Nana Patekar लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Nana Patekar लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, ऑक्टोबर १४, २०१५

द अटॅक ऑफ २६/११ (The attack of 26/11)



२६/११ मध्ये मुंबई वर झालेल्या आतंकवादी हल्यावर हा सिनेमा आहे हे सांगायला नको. नावावरून ते स्पष्टच आहे. हा आतंकी हमाला खूप जास्त कव्हर झालेला आहे मिडिया मधे. तिथे झालेला हमला हा इतका भयानक होता कि त्याबद्दल रकाने च्या रकाने भरून पेपर मध्ये लिहून येत होते. त्यामुळे या सिनेमा ची स्टोरी अशी काही लिहायला नको. पण आता हा हमाला ज्या एका सूत्रात गुंतवला आहे तो म्हणजे, पोलिस कमिश्नर त्यांची बाजू चौकशी समती समोर मांडताना. मुंबई च्या पोलिस कमिशानारांवर आरोप होता कि त्यांनी हल्याची बातमी मिळाल्यावर लगेच कारवाई केली नाही. त्यांनी लीडरशिप दाखवली नाही.

कथा जशी घडली तशीच दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्याची नाटकीय रुपांतर कधी कधी खूपच नाटकी झाले आहे असे वाटते. जसे, बोटीतून येत असताना, ज्या नावाड्या ची बोट पकडून ते येतात्त, त्याला मारातानाचा प्रसंग. असे दाखवले आहे कि कसाब अगदी समोर उभा आहे आणि दुसरा आतंकी वादि नावाड्याला मारतोय. आता इतक्या समोर उभा असताना त्याच्या समोर नावाड्याच्या शरीरातील रक्त उडणार असा साधा सुज्ञ विचार दिग्दर्शकाला पटलेला वाटला नाहि. सगळ्यात शेवटी कसाबला पकडताना इतकी जास्त पोलिसांची कुमक दाखवली आहे, आणि ते सगळे एकच बाजूने आतंकवाद्याच्या गाडीला घेरतात हे जर मजेशीर वाटते. पोलिसांना इतकी अक्कल नसते हे काही पटत नाही.



सिनेमा बघताना मात्र काळजाचे पाणी होते, जे लोक खरच या प्रसंगातून गेले त्यांना खरच सलामी द्यायला हवी. बघूनच प्रसंग आपल्यावर ओढवला असता तर काय केले असते असा विचार मानत येतो. आणि अश्या प्रसंगी , कामा हॉस्पिटल मधील डॉक्टरने जसे सगळ्या पेशंटला लपवले तसा नीट सुज्ञ विचार अश्या बाक्या प्रसंगी सुचायला पाहिजे असे वाटून जाते. कारण अश्या प्रसंगात डोके शांते ठेवून न घाबरता येणाऱ्या प्रसंगाला तोंड देण्याची आपल्याला कधी शिकवण दिलेली नाही.

सिनेमा बघावा ज्या लोकांना २००८ मध्ये नक्की काय झाले होते हे आठवत नसल्यास. नाना पाटेकरने पोलिस कमिशनरची भूमिका केली आहे. कसाब अगदी ओळखू येईल अश्या चण्याच्या कलाकार घेतला आहे. त्याला बंदूक घेऊन लोकांना मारणे या शिवाय फार जास्त काम इंटरवलच्या आधी नाही.



It is needless to say the the movie is about the attacks on Mumbai on 26/11. This event was most covered terrorist attacks in the world probably. It covered all the TV channels and news papers for days and weeks. So the sequence of events is well know to most. But the story line is about a police commissioner who was controlling majority part of the anti terror operations and his take on the whole issue. He was blamed with inaction and lack of leadership qualities to counter the attack effectively. 

The attempt is to show some sequence of events as they happened. But at times there is over dramatization in filming. One of the examples to quote in the scene when the terrorists capture a boat in the sea, on the pretext of seeking help and then use that to reach Mumbai. One of the terrorist is shown cutting throat of the boat owner, and Kasab is shown closely watching the incident. He was shown so close to the scene that he could not have escaped without some blood spill on him. In another incident, when Kasab was captured, all the police force was approaching the car form the same direction, leaving remaining three directions completely open. This looks very stupid, for any police force to do.


