Milind Gunaji लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Milind Gunaji लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, सप्टेंबर २८, २०१०

दहावी फ (Dahavi Pha)

02 
 रावसाहेब पटवर्धन शाळेत (किंबहुना कुठल्याही शाळेत) वर्ग मुलांच्या कुवतीनुसार निर्माण केलेले असतात. त्यात मुख्यत्वेकरून "अ" तुकडी हुशार मुलांची तर बुद्दू मुलांची तुकडी "फ" असा एक अलिखित नियमच आहे. तशीच "दहावी फ" हि रावसाहेब पटवर्धन शाळेतील मुलांची तुकडी. या तुकडीतील मुले, हि गरीब आई-बापांची, ज्यांना पोटापाण्याची सोय लावण्यासाठी होण्याऱ्या कामाच्या रगाड्यात मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नसतो अश्या गरीब आईबापांची असतात. दहावीच्या सहामाही परीक्षेत इतर तुकडीतील सगळी मुले चांगल्या मार्कांनी पास होतात तर दहावी फ मधील फक्त ३ मुले अतिशय कमी मार्कांनी सगळ्या विषयात पास होतात व इतर मुले नापास झालेली असतात.


आधीच निकाल खराब लागलेला, त्यात अ तुकडीतील एक मुलगा, फ तुकडीतील मुलाला चिडवतो. त्यात सगळी तुकडीच एकमेकांशी भांडायला लागते. आता या भांडणात नक्की कोणाची चूक हे समजून न घेता, चूक फ तुकडीतील मुलांचीच असणार असा शिक्षकांचा समज होतो आणि ते फ तुकडीतील सगळ्या मुलांना ५० रुपयांचा दंड ठोठावतात. या सगळ्या प्रकाराने फ तुकडीतील मुले खूप चिडतात व रागाच्या भरात शाळेत तोडफोड करायचा निर्णय घेतात.



एके दिवशी रात्री व्यवस्थित प्लान करून मुले शाळेतील प्रयोगशाळेवर हल्ला करतात. त्यांना रस्त्यावरील एक मुलगा मदत करतो. शाळेत तोडफोड तर करतात, पण त्या तोडफोडीत सामील असलेल्या "सिद्धार्थ जाधव" नावाच्या मुलाची ओळख दुसऱ्या दिवशी शाळेतील शिपायाला पटते. आता एक मुलगा फ तुकडीतील आहे असे कळल्यावर सगळी मुले फ तुकडीतील असणार असा सगळ्यांचा विश्वास बसतो. प्राचार्य पोलिसांकडे तक्रार करण्याचे ठरवतात.



शाळेत गणित व शास्त्र शिकवणारे शिक्षक गणेश देशमुख हे मात्र फ तुकडीतील मुलांना मिळण्याऱ्या वागणुकीवर खुश नसतात. त्यांना या मुलांबद्दल तितकेच प्रेम असते, जितके त्यांचे अ तुकडीतील मुलांवर असते. ते मुलांना प्रेमाने विचारतात कि अशी नासधूस का केलीत? पण सुरवातीला मुले नीट उत्तरे देत नाहीत. पण जेव्हा मुलांना खात्री पटते कि देशमुख सर चांगले आहेत तेव्हा हि मुले सगळे खरं खरं सांगतात. मग या तोडफोडीची प्रायश्चित्त म्हणून सगळी उपकरणे मुलांनी स्वताच्या मेहनितीने भरून द्यायची असे ठरवतात. मुले पण त्याला होकार देतात. काही गोष्टी तर दुरुस्त करून वापरणे शक्य असते पण काही गोष्टी विकत घ्यायला लागणार असतात. या सगळ्याचा खर्च २५००० येणार असतो, तो खर्च सगळी मुले काम करून, पैसे जमा करून भरून देण्याचे ठरवतात. आता या मुलांना या सगळ्यात यश येते का ? या मुलांना इतर शिक्षक आणि विद्यार्थी समजून घेतात का हे बघा "दहावी फ" मध्ये.

सिनेमा अतिशय उत्तम आहे. घरातील समस्त जनांना घेऊन बघण्यासारखा आहे. सिद्धेश जाधव ची आई देशमुख सरांबरोबर जे काही बोलते ते अगदी खरं आहे व खूप विचार करण्याजोगे आहे. देशमुख सर त्यांच्या कॉलेजजीवनातील प्रसंग सांगतात तो खूप चटका लावण्यासारखं आहे. अतुल कुलकर्णीचा गणेश देशमुख खूपच छान, त्याचबरोबर ज्योती सुभाषची भूमिका पण अतिउत्तम. सिनेमातील सगळेच लोक आपापल्या परीने चांगली भूमिका करतात.

