गुरुवार, मार्च १०, २०१६

यंदा कर्त्तव्य आहे (Yanda kartavya aahe)

राहुल देसाई हा एक बँकेत नोकरी करणारा तरुण लग्नासाठी तयार नसतो. पण त्याची आजी खूप आजारी पडते, आणि आजीची इच्छा असते कि राहुलचे लग्न झालेले  बघायचे. मग राहुलचे आई वडील खूप स्थळ बघतात. राहुल त्यातील एक मुलगी पसंत करतो. राहुलचे म्हणणे असते कि साखरपुडा करू पण लग्न अजून काही दिवसाने करु. पण राहुलचे आई-वडील, आजीची शेवटची इच्छा असे म्हणून लग्न करायला लावतात.

राहुलचे स्वातीशी लग्न होते. पण दोघांना एकमेकांना लग्नापूर्वी भेटून आवडी-निवडी समजून घ्यायला वेळच नसतो कारण लग्न अतिशय घाई घाईत होते. लग्न झाल्यानंतर मग दोघे हनिमूनला महाबळेश्वरला जातात. तिथे जाताना दोघेही अवघडलेले असतात . त्यातून स्वातीच्या भावाने जे हॉटेल बुक केले असते तिथे ह्यांचे बुकिंगच नसतेच. मग राहुल त्याच्या मित्राला, मंग्याला फोन करतो आणि अशोक विहार नावाच्या हॉटेल मध्ये यांच्या राहण्याची सोय होते. हॉटेल महाग असते पण आता दुसरे हॉटेल शोधणे शक्य नसते त्यामुळे तिथेच राहण्याचे ठरवतात.
तिथे त्यांना हॉटेलचे मॅनेजर पाठक भेटतात. आणि हे पाठक, राहुलच्या मित्राचे मित्र असतात. हॉटेल मध्ये गेल्यावर एक एक धमाल सुरु होते. आणि ती सगळी धमाल बघा "यंदा कर्तव्य आहे" या सिनेमात.

नवविवाहित दाम्पत्याला वाटणाऱ्या सगळ्या अडचणी खूप मजेशीर पद्धतीने दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्य म्हणजे अंकुश चौधरी आणि स्मिता शेवाळे यांनी तो खूप छान निभावला आहे. स्मिता शेवाळे या सिनेमात खूप सुंदर दिसते. सिनेमा छान आहे. विनोदी सिनेमा आवडत असल्यास जरूर बघावा.

Rahul Desai has a well paid job in a bank. He is not in hurry of marriage, but his grandmother is keen to see his wedding before her death. His parents convince him and find some good proposal for him. He likes one girl and thinks he can get officially engaged, and then then get married after awhile, once he knows her well. But once the decision is made, his parents rush him and get him married soon.

Rahul gets married to Swati. They do not really know each other well, since they do not get much time to spend together before the marriage. They leave for honeymoon to Mahabaleshwar, the popular hill station destination. By the time they reach there, they are really tired. After reaching the hotel, they get the news that the hotel they thought was booked not not actually booked for them and is full. They Rahul calls his friend Mangesh aka Mangya, he makes arrangements for them to stay in a hotel called Ashok Vihar. This hotel is expensive, but they still decide to stay there, since there is no other hotel available. 
The hotel manage Pathak is a friend of Rahul's friend Mangya. Pathak is an interesting character. The fun starts after they check in the hotel. Watch this in the Marathi movie "Yanda Kartavya aahe".

All the small problems and difficulties typical newly married couple who have gone through arranged marriage go through. Both Ankush Chaudhari and Smita Shevale have depicted the roles very well. If you love light comedies, you will enjoy this movie for sure. Do let us know your comments.

Direction

Cast

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा