Sachin Khedekar लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Sachin Khedekar लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, नोव्हेंबर ०५, २०१३

काकस्पर्श - एक विलक्षण प्रेमकहाणी



या सिनेमाची गोष्ट आहे स्वातंत्र पूर्व काळातील. सिनेमा हरी दामले आणि त्याच्या कुटुंबियां भोवताली व त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींबद्दल आहे. बहुतेक सिनेमा हा फ्लॅशबॅक मधेच आहे. आई-वडिलांचे निधन झाल्यानंतर, हरी दामले हा दामले कुटुंबियाचा कर्ता पुरुष असतो. पत्नी तारा, दोन मुली, एक मुलगा संकर्षण असा त्याचा परिवार असतो. घरात वकिली शिकणारा भाऊ महादेव, विधवा बहिण, नमुआत्या असा मोठा परिवार असतो. कोकणात बरीच जमीन आणि बागायत असते. हरी दामले याचा गावात देखील बराच मान असतो. तो तसा नवमतवादि असतो. नवनवीन संकल्पना तो उचलून धरत असतो, बरेचदा इतर लोकांचा रोष ओढवून देखील. हरीचा एक खूप जिवलग मित्र असतो, बळवंत फडके. हा सदैव देशाला स्वातंत्र कसे मिळेल याकरिता काम करत असतो. याच गावात उपाध्ये नावाचा एक ब्राह्मण असतो, ज्याचे हरी दामले बरोबर बरेच मतभेद असतात. शिवाय उपाध्ये हा एक अतिशय कर्मठ आणि जुन्या चालीरीती न सोडणारा, असा ब्राह्मण असतो.

वकिली शिकणारा भाऊ महादेव हा मुंबईला शिकत असतो. आता महादेव लग्नाचा झाला असल्याने, हरीदादा त्याच्या साठी स्थळ शोधतात. बळवंतच्या मध्यस्थीने, महादेवसाठी एक उत्तम स्थळ मिळते. मुलीचे नाव दुर्गा, दुर्गा चुणचुणीत, हुशार आणि चांगल्या गळ्याची, गोड गाणी म्हणणारी  असते. लग्न व्यवस्थित पार पडते. मुलगी वयात आलेली नसते, त्यामुळे अजून महादेव आणि दुर्गा यांचा तसा संसार सुरु झालेला नसतो. त्यात महादेवची परीक्षा जवळ येते त्यामुळे तो मुंबईला प्रयाण करतो. दुर्गा, जिचे नाव आता महादेवने उमा ठेवलेले असते, ती दामलेंच्या घरात रुळते. थोड्याच दिवसात उमा वयात येते, त्यानिमित्त्याने करण्यात येणाऱ्या गर्भादान / फलसंशोधन सोहळ्यासाठी महादेवला पाचारण करण्यात येते. महादेव मुंबईहून येतो खरा, पण त्याची तब्येत खूपच बिघडलेली असते. पूजेला देखील तो ग्लानीत असतो. त्याच दिवशी पहिल्या रात्री, उमाच्या जवळ पलंगावर त्याचे प्राणोत्क्रमण होते.

महादेवच्या मृत्यूने सगळ्या घरावर शोककळा पसरते. उमाच्या दु:खाला पारावार उरत नाही. १० व्या दिवशी पिंडदान करण्यासाठी हरी आणि गावातील इतर ब्राह्मण नदीकाठी जातात. परंतु पिंडाला कावळा शिवत नाही. सगळे लोक म्हणायला लागतात कि दर्भाचा कावळा करून पिंडाला शिवावावा, ही एकच शास्त्रात सांगितलेली पळवाट आहे. पण हरीदादाला ते मान्य नसते. हरी पिंडाच्या जवळ जाऊन काही तरी म्हणतो आणि त्याबरोबर पिंडाला कावळा शिवतो. आता दहा दिवस झाल्याने, उमाला सोवळी करण्याचा घाट घातला जातो. उमा खूप रडते, प्रतिकार करते, पण तिचे कोणी ऐकत नाही. नमुआत्या आणि तारा तिला जबरदस्तीने, नाव्ह्याच्या समोर देऊन बसवतात, तितक्यात हरीदादा पिंडदान करून परत येतो. घरातील प्रसंग बघून तो रागावतो आणि म्हणतो की उमाचे केस कापले जाणार नाहीत. गावातील सगळे लोक खूप टीका करतात. सगळ्या ब्राह्मण सभेमधून याचा प्रतिकार केला जातो. दामलेंच्या घरावर बहिष्कार टाकला जातो. पण तरीही हरी उमाला संरक्षण करण्यास मागेपुढे बघत नाही.