अगदी सामान्य वाटणाऱ्या मुलांमध्ये पण खूप काही चांगले गुण असतात, त्याची चांगली जोपासना करायला पाहिजे असा संदेश हा सिनेमा देऊन जातो. सिनेमा अगदी जरूर बघावा असाच आहे. तुमच्या प्रतिक्रिया जरूर लिहा.


Raosaheb Patwardhan School has sections of students in every class according to merit. Section A are all bright & studious student and Section F is all dull. This is the usual convention in most Indian schools. Same is the case with this 10th F of Raosaheb Patwardhan High School. Most of the students in 10th F class are from poor families, where parents have to work hard, and do not have time to pay attention to the kids.

In the mid term examination almost all the students from section A through E pass, but from section F only three pass with minimum passing scores and all others fail in one or more subjects. Because of this, school principal warns section F students, that unless they show improvement immediately, they will not be allowed to appear for the board examination. And we all know how important is Board Examination in India.



All the section F students are upset due to the poor results, and to add fuel to fire a boy from section A comments and teases section F boys. This leads to a fight in the school and the section F children were held responsible. They are all made to pay Rs. 50 fine, despite of their bad economic condition. Disturbed by this injustice, they decide to break open the school and take revenge.

Soon one of the nights, they make a plan and attack the school. They destroy several things, but main destruction was the science lab. One street boy also helps them in the process. While doing this, one of the watchman get small injury. But he recognizes one of the students in the gang. He identifies Sidhharth Jadhav of section F. Now since Sidhharth is from Section F, the authorities conclude that all the children of same section were in the gang. The principal decides to involve police in the incidence.


Ganesh Deshmukh, Science and Mathematics teacher is a balanced person, and he loves the Section F as well as section A. He takes initiative and intervenes. He convinces principal that involving police will have multiple implications and might earn bad name for the whole school. He starts talking to the section F students. Initially the students are reluctant to talk to him, but slowly they realize, he is really considerate and is caring for them. Finally the students confess and ask for his guidance.



Prof. Deshmikh strikes a deal with the children. To protect them from police complaint and other embarrassments they should earn money and rebuild all the things they broke. Also they can repair the things themselves if they can, to save some money. Total expenses are estimated to be Rs. 25,000. The students take the challenge and start working on it as a team. Can the students do it ? Do they get help from others ? Do they get help from teachers.? Do they accept this help.? To get answers to all these you should watch "Dahavi Pha. 



The movie is really good and I would recommend to all. This is an entertaining movie. Some conversations are really thought provoking. Conversation between Prof. Deshmukh ans Sidhharth's mother is one such. Prof. Deshmikh's incidence from his college is really touching. Atul Kulkarni is really good like most of his recent roles. Jyoti Subhash is good too. In general all the people have acted well, though many of the students are new actors.



This movie highlights the point, how ordinary looking kids have some good talent and skill, which just needs a bit of polishing and it glows. Do watch the movie if you have not. And do write your comments in the comments section below.


Cast

  • Atul Kulkarni  अतुल कुलकर्णी
  • Rajesh More  राजेश मोरे
  • Shreeram Ranade श्रीराम रानडे
  • Yashodhan Baal  यशोधन बाळ
  • Satish Taare सतीश तारे
  • Sunil Godase  सुनील गोडसे
  • Sampat Kambale  संपत कांबळे
  • Jyoti Subhash ज्योती सुभाष
  • Milind Gunaji मिलिंद गुणाजी
  • Renuka Daftardar रेणुका दफ्तरदार

Direction
  • Sumitra Bhave सुमित्रा भावे
  • Sunil Sukhthankar सुनील सुखटणकर



Link to watch online


Movie

बुधवार, मार्च १०, २०१०

मेड इन चायना (Made in China)


अप्पा जगदाळे खूप मोठे राजकारणी. यांची पिंपळगावला खूप जमीन असते. पुणे-मुंबई रस्त्यावर जर सेझ (स्पेशल इकॉनॉमिक झोन) आणला तर तेथील भागाची खूप प्रगती होईल व त्याचबरोबर स्वताला पण बरेच पैसे मिळतील, अश्या विचाराने अप्पासाहेब थडानी नावाच्या मोठ्या व्यावासिकाबरोबर हातमिळवणी करतात. आता याच भागात पिंपळगाव असल्याने तिथली जमीन मिळवणे पण सोपे होणार, आणि सगळ्या भागाचा विकास होणार या कल्पनेने सगळे लोक आनंदाने त्यांची जमीन विकतील असे अप्पासाहेबांना वाटते. अप्पाना एक मुलगी असते, तिचे नाव प्राची. प्राचीचे सगळे शिक्षण अमेरिकेत झालेले असते. अप्पांचे भाऊ, भाऊसाहेब जगदाळे, यांना २ मुले, दीपक व मोहित. दीपकला अप्पांनी स्वताबरोबर राजकारणात घेतले असते. व प्राची पण त्यांच्याकडे राजकारणाचे धडे घेत असते. दीपक हा बाहेरख्याली असतो, शिवाय त्याला जुन्या शस्त्रांचा संग्रह करण्याचा छंद असतो. दीपकचे त्याच्या बायकोबरोबर खास पटत नसते. इकडे मोहित व त्याची बायको निलांबरी हे दोघे खूप सुखी असतात. व निलूला दिवस गेले असल्याने दोघे खूपच खुश असतात.


मोहितने इस्त्रालय मध्ये जाऊन शेतीचे शिक्षण घेऊन इथे आधुनिक प्रकारची शेती करत असतो. व पिंपळगाव मधील सगळ्या शेतकर्यांना देखील आधुनिक शेतीचे ज्ञान देऊन तिथे खूपच प्रगती होते. तेथील माल एक्स्पोर्ट होत असतो. SEZ मुले आता सगळी जमीन थडानीला देणे मोहितला अजिबात पटत नाही.

याच गावात राहणारा अप्पांचा विरोधक कैलाश शिंदे याला देखील हि गोष्ट पटत नाही. आता थडानी सारख्या मोठ्या उद्योगपतीला तोंड द्यायचे म्हणून कैलाश त्यांच्या कार्यकर्त्यांकरवी हिंसेचा मार्ग अवलंबतो. जेव्हा जमिनीचा सर्वे करण्यासाठी जेव्हा लोक येतात तेव्हा हे कार्यकर्ते त्यांना चांगले बडवून काढतात. मोहित कैलाश बरोबर हात मिळवणी करायला जातो. कारण दोघांचा उद्देश एकाच असतो सगळ्या सुपीक जमिनी वाचवणे. पण कैलाश मोहितवर विश्वास ठेवत नाही. व दोघे आपापल्या मार्गाने अप्पाना सगळ्या जमिनी थडानीला देण्यात अडथळे निर्माण करतात. SEZ प्रकरण असे बरेच चिघळत जात असते, आणि चित्रपटाला एकदम कलाटणी मिळते. अप्पाचा एका मॉल मध्ये खून होतो. त्यामुळे SEZ प्रकरण जरा थंड होते व आता पुढे SEZ चे काय होणार असे वाटू लागते. पोलीस अप्पांच्या खुनाचा शोध घ्यायला येतात. या शोधात नक्की काय सापडते, कोणी खून केला असेल, सेझसाठी लागणाऱ्या जमिनी थडानीला मिळतात का हे बघा "मेड इन चायना" मध्ये.


सिनेमा ठीक आहे. SEZ म्हणजे नक्की काय हे या सिनेमातून नीटसे समजत नाही. SEZ नावाचे काहीतरी असते, हे फक्त कळते. सेझ हि संकल्पना चायनाने सुरु केली आहे त्यामुळे या सिनेमाला मेड इन चायना असे नाव देण्यात आले आहे. नावाकडे बघून असे वाटते, कि चीन मधून भारतात एक्स्पोर्ट होणाऱ्या गोष्टीमुळे नक्की काय होतंय, याचे चित्रण असेल, पण तसे काही होत नाही. पूर्वार्धात सुपीक जमिनी जाऊ नये, म्हणून शेतकऱ्यांचा लढा असेल अशी वाटणारी गोष्ट उत्तरार्धात रहस्यकथा वाटायला लागते. सोनीवर बघत असलेला CID कार्यक्रम बघत आहोत कि काय असं वाटू लागते. सिनेमात एकाच गाना आहे, आणि ते पण आता कशाला उद्याची बात चे रिमिक्स. ते काही खूप छान नाही. एकूण सिनेमा ठीक आहे. रहस्यकथा आवडत असेल तर बघावा असा. पण शेवटच्या काही मिनिटात आपण खुनी कोण आहे हे देखील ओळखतो.