It is so difficult to watch how people have gone through in those times, feel like really saluting the people who survived those attacks. It is beyond imagination, how we would react in those kinds of circumstances. The way the doctor protected most of the patients in Kama hospital was really commendable, and we think, can we really think and work like this in so much stress? Are we really trained to handle these kind of situations or even think straight in these times.  

I would strongly recommend for all to watch this movie. Nana Patekar has really done great job in the police commissioners role. Kasab is alright too, looks like real Kasab, but does not have much role half of the time.


Director

  • Ram Gopal Varma राम गोपाल वर्मा


Cast




Few links where actual interviews of the survivors and other reports are shown. These youtube vidoes are worth seeing

https://www.youtube.com/watch?v=Li4qNtHF9J0
https://www.youtube.com/watch?v=hmr9Zlh0YxE
https://www.youtube.com/watch?v=epkKI4zqkdo

मंगळवार, मार्च २३, २०१०

पक पक पकाक (pak pak pakak)

"चिखलू", हा आई वडिलांचे छत्र हरवलेला एक हुशार, बिनधास्त आणि व्रात्य मुलगा असतो. तो दिवसभर गावात सगळ्या लोकांच्या खोड्या काढत फिरत असतो. त्याच्याबरोबर गावातील सगळी मुलं पण दंग मस्ती करतो असतो. चिखलू त्याच्या आजी जवळ राहत असतो. आजीजवळ सगळे लोक तक्रारी करत असतात. त्यामुळे आजीला अगदी जीव नकोसा होतो. पण हिचा चिखलूवर खूप जीव असतो. गावात काहीही घडले कि लोक चिखलू वर आरोप करत असतात.गावातील लोक आपल्या मुलांना चिखलू पासून दूर राहा असे सांगतात. पण बऱ्याच मुलांचे चिखलूवर प्रेम असते. चिखलू शाळेत न जाता, मस्ती करत बसतो. जेव्हा तो शाळेत जातो, तेव्हा मास्तराच्या खोड्या काढतो. एकूण सगळ्या लोकांना चिखलू त्रास देतो.

गावाच्या शेजारी एक मोठे घनदाट जंगल असते. तिथे एक भूत राहते आणि ते भूत या गावातील लोकांना त्रास देत असा इथल्या लोकांचा विश्वास असतो. जंगलातील भुताला गावातील लोक, बळी वगेरे देतात, जेणेकरून भूत खुश राहील व लोकांना त्रास देणार नाही. गावातील सगळ्या लोकांचे आयुष्य या भूत्याभोवती फिरत असते. गावात कोणाची तब्येत बिघडली, किंवा कोणी मेले, तरीही भूत्यामुळे होते आहे असे सगळे म्हणतात. एकूण गावातील सगळ्या लोकांचे आयुष्य भूत्याभोवती फिरत असते.

एक दिवस शाळेत मास्तर रागारागात चिखलूला म्हणतात कि गावात सगळे लोक भूत्याला घाबरतात पण तूच एक असा आहेस जो भूत्याला घाबरणार नाहीस. तू का जात नाही जंगलात, त्याने गावातील लोक तुझ्या खोड्यांपासून तरी वाचतील. हे ऐकून चिखलू सगळ्या मित्रांना घेऊन जंगलात जायला निघतो, पण सगळी घाबरून परत फिरतात. हा एकटाच जंगलात जातो. तिथे गेल्यावर त्याला चित्र विचित्र आवाज येतात. तरी तो पुढे पुढे जात राहतो. तिथे एका पडक्या इमारती मध्ये जातो,तिथून खूप पक्षी येतात, त्या पक्ष्यांना घाबरून चिखलू पळत सुटतो आणि एका झाडाच्या फांदीला अडखळतो त्याच्या डोक्याला मार लागतो तो जेव्हा त्याला जाग येते, तेव्हा तो जंगलाबाहेर पडलेला असतो, व त्याच्या जखमेवर औषध लावलेले असते.

चिखलूवर खूप प्रेम करते गावातील एक मुलगी म्हणजे साळूताई. हिला लग्न करायचे नसते, पण हिचे आई वडील हिचे कोणाशी तर लग्न करून द्यायचे असा घाट घालत असतात. हिला मनाजोगता जोडीदार मिळाल्याशिवाय लग्न करणार नाही असे हिने ठरवलेले असते. चिखलू आणि साळू या दोघांची खूप मैत्री असते. चिखलूला समजून घेणारी त्याच्या आजी व्यतिरिक्त साळू हि एक मैत्रीण, ताई असते. साळू चीखालुला बरेचदा विचारते तो जंगलात का गेला, पण चिखलू काहीच सांगत नाही.