घरातील लोकांना हरीचे हे वागणे आवडत नाही, पण त्याला कोणी प्रत्यक्ष दर्शी विरोध करू शकत नाही. हरीला उमा आवडते आणि हरी त्यामुळेच उमाचे रक्षण करतो असे बरेच लोक बोलू लागतात. त्यात हरीची बायको तारा ही आजारी पडते. तारा आजारी पडल्यावर उमा घरातील सगळी जबाबदारी उचलते. अंथरुणावर खिळल्यावर ताराला देखील उमा आणि हरीच्या संबधाबद्दल शंका येऊ लागते. त्यातच तिचे निधन होते. मृत्युशय्येवर असताना, ती हरीला उमाशी लग्न करण्याचा सल्ला देते. पण हरी तसे करत नाही. गावातील लोकांच्या काहीबाही बोलण्यावर पडदा पडावा म्हणून, हरी त्याच्या मुलाचे लग्न करून देतो व घरात दुसरी बाई आल्याने, लोकांच्या वाईट बोलण्याला पट्टी बसते.  तर असे दिवस जात असताने, उमाच्या मनाला खूप यातना होत असतात, तिला हे आयुष्य नकोसे होते आणि ती जेवण करणे सोडते. तिच्या मरणासन्न अवस्थेत हरी तिच्या बोलतो, पिंडदानाच्या वेळेस बोललेले सत्य उमास सांगतो. ते सत्य काय असते, उमा आणि हरीच्या मनात एकमेकांबद्दल काय भावना असतात हे बघा "काकस्पर्श" या सिनेमामध्ये.

सिनेमा खूप सुंदर आहे. तसे बघितले तर अगदी सामान्य गोष्ट खूप सुंदर रीतीने सांगण्यात आली आहे. सिनेमा बघितल्यावर खरोखरच "एक विलक्षण प्रेमकहाणी" असे का म्हटले आहे ते कळते. सगळे कलाकार उत्तम आहेत. एकूण सेट, आणि चित्रण बघून आपण खरोखरच पूर्वीच्या काळातील कोकणात जातो. सिनेमा बघावा असाच आहे. पूर्वीच्या तरुण विधवा स्त्रीच्या व्यथा बघून जीव गलबलतो. सगळे कलाकार उत्तम. सिनेमाचा शेवट खूपच अनपेक्षित आहे. सिनेमात लहान मुलांनी बघू नये असा एकही सीन नाही, पण सिनेमा थोडा गंभीर आहे त्यामुळे लहान मुलांबरोबर न बघितलेला बरा.

This movie story line is set in pre-independent India. This is a story of Hari Damale and his family. Most of the story is in flashback. Hari Damale is taking care of his family after his parents, as they die early. His family consists of his wife Tara, two daughters and one son Sankarshan, his brother Mahadev who is studying law in Mumbai, and his widow sister, Namuatya. He owns farm land and orchards in konkan. He is well respected person in the village. He is a forward thinking person and pushes for change, at times even with some resistance from others. Balavant Phadake is his best friend. Balavant is involved actively in freedom fight. Another person in the village Upadhyay is not in good terms with Hari, reason being his orthodox and ritual nature. Upadhyay does not like Hari's modern thinking.

