत असतात. याने माईचा जीव खूप दुखावतो, पण त्याला त्या काहीच करू शकत नसतात.



मीनलला तिच्या लहानपणाचे एक गाणं आठवत असते, आणि ते गाणं तिच्या मुलीला खूप आवडत असतं. त्यामुळे राणीच्या वाढदिवसाच्या दिवशी मीनल तेच गाणं म्हणते, हे गाणं ऐकून नंदू घरातून धावत जाऊन मीनल कडे येतो आणि मीनलला मुन्नी मुन्नी अश्या हाक मारू लागतो. मीनल देखील खूप प्रेमाने त्याच्याशी बोलते, हे सगळे बघून सोसायटीतील सगळी लोक नाकं मुरडू लागतात. राजनला देखील हे पटत नाही. राजनला मीनल समजावून सांगते की नंदू हा तिचा बालमित्र आहे आणि एका अपघातात त्याच्या डोक्याला मार लागल्याने त्याची अशी अवस्था झाली आहे. पण राजनला हे काही खूप पटत नाही. नंदूला बरं करावे अशी मीनलची इच्छा असते. निदान त्याचे पुनर्वसन व्हावे अशी मीनलची इच्छा असते. ती त्यादिशेने पावले उचलायला लागते. आता मीनलला यात यश येते का ? राजनची समजूत पटते का? नंदूचे पुढे काय होते ? गणा मीनलला कशी मदत करतो ? हे बघा "चौकट राजा" या सिनेमामध्ये.



सिनेमा खूपच सुंदर आहे. नंदू जसा जसा मीनलच्या जवळ येतो, तसा राजनची किती तडफड होते हे खूपच छान दाखवले आहे. मीनलची समजूतदार, प्रेमळ व्यक्तिरेखा खूपच भावपूर्ण आहे. सुलभा देशपांडेच्या अभिनयाला तोड नाही. दिलीप प्रभावळकर नंदूच्या भूमिकेत अति उत्तम. सगळ्या गोष्टी इतक्या छान जमल्या आहेत कि नाव ठेवायला कुठेच जागा नाही. सिनेमातील "एक झोका, चुके काळजाचा ठोका," गाणं खूपच छान. तसेच "हे जीवन सुंदर आहे", पण खूप छान. सिनेमाचे थीम साँग मस्तच. एकूण सिनेमातील गाणी अतिशय समर्पक आहे.



जेव्हा मराठी सिनेमा दर्जा खालावल्यामुळे प्रेक्षकांकडून दुर्लक्षित झालेला होता, त्या दरम्यान एक दर्जेदार चित्रपट काढून स्मिता तळवलकरने मराठी प्रेक्षकांची वाहवा मिळवली होती. या सिनेमाला बरेच पुरस्कार मिळाले आहेत. सिनेमा बघावा असाच आहे. अगदी संपूर्ण कुटुंबाने बघावा सिनेमा आहे.



Rajan Ketkar with his wife Meenal and daughter Rani are a small family, recently moved to Mumbai, due to Rajan's transfer. Minal was brought up in a village and is not used to life in the big city like Mumbai. So she is struggling to catch up with Mumbai lifestyle. One day Minal hears Rani's loud cry while playing on the apartment swing. Minal rushes to find out what is the matter. She finds out that a mentally challenged person scaring Rani with forcing to go for high flying swings. And not stopping it even though Rani was shouting and crying. Minal slaps the guy's face and rescues Rani. Usha, the mother of that guy arrives on the scene and scold the guy, whose name is Nandu.



 Minal discovers many things about Nandu very soon. He is son of Usha, the lady who supplied milk to most of the apartments in the society. He always troubles children and ladies around. But Minal develops sympathy towards Nandu. She is trying to recollect where she has seen Usha. Due to that incidence, Nandu is very scared of Minal, and always tries to hide when he seen Minal around.



Gana is one of Nandu's neighbors. He understands Nandu well and loves him like younger brother. He is the only person around except Usha (Nandu's mother) who understands and supports Nandu. For Gana, Usha is like his mother. Nandu is fond of painting. But he is not really capable to take up some job and be on his own. All are treating Nandu badly. Usha is always worried about Nandu. specially what will Nandu do, after her.



Minal has one favorite childhood song. Her daughter also like it very much and she requests her mother to sing on her birthday during party. Minal sings it finally. And this time, when Nandu hears the song he runs to the party and calls Minal "Munni". Minal goes to Nandu and talks to him with sympathy and love. All the people in the party are surprised and many of them are unhappy and critical about the incidence. Rajan is disturbed too. Minal tries to convince Rajan that Nandu was her childhood buddy. They had spent lot of time together, and one day he met with an accident. This is reason behind Nandu's such state. Rajan is not really convinced with all this though. Minal desperately wants to help Nandu in recovery, or at least wants to make sure he is taken care of well, specially after his mother's death. She tries to help Nandu, but it really a difficult task, without support for her husband Rajan. Is Minal successful in the venture ? Does Rajan help her in that ? What happens to Nandu ? all to be watched in "Chaukar Raja".



The movie is really good and is of "Must watch" category. The roles played by most actors are too good. Specially when Nandu gets closer to Minal, Rajan's jealousy. Smita Talvalkar in Minal role is really good. She has really shown Minal's emotional nature very well. Deelip Prabhavalkar is amazing, Sulabha Deshpande and Dilip Kukarni are very good too. Ashok Saraf adds some spice to the story. In short the whole movie has got very good chemistry. The song "Chuke Kalajacha Thoka, eak zoka" is really nice, as theme song "Asa kasa vegala vegala mi Choukat Cha raja".



This movie made a big impact, when Marathi cinema was in some kind of down trend, and not doing really well. Smita Talvalkar got lot of appreciation and awards for this movie. Final words are must watch family movie.



Cast


Direction



Link to watch online

Movie DVD 

मंगळवार, ऑगस्ट ३१, २०१०

हापूस (Haapus)


अण्णा गुरव म्हणजे वानरवाडी मधील मोठे प्रस्थ. गावातील सगळेच मोठे निर्णय अण्णाच्या सांगण्याशिवाय होत नसत. याला कारण म्हणजे यांचा ज्योतिष शास्त्राचा गाढा अभ्यास व त्यावर नितांत विश्वास. यांचा मोठा परिवार. घरी म्हातारी आई, जिच्यावर अण्णांचा खूप जीव. बायको आणि मुलं. मुलं म्हणजे एक मुलगा अजित. लग्न झालेला, सुनेचे नाव नंदा. हा खूप हुशार, हा हापूस आंब्याची एक संकरीत जात बनवण्याच्या मागे असतो. आणि त्याला त्यात यश पण येत असते. दोन जुळ्या मुली, एक अमृता, आणि दुसरी अंकिता. अमृता एकदम धडाडीची, अगदी Tomboy शोभून दिसेल तशी, तर अंकिता अगदी लाजाळू व गरीब. चौथी मुलगीच नाव आनंदी. वय १३-१४. अंकिता गावातील एका रीक्षेवाल्याच्या "सुभाष उर्फ सुभ्या" च्या प्रेमात पडते. आता हिचे लग्न सुभ्याशी होणे तसे कठीणच असते, कारण पत्रिका आडवी येणार हे दोघांना देखील माहिती असते. अंकिताला बघायला पाहुणे येणार असतात, हे सुभ्याला कळते, त्याला समजत नाही

आता काय करावे. याच विचारात असताना, अण्णा गुरव यांचा पत्ता विचारत एक तरुण मनुष्य त्याच्या रिक्षात चढतो, त्याच्याशी गप्पा करताना त्याला समजते की हा अण्णा गुरवच्या मुलीला बघायला आला आहे. पण प्रत्यक्षात हा वानरवाडी मध्ये शिक्षक म्हणून आलेला असतो व वडिलांच्या मित्राकडे म्हणजे अण्णा गुरव यांच्याकडे राहणार असतो. अश्या तर्हेने "दिगंबर नीलकंठ काळे" याचे वानरवाडी मध्ये आगमन होते



अजितला हापूस आंबाच्या व्यापार करायचा असतो. त्याच्या मते, दलालांना मधल्या मध्ये खूप पैसे मिळतात, त्यामुळे जर का सगळ्या वानरवाडी मधील बागायतदार एकत्र आला तर आंबा विकला जाईल आणि पैसे पण जास्त मिळतील. पण या गावात असणारा दलाल राजेंद्र छाजेड हा अजितच्या मार्गात खूप अडथळे आणतो. व शिवाय अण्णा गुरव यांच्या मते, म्हणजे पत्रिकेच्या मते, गुरव यांच्या कुटुंबात बिसिनेस हा यशस्वी होणार नाही. त्यामुळे अण्णांची पण अजितला साथ मिळत नाही.



अमृता देखील, अण्णांच्या पत्रिका, पत्रिका या विषयावर चिडलेली असते, एकूण घरातील सगळेच लोक ज्योतिष व पत्रिका या विषयावर जरा वैतागलेले असतात. मराठवाड्यातील अंबेजोगाई या गावातून आलेला मास्तर, हे सगळे ओळखतो. त्यात अमृता याच्या प्रेमात पडते. पण अण्णांना कसे पटवायचे हा सगळ्यांसमोर पडलेला प्रश्न. शेवटी, अजित, बिसिनेस करू शकतो का, त्याला अण्णांची साथ मिळते का, दोन्ही प्रेमी युगुलांना आपापले प्रियकर मिळतात का , अण्णा बदलतात का हे बघा "हापूस" मध्ये.



दलाली मोडून काढली पाहिजे, त्याने शेतकऱ्यांना जास्त पैसे मिळतील, त्याचप्रमाणे ज्योतिष्य हेच अगदीच सगळे खर नसतं, तर मनुष्याची मेहनत पण खूप महत्वाची आहे हे दाखवण्याचा प्रयत्न या सिनेमात केला आहे. सगळ्यांच्याच भूमिका उत्तम आहेत. मधुर वेलणकर खूपच छान दिसते. मकरंद अनासपुरे नेहमीप्रमाणेच छान. सुभोध भावेची बायको म्हणून जी कोण नटी आहे, ती त्यापेक्षा वयाने मोठी आहे असा वाटत. पण तिची भूमिका उत्तम आहे. सिनेमा चांगला आहे. पण बघावाच असा नाही.

तुम्ही सिनेमा बघितला असल्यास किंवा बघितल्यानंतर, किंवा माझ्या लिखाणाबद्दल प्रतिक्रिया अवश्य नोंदवा.



Anna Gurav is a famous Astrologer in the village of Vanarwadi. He is one of strongest believer of Astrology and also advises each and every person in is contact to follow. All the major decisions in the village are not taken without consulting Anna's consultation. His family members are his old mother, his wife, son Ajit, Ajit's wife Nanda, twin daughters Amruta and Ankita and youngest member is Anandi.



Ajit is a bright man and has dreams, ideas as well as courage. He is working on a hybrid variety of famous Hapus Mango, and he is already getting some good results. Amruta is a very bold and dashing girl wife Ankita the reverse, very shy and silent. Amruta is always wondering in the village and is involved in fights. She is a true tom boy. Ankita is attending college and is in love with Subhash alias Subhya, who is a Auto Cab driver.



A prospective boy was to visit Anna Gurav's family to explore wedding relationship with Ankita. Subhya is aware of the fact, so he decides to play spoilsport. While waiting with his Cab for business, a guy comes to him and inquires about Anna Gurav's house. Subhya mistakes him for the prospective boy and starts telling him all false stories about Ankita, so he will decide the other way. But unfortunately he is not the right person but he is new school teacher Kale, who is son of Anna Gurav's friend.



There is a middleman Rajendra Chhajed, who is buying all the mangos from Vanarwadi and selling them in Mumbai. He is making a lot of money, and paying the real farmers working hard in Vanrwadi just peanuts. Ajit is upset about it, and tries to bring all the farmers together and tries to convince them that if they all come together and sell mangos they will make almost four times the money they are making now. Naturally Chhajed is creating all sorts of problems in this endeavor of Ajit to save his business and financial margins. Anna is also opposing Ajit because he thinks according horoscopes, his family can not do business successfully. And there is some unknown reason behind this premise.



Amruta is also upset because of Anna's horoscope business. Kale master being an outsider, but staying in their home, realizes this problem and overdose of horoscope and astrology by Anna. So all the family members decide to come together and find a way out of this. Basically how to convince Anna is the issue they have to tackle.



You have to watch the movie Hapus to see if they are able to convince Anna, if the two pairs in love unite, if Ajit is able to venture in business, and if Anna is able to support all hie family in a meaningful way.



Madhura Velankar has done a fabulous job if acting a double role of twin sisters with opposite charactors. Makaran Anaspure is hilarious as usual. Subodh Bhave and Shivaji Satam and established names and they have certainly justified their roles well. Pushkar Kshotri is good too. If you enjoy comedies, you will certainly enjoy the movie.




Cast


Direction




Link to watch online


Movie Trailer

Movie DVD