या प्रसंगानंतर चिखलूला वाटते कि भुत्या हा चांगला आहे. त्यामुळे चिखलू पुन्हा जंगलात जातो भूत्याचा शोध घ्यायला आणि एका अनपेक्षित क्षणी त्याची भूत्याशी भेट होते. शेवटी भुत्या हा नक्की कोण असतो, तो असा का वागतो हे बघायला मिळते पुढील सिनेमात. भुत्या आणि चिखलूची मैत्री, लोक कसे उगाचच कशाहीवर विश्वास ठेवतात हे बघा "पक पक पकाक"मध्ये.

चिखलू व भुत्याचे एकमेकांशी होणारी मैत्री, त्यांचे एकमेकांवरील प्रेम, चीखालुला भुत्या कसा नकळतपणे शिक्षण देतो, ते सगळे प्रसंग एकदम मस्त आहेत. नाना पाटेकर "भुत्या"च्या भूमिकेत खूपच मस्त. सक्षम कुलकर्णीचा चिखलू छान. फक्त त्याने जरा वजन कमी केले असते तर चांगले झाले असते, कारण गावात इतकी लठ्ठ मुले नसतात. सिनेमातील गाणी पण चांगली आहेत. सक्षम कुलकर्णीला या सिनेमासाठी AsianFestival of First Films (AFFF) चे बेस्ट अक्टर अवार्ड मिळाले आहे. लहान मुलांना घेऊन बघण्यासारखा सिनेमा आहे. सिनेमा छानच आहे. जरूर बघावा असा.

Pak Pak Pakak is a movie set in a small village. Chikahlu is a village boy, who has lost his parents at early age and is taken care by his grandmother. He is a very naughty kid, always playing mischiefs with all the villagers. He has lot of friends, but the parents of his friends are not allowing the kids to play with him, due to his reputation of naughty kid.

He has a good friend Salu. She is one of his neighbors, older than Chikhalu by few years. Her parents want her to get married, but she insists that she will marry only she finds a suitable man. Salu and Grandmother are the only two in village protecting Chikhalu, and who believe he is a good boy by heart but just a bit too naughty. Anything wrong in the village and the blame will be on Chikhalu.

Adjacent to the village s a forest. And all the villagers believe that there is a ghost in that village. People call it Bhutya. People have experienced strange things in the forest, which has led them to believe in Bhutya. Several people have tried unsuccessfully to find out about Bhutya. Finally they start worshiping Bhutya out of fear and belief that worshiping will protect them from the ghost.
One day, Chikhalu's teacher is irritated with his pranks and says why don't you visit Bhutya so that village will get rid from your pranks. This idea gets into fearless Chikhalu's head and he enters the forest with some of his friends. In few minutes, all the friends come out of the forest fearing Bhutya, and Chikhalu continues his adventure alone. But finally the silence and sound of different birds and animals induces fear in him. He starts to run back towards village but bumps on a low lying branch of a tree and gets unconscious. When he wakes up, he was just outside the forest with some herbal medicine applied to his wound.

Salu tries to get his reason for entering the forest and what happed with him, but Chikhalu wit fully avoids to answer. Salu is not convinced,but lets go for the time being. Chikhalu feels that Bhutya has helped him and decides to try to meet him again. He manages to enter the forest again and meets Bhutya. It will be spoiler to tell who Bhutya is and the story behind Bhutya's existence, how Chikhalu develops friendship with him.

Nana Patekar is really good in as Bhutya. Saksham Kulkarni has won awards for this role. He has acted really well throughout. Only things does not fit with the movie is his stout physique. Narayani Shastri is good as Salu. A must watch movie, specially if you want to watch with kids. Music is good too.


Cast
  • Nana Patekar नाना पाटेकर
  • Saksham Kulkarni सक्षम कुलकर्णी
  • Narayani Shashtri नारायणी शास्त्री
  • Usha Nadkarni उषा नाडकर्णी
  • Jyoti Subhash ज्योती सुभाष
  • Prachi Shah प्राची शहा

Direction
  • Gautam Joglekar गौतम जोगळेकर


Link to watch online