Mahadev, his brother is pursuing his law degree in Mumbai. Hari decides to get his brother married, since Mahadev has reached right age for marriage. Balavant gets a very good contact for the same. Durga is a bright young girl in his distant relation. Durga also knows singing and he thinks that Durga and Mahadev are perfect match. The marriage goes on well, he names Durga as Uma. Mahadev returns to Mumbai alone, since Durga is young yet, she is not sent with her. Mahadev also needs to concentrate on his exams and studies. Uma is getting used to the new place and people. She attains puberty and a ritual of Garbhadaan is planned. Mahadev has to be present for the same and he is called from Mumbai. Mahadev returns form Mumbai but with high fever. He manages to take part in the rituals, but during night his health deteriorates and he dies. 
Mahadev's death is a big shock for the whole family. Uma is the biggest victim. The rituals take place according to the traditions. In the Pindadaan ritual, Hari and others wait for long time for crows to touch the Pinda. There are rituals to avoid this ritual, but Hari is not in favor of making a false grass crow to do away with. Finally Hari goes to scene and promises something, and within few minutes crows come to eat the Pinda. At home, the ritual of Uma has to begin. Her head has to be shaved off as a widow. Namuatya is forcing Uma to shave her head, with help of a barber. Fortunately Hari returns in time, and saves Uma from this. He also announces that Uma will not have to shave her head. This attracts lot of criticism in the village, since this is not according to custom of the times. The village Brahman Sabha decides to stop any transactions with Hari's household.
Hari's family is disturbed, but they are not in a position to resist Hari. People started saying that Hari is in love with Uma and that is the reason he is protecting her. After few months of this tension, Tara gets sick. Uma is mature lady now and she really takes care of the house well. Tara too starts doubting the relationship between Hari and Uma. In her final moments, Tara requests Hari to marry Uma after her death, but Hari refuses. After Tara's death, Hari quickly gets his sone married, so that another lady comes to the house. This avoids people doubting his and Uma's relationships. But all these tense years in Uma's life take toll on her mental health. She is really fed up with her life and decides to die by stopping food. She gets really weak, and finally in those moments Hari tells her the reason he has been behaving like that, and what was the promise he made at the time on Pindadaan. The delicate relationship between Hari and uma is really shown very well in Kaaksparsha.
This movie is done very well with a very simple story. This is really a unusual love story. All the actors have done a very good job. The whole productions and set locations are really good and well matching with the story line and Konkan of the times. This a must watch movie and touching because of the problems ladies faced during that times. The movie ends in a very unexpected way. Movie is children friendly but could be bit taxing due to serious story line.

Do let us know your views.

Cast
  • Sachin Khedekar सचिन खेडेकर  - Haridada
  • Priya Bapat प्रिया बापट - Uma
  • Medha Manjarekar मेधा मांजरेकर - Tara
  • Savita Malpekar सविता मालपेकर - Namu Aatya
  • Vaibhav Mangale वैभव मांगले - Upadhyay
  • Sanjay Khapare संजय खापरे - Balwant
  • Abhijit Kelkar अभिजित केळकर - Mahadev
  • Manva Naik मन्वा नाईक - Shanti
  • Ketki Mategaonkar केतकी माटेगावकर - Small Uma
  • Kishor Raorane किशोर रावराणे - Janu
  • Gauri Ingawale गौरी इंगवले - Small Shanti
  • Saiee Manjarekar सई मांजरेकर - Kushi
  • Saksham Kulkarni सक्षम कुलकर्णी - Sankarshan
Director
  • Mahesh Manjarekar  महेश मांजरेकर 

Link to watch online



मंगळवार, मे १८, २०१०

शिक्षणाच्या आयचा घो (Shikshanachya aaicha gho)

मधुकर राणे अत्यंत सामान्य, मुंबईमध्ये एका चाळीत राहणारा मध्यमवर्गीय. याला दोन मुले, श्रीनिवास आणि दुर्गा. श्रीनिवासला क्रिकेटचे भयंकर वेड. त्या वेडापायी त्याला काहीच सुचत नाही. पण फक्त वेड असे म्हणता येणार नाही, तर त्याला क्रिकेट खेळणे खूपच छान जमत असते. जणू काही पुढील पिढीतील सचिन तेंडूलकरच. आईचे छत्र हरवलेली, दुर्गा एक हसरी आणि समजूतदार मुलगी. आता बायको गेल्यामुळे, घरातील काम, मुलांचा सांभाळ, ऑफिसातील काम यात मधुकर राणे खूप बिझी असतो. मुलांची शाळा त्यांचे खर्च, भागवणे याला जरा जड जात असते. त्यामुळे डोक्यावर कर्ज पण झालेले असते. त्यामुळे थोडा वैतागलेला पण असतो.

त्यात मुलाला क्रिकेटचे वेड. त्यामुळे श्रीनिवास अभ्यास करत नाही. मार्क कमी मिळतात. आता मार्क कमी मिळतात त्यामुळे मुलाला सारखे अभ्यास कर असा तगादा लावलेला असतो. हा जरी वैतागलेला, गांजलेला असतो तरीही, विनोद आणि प्रेमळपणा ओतप्रोत भरलेला असतो. त्यात मुलाला क्रिकेट खेळायला बूट हवे म्हणून पुन्हा "मोहमद / इस्माईल" कडून कर्ज घेतो. त्याच्या ऑफिसमधील त्याचा सहकारी त्याला एक युक्ती सुचवतो, कि जर तुझा मुला स्कॉलरशिप परीक्षेत पास झाला तर शाळा सगळा खर्च करेल, तुला तितकीच मदत होईल. हि आयडीया माधव राणेला एकदम पटते तो मुलाला स्कॉलरशिपला बसवण्याचा आग्रह करतो. त्यासाठी त्याला क्लास लावतो, अभ्यास करायला लावतो, पण श्रीनिवास चे मन कधीच अभ्यासात लागत नाही त्याचे शाळेत घेतलेल्या स्कॉलरशिपच्या पूर्व चाचणीत चांगलेच दिवे लागतात. या सगळ्याचा परिणाम म्हणून का काय, मधुकर राणे आपल्या मुलाला एका प्रसंगात बॅटने मारतो. या मारण्याच्या झटापटीत श्रीनिवासच्या डोक्याला पलंग लागतो तो कोमात जातो.

श्रीनिवास कोमात गेल्यावर मधुकर एकदम खडबडून जागा होतो. आपली शिक्षण पद्धती अशी का आहे, त्याचा मुलांवर काय परिमाण होतो याचा विचार करायला लागतो. खरच आपण मुलांना इतके मारून मुटकून अभ्यास करायला लावतो त्याचा आयुष्यात खरच काय उपयोग आहे का याचा मागोवा घ्यायला लागतो. हे सगळे करत असतानाच याला श्रीनिवासला पुन्हा पूर्ववत करण्याची इच्छा असतेच. त्यावर होणारा खर्च, मधुकर राणे उभा करू शकतो का, श्रीनिवासचे पुढे काय होते, आणि खरच मधुकर राणेला मुलाने साधे शिक्षण घेण्यापेक्षा दुसरे काही केलेले आवडते का बघा "शिक्षणाच्या आईचा घो" या सिनेमामध्ये.



सिनेमा चांगला आहे. शिक्षणपद्धती जरा बदलायला हवी असे दाखवण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. आपल्या शिक्षणपद्धती मध्ये खूप घोटून घोटून शिकवतात, आणि मुलांना स्वताला विचार करायला जागाच ठेवत नाहीत. मोठ झाल्यावर याचा अनुभव जास्त येतो. स्पर्धा हि चांगली कि वाईट हा तर एक खूप मोठा वादाचा मुद्दा होऊ शकतो. पण स्पर्धेमुळे होणारे फायदे फार आहेत असे वाटत नाही मला. त्यापेक्षा स्पर्धेशिवाय शिक्षण पद्धती ठेवली, तर त्याचा जास्त उपयोग होईल. आपण शाळेत जाऊन घोकंपट्टी करतो त्याचा खऱ्या जीवनात काहीच उपयोग होत नाही. शिक्षणपद्धती वर असलेला हा सिनेमा अजून काही नाजूक विषयांना पण हात लावून जातो. चाळीमध्ये राहणारी नलिनी, तिच्याकडे लोकांचा बघण्याचा दृष्टीकोन, नंतर त्यात झालेला बदल हा पण प्रकर्षाने दिसून येतो.

नको बाबा ती भारत जाधवची कॉमेडी असा म्हणण्यातील मी एक आहे. पण तरीही या सिनेमामधून एक चांगला विषय हाताळला गेला आहे असे मी म्हणीन. म्हणजे भारत जाधव आहे त्यामुळे बघू नये असे जर का कोणाला वाटत असेल तर तसे करू नका. तुम्हाला कदाचित हा सिनेमा आवडेल देखील. या सिनेमात बरेच आईवडील स्वताला बघू शकतात. स्पेशाली जे आईवडील आता मुलांना अभ्यासाव्यतिरिक्त काहीच करू देत नाही त्यांना तर हे नक्कीच जाणवेल. सगळ्या कुटुंबाबरोबर बघण्यासारखा हा चित्रपट आहे असे मी नक्कीच म्हणीन.


Madhukar Rane is a clark in government office. A Typical lower middle class Mumbai resident. He has two children Shrinivas and Durga. His wife has passed away. He is very efficiently managing his work and family responsibilities. But finances are in trouble, due to the increasing expenses and small income. Shrinivas is a good cricket player and a passion for the game. Durga is also a matured and happy go lucky girl. She is very responsible as compared to her age.


Srinivas fails in his mid term examination. He always gets distracted thinking of cricket while studying. Madhukar is worried about his sons future and keeps scolding him. Though he is proud of his cricket skills and supports Sribivas. He takes loan from a pawn broker to buy Srinivas cricket shoose. To repay the loan, he helps his collegues to finish their work in return of cash. He also makes and packs incense sticks. His children help him in that. A friend suggests him if Srinivas appears for scholarship examination, he will get free ship in the school and Madhukar will save the money on his fees. Madhukar agrees that is a great idea and announces at home that Srinivas if going to appear for the exam.


It takes lot of convincing to Srinivas's teachres and school principle to accept his application for the examination, the reason being he Srinivas has already failed in the class once and still not showing any signs of progress. Madhukar manages to find a tutor for Srinivas, so that he can study well for the examinations. But Srinivas is still in his own world of cricket. In the preliminary examination, Srinivas fails to score, and scholl teachers refuse to let him go forward. Annoied Madhukar tries to beat Srinivas with cricket bat itself. Trying to avoid his fathers anger, Srinivas fells and gets hurt on head. This puts Srinivas in coma.


The whole scenario in the family changes at this juncture. Madhukar starts to think about the whole episode and then in general the education system. Is really everything taught useful in the life ? Should parents just make children study or should let them develop other skills like sports, music, arts etc ? The more he thinks about it, the more frustrated he is. He is also determined to treat Srinivas well and get him back to his normal life. He already has a huge burden of loan and the treatment needs more and more money. Watch the movie"Shikshanachya Aaicha Gho" to see how he manages the struggle of life, who all help him, who all create problems and if he succeeds in treating Srinivas.

The movie is on the lines of Dombivali Fast. One of the issues of frustration in common man's life and how one gets to a point of fearless lone fight against it. Is the current education system, of making children learn things by heart and not able to express own views and ideas. Is academic competition everything ? And is ability to memorise everything, including useless stuff in the syllabus and able to spit it out in the exam is the only skill ? The movie also handles some delicate issues in human relationships.