अभ्यासू लोकांना जर SEZ बद्दल माहिती हवी असेल तर इथे लिंक दिली आहे. या सिनेमाला मेड इन चायना हे नाव का दिले आहे याचा शोध घेत असताना SEZ बद्दल बरीच माहिती मिळाली. हीच माहिती काही थोड्या संवादातून टाकली असते तर अधिक चांगले झाले असते.


Mohit Jagdale is a progressive farmer is Pimpalgaon. He is staying with his wife Nilambari and Grandmother. Appasaheb Jagdale, his uncle is Politician and Member of Parliament for the region. He is very renowned for his good developmental work in the region. He has one daughter Prachi, who has studied management abroad, and is back to Pimpalgaon to work with her father. Deepak is elder brother of Mohit, who is also in politics with his uncle Appasaheb. Deepak is characterless and treats his wife Yogita is unhappy due to this. Deepak has a hobby for collecting weapons and has a good collection of antic weapons and guns.


Appasaheb decides to get Special Economic Zone (SEZ) to his region, and develops ties with a businessman called Thadani. This needs a huge land of the order of 45 thousand acres for the project. This land needs to be procured from all the farmers of the region. So many families will loose their land and in turn their source of income. As part of the deal, Appasaheb is responsible to handle procurement of the land using his goodwill and political powers. Thadani on the other hand would invest in the infrastructure and develop the industries and townships.

Several people including Mohit are unhappy about this. Another major opposition is from Kailash Shinde, who is opposition politician in the town. His father has disappeared few years back, who was also opposing Appasaheb, and Kailash believes Appasaheb is behind his disappearance. He has a Agriculture supplies business and is worried if the lands are converted into industries, his business will close down. Both Kailash and Mohit have their own setsof supporters.


Bhausaheb, Mohit's father and Appasaheb's brother was a simple man, and respects farming then anything else. After his death Appasaheb supported Mohit and sent him to Israel for further training in agriculture. On his return he told him to take charge of the farmland and transform it into model agriculture. Thadani has been doing business in the region and has been major customer for agricultural and dairy products. Mohit has established modern dairy and poly-house for export oriented Flori-culture. With the new proposal his whole profession is in danger. So he tries to convince Appasaheb against the plan, but he faltly refuses and looses Mohit's respect.


Mohit tries to join hands with Kailash to protest against SEZ. But Kailash does not believe him and refuses to work with him. The whole issue is getting complicated and Appasaheb is killed by a shooter in a mall, while he was inaugurating it. The movie becomes a mystery at this point. Who is the killer ? What happens to the plan of SEZ ? Who succeeds Appasaheb in his political career ?

The movie starts with political movie with a theme of agriculture versus development. It touches issues like should a good fertile and well developed land be converted into industry ? Would people dependent of farmlands as their source of income, get decent jobs in the proposed industries or they will be left with labor jobs like sweepers etc. ? It it good idea to borrow concepts like SEZ blindly ?


It took some time for me to research and understand why the movie is named Made in China. The main concept of SEZ was developed and demonstrated successfully in China and was then copied by several other developing countries. More information on SEZ can be found here.

I would recommend you to watch the movie, if you enjoy Mystery movies and movies which make you think a bit. There is no powerful character role in the movie, though there are several renowned actors like Madhura Valankar, Sandeep Kulkarni, Milind Gunaji, Mrunal Kulkarni. Dr. Sharad Bhutadiya has justified his role in the movie well.


Cast
  • Sandeep Kulkarni संदीप कुलकर्णी
  • Milind Gunaji मिलिंद गुणाजी
  • Mrunal Kulkarni मृणाल कुलकर्णी
  • Upendra Limaye उपेंद्र लिमये
  • Madhura Velankar मधुरा वेलणकर
  • Deepshikha दीपशिखा
  • Dr. Sharad Bhutadiya डॉ. शरद भुताडिया
  • Shilpa Nawalkar शिल्पा नवलकर
  • Puja Naik पूजा नाईक
  • Uttara Bawkar उत्तरा बावकर
  • Anand Alakunte आनंद अलकुंटे
  • Kanchan Pagare कांचन पगारे

Director
  • Santosh Kolhe संतोष कोल्हे


Link to Watch online


Official website