"ह्या बायकांच्या मनात असते तरी काय?" असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हा चित्रपट पहाच. कथानक अगदी साधे. चित्रपटाचा नायक रंगा एक मध्यमवर्गीय चाळीत रहाणारा, घरात आई, वडिल, आजी, बहिण व बायको. वडिल कधीच बोलत नाहीत. त्यामुळे घरात कायम चार बायकाच बोलणार, ऑफिस मध्ये बॉस पण बाईच, आणि ती पण जरा खडूस. त्यामुळे एकुणात बायकांवर वैतागलेल्या रंगाच्या मनात येते कि आपल्याला बायकांच्या मनातील समजले तर किती बरे होईल.
एक दिवस देवी च्या मंदिरात असताना खरच त्याला सर्व बायकांच्या मनातील ऐकू यायला लागते. आणि मग सुरुवातीला त्याचा उडालेला गोंधळ फारच मजेशीर आहे. नंतर त्याला याचा खूपच त्रास होऊ लागतो आणि तो डॉक्टर ला भेटतो. सुरुवातीस डॉक्टर बाईंचा विश्वासच बसत नाही. पण मग जेव्हा त्यांच्या मनातील सर्व तो घडाघडा सांगतो तेह्वा त्या पण चक्रावून जातात आणि शेवटी सल्ला देतात कि माझ्याकडे काही उपचार नसल्याने तू याचा काही चांगला वापर करून घेऊ शकलास तर पहा. आणि मग रंगाचे जीवनच बदलून जाते.
प्रथम बायकोला तो हे समजावून देतो आणि तिला हे गुपित ठेवायला सांगतो. मग घरातील आई, बहिण व आजी यांच्या मनातील गोष्टी करतो किंवा त्यांना समजाऊन सांगतो. त्यामुळे त्यांची उडालेली गम्मत चांगली दाखवलेली आहे. आधी वडिलांचा राग करणारा रंगा आईच्या मनातून त्यांची बाजू समजाऊन घेतो आणि त्यांच्याशी चांगला वागू लागतो. त्याचप्रमाणे ऑफिस मधील बॉस व इतर महिलांशी वागण्याचा पण दृष्टीकोन बदलतो.
यानंतर मात्र थोडा मसाला चित्रपटात येतो, हा टाळला असता तर चांगले झाले असते. परंतु एकुणात संजय नार्वेकरचा एक छान मराठी चित्रपट म्हणावयास हरकत नाही. यातील "मन उधाण वार्याचे" गाणे खूपच छान आहे. याची मुळ कल्पना "What Women Want" वरून घेतली आहे असे म्हटले तरी चित्रपट चांगला जमला आहे व पाहण्यासारखा आहे. आपल्या प्रतिक्रिया जरून लिहा.
One day he actually starts hearing what all the ladies in his surroundings are thinking. There starts the comedy and tragedy of his life. Initially he finds ot very difficult to deal with, even tries to consult a Doctor. But no one could help him deal with miracle. The Doctor suggests he should try and utilize this rather than worry about it, and this changes his life.
Typical Bollywood masala like item song and terrorist twist etc. is there, but in spite of that the movie is worth watching I would say. Please do leave your comments.
Cast :