The movies is certainly worth watching with family. This is a different movie that you can expect from a Bharat Jadhav movie. His role is good and he has really justified it. Sakshm Kulkarni is good too. This could be an eye opener to parents who concentrate only on their children's academics and do not let them participate in extra curricular activities. I would recommend this to all the parents with school going children.


Cast
  • Bharat Jadhav भरत जाधव
  • Saksham Kulkarni सक्षम कुलकर्णी
  • Sidhdharth Jadhav सिद्धार्थ जाधव
  • Sachin Khedekar सचिन खेडेकर
  • Gauri Vaidya गौरी वैद्य
  • Kranti Redkar क्रांती रेडकर
  • Vidyadhar Joshi विद्याधर जोशी
  • Vaibhav Mangle वैभव मंगले
  • Kamlakar Satpute कमलाकर सातपुते
  • Kishor Pradhan किशोर प्रधान
  • Sandeep Pathak संदीप पाठक
  • Vijay Kenkre विजय केंकरे
  • Atul Kale अतुल काळे
  • Dhananjay Mandrekar धनंजय मांद्रेकर
  • Rajdev Jamdade राजदेव जमदाले
  • Rajiv Rane राजीव राणे

Direction
  • Mahesh Manjarekar महेश मांजरेकर

Link to watch online


मंगळवार, एप्रिल ०६, २०१०

तुझ्या माझ्यात (Tuzya-Mazyat)

Search Amazon.com for marathi movies अस्मिता आणि शशांक कर्णिक या दोघांची निशा आणि शुभम अशी दोन खूप गोड आणि लाघवी मुलं. शशांक आणि अस्मिता यांचे पटत नसते त्यामुळे ते दोघेही वेगळे झालेले असतात. अस्मिता एक खूप शंकेखोर असल्याने त्यांचा घटस्फोट झाला आहे असे कळते. अस्मिता, स्वताच्या मतांशी नेहमीच पक्की असते. "Head Strong" म्हणतात न तशी. पण जरी दोघे वेगळे राहत असले तरी दोघांचे एकमेकांशी बोलणे चालणे असते. इतकेच नाही तर शशांकच्या काकांशी (आबा) तर अस्मिताचे अगदी मुलीसारखे संबंध असतात. दर शनिवार, रविवार मुले शशांक कडे जातात आणि अस्मिता आबांकडे.
निशाला नाचात खूप रस. आणि आता मोठी होत असल्याने हिचे प्रश्न वेगळे असतात. म्हणतात न अगदी तशी टीपीकल टीनेज गर्ल. तर शुभम खोडकर पण हसरा मुलगा. या दोघांना आपले आई-बाबा वेगळे का राहत आहेत हे अजून नीटसे कळलेले / पटलेले नसते. त्यात शशांकने आता दुसरे लग्न केलेले असते, राधिकाशी.
राधिका हि पण एक घटस्फोटिता. हिला मुल होणार नाही असे कळल्यावर हिच्या आधीच्या नवऱ्याने हिला घटस्फोट मागितला असतो आणि दुसरा काही उपाय नसल्याने हि देखील "Mutual Consent" असे म्हणून पहिल्या नवऱ्याला घटस्फोट देते. राधिका खूप हुशार, साधी सरळ व सच्च्या मनाची असते. हि मुलांशी जुळवून घेण्याचा सतत प्रयत्न करत असते. बरेचदा अस्मिता जरी, राधिकाशी नीट वागत नसली तरीही, राधिका हिचा दृष्टीकोन नेहमीच चांगला असतो. शशांक हा खूप मोठ्या हुद्द्यावर एका बड्या कंपनी मध्ये नोकरी करत असतो. त्यामुळे जरी मुलांना तो शनिवार-रविवारी घेऊन जातो तरीही कधी कधी असे प्रसंग येतात कि हा दौऱ्यावर गेलेला असतो आणि मुलांना राधिकाबरोबर राहावे लागते. बरेचदा, ऑफिसमध्ये खूप काम असल्याने, मुलांना ने -आण करण्याची जबाबदारी पण राधिकावर टाकली जाते.
त्याच दरम्यान अस्मिता आता CA ची प्रक्टिस करणार असे शशांकला सांगते आणि मुलांची जबाबदारी जरा जास्त घेण्याची विनंती करते. एके दिवशी ती कामानिमित्य दौऱ्यावर जाणार असे सांगते, पण एका दुसऱ्या माणसाबरोबर गप्पा करत असलेली राधिकाला दिसते. याच गैरसमजातून एक कडू सत्य बाहेर येते. अस्मिता यानंतर पुढे काय करते, राधिकाला आपल्या मुलांची आई असे ती समजू शकते का, शशांक आणि अस्मिता या नंतर एकमेकांशी कसे वागतात, शेवटी राधिकाला मुलांच्या मनात स्वताबद्दल स्थान निर्माण करता येते का हे बघा "तुझ्या-माझ्यात".
सिनेमा ठीक आहे. घटस्फोटानंतर देखील मुलांसाठी आई-वडिलांचे संबध ठीक असू शकतात असे दाखवण्याचा प्रयत्न इथे केला आहे असे जाणवते. मला राधिकाची भूमिका खूप ताकादाची वाटली. घटस्फोटानंतर देखील मुलांसाठी आई-वडिलांचे संबध ठीक असू शकतात असे दाखवण्याचा प्रयत्न इथे केला आहे असे जाणवते. मला राधिकाची भूमिका खूप ताकादाची वाटली. शशांक बरेचदा ऑफिसमध्ये खूप काम आहे म्हणून राधिकावर जबाबदारी टाकतो, तेव्हा हि सगळे मुकाट्याने स्वीकारते. मनाने खूपच चांगली आहे असे दाखवले आहे. शेवटी जेव्हा ती अस्मिताला सांगते कि "पार्टनर चांगला नाही म्हणून खेळ सोडून देणे हे कधीही योग्य नाही" हे अस्मिताच्या भूतकाळावर अगदी परखडपणे, पण आडून ठेवलेले मत आहे असे वाटले. अस्मिता व आबांमधील "मरण हे स्टेशन प्रत्येकालाच गाठायचे असते, फक्त प्रत्येकाचा मार्ग वेगळा आणि स्पीड वेगळा" हे वाक्य आवडले. सिनेमा ठीक आहे.जरा रडका आहे असे मी म्हणीन. सगळ्या कुटुंबाला सोबत घेऊन बघू शकू आहे. गोष्ट जरा वेगळी आहे, तरी आपण शेवट काय होईल याचा अंदाज बांधू शकतो.
Shasank Karnik is a businessman, with a decent business. Asmita is his ex wife, and they have two children. Nisha the elder one is a Teenager and Shubham is the younger son. Though Asmita and Shashank are divorced, they do meet each other. Nisha and Soham would spend weekends with thier dad where as Asmita with Shashank's uncle, who is called by everyone as Aaba. Shashank pays Asmita every month to maintain family and is now married to Radhika.
Radhika is also divorced from her first marriage. When her ex husband discovers that she can not deliver a child, he forced her to divorce on "Mutual Consent". But she is still leading life with positive mindset. She is striving to make Shashank and Children happy and tires to be part of the family. She is working in an advertising agency and is very creative and talented. She is also very busy with her own job. Shashank being a successful and busy businessman, has to travel a lot and at times on weekends the responsibility of children is on Radhika.
Nisha being a teenager has her own problems. She is good in dance and has a passion for it. She always compares Radhika with Asmita and hates and insults her, Radhika always tries to be nice with her. Nisha is also strong headed like her mother Asmita and adamant most of the times. She always looks for reasons to blame Radhika for something or the other. Asmita and Radhika always has a drift among them for obvious reasons.
One day Asmita meets Shashank in his office and informs him that she has decided to start her career as a chartered accountant. She asks him, if he can share responsibilities of the children with higher commitment now. He readily agrees, but hardly has time for children and the burden is on Radhika, who also has a demanding job. This causes a couple of uncomfortable incidences.

One day Asmita requests them to pick up children from school since she has to travel for her work. But the same evening she is seen in a conversation with a man. When inquired, she tells there was a slight change in the plan so she came early and calls up the person seen with her for confirmation.
Watch Tuzya Mazyat" to find out who the person is, why is Asmita seen with him, what are the reactions of Shashank, Radhika and children when they discover the reality.

Movie handles a uncommon topic of divorcees and single parent families. Some of the quotes in the movie are really good. "Death is the ultimate destination for everyone. Only difference is the vehicle one takes and the speed one travels with". Sachin Khedekar, Mrunal Kulkarni are well know and acted well. Sulekha Talwalkar has a really good role and justified it well. Mohan Joshi has a small but meaningful role.
Cast
  • Mrunal Kulkarni मृणाल कुलकर्णी
  • Sachin Khedekar सचिन खेडेकर
  • Mohan Joshi मोहन जोशी
  • Sulekha Talvalkar सुलेखा तळवलकर
  • Kaumudi Walokar कौमुदी वालोकर
  • Shreyas Paranjape श्रेयस परांजपे

Director

  • Pramod Joshi प्रमोद जोशी


Link to watch online




गुरुवार, एप्रिल ०२, २००९

कदाचित (Kadachit)


"कदाचित", कथा गायत्रीची. गायत्री एक खुप ख्यातनाम Neurosurgeon असते. तिला एक गोड मुलगी असते. नवरा anesthesia specialist असतो. उत्तम संसार सुरु असतो. आणि अचानक, २० वर्षांनी तिचे वडिल येतात. त्यांना बघून गायत्री चक्रावून जाते. तिचा असा विश्वास असतो की तिच्या वडिलांनी, आईचा खून केला आहे. तिला त्यांना अजिबात त्यांना घरात ठेवून घ्यायचे नसते. पण ते येउन चिकटतात. त्यांच्याशी नाईलाजाने बोलल्यानंतर तिला वेगळीच गोष्ट कळते. मग गायत्रीचा सत्य शोधण्याचा आटोकाट प्रयत्न सुरु होतो. सत्य समजल्यावर तिची कशी मानसिक ओढाताण होते, तिच्यातल्या अपराधीपणाची भावना कशी तिला त्रास देते. हे बघा कदाचित मधे. माणसाच्या अपरम्पार जपलेल्या विश्वासाला जेव्हा तडा जातो तेव्हा कसे होऊ शकते याचे सुरेख दर्शन आपल्याला इथे घडते.

अश्विनी भावे ची गायत्री अप्रतिम. मनोरुग्णाची भूमिका खुपच छान साकारली आहे. सदाशिव अमरापुरकरचे वडिल खुपच सही. आपल्याला खलनायक वाटणारे सदाशिव अमरापुरकर कधी नायक बनुन आपल्या ह्रुदयात स्थान घेतात हे आपल्याला देखिल कळत नहीं. सचिन खेडेकर गायत्रीच्या नवरयाच्या भूमिकेत छान शोभुन दिसतो. सिनेमा बघताना ३ तास कसे निघून जातात ख़रच कळत नाही. सिनेमाचा शेवट नक्की काय असेल हे देखील शेवटपर्यंत समजत नाही.

सिनेमा खुप छान. जरुर बघाच.

Direction
  • Chandrakant Kulkarni चंद्रकांत कुलकर्णी 
Cast
  • Ashwini Bhave अश्विनी भावे
  • Sachin Khedekar सचिन खेडेकर
  • Sadashiv Amarapurkar सदाशिव अमरापूरकर
  • Tushar Dalavi तुषार दळवी

Link



आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा.